गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating

प्रास जनातलं, मनातलं
गीतगुंजन - ८, गीतगुंजन - ७, गीतगुंजन - ६, गीतगुंजन - ५, गीतगुंजन - ४, गीतगुंजन - ३, गीतगुंजन - २, गीतगुंजन - १ गीतगुंजन - ९ : My Heart Is Beating -> Preeti Sagar भारतातही डीसेंट इंग्लिश गाण्यांची कमी नाही आणि मला ताबडतोब आठवणारं पहिलं भारतीय इंग्लिश गाणं प्रीति सागरचं "My Heart is beating" हे होतं. विचार केला यावर लिहावं. खरं तर हे काही भारतीय हिन्दी चित्रपटामधलं पहिलं इंग्लिश गाणं नाही. बाँबे टॉकिजच्या १९३३ सालच्या 'कर्मा' नावाच्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा देविकाराणीने पहिल्यांदा इंग्लिश गाणं गायलेलं. त्याचे बोल होते, ""Now The Moon Her Light Has Shed." 'कर्मा' हा इंग्लिश - हिन्दी असा द्वैभाषिक चित्रपट होता. मग १९७५ साली चित्रपट आला 'ज्युली'. एका एंग्लो-इंडियन कुटुंबाची कहाणी सांगणारा हा सिनेमा. स्वत:ला इतर भारतीय समाजापेक्षा वेगळ समजणारं, उच्च समजणारं, बदलत्या सामाजिक परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेऊ इच्छिणारं असं हे कुटुंब आणि त्यातली ही ज्युली, सर्वात थोरली. इंग्लिश एटिकेट्स जपणारे कुटुंबीय जेवणानंतर ज्युलीला गाण्याचा आग्रह करतात आणि तेव्हा ती हे गाणं प्रिती सागरच्या आवाजात गाते. तारुण्याच्या उम्भरठ्यावर असलेली ज्युली शिकत असते, बाहेरच्या जगात, समाजात फिरत असते. तिच्यात तिच्या पालकांचा विशेषत: तिच्या आईचा 'कूपमंडूक'पणा आणि स्वत:ला इतरांपेक्षा निराळ समजण्याचा दृष्टीकोन नसतो. या गाण्यात तिचे तिच्या वयाला आणि काळाला साजेसे विचार फार आनंद देतात. ज्युली चित्रपटाचे गीतकार 'आनद बक्षी' आहेत पण मला नक्की कल्पना नाही की या गाण्याचे नेमके गीतकार कोण आहे. संगीतकार आहेत राजेश रोशन.... गाणं अप्रतिम आहे आणि माझ्या मते इथे स्थान मिळण्यासाठी योग्य आहे. जरूर आनद घ्या.... आणि हे 'My Heart Is Beating' गीत My heart is beating, keeps on repeating I' m waiting for you - 2 My love encloses a plot of roses And when shall be then our next meeting Cause love you know That time is fleeting, time is fleeting Time is fleeting My heart is beating, keeps on repeating I' m waiting for you My love encloses a plot of roses And when shall be then our next meeting Cause love you know That time is fleeting, time is fleeting Time is fleeting Oh when I look at you The blue of heaven seems to be deeper blue And I can swear that God himself seems to be looking through Zu zu zu zu ru zu, I' ll never part from you And when shall be then our next meeting With love you know That time is fleeting, time is fleeting Time is fleeting Spring is the season That drops the reason of lovers who are truly true Young birds are mating While I am waiting, waiting for you Darling you haunt me, say do you want me And if it is so, when are we meeting Cause love you know That time is fleeting, time is fleeting Time is fleeting My heart is beating, keeps on repeating I' m waiting for you My love encloses a plot of roses And when shall be then our next meeting Cause love you know That time is fleeting, time is fleeting Time is fleeting
वर्गीकरण
लेखनप्रकार

14 टिप्पण्या 5,852 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

मराठी_माणूस नवीन

एक अडाणी शंका. आता पर्यंत ज्या ज्या गीतांचे शब्द इथे वाचले , ती गाणी कोणत्या वृतात बसतात. ध्रुवपद, कडवे, यमक असा काही प्रकार दीसत नाही.

आनंदी गोपाळ नवीन

लै आवडतं गाणं हाय! पिक्चर बोगस. अन सगळी गानी लै झक्कास! That time is fleeting, time is fleeting Time is fleeting ~

५० फक्त नवीन

गायलेले इंग्रजी शब्द कळतात असं हे एकमेव गाणं.... खुप मस्त आहे. गर्लफ्रेंड कशी असावी याचं मनात चित्र या पिक्चरनं उभं केलं होतं.

किचेन नवीन

In reply to by ५० फक्त

सहमत.... मी पहिल्यांदा खालचे शब्द न वाचता गाण ऐकल आणि मला ते समजल! विंनती :तुम्ही ब्रायन आदमच inside out टाका न..

फारएन्ड नवीन

हरीन्द्रनाथ चट्टोपादध्याय हे याचे गीतकार आहेत असे कोठेतरी वाचले होते. बाकी गाणी आनंद बक्षीची असावीत. मस्त गाणे आहे, आणि ही माहितीही छान. कधीकधी चित्रपट्/गाणे पाहून सुद्धा बाकी संदर्भ नीट लक्षात आलेले नसतात. ते कळाल्याने आवडला लेख. या चित्रपटात हे गाणे प्रीती सागरकडून, "साँचा नाम तेरा" हे अतिशय सुंदर गाणे आशा व उषा कडून, आणि "ये राते नयी पुरानी" हे गाणे लता कडून गाऊन राजेश रोशन ने खूप वैविध्य आणले होते गाण्यांत.

मस्त कलंदर नवीन

माझं खूप आवडतं गाणं आहे हे. धन्यवाद. अवांतरः या सिनेमातल्या हिरॉईनला पाहण्यापेक्षा मी छोट्या श्रीदेवीलाच पाहात होते. :-)

पैसा नवीन

बर्‍याच वर्षानी आलेलं इंग्लिश गाणं आणि प्रीती सागरचा लता आशा यांच्यापेक्षा वेगळा आवाज हे कॉम्बिनेशन लोकाना नेहमीपेक्षा वेगळं म्हणून आवडलं असावं. त्यातही राजेश रोशन यांची गाणी तरुणाना आवडतील अशी, अगदी आत्ता आता आलेल्या 'कहो ना प्यार है' पर्यंत असल्यामुळे ही हे गाणं प्रचंड हिट झालं.