दुनिया बदल गयी, इंसान बदल गये,
बदले नही है कभी भी, मिट्टी के रंग..
मिट्टी के रंग..
१९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेल्या आणि दुरदर्शन पाहिलेल्या बहुतेकांना ही चाल ओळखीची वाट असणार ह्याची मला खात्री आहे. निखळ 'करमणूक' हा एकमेव 'क' कारान्त उद्देश घेऊन जन्माला आलेल्या दूरदर्शन चा हा सुवर्ण काळ म्हणायला काहीच हरकत नाही. दर्जेदार आणि बालिश कट-कारस्थान रहित मालिका ह्यांचा हा काळ. कशिश,सर्कस, व्यॉमकेश बक्षी, मिट्टी के रंग, रिपोर्टर, सुरभि, इधर-उधर, मालगुडी डेज़, बुनियाद, पोटली वाले बाबा, सुराग, चंद्रकांता, स्ट्रीट हॉकस, नाइट रायडर्स आणि देख भाई देख ह्यांच्यासारख्या दर्जेदार मालिकांमधून लोकांचे प्रामाणिक मनोरंजन करायचा प्रयत्न करणार्या दिग्दर्शकांची त्या वेळी चलती होती. साधेपणा, मनाला भिडणारी गोष्ट, सुमधुर संगीत आणि दर्जेदार कलाकार ह्या गोष्टींवर प्रसिद्ध होणार्या मालिका ह्यांची त्या काळी सामान्य प्रेक्षकाला भुरळ पडली होती. स्लीवलेस, बॅकलेस ब्लाऊज घालून दर श्वासागणिक नवी नवी कारस्थाने रचणार्या व्याम्प ची डोकेदुखी यायच्या आधीचा हा काळ आठवला की मस्त वाटत.
ह्यातल्या काही मालिका मी कधीही विसरू शकणार नाही. आर. के. लक्ष्मण ह्यांच्या मालगुडी डेजच नाव घेतल्याशिवाय मी पुढे लिहु शकणार नाही. स्वामी आणि त्याच्या मित्रांचे उद्योग पहायसाठी जीव टाकायचो मे तेव्हा. आताही कधी डी.व्हि.डि. वर मालगुडी डेज पाहतो तेव्हा परत लहान व्हावस वाटत. हल्लीच्या रियालिटी शो च्या होस्ट चा खोटा ओढून ताणून केलेला अभिनय कुठे आणि अमुल सुरभी च्या सुरुवातीला सिद्दार्थ काक आणि रेणुका शहाणे ह्यांचे प्रसन्न स्मितहास्य आणि एकदम एस्टाईल मधे केलेला नमस्कार ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही. कशिश तर मी अगदी लहान असताना लागायची. प्रेम काय आहे हे समजायचे वय नसताना सुद्धा ती आवडायची. मालविका तिवारी आणि सुदेश बेरी ह्यानी फक्त १३ भागांमधे ही मालिका रंगवली होती. शाहरूख खान आणि सुरभी कन्या रेणुका शहाणे ह्यांची सर्कस पण मस्त होती.
चंद्रकांता च्या तर जवळपास प्रेमातच पडलो होतो. त्यामधे पण चंद्रकांता पेक्षा राजकुमार विरेन्द्र, महाराजा शिव-दत्त, सभ्या दासी, चंद्रकांता च कबुतर, त्या काळातही कमांडो ट्रेनिंग दिल्यासारखा वागणारा बदरीनाथ हे विशेष आठवतात. क्रूरसिंग आणि त्याच्या दोन चेल्यांची याकककु करायची ढब शाळेत मस्ती करताना उपयोगी पडायची. आत्ता आत्ता दूरदर्शन नी ह्याच सीरियल ची चंद्रमुखी नावाची भ्रष्ट आवृत्ती काढली.
व्यॉमकेश बक्षी विशेष आवडायची नाही तेव्हा, पण जरा १०~१२ वर्षाचा झाल्यावर आणि ती सीरियल संपून गेल्यावर आपण एक चांगली गोष्ट मिस केली ह्याची रूख-रूख लागून राहिली होती. सुराग बघताना तर चक्क मी आणि माझे बाबा पैज लावायचो कोण गुन्हेगार असेल ह्याच्यावर आणि बहुतेक वेळा दोघही हारायचो ही बात अलाहिदा. सुदेश बेरीचा इन्स्पेक्टर भारत आणि त्याचा पार्ट्नर सब-इन्स्पेक्टर श्रिवास्तव मुळे मला तेव्हा पोलिस बनायची स्वप्न पडायची हे ही आठवतय. त्या वेळेला केबल नसल्यामुळे सी. आय. डी. बघायला मिळायचे नाही, त्यामुळे पोलिस कसे नसावेत ह्यासे धडे मिळाले नव्हते. ;)
मिट्टी के रंग तर त्याकाळची सगळ्यात लाजवाब मालिका होती. गरीब पण प्रामाणिक माणूस परिस्थीतीने कसा पिचला जातो ह्याचे चित्रण ह्यामधून असायचे. प्रत्येक आठवड्यात नवीन 'आम आदमी की कहानी' घेऊन ही मनावर राज्य करायची. ह्याच्यामधले दोन भाग तर मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. ताविज नावाचा एक भाग बघून माझ्या डोळ्यात पाणी आल होत. एका वाळूत हरवलेल्या चमच्यासाठी एका आणत मुलाला मरेपर्यंत मारणार्या त्या जोडप्याला पाहून संताप आला होता. त्याच्याच शेवटी त्याच्या आईची एकमेव आठवण असलेला त्याचा ताविज ह्या गडबडीमधे हरवून जातो आणि तो शोधण्यासाठी तो चक्क समुद्रात शिरतो आणि तिथेच तो भाग संपतो. त्याला तो ताविज मिळतो का?, त्या मुलाच पुढ काय होत? असे असंख्य प्रश्ण मनाला हूरहुर लावून जातात. अजुन एक भाग म्हणजे 'बस स्टॉप की थंडी रात' नावाचा होता. त्याची गोष्ट सांगयसाठी एक वेगळा टॉपिक नक्की काढीन मी. चार ओळींमधे त्यामधला खोलावा येणा अशक्य आहे.
ह्या मस्त मालिका सोडल्या तर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री हिंदी पिकचर लागायचे. ३ तासाचे पिक्चर जाहिराती मुळे चक्का ४-४ तास चालायचे. रविवार दुपारी चार वाजता मराठी पिक्चर लागायचा (रटाळ असायचे पण दुसरा पर्याय नसायचा). स्ट्रीट हॉकस आणि नाइट रायडर पण बहुतेक शुक्रवार शनिवार ला पिक्चर च्या आधी लागायचा अस मला वाटत आहे.
काही जाहिराती सुद्धा मस्त असायच्या. त्यांचे दुवे खाली देत आहेच. पुरब से सूर्य उगा, पंडित भीमसेन जोशींच मिले सूर मेरा तुम्हारा, विको इत्यादी. मिले सूर मेरा तुम्हारा पंडितजींच्या धिरगंभीर आणि वजनदार आवाजात म्हणायचा प्रयत्न मी आणि माझा मामे भाऊ करायचो आणि नंतर जास्त वेळ बाहेर खेळायला परवानगी मिळत असे.
१९९५ पासून बहुतेक दूरदर्शन ला उतरती कळा लागली. खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेत टिकायच्या उद्देशानि म्हणा किंवा जाहिरतींसाठी म्हणा दूरदर्शन मधे केकता कपूर टाईप मालिकांनी प्रवेश केला आणि आधीच्या सर्व चांगल्या परंपरांच वाटोळ झाल. मालिकांची लांबी वाढतच गेली. ३२ भागात संपणार्या मालिका ३२०० भागात कशा पाणी घालून चालवता येतील ह्याचा विचार होऊ लागला. ह्याची सुरूवात केली मराठी मालिकांमधील दामिनी ह्या मालिकेने. मुख्य पत्र मेल्यावरही चक्क ५-६ वर्ष चालू होती ही मालिका. हिंदी मधली पहिली लांब लचक मालिका माझ्या आठवणी प्रमाणे शांती ही होती. मन्दिरा बेदी ची पहिलीच मालिका होती ती बहुतेक. अश्या वाढत जाणार्या मालिकांचा कंटाळा येऊन मी नंतर नंतर टी.व्ही. पाहाण जवळ जवळ बंद केला होता. चक्क ८-१० वर्ष मी बातम्या सोडून आणि क्वचित कधीतरी रविवार चा मराठी पिक्चर सोडून टी.व्ही. पहिला नाही.
नंतर २००८ नंतर कधीतरी घरी आई-बाबांसाठी म्हणून टाटा स्काय घेतल. मग हळू हळू क्वचित टी.व्ही. पाहाण होऊ लागला. सि.आय.डी. चे जोक्स समजायला लागले. पण तरीपण जुन्या मालिकांची म्हणा किंवा एकूणच दूरदर्शन विषयी जो आपलेपणा वाटायचा तो काही वाटत नाही. नाही म्हणायला इथेही एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, मला सासू हवी अश्या चांगल्या मालिका होत्या किवा आहेतच. पण त्या बघायला हल्ली वेळ मिळत नाही. :(. जेव्हा वेळ असतो आणि मी चुकुन घरामधे असतो तेव्हा मात्र नेमक्या अजुन चांदारात आहे, अक्कासाहेबानचा फेरा, तू तिथे मी असल्या भंगार गोष्टी चालू असतात. :(.
असो. जुना ते सोन हे नक्कीच खर आहे. होप कधीतरी आधीसारख्या दर्जेदार मालिकांचा काळ येईल अशी प्रार्थना करूयात.
:).
https://www.youtube.com/watch?v=ekvevq_ipaI&feature=fvst
_____________________________________________________________________________________
लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. गोड मानून घ्यावा अशी नम्र विनंती. काही चुकल-माकल असेल तर माफी असावी.
वाचने
8425
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला जास्ती काही आठ्वत नाहीये
आयच्या गावात !
तुझा प्रतिसाद वाचल्यामुळे लेख वाचायचे कष्ट वाचले!
In reply to आयच्या गावात ! by परिकथेतील राजकुमार
असु दे असु दे.
In reply to आयच्या गावात ! by परिकथेतील राजकुमार
आयडी
In reply to असु दे असु दे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा.
In reply to आयडी by तिमा
देख भाई देख,रजनी,देखो मगर
१९९० चे दशक...
In reply to देख भाई देख,रजनी,देखो मगर by अत्रुप्त आत्मा
येस्स आय ड्रीम ऑफ जिनी माय
In reply to १९९० चे दशक... by मोदक
+१
In reply to येस्स आय ड्रीम ऑफ जिनी माय by पियुशा
कॅप्टन व्योम नव्याने आले
In reply to १९९० चे दशक... by मोदक
देख भाई देख.
In reply to देख भाई देख,रजनी,देखो मगर by अत्रुप्त आत्मा
ती स्याम डीसील्वाची
:-).
In reply to ती स्याम डीसील्वाची by पियुशा
+१
In reply to :-). by श्रीरंग_जोशी
स्याम आणि गोपी वाली का?
In reply to ती स्याम डीसील्वाची by पियुशा
स्वाभिमान
In reply to ती स्याम डीसील्वाची by पियुशा
होप कधीतरी आधीसारख्या
जायंट रॉबर्ट.
In reply to होप कधीतरी आधीसारख्या by मदनबाण
आम्ही सध्या news चान्नेल्सच
कधीतरी 'लेखु' नावाची एक
इंद्रधनुष
In reply to कधीतरी 'लेखु' नावाची एक by मराठे
ता ना ना ना ना ना ना ना ना
आमच्या अल्पबुद्धीला फक्त '
स्टोन बॉय .
किलबिल कसे विसरलात ?
होना
हुम्म्म
रेव्हनचे बोलला नाहीत... असो..
In reply to हुम्म्म by इरसाल
मालगुडी डेज ही आर के नारायण
+१
In reply to मालगुडी डेज ही आर के नारायण by निनाद मुक्काम …
'गोट्या' सिरीयल अजुनही
इथे मिळेल.
In reply to 'गोट्या' सिरीयल अजुनही by किसन शिंदे
हम्म्म
"मिट्टी के रंग" मधली