Skip to main content

सायन्स-सुपरनॅचरल फिक्शन कादंबरी : "जलजीवा"( भाग १३ ते १६-शेवट)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 07/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १३) ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते- .....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्‍यांकडून, जवानाकडून! त्यामध्ये अनेक महिला होत्या. त्यापैकी जेनिफर नावाची एक अमेरीकन गुप्तहेर होती. ती पूर्वी एक अट्टल गुन्हेगार होती. पण अमेरीकेने तीला काही वर्षे तुरुंगात ती सुधारल्यानंतर रशियाच्या हेरगीरी साठी पाठवले होते. पण, ती युद्धा दरम्यान पकड्ली गेली. तीला रशियाने इतर कैद्यांसमवेत बंदी बनवून या डेव्हील्स स्क्वेअरवरच्या बेटावर ठेवले होते असे ऐकीवात आहे. कॅप्टनने सांगितले की पूर्वी एकदा जहाज साऊथ जॉर्जिया कडे येत असतांना प्रवासात काही अतर्क्य घटना घडल्या होत्या. तेव्हा योगायोगाने जहाजावर एका संशोधनासाठी रॉबर्ट गॉडमन आलेले होते. जहाज ऐन समुद्राच्या मध्यावर असतांना जहाजावरच्या लोकांसह कॅप्टनने आणि रॉबर्ट गॉडमन यांनी एक घटना पाहिली. कॅप्टन मला म्हणाले- "त्या घटनेनंतर रॉबर्ट गॉडमन यांनी मला ही युद्ध कैद्यांची थोडक्यात माहिती त्यावेळेस थोडक्यात दिली होती. एवढेच! तुम्हाला लागल्यास त्यांना भेटू शकता." कॅप्टन पुढे सांगत होता- "त्या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास साऊथ जॉर्जिया च्या आम्ही जेव्हा जवळ आलो होतो तेव्हा रात्री दूरवर डेव्हील्स स्क्वेअरच्या हद्दीतून एक प्रवासी विमान उडत होते. डेकवर सहज आम्ही ते विमान बघत बसलो होतो. त्या विमानाभोवती अचानक काळ्या पांढर्‍या ढगांनी गराडा घातला. ते विमान हवेतच हेलकावे खावू लागले. मग त्या विमानाची बॉडी गरम ज्वालामुखीने विरघळावी तशी विरघळू लागली. ते विमान आतल्या प्रवाशांसह वितळले आणि काही वेळाने तेथे काहीही नव्हते." रॉबर्ट गॉडमन चा ठावठीकाणा मला देवून कॅप्टन आपल्या कामावर निघून गेला. त्या बेटावरून वाचलेली केट तिघा मित्रांच्या मृत्यू मुळे आणि तीला आलेल्या विचित्र अनुभवाने विमनस्क अवस्थेत होती आणि उपचार घेत होती. ती तीच्या मूळ देशात- कॅनडाला उपचारासाठी निघून गेली होती. नंतर लंडनला आल्यावर मी रॉबर्ट ला शोधले. सर्वप्रथम रॉबर्ट ने मला ती माहीती सांगण्यास नकार दिला. पण मी आग्रह केला कारण जलजीवा पुन्हा जागृत झाले होते हे मी त्यांना पटवून सांगितले. या विषयी पूर्ण नाही पण थोडीफार कल्पना मी रोझीला दिली होती. रॉबर्ट ने मला स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लेखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो याबद्दल सांगितले आणि ते पुस्तक मला वाचायला दिले. पहील्या महायुद्धाच्या काळात अनिस्टन ला एकदा मध्य प्रदेशातल्या शर्वरी जंगलात हिरव्या मातीच्या संशोधनासाठी भारतात आले होते.समुद्रातल्या अनेक निर्जन बेटांवर सुद्धा अशी हिरवी माती असते आणि भारतात फक्त मध्य प्रदेशातच ही माती होती असे संशोधना अंती स्पष्ट झालेलेल होते. तेथे असतांना त्यांची भेट योगायोगाने एका व्यक्तीशी झाली...ते एक साधे शेतकरी होते. जार्वार पर्वतावर चढण्यासाठी संध्याकाळी अनिस्टन निघाले असता त्या शेतकर्‍याने त्यांना रोखले. सहजच माहीती विचारण्यासाठी तोडक्या हिंदी भाषेतून त्या शेतकर्‍याला विचारले असता एक माहीती समोर आली. ती व्यक्ती (शेतकरी) पुढे अनिस्टनला सांगू लागली- "एकदा त्या जंगलातून परतताना उशीर झाला. सहज म्हणून त्या जार्वार पर्वताकडे माझे लक्ष गेले. मला त्या पर्वतावर एक झाड दिसले. पण ते झाड साधे झाड नव्हते. त्या झाडांच्या प्रत्येक पानाऐवजी तेथे रात्री प्रखर ज्वाळा निघत असतात. रात्रीच्या अंधारात ते जळणारे झाड विचित्र दिसते होते. मला प्रथम वाटले की कुणी या झाडाला आग लावून दिली असेल. पण आग लावली असती तर त्या झाडांच्या ज्वाळा वरच्या बाजूने गेल्या असत्या. पण येथे प्रकार वेगळाच होता. झाडाच्या पानां ऐवजी ज्वाळा होत्या. " दुसर्‍या दिवशी अनिस्टन त्या झाडाजवळ दिवसा गेले. सोबत त्यांनी त्या व्यक्तीला ही आणले होते... त्या झाडाची