गर्भातील चिमुकलीचे काही अनुत्तरीत प्रश्न.....
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी,
प्रेमिकेसाठी घेतो प्रियकर, उंच उंच भरारी,
मग सांगा, ताईविना दादा अन मुलीविना पालक,
हि कहाणी नाही का अधुरी......... ?
बाबांसाठी मुलगी असते स्वप्नातली परी,
'लेकच हवी' हा आग्रह कोणी न धरी,
जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करी,
मग सांगा, राक्षसच नांदतो ना यांच्या अंतरी......... ?
जन्म घेतला जिच्या पदरी,
ती एक मुलगीच, हे हि तो विसरी,
वंशाचा दिवा हवा आहे दारी,
मग सांगा, फक्त एका मुलासाठी,
आणखी किती लेकी धाडणार देवाघरी........ ?
मुलगी असते धनाची पेटी,
प्रकाश देणारी जीवन ज्योती,
मुलींशिवाय समाजाची होईल का हो प्रगती,
मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ?
वर्गीकरण
सुंदर कविता
अमितसांगलि साहेब, खरच विचारकरायला लावणारी कविता
In reply to अमितसांगलि साहेब, खरच विचारकरायला लावणारी कविता by निश
समाजात असेहि लोक आहेत जे
In reply to समाजात असेहि लोक आहेत जे by पक पक पक
पक पक पक साहेब, तुमच मत पटल पण
वास्तववादी कविता आवडली.
भेदभाव....
कविता सुंदर ! त्यामागील विचार
सुंदर कविता. पुलेशु. या
In reply to सुंदर कविता. पुलेशु. या by शुचि
हिंदी कविता छानच आहे.