Skip to main content

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कहाणी ऐका एका वेश्येची पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची कहाणी ऐका एका वेश्येची..... बालपण सगळ चिखलातच गेल आईच दुधपण बाटलीतूनच पिल जगायचं रडगाण पण लवकरच कळल कहाणी ऐका एका वेश्येची.... शाळा कसली माहीतच नाही शिक्षणाचा तर मला गंधच नाही भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही पशूंचा सहवास तर नवीनच नाही कहाणी ऐका एका वेश्येची..... संसार पडलाय उघड्यावर सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर संसाराचा गाडा माझ्याच देहावर कहाणी ऐका एका वेश्येची..... रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल कहाणी ऐका एका वेश्येची.... तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं नरकातून या बाहेर ढकललं आमच आयुष्य असच गंजल त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल कहाणी ऐका एका वेश्येची.... या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....

वाचने 20252
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by श्रावण मोडक

कोणी मला मराठीतून समजवून सांगीतले तर काही उत्तर देउ शकेन. पुन्हा एकदा खुलासा- वर चर्चेत (गेले अनेक वर्ष ऐकत) आलेला युक्तीवाद की वेश्या आहेत म्हणून सामान्य स्त्रियांची इज्जत वाचते. पुन्हा महीलांची तंग वेशभूषा, स्वेच्छेने.. महीला, पुराणकालात धर्म अमुक तमुक असे अनेक उल्लेख आले. चर्चा नेहमीप्रमाणे लैंगीकतेच्या आजुबाजुलाच घुटमळत होती. म्हणुन फक्त लैगिंक सुरक्षा इतकेच नव्हे तर स्त्रीयांसाठी समाजात पोषक वातावरण म्हणजे काय, स्त्रीयांना समाजाने नेमके उपलब्ध करुन दिलेले स्वातंत्र्/व्यवस्था याचे जागतीक निकष काय ? त्या अनुषंगाने हे आलेले ताजे निरीक्षण. एकंदर अजुन व्यापक मुद्दा यावा म्हणून ती बातमी इथे डकवली. त्याचे निष्कर्ष मान्य करा न करा. पण असे काही आहे व या सर्वाचा विचार व्हावा म्हणुन .... आता यात कोणता खोडसाळपणा, प्रमाण विपर्यास, फोलपणा असेल तर... ठीक आहे माझा अभ्यास वाढवतो इतकेच म्हणतो.

In reply to by सहज

सहज तुमची 'तगमग' समजते. आग असल्या शिवाय का धुर निघणार? कदाचीत विपर्यास केला गेला असेलही. (पाश्चात्य माध्यमांचा खोडसाळपणा नवा नाही.) पण म्हणुन सर्वेक्षणामध्ये नमुद केलेल्या परिस्थितीच्या अगदिच उलटी वा परिस्थिती तितकीशी वाईट नाही असे म्हणण्याच धारिष्ट्य कुणीही दाखवणार नाही. मनीच्या बाता: गण्या चार मोठी माणसं बोलत असताना तुला मध्ये नाक खुपसायची गरज होती का?.

In reply to by गणपा

मनीच्या बाता: गण्या चार मोठी माणसं बोलत असताना तुला मध्ये नाक खुपसायची गरज होती का?.
बघा!! सहज, बिका आणि श्रामो यांचा 'चार' मोठी माणसं म्हणतो.. डब्बल कोणाला मोजलेस? ;) (ह घ्यालच)

In reply to by सहज

ड्रायवींगचं जाउद्या च्यायला एका असहाय्य बाळाचा जगण्याचाच हक्क केवळ स्त्री आहे म्हणून हिरावून घेतला जातो म्हणजे काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दर दोन दिवसाड नदीत, कचराकुंडीत भ्रूण सापडल्याच्या बातम्यां वाचतो आहे. :(