त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक. त्या धार्मिक विधीचे तर काय करावे असे मला कधी कधी होते. अहो, काहीही थेर, नवनवीन थेर काढत असतात. छळ पाण्याचा, फुकटच्या भांडवलावर पैसे मिळविणारे नामानिराळे होतात. यात मेले कसले समाधान आणि कुठची शांती भक्तांना मिळते कोण जाणे. गमतीने मला कधी कधी वाटते की माझी जी ही चीड चीड होते ते मी इतरे जणांसारखी शांती करत नाही ना त्यामुळे होते. जाऊ द्या. तसली शांती मला नकोच. नदीचा, पाण्याचा छळ करून मेली कसली शांती. असो.तर मी त्या कोलावारीचा फायदा करून घेतला बरं का, खरे तर गैर फायदा. त्या कोलावारीच्या संगीतावर मी एक गाणं तयार केलं. मराठीतून लिहीलं. मराठीतून म्हटलं. मीच म्हटलं. एक साधी फिल्म बनवली. त्या फिल्म मध्ये आपले नेहमीचेच गोदेचे छळाचे प्रकार दाखवले. आणि ठेऊन दिले यु ट्यूब वरती. अहो, हळहळणाऱ्या अपरिचित जनांनी ते गाणे आणि ती फिल्म त्यांच्या फेसबुकाला चिकटवून इतकं गरागरा फिरवलंय म्हणुन सांगू ! बाप रे, बाप रे !! कुठ्ठून कुठ्ठून मेल आले, फोन आले. मी तर कुणी समाजसेवक आहे असेच वाटले जनांना. तसे काही नाही. मला गोदा आवडते. माझे तिच्यावर घट्ट प्रेम आहे. तिच्याशी मैत्री करावी ना. कुणीही करावी. पण तिची हेळसांड केली की मला राग येतो. मूर्खाना हे ही कळत नाही की तिला दुखावणे आपल्याला परवडणार नाही. पण येडोबांचे काय कराचे मला कळत नाही. त्यामुळे चान्स मिळाला की मी लगेच विषय काढतो. तुम्ही सुद्धा ही फिल्म बघा. त्या फिल्म च्या तांत्रिक बाबी कडे फार जाऊ नका. मी काय कुणी निष्णात नव्हे. विषय महत्त्वाचा आहे. शोधणे सोप्पे आहे. यु ट्यूब वर " Kolaveri Godavari " शोधा. लगेच सापडेल. मित्र मैत्रीणीना सांगा. फेसबुकावर चिकटवून फिरवा. त्यातून काही जणांना वाटेल नक्की ही गोदेला जरा सांभाळले पाहिजे. हीच तिच्यावर कृपा !! अनिल अवचटाना ( बाबांना ) कोलावरी गोदावरी आवडली. बाबा मला म्हणाले " असे आमच्या मुळा मुठे साठी कुणीतरी केलं पाहिजे."
बहुदा ही लिंक व्हावी :
(
वाचने
5671
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) =)) =))
बिन्दास्स बोला .....
In reply to =)) =)) =)) by गणपा
शोधण्यापेक्षा !! _/\_ श्री
धन्यवाद
In reply to शोधण्यापेक्षा !! _/\_ श्री by सुहास..
वीडीओ चिकटलविल्यामुळे...
In reply to शोधण्यापेक्षा !! _/\_ श्री by सुहास..
आई ग्ग !!!!
आवरा
गोदेच्या प्रश्नाकडे लक्ष
अतिशय विचार करायला लावणारा विडीयो व गाण
कहर !
आज रात्री पाहतो ... अजुन मुळ
साहेब
In reply to आज रात्री पाहतो ... अजुन मुळ by गणेशा
वा वा मुतालिक साहेब..फार
धन्यवाद मित्रानो
चांगला उपयोग
गोदावरीच नव्हे तर भारतातील
>> आपल्याकडच्या खुळ्या प्रथा
In reply to गोदावरीच नव्हे तर भारतातील by पाषाणभेद
नद्यांची वाट.....
तो कुठलासा रिपोर्ट वाचण्यात
In reply to नद्यांची वाट..... by सुधीर मुतालीक
धन्यवाद
In reply to तो कुठलासा रिपोर्ट वाचण्यात by llपुण्याचे पेशवेll
काळेपाणी............
धन्यवाद
In reply to काळेपाणी............ by जयनीत
गाणं आणि त्याप्रमाणे केलेली
हा हा हा !
In reply to गाणं आणि त्याप्रमाणे केलेली by रेवती
छान!
धन्यवाद
In reply to छान! by स्वाती दिनेश
लई भारी...
खास आभार.
In reply to लई भारी... by योगप्रभू