✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दाग अच्छे होते हैं

च
चिखल्या यांनी
Tue, 02/26/2013 - 03:07  ·  लेख
लेख
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा... चिखलात प्राणी लोळतात, आंघोळ करतात, आणि अंगाला चिखल लावुन घेतात. मला आंघोळ आवडत नाही. प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात. संरक्षणवरुन आठवलं, प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने स्वत:ला चिखल लावून घेतला म्हणून तो प्रिडेटर त्याला पाहू नाही शकला. पण लोकांनी अर्नोल्ड शिवाजीनगरला लक्षात ठेवला आणि चिखलाला विसरले. मग चिखल उतरल्यावर अर्नोल्ड शिवाजीनगरची धुलाई झाली. असो चिखलामुळे असे रक्षण होते. पण तोच चिखल आपल्या अंगाला लागला की आईचा मार मिळतो. आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत. म्हणुन मला देवपण नाय आवडत. पण मी मंदिरात जातो, तिथे प्रसाद मिळतो आणि घंटा पण वाजवायला मिळते. घंटेचा आवाज मस्त येतो. पण कानाखाली आवाज आला की कान लाल होतो. लाल रंग मला आवडतो. मला रंग खेळायलाही आवडतं. मला होळीही आवडते. होळीत चिखलात माखायला आवडतं. पण मग डाग पडतात कपड्यांवर. आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेल आवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही. आईला कोणीतरी सांगा रे की दाग अच्छे होते हैं
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2587 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

काय म्हणतात ते

स्पंदना
Tue, 02/26/2013 - 04:47 नवीन
वहावतं लिखाण. एकदा वहायला लागल की अगदी नाक गळल्यासारखे. मस्त !
  • Log in or register to post comments

खिक !

सस्नेह
Tue, 02/26/2013 - 14:08 नवीन
अगदी नाक गळल्यासारखे.
काय उपमा आहे ! चिखलासारखी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

डोळे पाणावले ती उपमा पाहून.

बॅटमॅन
Tue, 02/26/2013 - 14:18 नवीन
डोळे पाणावले ती उपमा पाहून. बाकी दाक गळ्ळ्यावर बाईट अबस्था होते एकदब. जगदब्ब, जगदब्ब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

विनोद कुठशिक आहे , हे लिहिलं

लौंगी मिरची
Tue, 02/26/2013 - 05:16 नवीन
विनोद कुठशिक आहे , हे लिहिलं असतं तर निदान हसता तरि आलं असतं .मला कुठेच हसायला आलं नाहि . बोर झालं .
  • Log in or register to post comments

आपलं सदस्यनाव सार्थ केलंत

आनन्दिता
Tue, 02/26/2013 - 05:22 नवीन
आपलं सदस्यनाव सार्थ केलंत अगदी!!!!
  • Log in or register to post comments

आईपासुन रक्षण बाबापण नाय करु

गणपा
Tue, 02/26/2013 - 16:04 नवीन
आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत.
=)) कुणी काही म्हणो रे चिखल्या बालीश निबंध आवडला. :)
  • Log in or register to post comments

:D

पैसा
Tue, 02/26/2013 - 16:07 नवीन
कुठे सुरू झाले आणि कुठे संपले! चिखल्याला दाग आवडणारच!
  • Log in or register to post comments

@आईला टाइड आवडते, सर्फ

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/26/2013 - 21:07 नवीन
@आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेलआवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही.>>> =)) =)) =)) असंबध्दतेतून निर्माण होणाय्रा विनोदाचं उत्तम चित्रण आहे हे! :-)
  • Log in or register to post comments

खाली यत्ता ल्ह्यायची र्‍हायली

प्यारे१
Tue, 02/26/2013 - 21:51 नवीन
खाली यत्ता ल्ह्यायची र्‍हायली काय?
  • Log in or register to post comments

हे प्रतिसाद पाहून मला अतीव दु

आदूबाळ
Tue, 02/26/2013 - 23:14 नवीन
हे प्रतिसाद पाहून मला अतीव दु:ख होत आहे. लेखकाने या ठिकाणी तीसपस्तीस ओळींमध्ये अनेक विचारगर्भ विषयांना तोंड फोडलं आहे. उदा. - माध्यम (दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते) - स्मरणरंजन (बाबा मला डुक्कर म्हणतात) - प्राणिशास्त्र (प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात.) - चित्रपट (प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने...)) - कौटुंबिक जीवन(आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत.) - भारतीय संस्कृती (मला होळीही आवडते) - शालेय मुलाचं भावविश्व (म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही) वैग्रे वैग्रे. आणि सगळे तिरकस प्रतिसाद देतायत? तीव्र णिशेध.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा