मराठा लाईट इन्फंट्री - मराठ्यांची शौर्यगाथा

जयंत कुलकर्णी जनातलं, मनातलं
Simple, Free Image and File Hosting at MediaFire आपल्याला आठवत असेल मी मिपावर काही दिवसापूर्वी मराठा लाईट इन्फंट्रीवर एक छोटी लेखमालिका लिहिली होती. ती आता पूर्ण करुन पुस्तक स्वरुपात पूर्ण प्रकाशीत झाली आहे. हे पुस्तक मिपावरील व माझ्या ब्लॉग वाचकांच्या प्रोत्साहनपर शब्दांमुळेच पूर्ण झाले आहे याची मला जाणीव आहे. त्या सर्व वाचकांचे मी आभार मानतो. प्र्काशन सभारंभ कोल्हापुरात होणार आहे त्याची तारीख व वेळ इत्यादी बाबी मी वेळेवर कळवीनच. प्रकाशकाने हे पुस्तक अजून ८/९ दिवसात सगळीकडे उपलब्ध करायची जबाबदारी उचलली आहे. काही ठिकाणे व त्यांचे दुरध्वनी क्र. खाली देत आहे. कोल्हापूर : अक्षरदालन - २६४६४२४, २३ सांगली : प्रसाद वितरण ग्रंथ दालन - २६२१५१५, संकपाळ बूक सेलर्स-२३२६४४७ मिरजः रत्नाकर बूक सेलर्स-२२२०१०७, पुणे : पाटील एंटरप्रायझेस - ९४२२३२१९८९, रसीक साहित्य-२४४५११२९ औरंगाबाद : कैलाश पब्लिकेशन-२३५३९२३ कराड : विजय वितरण-९४२३२६०६५१ दुसरा मार्ग: जर आपल्याला पुस्तक लगेचच पाहिजे असल्यास आपण प्रकाशकाच्या खालील खात्यावर रु २००/- भरुन त्याला ई-मेल केलात तर आपल्याला ते घरपोच होईल. खाते क्र. ICICI a/c No.016605004252. अक्षर दालनचा ई-मेल :akshardalan@yahoo.com या मेलवर आपल्या पेमेंटची पूर्ण माहिती व पूर्ण पत्ता देण्यास विसरु नये. फेसबूकवर Maratha Light Infantry नावाने ग्रुप चालू केला आहे तेथेही आपल्या पेमेंटची माहिती दिली तर ती ताबतोब कळू शकते. आपल्या सर्वांच्या सदिच्छेने दुसर्‍या महायुद्धावर एक ७०० पानी पुस्तक पूर्ण करत आणले आहे. त्याबद्दलही कळवेनच. याचे बघुया काय होते ते पहिलाच प्रयत्न आहे........... जयंत कुलकर्णी. Update : Book Sellers' Name Phone No. Uday Agencies, Ahamadnagar 2347307 Dilkhush Book Stall, Karad 222833 Vijaya Vitaran, Karad 9423260651 Ajab Pustakalaya, Kolhapur 2546710 Gulmohar Book Depo, Kolhapur 2621307 Mehta Book Sellers, Kolhapur 2542304 Pimpalapure Book Distributors, Nagpur 2724318, 2773552 Jyoti Stores, Nasik 2306700 Rasik Sahitya, Pune 24451129 Patil Enterprises, Pune 24487629 Shubham Sahitya, Pune 24474322 Sahitya Darshan, Pune 24321124 Ratnakar Book Stall, Miraj 2220107 Ideal Pustak Triveni, Mumbai 24304254 Peoples' Book House, Fort,Mumbai 22873768 Javahar Stores & Book Depo, Vileparle,Mumbai 26143902 Shabda The Book Gallerly,Borivali 28332640 Prasad Vitaran Granth Dalan, Sangli 2621515 Nandadip Book Services,Solapur 2628332 Navsahitya book stall,Belgaon 421078
वर्गीकरण
लेखनप्रकार

42 टिप्पण्या 10,804 दृश्ये

Comments

धमाल मुलगा नवीन

शक्य झालं तर आजच घेऊन टाकतो पुस्तक. :-) जयंतराव, फार वाट पहायला लावलीत हो पुस्तकासाठी. :-)

सुनील नवीन

अभिनंदन! ठाणे-मुंबईत कुठे उपलब्ध होऊ शकेल?

जयंत कुलकर्णी नवीन

चायला पुस्तक लिहिणे एका झटक्यात जमले हो पण नंतरची बाळंतपणे फारच कंटाळवाणी असतात.........हे आता कळाले. घी देखा..........:-)

रणजित चितळे नवीन

जयंतराव माझा मामा होता ५ मराठा लाय मध्ये :-)

डॉ सुहास म्हात्रे नवीन

भारतात फेरी झाली की जरूर खरेदी करणार. तुमच्या पहिलटकरणीच्या त्रासात व आनंदात सहभागी आहे :) !

