Skip to main content

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 10/08/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज) फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता! ____________________________________ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ. मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो. ______________________________ पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे. आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो. त्यामुळे : चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी । हा आपला अनुभव होत नाही. आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही. _______________________ ट्राय टू अंडरस्टँड धिस, एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अ‍ॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं. थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक! ________________________ झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो. साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं. असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे. _________________________________ देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी तेणे समाधान मज जोडले ॐ मयी । त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल. ___________________________ अनंगपण फिटले मायाछंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी । असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल. ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्‍या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल. तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे. तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'. जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल. __________________________ पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी । हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही. ________________________________ ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी । हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता) असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय. तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय. __________________________ या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे. 'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
लेखनविषय:

वाचने 37925
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

हा प्रतिसाद पूर्णपणे चुकलेला आहे. .->

पैजारबुवा भाग मिल्खा भाग" बरोबरच खालचा व्हिडीयो देखील नक्की पहा ! { इतरांनी देखील पाहण्याचे कष्ट घेतल्यास माझी हरकत नाही. } मेजर जनरल जी.डी.बक्शी :-

In reply to by मदनबाण

प्रत्येकाने बघावाच असा हा अत्यंत ओजस्वी व्हिडियो दिल्याबद्दल मदनबाण यांचे अनेक आभार. या धाग्यावर चक्कर मारण्याचे सार्थक हा व्हिडियो बघून झाले.

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद काका ! मला माहित होते की या धाग्याचे टिआरपी मुल्य अधिक आहे, त्याचाच फायदा मी उचलला ! उद्देशच एकच सगळ्यां पर्यंत या व्हिडीयोतला संदेश पोहचावा. ज्या काश्मिर मधल्या ५ वर्षातील ३ पोस्टींग बद्धल त्यांनी सांगितले आहे त्या किस्तवाड { Kishtwar } मधेच सध्या दंगल चालु आहे ! देशातल्या अर्थव्यवस्थेचे ३-१३ तर वाजलेच आहेत शिवाय राजकिय अराजकता पराकोटीची झाली आहे. जनरलनी सांगितल्या प्रमाणेच आपला तमाशा झाला आहे ! राजकिय गँगरीन आपल्याला संपवायला लागला आहे. पाकडे आपल्याला ठार मारत आहेत... त्यांची खेळी मस्त चालु आहे. आपल्या मिडीयाला देखील ते लिलया खेळवायला शिकले आहेत... त्याचे उत्तम उदाहरण देतो, ते म्हणजे आत्ता ५ जवानांना ठार मारल्या नंतर सर्व मिडीया पाकड्यांवर आगपाखड करु लागले,यातुन त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी एक हाडुक टाकले ! कुठले हाडुक ? कोणी टाकले? तर शहरयार खान { Shahryar Khan } यांनी ते हाडुक टाकले... काय तर दाउद इब्राहिम पाकिस्तानात होता म्हणे ! आता तो म्हणे युएइ मधे असु शकतो ! झालं ते हाडुक टाकुन मोकळे झाले आणि आपले मिडीयावाले लगेच हे हाडुक चघळायला तुटुन पडले ! अरे ५ जवानांना ठार मारले ना पाकड्यांनी ? मग या माध्यमांनी सरकारला धारेवर धरुन हैराण करायला नको ? पण ह्यांना नविन हाडुक चघळायला मिळाल्यावर ५ जवानांच्या हत्येला ते क्षणार्धात विसरले देखील ! ही अवस्था आहे आपल्या मिडीयाची. त्याज्या बातमी नुसार पाक सैन्याच्या गोळीबारात जखमी झालेला अजुन एक शहिद झाला आहे. :( अजुन एक... अजुन एक... अजुन एक... आपण सर्वांनी फक्त मोजत बसायच ! मी आता अजुन एक व्हिडीया आता इथे देतो... पूर्व रॉ प्रमुख आरएसएन सिंग

In reply to by मदनबाण

बाणराव, दोन्ही व्हिडीओ पाहिले. त्यातले बरेच काही समजले. काहि ठिकाणी थोडा अडखळलो उदा. हेमंत करकरेंच्या उल्लेखाच्या वेळी. (अर्थात या विषयातले माझे वाचन फार तोकडे आहे) पण तुमचा हे सगळे दाखवण्या मागचा जो उद्देश होता तो नक्की सफल झाला. अजुन एक विनंती ह्या विषयासाठी वेगळा धागा काढला तर तो अधिक जणांपर्यंत पोचेल. (अस्वस्थ)

ह्याच ज्ञानेश्वर माऊलींनी हतिपाठामध्ये " हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी " असे म्हणुन नामस्मरणाचा महिमा गायिला आहे . मागे एका लेखात आपण
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे.
असेही म्हणाला आहात (संदर्भ : http://www.misalpav.com/node/24998) थोडक्यात ज्ञानेश्वर माऊली काही ठिकाणी योग्य आणि काही ठिकाणी व्यर्थ बोलतात असे आपले मत आहे काय ? ह्यावर जरासा प्रकाश पाडावा . (अवांतर : हा प्रश्न गिरीजा तांबे ह्यांनी विचारला आहे कि प्रसाद गोडबोले ह्यांनी की मुहम्मद अब्दुल्ला ह्यांनी की शेल्डन कुपर ह्यांने उत्तरावर परिणाम पडु नये अशी अपेक्षा आहे . अवांतर २: वरील आणि ह्या अवांतराला उत्तर देण्याचे टाळल्यास धागा अवांतरात जाण्याचे टाळता येईल .)

काही लोकांची स्वतःची संकेतस्थळं वगैरे आहेत अशी माहिती आहे (अ‍ॅट एनी गीवन टाईम, साधारण दोन किंवा तीन सदस्य उपस्थित असणारी). त्यांचा तिथे वेळ जात नाही म्हणून इथे येतात हे उघड आहे. येई नात का, पण आल्यावर प्रतिसादातून `फेसबुकी ज्योक' मारणं यात काय फुशारकी वाटते? एकच कारण असावं, हे असले उद्योग तिथे केले तर `एक सदस्यिय संकेतस्थळ' म्हणून गौरव होण्याची शक्यताच जास्त, म्हणून इथे हौस भागवत असावेत. स्वतःला गाढव म्हणवणारा एक आयडी, फक्त माझ्या लेखांवर गोंधळ घालायला निर्माण झाला (का केला?) आहे. आता स्वतःला गाढव म्हणणं यासारखा स्वतःचा अपमान नाही हे गाढवाला कसं कळणार? पण माणसाला तरी ते कळायला हवं! अर्थात इतक्या निम्न बुद्धीचं प्रदर्शन केल्यावर गाढव हा `आकार' आहे हे लक्षात येणं अवघडच. त्यामुळे स्वतःला गाढव आणि (त्यात पुन्हा निराकार!) म्हणून गाढव कितीही नाचलं तरी मराठीत त्याला गर्दभलीलाच म्हणतात.

In reply to by संजय क्षीरसागर

अहो कोण तुम्ही? स्वतःच्या एकूणच आवाक्याबद्दल इतके गैरसमज असतात तुमचे,मिपाकरांना या फुटकळ लेखांवर टिप्पणी करून पांडित्याची हौस आहे असं का वाटतं तुम्हाला?

कधी येणार? संजयजी मि आतुरतेने वाट बघतोय.... जाता जाता ...एक शंका आहे ती विचारुन घेतो... आमिर खान च्या मन चित्रपटातले एक गाने आहे .... " मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन " तर ह्या गाण्यावरुन गीत लिहण्यार्याला हेच सुचवायचे आहे की ...ह्रद्य किंवा ब्रेन नाही तर मन च प्रेम वैगेरे करायला लावते ...तर आपण मनाचे एकावे काय?? आणी "मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन" ह्याचे उत्तर आपण मनापासुन कसे वदवुन घ्यायचे??? कळावे लोभ असावा...

पण मी कदाचित हे लेखन समजायला बराच लहान आहे आणि ""एक्स्पिरियंस्ड इलाइट क्लास"" मध्येही नाही .. आता कसं होणार माझं :(

In reply to by स्पा

तुझं कसं होणार याची काळजी करू नको. आमची स्वाक्षरी वाच.तू त्या क्लास मधे नाहीस याची जाणीव म्हणजेच तू त्या क्लासला जायचा सोपानावर उभा आहेस ! भिउ नकोस त्या सोपानावर तुझ्या पाठीमागे कुणीच नाही. कारण उणीवेची जाणीव ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !

In reply to by चौकटराजा

कारण उणीवेची जाणीव ही जाणीवेची पहिली पायरी आहे मित्रा !
चोक्कस्स्स !

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिसादाचं शीर्षक + पहिलं वाक्य धरून सुद्धा sarcasm मधे काहीच फरक पडत नाही. आता तुमचे व्यनि मला वाचता येत नाहीत. व्यनिमधे कौतुक केले की ते खरे असे मानायचे का? तुमची कोणी टांग खेचत असेल तर तो व्यनि, खरड्वही, ईमेल, फोन, sms कशानेही खेचू शकतो. (मी स्पाने खेचली असेल असे म्हणत नाहीये पण नाकारतही नाहीये) असो बाकी. व्यनि म्हणजे व्यक्तिगत निरोप. आता व्यक्तिगत ह्याचा अर्थ तुम्हाला मी नव्याने सांगायची गरज नसावी. तुम्ही व्यनि खरडवहीतील गोष्ट धाग्यावर आणता आणि इतरांना लेख सोडून लेखकावर प्रतिसाद देता अशी दूषणे देता. त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर - वाचून मला जे वाटलं ते लिहीलं आणि जे मी तुमचा प्रतिसाद वाचून जे जाणवलं ते लिहीलं. बाकी तुमच्याकडून तुम्ही नेमकं तेवढंच सोडूनच दिलंय! हे वाचून डोळे पाणावले. मी गेल्या काही लेखात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची तुम्ही नेमकी सोडून दिली आहेत त्याचे काय?

