आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय.
१. आय आय टी होली काऊ आहे काय?
नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला.
२. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का?
डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे. तरीपण पूर्वीइतकी काठिण्यपातळी राहिलेली नाही (दोन्ही परीक्षांमध्ये).
२.१. काठिण्यपातळी का खालावली?
पूर्वी जेईई आणि गेट चे पेपर्स हे सब्जेक्टीव असत; आता ऑब्जेक्टीव असतात. आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक लोकांची संख्या वाढली. त्यामुळे पेपर चेक करणे, व एकंदरच परीक्षा लवकरात लवकर घेणे या सगळ्याचा विचार करता सब्जेक्टीव टू ऑब्जेक्टीव हा बदल होणे ही परीक्षापद्धतीची, System need होती. अर्थातच यामुळे काठिण्यपातळीत बदल होणे अपरिहार्य आहे.
या बदलामुळेच गुणवत्तायुक्त विद्यार्थी न येण्याची शक्यताही वाढते. हेच एक महत्वाचे कारण आहे, ज्यामुळे एकंदर आय आय टीची गुणवत्ता घसरत असल्याचा आरोप खोडून काढणे सोपे रहात नाही.
३. आय आय टीमध्ये संशोधन होते का?
हो. आय आय टीमध्ये विविध विषयांवर संशोधन होते. पण त्यातून अगदी ठोस (ग्राऊंड-ब्रेकिंग का काय ते) निर्माण होत नाही हे खेदाने नमूद करावे वाटते. इंडस्ट्रीची जी गरज आहे ती पूर्ण करणे हे आय आय टीचे उद्दिष्ट आहे की नाही माहित नाही, पण असण्यास हरकत नसावी. एम.टेक व पीएचडी साठी जो काही रिसर्च चालतो त्यातील फार थोडा भाग इंडस्ट्रीमध्ये उपयोगात आणला जाऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
४. आय.आय.टीचा दर्जा का खालावला?
प्रश्न अगदी विचारपूर्वक मांडतोय. परीक्षापद्धतीबरोबर अजुनही काही फॅक्टर्स आहेत, ज्यामुळे आय आय टीचा दर्जा खालावत आहे (कुणी विचारले नसले तरी हे माझे मत आहे)
- अनेक शिक्षक आय आय टी मध्येच बीटेक, एम टेक, पीएचडी करुन तिथेच फॅकल्टी म्हणून जॉईन होतात. फार कमी शिक्षक इंडस्ट्रीत जाऊन आलेले असतात. त्यामुळे इंडस्ट्रीची गरज त्यांच्या लक्षात लवकर येत नाही.
- शिक्षकांचे शिकवण्याचे विषय, पद्धत, पेपर काढण्याची- ग्रेडींग करण्याची पद्धत ३-४ वर्षांमध्येच विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे एकदा प्रवेश मिळाल्यानंतर पास होणे अवघड नाही.
- युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर सिक्षकावर्/पेपर तपासणार्यावर कुठलेही स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. पण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही
- अनेकदा आय आय टीअन अंडरग्रॅडला रिक्रुटर्स फक्त त्याचा जेईई रँक विचारुन पुढे काहीही न विचारता जॉब ऑफर करतात. त्यामुळे प्रवेश झाल्या झाल्याच विद्यार्थी फार शेफारतात. हाच अॅटीट्युड पुढे अनेक वर्षे कायम राहतो/असावा.
हे सगळे असूनही आय आय टीचा दर्जा हा इतर युनिव्हर्सिटीज पेक्षा तुलनेने उच्चच आहे. पण म्हणून "आम्हीच शहाणे" असा आविर्भाव न करता आत्मपरीक्षण करणे कधीही हितावह आहे म्हणून एक आय आय टीयन या नात्याने हा लेखप्रपंच. :)
टीपः सध्या व्यस्ततेमुळे या धाग्यावर प्रतिक्रिया देता येईलच याची खात्री देत नाही. पण अगदीच रहावले नाही म्हणून लेख टंकलाय. पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विचारप्रवर्तक धागा.
तुम्ही आयायटीतले की बाहेरचे?