आदूबाळ नवीन

जयंतराव, धन्यवाद. पुस्तक नक्की घेणार! माझी एक अज्ञानी शंका: मराठा लाईट इन्फन्ट्रीचं गाणं "सिंहगड" हे फक्त बँडवर वाजवलं जातं की त्याला शब्द देखील आहेत? काही गुप्तता वगैरे नसेल तर ते उपलब्ध करून देता यईल का?

वसईचे किल्लेदार नवीन

संग्रह्य असणार यात शंकाच नाहि. पुस्तक नक्की घेणार. मुंबापुरीत कुठेसे मिळेल ते कळवावे हि नम्र विनंती.

अभ्या.. नवीन

जयंतकाका तुमचे पुस्तक तर अप्रतिमच असणार यात शंका नाही. शुभेच्छा. पण मला मुखपृष्ठाची सजावट अतिशय आवडली. अगदी विषयाला साजेशी अशी. मस्त. खूप खूप शुभेच्छा.

पिवळा डांबिस नवीन

पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन जयंतराव!! पुस्तक मिळवून खरीदण्याचा नक्की प्रयत्न करीन...

किसन शिंदे नवीन

हार्दिक अभिनंदन सर!! ठाण्यात पुस्तक उपलब्ध झाले कि लगेचच घेतल्या जाईल पण त्या पुस्तकावर तुमची स्वाक्षरी कधी मिळेल ते बोला आधी.

विटेकर नवीन

छाती इंचभर फुगली आमची !! आमच्या "मिपाकराचे " पुस्तक आहे. पण तुमची पेंडिंग यादी मोठी आहे .. जरा मनावर घेऊन हातावेगळे कराच ! बाकी मिपावरिल सदस्यांचा सहभाग म्हणजे " प्राची च्या जागी ते गच्ची बसतयं का बघा " इतकाचं! सारे कर्तृत्व तुमचेच ! सलाम .. मराठी पाऊल पडते पुढे

धमाल मुलगा नवीन

नेटबँकिंगने पैसे पाठण्यासाठी प्रकाशकाच्या खात्याची माहिती हवी आहे. खातेक्रमांकाशिवाय - १.खातेदाराचे नाव ( बँकेच्या नोंदीनुसार असलेले) २. बँकेच्या शाखेचे नाव ह्या बाबी नसल्यामुळे पैसे ट्रान्सफर करता आले नाहीत. :-( नेटवरुन पैसे पाठवले तर प्रकाशकाला पैसे ताबडतोब मिळतील तसेल पाठवायच्या इ_मेलमध्ये ट्रॅन्झॅक्षन आयडीसह स्किन ग्ॅबही पाठवता येईल. सदर माहिती प्रकाशकाकडुन घेऊन ईथे द्याल काय?

जयंत कुलकर्णी नवीन

In reply to by धमाल मुलगा

Akshar Dalan खाते क्र. ICICI a/c No.016605004252. कुठल्याही ड्रॉपबॉक्स मधे चेक टाकला तरी चालतो. फक्त ई-मेल पाठवायला विसरु नका. जेथे उपल्ब्ध होणार आहे त्याची सविस्तर यादी अपडेट केली आहे. ढन्यवाद !

नि३सोलपुरकर नवीन

हार्दिक अभिनंदन काका. पुस्तक नक्कीच विकत घेणार बाकी किसन देवाशी बाडीस ...

कापूसकोन्ड्या नवीन

खरं म्हणजे तसे पूर्ण वाचून झाले आहेच. पण विषयच असा आहे की, पुस्तक विकत घेउन नक्की वाचणार. आम्ही आपले उगीचच छाती पुढे करून म्हणणार की लेखक आमच्या ओळखीचा (?)आहे. असो. परत एकदा शुभेच्छा

५० फक्त नवीन

अतिशय अतिशय अभिनंदन काका, तुमच्या या उपक्रमाबद्दल कट्ट्याच्या वेळी माहिती दिली होतीच आज प्रत्यक्ष पाहताना फार फार आनंद झालं.

जयंत कुलकर्णी नवीन

माझ्या सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे आभार येथे व फेसबूक वर मानलेच आहे. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.

बांवरे नवीन

पुस्तकाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. रसिकमध्ये उपलब्ध झाले की घेइनच.

जयंत कुलकर्णी नवीन

नमस्कार ! ज्यांना ह पुस्तक अजुनही पाहिजे असल्यास, कृपया मला व्यनि करावा. माझ्याकडे वीस प्रति आलेल्या आहेत.