In reply to by लंबूटांग

पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल! तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल तितकी तुमची मानसिकता उघड होत जाईल याचं भान ठेवून लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही कोणता प्रतिसाद म्हणत आहात माहित नाही मला पण त्या प्रतिसादाचा संदर्भ घेऊन हा प्रतिसाद sarcastic नव्हता असे कसे. मी लिहीले होते ते सांगायला की मी सर्व प्रतिसाद नीट वाचतो. म्हणून. भ्रमर १ वर पहिला प्रतिसाद बिरुटे सरांचा आहे. कैच्या कै. कसली मानसिकता आणि कसलं काय. जरा लिहाच तुम्ही माझ्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतेय. मलाही उत्सुकता आहे. इथेच लिहीलेत तरीही चालेल. मी अजिबात वैयक्तिक आरोप केलेत वगैरे बोलणार नाही. तुम्हाला माझ्या आजपर्यंतच्या ५-१० प्रतिसादांतून माझी मानसिकता कळली ह्याचेच मला आश्चर्य आहे. तुमच्या पोस्टवर तुमच्या सिद्धांतांवर/ विचारांवर कोणी आक्षेप घेतला की आक्रस्ताळेपणा करून वाट्टेल ते मानसिकता काय आणि inferiority complexकाय बरळायचे, स्वत:च्या सोयीनुसार एखादे वाक्य घेऊन त्याचा वाट्टेल तसा अर्थ लावायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सोयीस्कररीत्या टाळायचे हे सर्वांना माहिती आहे. बरं मागील धाग्यांत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणार का? तुमच्या संज्ञांच्या व्याख्या विचारल्या होत्या ते.

In reply to by लंबूटांग

लंबूटांगजी - मी एक सुचवू का..? ते सगळे प्रश्न (आणि शक्य झाल्यास लिंका) एका प्रतिसादात याच धाग्यावर द्या. आणखी कुणाचे अनुत्तरीत प्रश्न असतील तर ते येथेच येवूदेत.. माझेही काही अनुत्तरीत प्रश्न आहेत - शोधतो सवडीने! का त्याचा नवीन धागा काढूया..?

In reply to by मोदक

पण म्हटले इतरांना उपदेश करणारे संक्षी स्वतः सगळे नीट लक्ष देऊन वाचत असतीलच. म्हणून नाही दिल्या.
  1. येथे विचारले होते सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का? तिथेच विनंतीवजा सूचना केली होती तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
  2. त्याच धाग्यात परत आठवण करून दिली होती
  3. ही दुसर्‍या धाग्यावरील प्रतिक्रीया
  4. तिसर्‍या धाग्यात परत एकदा आठवण.
संक्षींनीच ह्या मालिकेतील पहिल्याच धाग्यावरील एका प्रतिसादात लिहीले होते की जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो. . माझ्याबाबतीत तरी असे काही घडले नाही ब्वॉ. बरं मोदकराव तुम्हाला नवीन धागा काढायचा असल्यास माझा प्रतिसाद तिथे उध्रुत करा बिन्धास्त. HTMLहवे असेल तर ते व्यनी/ इमेल करेन.

In reply to by लंबूटांग

आहो, तुम्ही स्वतःचे प्रतिसाद सुद्धा वाचत नाही असं दिसतंय! तुम्ही लिहीलंय :
त्याचा संपूर्ण प्रतिसाद - केवळ ह्याच नाही तर इतरही धाग्यांवर- वाचून
आणि त्याला उत्तर म्हणून मी लिहीलंय >पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल! याचा अर्थ पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद. असो, बाकी तुम्ही पहिल्या पोस्टवर जे दिव्य प्रतिसाद दिलेत ते वाचा. त्याबद्दल प्रथम तुम्हाला दिलगीरी व्यक्त करावी लागेल. नाही तर तुमचे प्रश्न आणि तुम्ही गोंधळ घाला.

In reply to by संजय क्षीरसागर

कोणता प्रतिसाद स्वतःचे प्रतिसाद संपूर्ण प्रतिसाद पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद दिव्य प्रतिसाद

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही संदिग्ध लिहीले आहे. पहिल्या पोस्ट्वरचा पहिला प्रतिसाद आणि पहिल्या पोस्ट्वरचा त्याचा पहिला प्रतिसाद यात प्रचंड फरक आहे. आणि दिलगीरी कशाबद्दल मी व्यक्त करावी ब्वॉ? माझ्या त्या प्रतिसादाची लिंक खाली दिलेली आहे. तुमचा स्मृतीसंबंधीचा जो सिद्धांत होता त्यातील त्रुटी मी उदाहरणासहित दाखवली. आता ती चूक असेल तर तुम्ही दाखवा तसे. मी कशाबद्दल दिलगीरी व्यक्त करायची?

