Skip to main content

गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 20/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी आयआयटीमध्ये माझ्या प्राध्यापकाना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दूखावला गेलो तेव्हा माझी क्षमा मागण्याचा मोठे पणा दाखवणा-या प्रा. अरूणकुमारांना पण भेटलो. त्यांना लेक्चरला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त अंवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा... "Rajeev, what are you doing these days? "- प्रा. अरूणकुमार "Sir, I am working in a private software company as Project Manager." -मी "What is the team size?" - प्रा. अरूणकुमार "8-10 developers"-मी "How long you have been with them?" - प्रा. अरूणकुमार "Now almost 3 years." -मी "Who is on your top?" - प्रा. अरूणकुमार "Vice President and CMD!" -मी "How many IITians are there in your organization?" - प्रा. अरूणकुमार "Only two, sir! Me and my boss. " -मी "Rajeev, you should seriously think of changing your job" - प्रा. अरूणकुमार मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!
लेखनविषय:

वाचने 23717
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

लेखाचा उद्देश लक्षात आला नाही. म्हणजे ज्या कंपनीमध्ये आयआयटीमधून शिकलेली मंडळी नसेल अशा यःकश्चित ठिकाणी तू आपली बुद्धी, शिक्षण, योग्यता, इत्यादी का व्यर्थ दवडतो आहेस असे तर प्रा. अरुणकुमारांना सुचवायचे नव्हते ना? म्हणजे मला असाच अर्थ कळला. असं जर असेल तर मग प्रा. अरुणकुमारांनाच अजून शिकण्याची गरज आहे असे मला वाटून गेले. माझा आणि आयआयटी, आयआयएम, सीओईपी, व्हिजेटीआय, वगैरे उच्च संस्थांचा कुठल्याच प्रकारचा संबंध कधीच आला नाही आणि माझी शैक्षणिक, बौद्धिक योग्यता बघता असा संबंध येणे पुढच्या ७-८ जन्मात तरी शक्य होणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. म्हणून आयआयटी, आयआयएम या संस्थांविषयी मला खूप आदर आहे. या संस्थांमधून उत्तीर्ण होणार्‍यांविषयी मला नेहमीच एक भीतीयुक्त आदर वाटत असतो. ही मंडळी बुद्धीमान असतातच यात शंकाच नाही; त्यांच्या फोकसचे देखील मला कौतुक वाटते. इथे आयआयटी, आयआयएम मधून उत्तीर्ण झालेली मंडळी बघून मला त्यांच्याविषयी आदर वाटतो. पण सगळ्या जगाला आदर वाटतो म्हणून प्रा. अरुणकुमारांनी अशी टिप्पणी करावी हे अनाकलनीय आहे. कुणी कुठलेही काम करत असला तरी तो त्याच्या-त्याच्या परीने अर्थव्यवस्थेचे इंजिन पुढे नेण्यास हातभार लावत असतो हे अर्थशास्त्राचे सोपे गणित आहे. अगदी शिपाई असला काय किंवा सफाईकामगार असला काय, प्रत्येक व्यक्ती अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असते. ही अशी अर्थव्यवस्थाच नसेल तर मग कुणाच्या बुद्धीला किंमत राहील? सी. के. प्रल्हादसारखा द्रष्टा व्यवस्थापन गुरु जर 'बॉटम ऑफ पिरॅमिड' अशी लाखमोलाची थिअरी मांडून बड्या-बड्या कंपन्यांना यश मिळवून देऊ शकतो तर कुठल्याही स्तरावरच्या व्यक्तीचे किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामाचे एकूण अर्थव्यवस्थेतले महत्व प्रा. अरुणकुमारांसारख्या तज्ञ व्यक्तीला कळू नये याचे आश्चर्य वाटते. मी आयआयटीमधून किंवा एनआईडीमधून डिझाईनचा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या काही लोकांना ओळखतो. त्यांची झेप इतरांच्या मानाने काही फार दिव्य नाहीये. एक मुलगी तिच्या कामात थोड्या-फार प्रमाणात वगळता बाकी खरच मठ्ठ आहे. कॉमन सेन्स, लॉजिक, जनरल नॉलेज, विचार करण्याची क्षमता, इत्यादी सगळ्याच बाबतीत ती जवळ-जवळ शून्य आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. माझ्या जुजबी ओळखीचा एक आयआयटी मधून शिकलेला प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तो इतका बालिश आणि गर्विष्ठ आहे की कुठलाच प्रोजेक्ट त्याला घ्यायला तयार होत नाही. 'मी आयआयटीत शिकलेलो आहे' या तोर्‍यामुळे त्याने खूप शत्रू आणि खिल्ली उडवणारे मित्र जमवून ठेवलेले आहेत. कंपनी जॉईन केल्यावर ताबडतोब पीसी मिळाला नाही म्हणून संतापून त्याने एक सर्वर उचलून आणला होता. 'मी आयआयटीयन आहे' हे माहित असून मला लवकर पीसी, लॅपटॉप मिळत नाही याचा त्याला फार राग आला होता. आता तो काहीतरी फुटकळ कामे करत असतो आणि सगळे त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी माणूस घडतो ते अंतःप्रेरणेने. बाकी दिशा देण्याचे काम हे बाहेरील घटकांचे असते. या संस्था आणि त्यात शिकणारे खूप बुद्धीमान असतात यात शंकाच नाही पण फक्त तेवढ्यावरच यश अवलंबून नसते असे मला वाटते. कितीतरी कमी शिकलेले, न शिकलेले आयुष्यात काहीतरी भव्य-दिव्य करून जातात. इन फॅक्ट, सीईओ वगैरे मंडळी सोडली तर आभाळाला टेकलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये इतके महान शिक्षण घेतलेल्या लोकांचे प्रमाण फार काही जास्त नसावे. --समीर

