✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रवासातील माणुसकीचे दर्शन

श
शितल यांनी
Sun, 06/01/2008 - 03:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9970 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 08:20 नवीन

भला माणूस!

सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..! शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत... तात्या.
  • Log in or register to post comments
फटू Sun, 06/01/2008 - 09:14 नवीन

खरंच भला माणुस होता तो...

अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात... (भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/01/2008 - 09:35 नवीन

माणूसकी

सहजपणे लिहिलेला प्रसंग डोळ्य़ासमोर उभा राहिला. माणूसकी अशी अपवादानेच दिसते. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 09:51 नवीन

भयानक प्रसंग...

एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो. अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
मदनबाण Sun, 06/01/2008 - 15:24 नवीन

पेठकर

पेठकर काकांशी सहमत..... आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
शितल Sun, 06/01/2008 - 16:09 नवीन

ते मात्र लिहायचे राहुन गेले.

प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 20:51 नवीन

धन्यवाद...

हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) वाचून बरे वाटले. धन्यवाद. आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 06/01/2008 - 12:04 नवीन

अशी सभ्य

:) अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे ! सलाम ! अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
मन Sun, 06/01/2008 - 13:35 नवीन

माणसांमध्ये

"माणुस" सापडतो तो असा. छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी. (आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
इनोबा म्हणे Sun, 06/01/2008 - 16:18 नवीन

"माणुस" सापडतो तो असा.

खरं आहे! पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... हेच म्हणतो.. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
मुक्तसुनीत Mon, 06/02/2008 - 01:35 नवीन

अनुभवकथन आवडले.

..त्यातील प्रामाणिकपणा , साधेपणा विशेषत्वाने जाणवला.
  • Log in or register to post comments
आनंदयात्री Mon, 06/02/2008 - 11:08 नवीन

असेच म्हणतो

सुंदर मांडलाय अनुभव .. अजुन येउ द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
यशोधरा Mon, 06/02/2008 - 08:37 नवीन

शीतल, छान

शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक. तेह्वा तू किती घाबरली असशील ना?
  • Log in or register to post comments
ऋचा Mon, 06/02/2008 - 10:43 नवीन

खुप छान

खुप छान लिहिले आहेस. पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
सुधीर कांदळकर Mon, 06/02/2008 - 19:49 नवीन

पेठकरसाहेबांचा सल्ला ......

खरेच गांभीर्याने घ्यावा. 'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही. अनुभव छान लिहिला आहे. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
चतुरंग Mon, 06/02/2008 - 20:29 नवीन

साधे सोपे अनुभवकथन आवडले.

वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे. मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :) चतुरंग
  • Log in or register to post comments
अमोल केळकर Mon, 06/02/2008 - 22:02 नवीन

प्रतिक्षा केंव्हा संपणार --

आणखि दोन अनुभव लगेचच मा॑डते. वाट पहात आहे. (गगनबावडा- कणकवलीचा) प्रवासी केळकर
  • Log in or register to post comments
विदेश Mon, 06/02/2008 - 22:02 नवीन

माणुसकीचे दर्शन-

छान लिहिला आहे प्रवासानुभव. पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली . नशीब चांगले,माणूस भला भेटला!
  • Log in or register to post comments
शितल Mon, 06/02/2008 - 22:46 नवीन

धन्यवाद !

सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.
  • Log in or register to post comments
वरदा Mon, 06/02/2008 - 23:33 नवीन

मस्त लिहिलयस

मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय.... तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....
  • Log in or register to post comments
स्वाती दिनेश Tue, 06/03/2008 - 12:29 नवीन

शीतल..

शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव. भला माणूस होता तो,नशिब ! स्वाती
  • Log in or register to post comments
प्राजु Tue, 06/03/2008 - 12:45 नवीन

शितल...

अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ईश्वरी गुरुवार, 06/05/2008 - 03:57 नवीन

>>अनुभव छान

>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम. -- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी. पुढचेही अनुभव टाक ना लवकर. ईश्वरी
  • Log in or register to post comments
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 19:22 नवीन

अंगावर

अंगावर काटा आला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
अर्धवट गुरुवार, 06/24/2010 - 19:34 नवीन

बाय जपुन

बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय.. (उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट
  • Log in or register to post comments
पाषाणभेद गुरुवार, 06/24/2010 - 19:53 नवीन

बर्‍याचदा

बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा