Skip to main content

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

लेखक ईश आपटे यांनी मंगळवार, 12/04/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे. १. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी २.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते ३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची ४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची ५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची ६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची ७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची. ८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप ९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल. हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे) ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे. समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः / द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः // भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता / भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा // याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी / पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता // उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता / तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः / {लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे} (लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल. मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल. लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे) लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे. ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन संदर्भ- सूर्यसिध्दान्त विष्णु पुराण सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28910
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by गोगोल

अहो काल तुम्ही ते दडपण्याचं म्हणालात म्हणून मुद्दाम चेक केल!! (आम्हालातरी काय खाज बघा!!:)) साय-फाय चॅनलवर अजून ही दाखवताहेत सटारगेट-१!!! एन्जॉय!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

परत बघणार... कर्नल ओ नील झिंदाबाद!!

आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!! जिवंतपणाचं लक्षणच जणू!! ;)

In reply to by प्राजु

आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!!
अगदी! गोडा मसाला घरी आणण्याच्या कृतीवरही होतो. (लिहिणारा/री) जिवंत असल्याचे लक्षण! ;) 'मी काहीबाही लिहितो, म्हणजे मी आहे.' (देकार्तची क्षमा मागून.) (कोणी याचे ल्याटिनीकरण करणारा तज्ज्ञ आहे काय रे???)

In reply to by धनंजय

...scriboमध्ये ती काहीबाही लिहिण्याची अर्थच्छटा कितपत येते, याबाबत साशंक आहे. जिवंतपणाचा निर्देशक म्हणून नुसते काहीतरी लिहिणे उपयोगी नाही. काहीबाही (किंवा काहीतरीच) लिहिणे महत्त्वाचे. या अनुषंगाने, कृपया त्या scriboचे पुनर्ल्याटिनीकरण करू शकाल काय? (Illegitimi non carborundumच्या धर्तीवरचे स्यूडोल्याटिन असले तरीही चालू शकेल.) (पहिला कच्चा खरडा म्हणून Bullshito ergo sum सुचले होते, पण त्यात मजा नाही. नको तितके थेट आहे. थोडे साटल्य बरे.)

वेगळे लेखन वाचून चांगले वाटले. (इतिहास पाहतांना वेगळ्या गोष्टी समोर येतात. काही संप्रदायांमध्ये एका विशिष्ट घटनेआधी काहीच अस्तित्त्वात नव्हते असे मानल्यामुळे काही वेळा चमत्कारिक परिस्थिती होते. माझ्या वडिलांनाही या अभ्यासाचा छंद होता. पण त्यांच्या अभ्यासावर समाजाकडूनच कडक टिका आणि नियंत्रण आले. मजहब इमानपेक्षा वेगळे काही बोलतो म्हणून नातेवाईक आणि मित्रांकडूनही त्रास भ्जोगावा लागला हे सत्य आहे. हे सगळे माझ्या डोळळ्यासमोर घडले आहे.) वर आलेले काही प्रतिसाद माझ्या वडिलांना त्रास देणार्‍यांच्या सारकेच आहेत. त्यांना वेगळे काही सहन होत नाही. खुदा त्यांना चांगली बुद्धी दे. वेगळे विचार मांडायला त्रास सहन करावाच लागतो. पण माझ्यात तरी माझ्या वडिलांसारखे आयुष्य जगण्याची हिम्मत नाही. म्हणून खुदाच्या क्रुपेने फक्त तुमच्या लेखनाची पढाई आहे.

