उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११)
-- पण भावनांचा कधी होणार
मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत).
प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ?
स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी ! असे काहीसे मजकूर ऐकायला आणि वाचायला मिळतात टी.व्ही वर, वृत्तमानपत्रात.
अरेरे, पण या लोकांच्या भावना गेल्या कुठे ? त्यात भरीस पाडतात ते आपले जनसेवक, मिडियावाले ! आता काय दाखवायचं, कसं दाखवावं आणि काय झाकायच, हे त्यांनी बहुधा शिकला नसावं का ? पण इथे यांच्या खुणाच उलटया. आपल्या वाहिनीला कशी प्रसिद्धी मिळेल, सर्वोत्तम टी.आर.पी (प्रेक्षक-संख्या) मिळेल ? यातच चढाओढ. एखादा प्रसंग कसं 'एनकॅश' करायचा हेच आजकालच्या जर्नलिझम मध्ये शिकवतात, असा वाटतं. हा शब्द 'एनकॅश' मुळात घातकच आहे. बरं, ही माणसे प्रश्न तरी कसे विचारणार, तर झाल्या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? आता जिथे त्यांचे परिजन या हल्ल्यात म्हणा की अन्य कुठल्याही दुर्दैवी प्रसंगात, मेले आहेत. अरे, लेकांनो ती माणसे आहेत , भावना शून्य रोबोट नव्हेत, हे त्यांना कोणीतरी समजावा रे, जरी तुम्ही झाला असलात तरी.
साधा कुत्र्या, मांजराला लागलं, मारलं तर आपण लगेच प्राणीवादी बनायला तयार..मग ताबडतोब मोर्चे, निदर्शने, आजकालच्या भाषेत फेसबुक वर कार्यक्रम ठरवून कोण कोण हजार राहणार याची हजेरी घेणे इत्यादी. आता यात यांचा काय जातंय म्हणा, सोशल कॉज म्हणे. जो तो उपटcसुम्भासारखा येतो आणि प्रसिद्धीच्या मागे धावतो. अरे, यक्ष्न कोणी सांगा रे, की देवाने जो दोन पायांचा जीव निर्माण केला आहे, त्याला 'माणूस' म्हणतात, त्याच्याकडे बघा, त्याला सावर. चार पायांचे प्राणी आपोआप निसर्गाकडून सांभाळले जातात; त्यांना तसा उपजतच स्वतःच रक्षण करण्याचा दान दिल आहे.
पुढे सांगायचा झाला तर काय आजकालच्या लोकांचा फॅड आहे नवीन, जरा कुठे काही अघटीत घडला की निघाले मेणबत्त्या घेऊन. किंवा दोन मिनिट मौन वगैरे पाळून. आता मी या भावनेच्या विरुद्ध नाही, पण त्या जर तारतम्याने वापरल्या तर, अन्यथा मस्तक खवळल्याशिवाय राहत नाही. वरून, हें प्रताप यांचे एक-दोन दिवस झिंग आल्यासारखे असतात आणि काही होतंय असं वाटायच्या आत मावळतात.
पण गरजूंना साधी कोणी मदत केली आहे का ? विचारपूस तरी केली आहे का ?
मग आमच्या पुढे पुढील प्रश्न दत्त म्हणून उभे राहतात, की बाबा ! कोण लागतात हें आमचे एवढे, की आम्ही त्यांच्या बद्दल एवढा विचार करू? (आता अशा वेळी दत्त म्हणून पुढे उभे राहणे का म्हणतात ते माहीत नाही.) कोण लागतात हें आमचे? आम्ही का म्हणून मदत करू? आम्हाला याच्या मोबदल्यात काय मिळेल ? अशी ही मोठी प्रश्नावली मनात तयार. मात्र बोलून दाखवायची हिंमत कोणात नाही. कारण त्यालाही निर्भीडपणा लागतो, जो आज काहीसा मावळत चाललाय. (काही निर्लज्ज मात्र हें बोलूनही दाखवतात बर, मग अशांच्या माणुसकी विषयीचा वेगळाच प्रश्न उभा राहतो). काहींची म्हणे पत कमी होईल अशाने समाजात. अरे ! पण ह्या सोम्यांना कोण समजावणार, की ज्या लोकांचा, समाजाचा कारण पुढे करून हें अवडंबर माजवत आहेत, तो समाज त्यांना पोसायला येणार नाहीये. या समाजाला एकाचा धंदा, जुन्या-पुराण्या कुठल्यातरी परंपरा जपायच्या, ज्या काळानुरूप ओसरायला पाहिजेत. त्यांना वाटता की त्या जपल्या म्हणजे आपला "कल्याण". पण त्यांना हें माहीत नाही, हेच ते "कल्याण", त्यांना माणुसकीच्या विरुद्ध दिशेने अधोगतीकडे घेऊन चालले आहे. हें आता समाजाला उर फुटेस्तोवर सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आता या बॉम्बस्फोटाच्या घटनेवर किती पत्र, संदेश पाठवण्यात आले, इमेल-मोबाईल वरून. वृत्तवाहिन्यांवरून चिथावणीदायक दृश्य, चित्रे सतत दाखवण्यात होती. पण हेच संदेश कितीसे असे पाठवले गेले, की त्या हल्ल्यात सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात हवा आहे ?. आपणही असा विचार केला होता का, की मी माझ्यापरीने कसा हातभार लावू, मग तो खारीचाही का होईना ?. मोबाईल वरील संदेशही कसे होते, तर म्हणे "त्या दिवशी कसाबचा वाढदिवस होता, म्हणून आतंकवाद्यांनी हें स्फोट घडवून आणले, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी", आता काय म्हणावं, अशा मंद बुद्धींना, ज्यांनी हें संदेश प्रसारित आणि पुढे त्याचे वाटप केले ! बर्थडे ब्लास्ट म्हणे ! मूर्ख लेकाचे. आपण आपल्या वाढदिवस साजरा करण्याला बर्थडे ब्लास्ट म्हणतो, अहो पण त्या लेकाच्यांनी त्याचा शब्दशः अर्थ काढला ना हो. प्रत्येक गोष्टीचा आजकाल विडंबन करण्याची सवय लागलीय लोकांना. पण म्हणून काय जनतेच्या भावनांशी हा खेळ ? आता या भावना कुठे उरत चालल्या आहेत म्हणा. अहो पण ज्यांच्यात ज्या काही भावना उरल्यात त्यांच्याबद्दल मग सहानुभूती वाटून राहते. काय तर म्हणे, स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी, अहो मग पण भावना कशाशी खातात हेही कळण्याची बुद्धी उरू नये ?
बर ते सरकारच, Anti Terrorist Squad काय करताय तर, काही नाही. प्रत्येक गोष्टीचा जाब, हिशेब द्यावा लागतो म्हणे त्यांना, साध्या गोळ्या किती झाडल्या याचाही.. कीव येते त्यांची. कारण इच्छा असूनही त्यांना त्यांची कामगिरी बजावता येत नाही. मग त्या साल्या अतिरेक्यांना कितीही गोळ्या झाडू देत, पण जर ते तुमच्या तावडीत सापडले तर त्यांना ठार नाही करायचा, तर नुसत्या पायावर गोळ्या झाडायच्या म्हणे. का तर म्हणे त्यांच्या साथीदारांची नाव आपल्याला कदाचित कळू शकतील म्हणे. जिवंत हवा आहे आहे तो आम्हाला, आणि आपला कोर्टाचा कामकाज तर सर्वश्रुत आहेच, यात काही वादच नाही. देओलांचा सनी उगाच नाही भडकत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणत.
बर या उपर, काहींनी मदतीचा आवाहन केला तरी हा समाज आहेच वर बोलायला, की आम्ही का म्हणून, शासनाचा काम आहे ते. अहो पण शासनाच्या कामाचा वेग सर्वांस श्रुत आहे, आधी चौकशी समिती नेमली जाणार (तीही उच्चस्तरीय बर का ?) मग अहवाल मांडला जाणार, आणि मग काय...... तो अहवाल बासनात, नाही का ...
गोर गरिबांना, गरजू पीडितांना मदत करा, असं उपदेश मी नाही करणार इथे, हें ज्याचा त्याने समजायला हव. आणि हो, जर का केलात, तर अशा गोष्टींचा उहापोह करून त्या केलेल्या दानाच अवडंबर तरी माजवू नका म्हणजे मिळवलं. कारण केलेलं दान हें अशा रीतीने वाया जात त्या दात्याच्या दरबारात. त्याचा रंगच उडून जातो. एक आत्मिक समाधान जी मिळते ते मग नाही मिळत.
बघा बार प्रयत्न करून तुम्ही आजपासून.. छान वाटत. एका जाहिरातीत ऐकला आहे, "करके देखो, अच्छा लगता हें"
उद्रेक भीषण स्फोटांचा झाला खरा, पण आता आपल्या भावनांचा कधी कोणार ??
इति...
वाचने
6102
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुर्खपणाचा कळस आहे हा.
लोकल पारायण १२-१५
सूडकुमारा, हा प्रतिसाद वाचून
In reply to लोकल पारायण १२-१५ by सूड
निरीक्षण नोंदवलं !!
In reply to सूडकुमारा, हा प्रतिसाद वाचून by विश्वनाथ मेहेंदळे
मोदीनीं नाही का इशरत ला पकडुन
मोदी डोकं वापरतात...
बाकी A.T.S. चं मुखपत्र
हेच ते मुखपत्र वाटतं
काय कामाची ती कार्य शैली
In reply to हेच ते मुखपत्र वाटतं by अर्धवटराव
काय कामाची??
In reply to काय कामाची ती कार्य शैली by श्री गावसेना प्रमुख
हे असले टुकार लेख आणि
In reply to काय कामाची?? by अर्धवटराव
अर्थात, लोकांच्या बुडावर आणखी जोरदार लाथा पडाव्यात अशी फार इच्छा आहे आमची.
का? लोकांनी काय केलय तुमच? आणी नाही आवडत तर सोडुन द्याना,कशाला उगीच टाईमपास करताय......आम्हि कुठे धरुन ठेवलय?
In reply to हे असले टुकार लेख आणि by श्री गावसेना प्रमुख
म्हणजे????
In reply to आम्हि कुठे धरुन ठेवलय? by अर्धवटराव
असं का वाटलं तुम्हाला?
In reply to म्हणजे???? by श्री गावसेना प्रमुख
फुकटच काहि बाही बोलायचं
In reply to असं का वाटलं तुम्हाला? by अर्धवटराव
अर्थात.
In reply to फुकटच काहि बाही बोलायचं by श्री गावसेना प्रमुख
ए.टी.एस.
In reply to अर्थात. by अर्धवटराव
म्हणायला काय जातं.
In reply to ए.टी.एस. by श्री गावसेना प्रमुख
२)कसाब ला पकडल्याने त्याला
In reply to म्हणायला काय जातं. by अर्धवटराव
जमा खर्च.
In reply to २)कसाब ला पकडल्याने त्याला by श्री गावसेना प्रमुख
तर कसाबची केस अफजल गुरुपेक्षा
In reply to जमा खर्च. by अर्धवटराव
तर कसाबची केस अफजल गुरुपेक्षा अगदी भिन्न आहे. त्यांची अशी तुलना करणेच चुकीचे आहे.
दोघांनी देशावरच हल्ला केला होताना. हल्ल्यातही राजकारण करण्याला तुमच समर्थन आहे काय? इतक्या सर्व संस्थांना जर जीवंत कसाबचा फायदा झाला तर तो देशाचा फायदा नाहि काय? होय मान्य ,पण तरीही अफजल गुरु आनी अजमल कसाब ह्यान्ना सरकार पोसतच आहे ना,ह्यात राजकारण करायला नको.ह्यांना जिवंत ठेवण्यात काय हाशील. सगळ्या जगाला माहीत आहे की हे सर्व पाकीस्तान्च करतोय हे सर्व्,अगदी परवा अमेरीकेवाले बोलले की आम्ही लादेन हल्ल्याची माहीती पाकीस्तानला दिली असती तर लादेन पळुन गेला असता. सोडाहो हे पुरावे ह्यांच्यानी काही होत नाही.शिंदे सुद्धा बोलले की हे सर्व पाकीस्तान करतोय. राहीले टाटा मग हे कॉग्रेस चे जिंदाल का करीत नाही?का त्यांचा हीशेब चोख आहे.देशावरच हल्ला केला...
In reply to तर कसाबची केस अफजल गुरुपेक्षा by श्री गावसेना प्रमुख
सरकार काय करतंय हे सर्व सुज्ञ
अच्छा.
In reply to सरकार काय करतंय हे सर्व सुज्ञ by केदारविदिवेकर
मिपा इज बॅक
साॅरी
In reply to मिपा इज बॅक by नितिन थत्ते
म्हणजे मिपावर नेहमीचे यशस्वी
In reply to साॅरी by अन्या दातार
(No subject)
In reply to म्हणजे मिपावर नेहमीचे यशस्वी by नितिन थत्ते
खरच?????
In reply to (No subject) by शैलेन्द्र
@ सूड
नका
In reply to @ सूड by केदारविदिवेकर
नकाओ असं बोलु ते नविन आहेत ,
In reply to नका by तिमा
?
In reply to नका by तिमा
?
खीक्क...
In reply to @ सूड by केदारविदिवेकर
ते स्माइलीवाले पराग दिवेकर
मनातला प्रश्न विचारलात !!
In reply to ते स्माइलीवाले पराग दिवेकर by मृत्युन्जय
@ते स्माइलीवाले पराग दिवेकर
In reply to ते स्माइलीवाले पराग दिवेकर by मृत्युन्जय
स्मायलीवाले पराग दिवेकर आहेत
In reply to @ते स्माइलीवाले पराग दिवेकर by अत्रुप्त आत्मा
ते काये. ते तुमचे कोणी असतील
In reply to @ते स्माइलीवाले पराग दिवेकर by अत्रुप्त आत्मा
@बाकी ते मृत्यूंजय कर्ण आमचे
In reply to ते काये. ते तुमचे कोणी असतील by मृत्युन्जय
खरे आहे. पैसा आहे, २ वेळा
वा राव........
गायब होणाऱ्या ५० मध्ये आपण
In reply to वा राव........ by माम्लेदारचा पन्खा
कुठे चाललास रे असा मध्येच?
In reply to गायब होणाऱ्या ५० मध्ये आपण by llपुण्याचे पेशवेll