In reply to by लंबूटांग

थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको.. ते म्हणतहेत तो स्पा चा पहिला प्रतिसाद हा आहे.
संजय क्षीरसागर बस नाम हि काफी हे ;-) रंजक लेखमाला वाचतोय
संक्षी - थोडा शांतपणे विचार करा - तुम्हालाच सगळेजण का टारगेट करत आहेत..?? काहीही चुकत नसावे का तुमचे? तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य. परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..? थोडा तरी विचार करा राव. (चेष्टा करण्यात आणि टर उडवण्यात माझा सहभाग आहे हे मी बिनशर्त मान्य करत आहे परंतु वरचा प्रश्न कळकळीने विचारला आहे - बाकीच्या प्रश्नांप्रमाणे याही प्रश्नाला फाट्यावर मारणार असलात तरी मला फरक पडणार नाही)

In reply to by मोदक

तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य.
अच्छा! त्याला ज्ञान आणि अभ्यास म्हणतात का? बॉरं....

In reply to by प्रभाकर पेठकर

समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..? त्यांचा अभ्यास असेल / नसेल ती त्यांची वैयक्तीक गोष्ट आहे.

In reply to by मोदक

समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.
वपुंची आठवण आली.

In reply to by धन्या

एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना त्याच्या अस्तित्वाविषयी गृहीतक मांडतो. त्या गृहीतकामध्ये अतर्क्य गोष्टी तार्किकरीत्या योजलेल्या असतात. ते गृहीतक आपण मांडतो कारण आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो. उत्तरही सापडते. पण ते आपल्याला हवे असलेले उत्तर असते. खरे उत्तर..? ते हवे असेल तर पुन्हा एखादे गृहीतक मांडावे लागेल. नवी समज आली की; नवीन धारणेसह! *********** हे कसे वाटते आहे..?? :-D

In reply to by मोदक

त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.
आज पर्यंतच्या अनेक धाग्यांवरील अनेक प्रतिसादकांनी अनंत प्रयत्न करूनही कोणी उत्तरापर्यंत पोहोचलेले दिसत नाही.
त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..?
तुम्ही ते गृहीत धरा किंवा नका धरू त्याने काय फरक पडणार आहे? त्यांनी सुरुवातीपासूनच ते गृहीत धरलेले आहे. तसेच, तुमचाच कांही अभ्यास नाही, तुम्हालाच कांही ज्ञान नाही हेही त्यांनीच गृहीत धरलेले आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इतका इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स? हा निष्कर्ष कशावरून काढलात?

In reply to by अत्रुप्त आत्मा

पूर्वी कंटाळा आला की मी काही विशिष्ट ब्लॉग्ज वाचत असे. हल्ली मी संजय सरांच्या लेखांवरील प्रतिसाद वाचतो. संजय सरांचा लेख कळो न कळो परंतू त्यांच्या लेखावरील प्रतिसाद म्हणजे करमणूकीची हमी.

In reply to by धन्या

ही मालिका अगदी योग्य वेळी सुरू केली आहे. अजून महिनाभर हापिसात काही काम नाही आहे. ह्या धाग्यामुळे चांगली करमणूक होतेय.

लेख आवडला !

In reply to by धर्मराजमुटके

पूर्वग्रह नसल्यानं तुम्हाला तो कळू शकला इतकंच. प्रक्रिया निश्चित करून पाहा, उपयोग होईल.

काही सुज्ञ, बुद्ध किंवा अबुद्ध, बालिश, टप्पर लोकांना याचा उपयोग होऊ शकतो: Psychology's answer to trolling and online abuse संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.

परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..?
सदस्यांना ज्ञान याचा अर्थ सच्चिदानंद बाबांची गोष्ट वाटते. अशा लेखनात काही त्रुटी दिसत नाहीत कारण त्यात समाजमान्य धारणांच दळण फक्त नव्या शब्दात काढलेलं असतं. लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही. नाऊ सी, हा लेख देखिल त्याच ज्ञानेश्वर महाराजांवर आहे पण दोन ठिकाणी आलेल्या प्रतिसादात कमालीची तफावत आहे. याचा अर्थ तुमच्या मते, मी सर्वांना कमी लेखतो असा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे : `टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.
अप्रकाशित लेख सुद्धा योग्य ठिकाणी पोहोचतो याचं आश्चर्य आहे! आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो. माझ्यावर इतकी विडंबनं झालीयेत की बोलता सोय नाही. मधे मिपा बंद होतं तेव्हा सहज दुसर्‍या संकेतस्थळावर चक्कर टाकली तर माझ्यावरचं विडंबन तिथे प्रकाशित करून लोक मजा घेत होते! कॅन यू इमॅजिन? जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक! धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात. आता माझ्या विडंबनाला `फारच व्यक्तिगत रोख आहे' म्हणणं, आणि इतरांच्या माझ्यावर केलेल्या विडंबनाला `इट इज ओके, इतपत चालायचंच' म्हणणं याला काय अर्थ आहे? हे म्हणजे `एकाचा बलात्कार सौम्य आणि दुसर्‍याचा फोर्सफुल, तस्मात पहिला कायदेशीर आणि दुसरा बेकायदा' असा न्याय लावणं आहे .