त्यांच्या वतीने आम्ही उत्तरे
कोचिंग क्लास
धागा आवडला. वेळ मिळाल्यास
ओ दुर्बिटणेबै
स्व अनुभव कि फक्त निरीक्षण ??
धागा हिंदी किंवा इंग्रजी
उच्च शिक्षणातही भारत "ढ'च!
ओके
आँ????
अहो
लेख आवडल्या गेला आहे अन्या
लेख आवडल्या गेला आहे.. आनखिन
त्रोटक होता
त्रोटकपणाचा आक्षेप मान्य. लेख
+१
अनुत्तीर्ण.....
बापरे मोठीच जबाबदारी आली की....
मास कॉप्या करून आणि कॉलेज
आय आयटि मध्ये पण हायली
कानात मायक्रोफोन घालून कॉप्या करण्यापेक्षा
>>आय आयटि मध्ये पण हायली
खुलाशाबद्दल धन्यवाद, यावरुन
आयायटी ही जरी (सध्याची)
उत्तरे
आमच्या बघण्यातले आयायटीवाले
बेसलाईन
- जेंव्हा ~ १९६० च्या दशकात आय आय टी चालू झाल्या तेंव्हा तेथून बाहेर पडणारे आणि आत्ता बाहेर पडणारे यांच्या (व्यावसायीक) गुणवत्तेत सरासरी फरक आहे असे वाटते का? (मला असा असेल असे वाटत नाही)
- हा जो काही दर्जा तो केवळ पुर्वी आणि आत्ता अशाच तुलनेतून विचार करण्यासाठी आहे का जगातील इतर नामवंत विद्यापिठे आणि आय आय टी अशी तुलना करण्यासाठी आहे?
- पिबिएसवर एकदा मुलाखतीत मूर्तींनी सांगितले होते की माझ्या मुलाला आय आय टीत प्रवेश मिळाला नाही म्हणून कॉर्नेलला जावे लागले. मग त्यांनी नंतर एमटेक/पिएचडी साठी आय आय टीत प्रयत्न केला का? नसला तर का नाही? इथल्या एका गव्हर्नर होऊ इच्छिणार्या राजकारण्याने देखील असेच एकदा गंमतीत एम आय टी बद्दल म्हणलेले पाहीले आहे. अर्थात त्याच्यासमोर भारतीय पोटेन्शिअल फंडर्स बसले असल्याने, त्याला how Indians are smart असे म्हणून त्यांचा इगो सुखावयाचा होता.
- पण मुद्दा असा आहे की आय आय टी ज्या दर्जाच्या हेतूने तयार केल्या गेल्या (यात त्यातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा दोष नाही) त्यात जे काही शैक्षणिक धोरण होते ते आयव्ही लीग्स सारखी संस्था करण्याचे होते का? आणि असले तर तसे झाले का? नसले, तर बाकी इंजिनिअरींग कॉलेजेस पेक्षा अमेरीकन ग्रेडींग सिस्टीम आणि नव्वदच्या दशकाआधी अमेरीकेतील अधिक विद्यापिठात (तो ही आयव्ही लीग) प्रवेश, असा दर्जा सोडल्यास काही वेगळे आहे का?
यात मी आय आय टी आणि त्याहूनही अधिक आय आय टीअन्स ना नावे ठेवण्याच्या हेतूने लिहीत नाही हे स्पष्ट करत आहे. माझा मुद्दा हा आपल्या दर्जाची व्याख्या ही खर्या अर्थाने जगातल्या ऑक्सफर्ड-एम आय टी शी स्पर्धा करण्यासाठी केली गेलीच नाही हा आहे.चर्चा वाचते आहे!
नॉन आयाय्टीयन, नॉन विंजिनेर, नॉन आयटी,
एक प्रश्न
अजून माहिती हवी होती.
लेख आवडला पण ण आय आय टीमध्ये
मॅथेमॅटिकल ट्राय्पोज
आय आय टी कानपुरमधे मात्र ओपन
पटलं नाही.
चांगला मुद्दा राजेश
चांगला मुद्दा राजेश
संशोधन आणि अनुदान
माझे एक फालतू मत...