लेख रोचक आहे. मते पटली किंवा न पटली तरी हे मांडायला माझी काहीच हरकत नाही. किंबहुना सर्व इतिहास अभ्यासकांनी लेखाचे स्वागत केले पाहिजे असे वाटते. उत्सुकता म्हणून सूर्यसिध्दान्त असा शोध विकीवर घेतला असता. अजून काही मनोरंजक माहिती सापडली. हा ग्रंथ स्वतः सूर्याने दिला असे एक पौराणिक मत आढळते. तर आधुनिक मतानुसार सूर्यसिध्दान्त याचा लेखक माहिती नाही. किंवा लेखक कोण याविषयी मतभिन्नता आढळते असे म्हणता येईल. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. किंवा कदाचित त्या आधीचाही असेल. म्हणून या ग्रंथावर, 'ग्रीक किंवा मेसापोटामिया येथील तत्त्वज्ञांची भारतीय प्रत' असा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. इस.पूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धांत, पौलिश सिद्धांत आणि रोमक सिंद्धांत या ग्रंथात याचा उल्लेख आहे. तसेच वराह मिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळतात. एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे. या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकार यावर माहिती आहे. ग्रहांचे आकारमान - शुक्र - सूर्यसिध्दान्तानुसार शुक्राचा आकार ३००८ मैल आहे. (विकीवर सूर्यसिध्दान्तातील एकक दिलेले नाही. पण ते बहुदा योजने असावे.) आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचा आकार ३०३२ मैल आहे. शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिध्दान्तानुसार शनीचा आकार ७३८८२ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की ७४५८० मैल आहे. म्हणजे फक्त सुमारे १ टक्क्याचा फरक यात दिसला आहे. तसेच सूर्यसिध्दान्तातच साईन व कॉस यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा उहापोहही या ग्रंथात आहे. एकुणच सुर्यसिद्धांत हा ग्रंथ रोचक आहे. या ग्रंथाचा आवाका वैश्विक मिती या संदर्भात आहे/असावा. त्यामुळे त्यातील संदर्भ गंभीरतेने अभ्यासण्यास हरकत नसावी. सुर्यसिद्धांत या ग्रंथात कपोलकल्पित गोष्टी नाहीत असे मला वाटले. अजून अभ्यास व्हायला हवा. खरे तर अनेक पाश्चात्य विद्यापीठात हा ग्रंथ अभ्यासला जातो आहे, असे जालावर दिसून आले. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस (Burgess ) या अभ्यासकाने Surya-Siddhanta; a text-book of Hindu astronomy या नावाने इ.स. १८५८ मध्ये केले. अभ्यासूंना हे भाषांतर प्रमुख ग्रंथालयात उपलब्ध आहे असेही दिसते. आशा आहे या माहितीचा उपयोग होईल.

In reply to by श्रावण मोडक

सर्वद्वेष्टे माझा द्वेष करत नाहीत आणि ते फार जहाल तुच्छतावादीही नाहीत म्हणुन ते जवळचे :) वैयक्तिक हल्लास्वरुपी विनोदावर हसणे ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.

In reply to by आनंदयात्री

हाहाहाहा... उत्तर बाकी भारी आहे. त्यात जवळचे, लांबचे असे मीतीदर्शक शब्द दिसले आणि भरून पावलो रे...

In reply to by आनंदयात्री

शनिचा आकार = शनि ची व्याप्ति. द्विमितीमध्ये (लांबी व रून्दी) मोजमापाचे एकक मैल हे बरोबरच आहे. दृश्य स्वरुपात व्याप केवढा हे सांगताना आकार हाच शब्द वापरला जातो. वर्तुळाकार वस्तूच्यासाठी 'व्यास' हा व्याप्ति निदर्शक शब्द वापरतात.असो. खुसपट

In reply to by निनाद

धन्यवाद निनाद. पुरक माहिती अत्यंत उत्तम आहे. आपट्यांनी दिलेली माहितीही रोचक विस्मित करणारी आहे (फक्त चाळणी लाउन वाचली :) ) धन्यवाद.

In reply to by निनाद

अजून काही मनोरंजक माहिती सापडली.
वरील प्रतिसादातील माहितीची लेख आपटे तर नव्हेत? ;-) (ह. घ्या. ) ही माहिती तुम्ही कॉपी पेस्ट केली आहे की तपासून पाहिली आहे? तुम्ही दिलेल्या विकीपानावर काही श्लोक दिसले त्यात ही माहीती आहे का? आकडे तर कुठे दिसत नाहीत. बाकी सगळं जाउद्या, फक्त त्या पुस्तकात पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परीवलनाचे गणित कसे केले आहे तेव्हढे इथे कॉपी पेस्ट करा म्हणजे कुणा 'इशाने' का सुर्याने ते पुस्तक लिहले आहे ते कळण्यास मदत होईल.

In reply to by Nile

आकडेवारी मी कुठून देणार? मी मला जे सापडले ते दिले. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमचे शोधा. हे कुठून घेतले आहे ते हवे असल्यास - इंग्रजी विकी पाहा - http://en.wikipedia.org/wiki/Surya_Siddhanta विकीसोर्स - सूर्यसिद्धान्त http://wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A… आकडेवारी कुठे आणि कशी ते ग्रंथकर्त्याला किंवा इंग्रजी विकिच्या पानकर्त्याला विचारावे, तेथे चर्चा होऊ शकते. या ग्रंथाचा अभ्यास करून माहिती योग्य नाही असे आढळल्यास ती बदलण्याची शक्यता असू शकते. इंग्रजी विकीची माहिती योग्य नसेल तर बदलण्याची मुभा सर्वांना असतेच. या पानाला कुलुपही घातलेले नाही. अभ्यासासाठी सूर्यसिद्धान्त विकीसोर्स दुवा वर दिला आहे. विकीसोर्स वरील लिखाणही योग्य नसल्यास तशी चर्चा तेथे करून इच्छुकांना ते ही बदलता येईल. वरवर इंग्रजी भाषेतले काही दुवे वाचून हा ग्रंथ महत्त्वाचा असावा असे वाटले इतकेच. तसा तो सर्वांनाच वाटावा असाही आग्रह माझ्या प्रतिसादात नाही. आशा आहे माझा मुद्दा स्पष्ट झाला असेल.

In reply to by निनाद

हम्म. माझा मुद्दा इतकाच होता की तसे गणित केलेले असेल तर विश्वासार्हता वाढेल. मला दुव्यात फक्त श्लोक दिसले. इतर दुवे तपासतोच आहे.

रंजक लेख! या शहरांचा काळ कोणता ते लेखावरून समजले नाही. भूगोलाच्या पुस्तकात गोंडवन वगैरे वाचलेले आठवते. पण ते फारच प्राचीन (कोट्यवधी वर्षांपूर्वी) असावे. काही हजार वर्षांमध्ये या खंडांमध्ये हजारो मैलांचे अंतर पडेल असे वाटत नाही. लेखात सांगितलेले सप्तद्वीप आणि समुद्र वगैरे कल्पना फॅन्टास्टिक आहेत. भारतात जांभळाची झाडे आहेत म्हणून भारतीय उपखंडाला जंबूद्वीप म्हणतात अशी माझी कल्पना होती.

In reply to by नगरीनिरंजन

भारतात जांभळाची झाडे आहेत म्हणून भारतीय उपखंडाला जंबूद्वीप म्हणतात अशी माझी कल्पना होती. कदाचित त्याकाळी जांभळाची लागवड मोठ्या प्रमाणात नसेल आणि सगळ्यांनाच जांभूळ खायला आवडत असेल (हापूस सारखे) म्हणून मग सोन्यासारखा भाव आला अन जांभळ्या रंगाचे सोने म्हंटले असेल. हॉलंडमध्ये नाही का ऑर्किड का काय फुल अगदी सुरुवातीला मिलिअन $ मध्ये विकली जायची, त्यावर सट्टा वगैरे पण व्हायचा...लोकं फुलं विकुन प्रचंड पैसेवाले झाले होते अन शेवटी कंगाल पण झाले.( डॉट कॉम बबल/ हाउसिंग बबल सारखे). हा माझा अंदाज.

वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात
वर उल्लेखलेल्या अभ्यासाने लेखात लिहलेली मतं बनत असतील तर तो अभ्यास आपट्यांनीच करावा अशी आमची विनंती आहे.

आपटे काका द्या हो माहिते इथे. लोकांच्या कॉमेन्ट्स कडे अज्जीबात लक्ष्य देवू नका पृथ्वी गोल आहे असे सांगणारांवरदेखील टीका केली गेली होती. त्याना जीवे मारले होते. लोकाना नव्या गोष्टी रुचतच नाहीत. ( निदानभुगोलाची अगोदर छापलेली पुस्तके संपूर्ण खपली जाईपर्यन्त तरी ...)

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊंचे काका, मग आम्हा उरलेल्या मिपाकरांचे कोण ? असो, जरी तिरकस प्रतिसाद आले तरिही आपटेंचे रंजक लिखाण आवडले. मी तरी मला जे आवडते अन पटते तेच घेतले . मी ही जांभळेस्वर्ण असते हे आमच्या ओळखिच्या सहस्त्रबुध्दे काकांकडून ऐकले आहे अन पार्‍यापासून स्वर्ण (ते ही त्यांच्याचकडून ऐकले होते)कसे तयार होते हे जाणून घेण्यास उत्सूक . तसे पण हल्ली सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडतायतं त्यात कोणाला हे समजले तर सोनेपे सुहागा :-)

In reply to by नगरीनिरंजन

मेलो.. फुटलो.. खुर्चीतून पडून पृथ्वी फिरली/ सरकली.. (मी पडलो हां, पृथ्वी नै..)