In reply to by संजय क्षीरसागर

`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही. "`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..?? तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?

In reply to by मोदक

अगदी अगदी ! आत्म्याचे परमात्म्याशी मिलन इतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं ) दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान ! संक्षी - एक अनाहूत सल्ला - नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!

In reply to by विटेकर

लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती... बालका, आपल्या पाऊलांपुरते तर सामान्यजन पाहतात.

In reply to by संजय क्षीरसागर

व्यक्तिगत रोख, तुच्छता आणि चिखलफेकीबद्दल तुम्ही काही बोलणे म्हंजे ओसामाने "हल्ली जगात साला टेररिझम फार वाढलाय बॉ!" म्हणण्यापैकी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही.
आम्ही "ईलाईट" क्लासमधले नसल्यामुळे काल दुपारी बारा वाजल्यापासून आज पहाटे सहा वाजेपर्यंत कार्यालयात कळफलक बडवत होतो. जरा सबुरीनं घ्या. असे हातघाईवर येऊ नका. वेळ मिळाला की सार्‍या प्रश्नांची उत्तरे देईन.

In reply to by संजय क्षीरसागर

समाजमान्य धारणांच दळण
आपले ते सत्य आणि इतरांच्या त्या धारणा हे समीकरण आधीच पक्के जुळवले की मग चर्चा ही निव्वळ औपचारिकता उरते.

In reply to by संजय क्षीरसागर

आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो.
कैच्या कै लिहू नका. विडंबने लेखाची त्या लेखकाच्या विशीष्ट शैलीची होतात. त्याने व्यक्तिगत आयुष्यात काय केले आहे व किती संस्थळे काढली आहेत व त्यावर किती लोक येतात वगैरे असंबद्ध गोष्टी त्यात नसतात. मी काही विडंबन एक्स्पर्ट नाही पण मी मिपावर जे काही थोडे बहुत लेखन केले आहे ते बहुतांश विडंबन या प्रकारात केलेले आहे. विडंबन तुमच्या वर केलेले नसून तुमच्या लेखावर केलेले असेल तर ते ज्या लेखनावरून स्फुरलेले आहे त्याची लिंक दिली तरी पुरे असावे.
जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक!
विडंबन म्हणजे चिखलफेक? आणि तुम्ही प्रतिसाद द्यावा म्हणून विडंबन करतात असे तुम्ही कोणाला सांगितले? बरं तुम्ही तिथे प्रतिसाद देत नाहीत तिथे तर मग तिथल्या काही सदस्यांना तुम्ही कोण हे माहितही नसेल. विषय संपला.
धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात.
देअर यू गो अगेन. आक्रस्ताळेपणा. अब्युज काय आणि भ्याडपणा काय. दोन विडंबनांमधे जमीन अस्मानाचा फरक आहे. तुमच्या लेखनशैलीवरील विडंबना मधे तुम्ही वैयक्तिक जीवनात काय काम करता/ किती साईट्वर लिखाणकरता वा तत्सम उल्लेख नाही आहेत. जे तुमच्या विडंबनामधे होते. म्हणून ते उडाले असावे. नोटः
  1. मी काही संपादक नाही आणि लेखन उडवण्याला माझा कधीच सपोर्ट नव्हता पण असो तो वेगळा विषय आहे.
  2. ते दिलगीरीचे काय म्हणत होतात. चूक कळली तर दिलगीरी व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये माझी.
  3. त्यानंतर माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार का? की ती द्यायला लागू नयेत म्हणून हे दिलगीरीचे कारण पुढे करताय?

ज्या प्रमाणे एखाद्या सर्वशक्तिमान पहिलवानाने उठसूट लोकांची गचांडी पकडू नये हा सामाजिक संकेत आहे त्या प्रमाणे बुद्धिमान माणसानेही उठसूट जनतेची गचांडी पकडू नये असा सामाजिक संकेत आहे. दोघांनी हे केल्यास त्यांच्या शक्तींची अवहेलना व हसे होते.....व त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग होऊन ती वाया जाते.....आणि शक्तीचा स्त्रोत आटू शकतो......

टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??
इतकी उघड गोष्ट आहे. लेखकच पुरावे देतोय :
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो. ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.
आणि प्रतिसाद तर एकसोएक आहेत : १) वा! धनाजीराव वा! छान लिहिलेय. २) आवडलं. ३) मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही आहे ४) मस्त! आपुले मरण पाहिले म्या डोळां.. ५) आमच्या अण्णांना हा लेख वाचून दाखवतो आणि आलेला अनुभव तुला सांगतो ६) लेख आवडला. धन्स हो धन्याशेठ. काय निष्कर्श निघतो यावरनं? _________________________ आणि माझा प्रश्न फार साधा आहे: `इफ वन कॅन रेज अ डेड, वाय टू सर्च फॉर द अनडाइंग ? किमान बुद्धी सुद्धा साधा तर्क करू शकते, जर मृत्यूवर विजय मिळवला तर अध्यात्माची गरज काय? भारतीय मानसिकता किती बालीश आहे. आपण कुणाही पाश्चिमात्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि त्याला सांगितलं की `धिस इज वन ऑफ दि हायेस्ट ट्रिटाइज ऑन द ग्रेट भगवद्गीता, अँड यू नो? इट इज रिटन बाय अ डेड हू वॉज रेज्ड अलाइव टू राईट इट! तर तो सरळ म्हणेल, `मॅन, फर्गेट अबाऊट द ट्रिटाइज, वेअर इज दि फॉर्म्युला?' तुमच्या साधी गोष्ट लक्षात येत नाही. या भंपकपणानं तुम्ही ज्ञानेश्वरीचं मूल्य कमी करतायं. असो, साक्षात लेखक तिथे प्रतिसाद देणार आहेत, तेव्हा बघू. _____________________________
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?
नाही. माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत' अर्थात, यावर तुम्ही पुन्हा उपहास सुरू करण्याची आणि हे वाक्य विपर्यस्त करून जागोजागी वापरण्याची शक्यता आहेच. पण तसं करणं फक्त एकच गोष्ट दर्शवेल, मी माझ्या लेखनाशी प्रामाणिक राहून तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही मात्र, मला समजावून न घेता, पुन्हा बेईमानी केली! अँड दॅटस द होल थिंग, `तुम्ही स्वतः सत्य आहात', हे पुन्हा तुम्ही नाकारलं. आता यानं मला काय फरक पडतो? मी तर निश्चिंत आहे, तुमचं अस्वास्थ्य कायम राहिलं.

In reply to by संजय क्षीरसागर

काय निष्कर्श निघतो यावरनं? तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे. माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत' ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..? वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे. वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे. _____________________ सुटसुटीत तेच लिहीतो

In reply to by मोदक

इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही. १९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही. आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा. १९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे. धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली. असो. देव तुमचे भले करो.

In reply to by धन्या

आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे आणि तिथे बाळ सप्रे आणि मी दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याची जवाबदारी तुम्ही स्विकारली आहे.
`आता हसावं की रडावं हेच मला कळत नाही'
तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा, आता तो तुमचा प्रश्न आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मी प्रतिसादात काहीही लिहिलं तरी तुमच्यावर त्याचा शष्प परिणाम होणार नाही हे मला माहिती आहे. तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतो.
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे.
माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात. अगदी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिणं हा सुद्धा माझ्या दॄष्टीने चमत्कार नाही. तो त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेचा, त्यांच्या आई-वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता. मग मी ती सच्चिदानंद बाबांची गोष्ट का लिहिली? माझ्या वाचनाची रेंज खुप मोठी आहे. अध्यात्म, मानसशास्त्र आणि सजीवांची उत्क्रांती हे त्यातले प्रमुख विषय आणि त्या अनुषंगानं देव, धर्म, पुनर्जन्म, फलज्योतिष असं खुप काही मी वाचत असतो. नुकताच मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) या विषयावर वाचन झालं. मृत्यूसमीप अनुभव ही गोष्ट सर्वसामान्यांना जरी चमत्कार किंवा अतिंद्रीय वाटली किंवा तो स्वर्ग, नरक वगैरे बाबींचा पुरावा वाटली तरी विज्ञानाने या अनुभवांची उकल केली आहे. मानवी शरीरात काही विशिष्ट संप्रेरके टोचून कृतिमरीत्या असा अनुभव देण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत. मी या दोन बाबींची म्हणजेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट आणि मृत्यूसमीप अनुभव संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असे असले तरीही त्या लेखात मी कसलाच दावा केलेला नाही. तुम्ही "कोट" केलेली वाक्ये ही मला माहिती असलेल्या किंवा मी येथे लिहिलेल्या सच्चिदानंद बाबांच्या गोष्टीमधील आहेत. ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे. विश्वाच्या अफाट पसार्‍याचं पुर्णतः आकलन होणं हे मानवी बुद्धीच्या कुवतीच्या पलिकडचं आहे. मला सर्व समजलंय असं कुणी म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा भ्रम आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

