Skip to main content

([ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीचे अभद्र प्रोडक्शन रिलिज)

धन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
दिनांक १ जुलै २०११ रोजी हिंजवडी आयटी पार्कात फेज २ मध्ये प्रोडक्शन रिलिज होत असून हे प्रोडक्शन रिलिज क्लायंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेवलपमेंट टीम बरोबर केंद्र योग करते. त्यात क्लायंट बरोबर होणारा केंद्रयोग अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. याशिवाय हे प्रोडक्शन रिलिज पोस्ट डिप्लॉयमेंट सपोर्ट टीम बरोबर प्रतियुती करते. थोडक्यात प्रोडक्शन रिलिजमुळे बॄहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने हे प्रोडक्शन रिलिज एकंदर "अभद्र" असेच म्हणावे लागेल. इंफ्रास्ट्रक्चर डाऊन होणे, क्वालिटी टीमने अडथळे आणणे, एखादया डेवलपरनेच जाणून बुजून बग ठेवून घातपात करणे, क्वचित प्रोजेक्ट मॅनेजरक्षोभ, किंवा पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे नावे दिलेल्या डेवलपर्सना हे प्रोडक्शन रिलिज विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया - http://vaayzed-programmers.blogspot.com/2011/06/blog-post_20.html नॉन आयटी वाचक क्षंमस्व.
नरेशकुमार

अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया - http://vaayzed-programmers.blogspot.com/2011/06/blog-post_20.html . ब्लोग उघडत नाहीये. नीट लींक पेस्ट करा. असाच लेख जस्ट आत्ताच थोड्या वेळापुर्वि कुठेतरी वाचल्यासारखा वाटतो.
20/06/2011 - 10:26 Permalink
धन्या

In reply to by नरेशकुमार

ब्लोग उघडत नाहीये. नीट लींक पेस्ट करा.
जाऊ दया... "अभद्र" बॄहच्चौकोन भौमितिक रचनेचे परीणाम १ आठवडयाच्या ऐवजी २ आठवडे आधी दिसायला लागले आहेत. कालाची अचुकता वर्तवण्यात आमची थोडी चुकच झाली. पण होणारे परीणाम मात्र अचूक वर्तवले आहेत. आम्ही आमच्या भाकितात म्हटलेच होते की इंफ्रास्ट्रक्चर डाऊन होणे...
20/06/2011 - 10:38 Permalink
मीमाको

लय भारी!!! जाणून बुजून बग ठेवून घातपात करणे...
20/06/2011 - 10:46 Permalink
चिरोटा

हा हा. मस्तच. http://vaayzed-programmers.blogspot.com/ हि लिंक उघडली
20/06/2011 - 10:50 Permalink
प्यारे१

>>>>नॉन आयटी वाचक क्षंमस्व. हा पंक्तिप्रपंच का आला? अभद्र रिलिजचे परिणाम असतील तर ते सारखेच व्हायला हवेत. धवांचा तीव्र णिषेढ... बाकी तीव्रता मोजण्याचे काय युनिट आहे? आणि हो... (येस्स वी आर... व्हाय आर वी? ;)) नकुंना वाय्झेड ब्लॉग उघडत नाहीये. त्यांना उघडून द्या.
20/06/2011 - 10:52 Permalink
चिरोटा

अहो ध्नाजीराव, जरा जपून लिवा की. काय लिहिलय ब्लॉगात हे ?
I work as Software Engineer in Hinjwadi. we are now in production release.and majority of bugs are assigned to me. I hate that. Yes, in the beginning i screwed up little bit. But i did my work and went succesfully to Pre-Production also.
20/06/2011 - 11:19 Permalink
धन्या

In reply to by चिरोटा

दुसर्‍या कुणीतरी बनवलेली आहे... त्यांचा उत्साह जरा जास्तच झाला आहे. पण बिल आता आमच्या नावावर फाटणार असं दिसतंय :)
20/06/2011 - 12:15 Permalink
विदेश

अभद्र प्रोडक्शन रिलीज निमित्त सर्व 'नोन-आय-टी' वाचकांना शुभेच्छा !
20/06/2011 - 13:17 Permalink
राजेश घासकडवी

किंवा पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.
हे मस्तच. पुण्यात जून जुलैत पावसाची भाकित करण्याइतका तुमच्या होराशास्त्रावर तुमचा विश्वास आहे हे बघून आदराने नतमस्तक झालो.
20/06/2011 - 17:40 Permalink
आत्मशून्य

:) आतापर्यंत हा विचारच केला न्हवता. ह्या सर्व गोंधळात एच.आर. वक्री होऊन काय फलनिर्देष देइल यावरती विवेचन विस्तृतपणे येऊद्याच. - जूजूत्सूक.
20/06/2011 - 18:50 Permalink
मूकवाचक

ऑनसाईट असणे हा 'नीचभन्ग राजयोग'च आहे. ऑनसाईट असताना एरवी वक्री असणारे एच. आर, अ‍ॅडमिन वगैरे ग्रह अस्तन्गत तर प्रोजेक्ट मॅनेजर, टीम लीड वगैरे सतत षडाष्टकात असणारे ग्रह निर्बळी होतात.
20/06/2011 - 20:00 Permalink
स्मिता.

धनाजीराव सध्या एकदम फॉर्मात आहेत. एकावर एक षटकार ठोकत आहेत. पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. हे लई भारी!!
20/06/2011 - 22:17 Permalink