मला वाटते कि सर्व महत्वच मुद्दा विसरत आहेत. प्राध्यापकानी त्याना कम्पनी नव्हे तर job change करायला सान्गीतले आहे. त्यामुळे युयुत्सु आता त्याच कम्पनीमध्ये project management ऐवजी technical role करत असावेत. बरोबर ना, युयुत्सु ?

मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला आय आय टी परिसराची एक चक्कर पुरेशी असते
ह.ह.पू.वा..... का ? please don't ask... because its not my nature to be mysterious but I cant tell you and I cant tell you why ...... ;) बाकी या धाग्याबद्दल काय बोलणार ? आता तूम्ही कीतीही कारणे पूढे करा, भलेही कारणे योग्य असतील वा नसतील मिपाकर तूमच्या चूकीच्या वागण्याचे/निर्णयाचे खापर तूमच्यावरच फोडतील तूमच्या गूरूंवर नाही.

गेल्या काही वर्षांत आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असून वरच्या २० टक्क्यांतील विद्यार्थी वगळता बाकीच्या ८० टक्क्यांचा दर्जा सुमार असतो, असे मत ‘ इन्फोसिस ’ चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलं http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10228616.cms यातच सर्व काही आले .. बाकी चालु द्या

दिसत नाही लेख जितका एकांगी वाटला की जर दोनच आयआयटीयन्स असतील तर बाहेर पड तितकेच बरेच प्रतिसादही... जर इतके सर्व इतर कॉलेजेस आणि सगळे कोपर्‍यावरच्या कॉलेज मधले बुद्धिमान आहेत तर ते काय मुद्दाम जेईई सोडून बारावी करून मुद्दाम कमी गुण घेऊन तिथे गेलेत आणि आता काही जनरल सॉफ्टवेअर कामात आपली असामान्य प्रतिभा दाखवतायत की जी बी टेक वाल्यांपेक्षा खूप महान आहे. हे मान्य करायलाच हवं की तेवढा बुद्धिमत्तेत, कष्टात, गुणवत्तेत आणि इतर विद्यापीठातून जसे किलोच्या टनाच्या भावाने अभियंते सहज पास होऊन काही धडपड करून सॉफ्टवेअर मध्ये शिरतात त्यापेक्षा आय आय टिचा दर्जा शंभर टक्के वरचा आहे. (मी आय आय टी चा नाही कोपर्‍यावरच्या कॉलेजचा आहे... खुलासा केलेला बरा). सध्या जागा राखून ठेवत आहे... पुढील प्रतिसादासाठी...