भारतीय मानसिकता किती बालीश आहे.
परदेशी परिपक्व मानसिकतेचे दर्शन झोम्बी, ओमेन, नॉन्स्ट्रडॅमस, एक्झॉर्सिस्ट वगैरे वगैरे अनेक चित्रपटांमधून, त्यांच्या सिक्वल्स मधून, कादंबर्‍यांमधून अनेकदा झाले आहे. येशूच्या कथेतही अशी कांही उदाहरणे असणारच. मी बायबल वाचलेले नाही त्यामुळे त्यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. पण मला खात्री आहे. जिथे भूतखेतांच्या कथा चविने वाचल्या-पाहिल्या जातात तिथे देवादिकांचे चमत्कार अस्तित्वात नाहीत असे म्हणणे भाबडेपणाचे ठरावे.

संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो. तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात बराचसा डिसकनेक्ट जाणवतो आहे. आक्रस्ताळेपणा, बालीशपणा, मुद्दे सोडून भरकटणे, कै च्या कै तर्क मांडणे वगैरे वगैरे. अंतर्जालावर येवून तुम्हाला यावर उत्तर मिळणार नाही उलट तुमचे प्रश्न वाढत जातील प्रश्न वाढले नाहीत तर तुमचे मनस्वास्थ्य नक्की हरवेल. या सर्व प्रश्नांवर एखाद्या तज्ञाची मदत घ्या. अहो हा समाज कीर्तनाने सुधारणार नाहीये आणि तमाशाने बिघडणार नाहीये - मग तुम्ही तुमची विचारसरणी रेटून काय फरक पडणार आहे..?? बर्र.. तुम्ही हे जे काही विचार रेटताय त्यात तुमचे स्वतःचे सातत्य नाहीये. तुमचे जे कोणी अनुयायी असतील / होतील त्यांच्याकडून सातत्याची अपेक्षा ठेवणे जरा जास्ती होत नाही का..?? ट्रायल बॅलन्समध्ये घोळ असताना बॅलन्सशीट टॅली होईल का..?? तुम्ही सत्य आहात - नो वन इस डडिनाईंग दॅट बट अ‍ॅट द सेम टाईम हॅव करेज टू फेस, अ‍ॅक्सेप्ट अँड डायजेस्ट एनी निगेटिविटी बिकॉज ऑफ यूअरसेल्फ!! प्लीज विचार करा. सल्ला वैयक्तीक वाटल्यास मी काही करू शकत नाही. घेणे न घेणे तुमच्या हातात आहे. धन्यवाद.

In reply to by मोदक

आम्ही बॉल टाकलेला ... हे पहा ...http://www.misalpav.com/comment/502398#comment-502398 पण बहुतेक त्यांना तो बाऊंन्सर गेला असावा किंवा त्यांनी लेफ्ट ओव्हर केला असावा ... किंवा ते बोल्ड झाले असावेत असो ... नेक्स्ट टाईम ;) =))

सर, अगदी पहिल्या लेखामधला (१. अध्यात्म : पूर्वभूमिका ) डिस्क्लेमर (?)
२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणाऱ्याच्या ओपननेस वर अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे. आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणाऱ्याचा आनंद हा ऐकणाऱ्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, नाहीतर ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल. तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका. या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घर बसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्यं समजले नाही तरी तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही. काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजले आहे हे सर्वमान्य झाले पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही.
हा मेन भाग आहे
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.
इथे आधी टाकायला हवा होता असं वाटुन गेलं. तरीही गोंधळ कमी झाला असता कि नाही हि श़ंकाच आहे ! बाय द वे , मी वाचतो आहेच. जसं पोहण्यात काय मजा आहे हे आधी पाण्यात उडी मारुन तरंगायला शिकल्याशिवाय कळत नाही तसं लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अ‍ॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही. धन्यवाद आणि आभार उन्मेष

In reply to by उन्मेष दिक्षीत

लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अ‍ॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही.
जे लिहिलय ते आधी कळले तर पाहिजे नं! दुसर्‍याला कमी न लेखता, त्याची मानसिकता, आकलनशक्ती, त्याचा नुसत्या पाठांतरावर आधारीत व्यवसाय आदी गोष्टींवर नकारात्मक आणि अपमानकारक शेरेबाजी आणि शब्दप्रयोग टाळून आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्वच्छ आणि सोप्या भाषेत मुद्देसुदपणे मांडले, शंका विचारणार्‍यांना शब्दांच्या घोळात न भरकटवता जर त्यांना समजेल अशा मोजक्या शब्दांत त्यांचे शंका निरसन केल्यास, आपला वरील मुद्दा विचारार्ह ठरू शकतो. आदर हा मागुन मिळत नसतो तो कृतीतून मिळवावा लागतो. मीच सर्वज्ञ आणि मीच दिपस्तंभ ही भूमिका सोडून वाचकाच्या पातळीवरून खेळीमेळीच्या वातावरणात, किमान दुसर्‍याला कमी न लेखता कांही बोधामृत पाजले तर त्याचा स्विकार नक्कीच होऊ शकतो. मिपावर ज्ञानामृताचे कण वेचता येतील असे अनेक धागे येतात. लोकं वाचतात सहमत/असहमत होतात पण ह्या 'भ्रमरा' इतके घाऊक पातळीवर नाकारले जात नाहीत. त्या चांगल्या लेखांचा अभ्यास करून नंतर सोप्या भाषेत आपले विचार मांडले तर मिपा सदस्य नक्कीच त्या विचारांकडे आदरयुक्त नजरेने पाहतील.

In reply to by उन्मेष दिक्षीत

@उन्मेष दिक्षीत: तुमची तुलना जरा चुकते आहे. एक म्हणजे इथे काही लोकांना तरंगता येते आहे आणि बहुधा त्यांना तेवढेच हवे आहे पण संक्षी त्यांना तुम्ही सरळ नं पोहता बटरफ्लाय स्ट्रोकच मारून पोहा असे सांगतायत. इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत. दुसरे म्हणजे असेही काही लोक आहेत ज्यांना पोहायची गरजच वाटत नाहीये. पण संक्षींच्या लेखनाचा सूर असा आहे की सर्वांनाच पोहायचे आहे आणि त्यांनी बटरफ्लाय स्ट्रोक मारूनच पोहले पाहिजे. बरं ज्यांनी विचारले की तुम्ही म्हणताय बटरफ्लाय स्ट्रोक मारून असे होते आणि तसे होते पण मग आमच्या पद्धतीनेही तर तेच होतेय तर त्यांना परत हीन लेखले जातेय. किंवा जर एखाद्याला वाटत असेल की ह्या पद्धतीने त्यांचे सुरळित चाललेले तरंगणे डळमळीत होईल तर त्यांना खात्री नं देता अजूनच शब्दांच्या जाळ्यात अड्कवणे सुरू आहे. अथवा माझ्यासारखे काही जे त्यांना ह्या बटरफ्लायच्या तंत्रात काही गड्बड आहे असे विचारतायत त्याकडे ते सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे लोक पडताळण्याच्या फंदातच पडत नाहीत.

"मला चढलेली नाही" हे पुनः पुनः सांगणार्‍या माणसालाच सर्वात जास्त चढलेली असते. तसंच "मी निश्चिंत आहे" हे पुनः पुनः सांगणाराच सर्वात जास्त अस्वस्थ असतो. तो स्वतःच्या मनालाच हे बजावत असतो "निश्चिंत रहा, अस्वथ होऊ नकोस" =))

आणि निखळ मनोरंजनाचा हा ठेवा वाचनखुणेत साठवला. एकिकडे शब्दांच्या नवनव्या व्याख्या काय, कोलांट्या काय, लोकांना (स्व)अध्यात्मसाक्षर करून सोडायचेच यासाठी चाललेले भगिरथ प्रयत्न तर दुसरीकडे मूढ, अजाण जनसामान्य. काय होणार या जगाचे? इथे एक माणुस जबरीने आपला अनुभवामृत जबरीने गळी उतरवत आहेत, आणि इथे सगळे नाहीऽऽऽ,नकोऽ म्हणताहेत! का? का? का?

छे! या मिपाकरांना एवढे मोठे गिफ्ट दिले.. पण छे.. करंटेच हे त्यांना काही अप्रुपच नाही ;)

मला वेगळंच सांगायचं होतं .. मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत ! मला स्वत:ला त्यांचा वैयक्तिक गायडन्स मिळाला आहे ! माझ्या लेखांशी रिलेटेड असलेल्या अगदी साध्या प्रश्नांपासुन पर्स्नल प्रॉब्लेम साठी ही त्यांचा गायडन्स मला आजही आहे ! मी जेव्हा गोंधळ म्हणालो, तेव्हा मला धाग्यावरचे प्रतिसाद आणि बाकीचं कन्फयुजन म्हणायचं होतं. मला स्व्तःला फायदा झालाय .. अगदी पहील्या लेखांपासुन ची वाक्य अन वाक्य माझ्यासाठी मोलाची आहेत ! काय फायदा झाला, कशा पद्धतीनं झाला, या करुन बघण्याच्या आणि अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. ते असं नाही सांगता येणार. म्हणुनच मला हा पार्ट महत्वाचा वाटतोय.
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.
@संजय सर, थँक्स. मला माहीत नाही हे मी लिहायला हवं होतं की नाही तुमच्या परवानगीशीवाय, पण मला गरजेचं वाटलं आणि लिहीलं धन्यवाद, उन्मेष