पाने दिवसा हिरवीच पण आगीच्या ज्वाळा निघतांना जसा आकार होता तसा त्या पानांचा आकार होता. ती पाने तोडून संशोधनासाठी त्यांनी घेतली. त्या पानांचा वाळवून भुगा करून घेतला. त्यापैकी काही भुगा जवळ साचलेल्या पाण्यात उडाला असता त्या पाण्याचा तात्काळ बर्फ झाला. पण, तो बर्फ हाताला गरम लागत होता. म्हणजे पाण्याची ही चौथी वेगळीच स्टेट (रूप) होती. एक अद्भुत शोध लागला होता......" अ‍ॅनाच्या वडीलांच्या फाईलमध्ये त्या व्यक्तीच्या पुढे लिहिलेल्या नावावरून आणि वर्णनावरून अरविंद आचरेकरांना अचानक काहीतरी आठवले. ते व्यक्ती म्हणजे अमेयचेच पूर्वज होते हे नक्की झाले होते. म्हणूनच अमेयला जलजीवांकडून टार्गेट करण्यात आलेले होते, बदला म्हणून. सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या होत्या. उलगडत होत्या. त्या फाईलमध्ये पुढे लिहिले होते- "पहिल्या महायुद्धातल्या छळ करण्यात आलेल्या कैद्यांना नंतर पाण्यात बुडवून मारणयात आले. त्यांच्या छळ होत असतांनाच्या त्या आर्त किंकळ्या त्या पाण्यातच राहिल्या..... त्या किंकाळ्यांची शक्ती जलजीवांच्या रुपात उफालून बदला घ्यायला निघाली..... पाण्यातले सैतान जन्मले.... पहिला जलजीवा स्त्री होती, म्हणजे जेनिफर. अनिस्टनच्या त्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्‍या बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून टाकले होते. हे फक्त ठरावीक लोकांनाच माहिती होते. पण त्याच झाडांना पोसणारी हिरवी माती त्या गरम बर्फावर टाकली की ते पुन्हा वितळून जलजीवा बनतात,असे आढळून आले होते. आफ्रीकेच्या जंगलात सुद्धा तशी हिरवी माती सापडते. पण तश्या प्रकारचे झाड आणि त्याच्या बीया मात्र सर्वप्रथम भारतात सापडल्या. या जलजीवांबाबत माहीती अमेरिकेने सर्वसामान्य लोकांसमोर जास्त येवू दिली नाही. दुसर्‍या महायुद्धात पुन्हा कुणीतरी त्या जलजीवांना जिवंत केले. पुन्हा त्यांना जमीनी खाली गाडण्यात आले. पण त्यावेळेस जलजीवांना नवीन सैतानी खेळ सापडला होता. जिवंत माणसांना जलजीवा बनवायचे. जिवंत माणसां भोवती वेढा घालून हे त्यांनाही जलजीवा बनवत असत. ही जलजीवा बनलेली जीवंत माणसं मात्र त्या पानांमुळे रुपांतरीत होत नव्हती. त्यांना लाल माती टाकून पुन्हा मूळ मानव रूपात आणता येत होते....जोपर्यंत ते मूळ रुपात येत नाही तोपर्यंत ते जलजीवांच्याच सैतानी शक्तींच्या संमोहनाखाली असतात आणि ते आणखी जास्त खतरनाक बनतात..." त्या नंतर त्या हिरव्या, लाल मातीची ठीकाणे आणि त्या बीया आणि झाडॅ याबद्दल माहिती त्या फाईल्स मध्ये होती. त्यातल्या एका लिहिले होते की जार्वार पर्वताच्या पायथ्याशी खणले असता एका गुहेवजा जागेत खुप खोल एका अंधार्‍या जागेत त्या बीया, रोपटे आहेत. तसेच इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे सांगितली होती. गरज पडली तर घेण्यासाठी!! त्यानंतर एकदा ऑर्थर हॉफमनचा चा जहाजावरच्या चाच्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पण ते सर्व चाचे हे मानव-जलजीवाच होते. पेपरमध्ये ही मृत्यूची छापलेली बातमी स्कॅन करून त्या फाईल मध्ये होती. अ‍ॅनाच्या डॉळ्यात पाणी आले..... त्या सर्वांना कळून चुकले की अमेय जंगलातून असाच जलजीवांमुळे गायब झाला असावा. आणि त्या दिवशी घरी आलेला हा अमेयच होता आणि अ‍ॅनाला भास झाला नव्हता. टी.व्ही. वर सिडी घेवून पळणार्‍या त्या माणसाचा पाणीमय चेहेरा अमेयसारखाच दिसत होता. मग ही सगळी माहिती अ‍ॅनाने लेस्टर बेनेट्ला सांगितली. बीया लपवलेल्या ठीकाणांचा शोध जगभरच्या शास्त्रज्ञांनी घेण्यास सुरुवात केली. आता तिसर्‍यांदा उद्भवलेल्या जलजीवांना कायमचे नष्ट करायचे काम पार पाडायचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेयला पुन्हा मानवरूपात आणायचे होते. अमोलच्या विनंतीवरून जितीन मुंबईला आलेला होता. त्यांनी लाल माती मागवली आणि ती घेवून आता अमोल, अरविंद, अमेयची आई, आसावरी, अ‍ॅना हे सर्वजण मध्य प्रदेशात जायला निघाले. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता, की अमेयला कसे शोधायचे आणि ओळखायचे? किंवा त्याला पुन्हा परत त्या जंगलात कसे बोलवायचे? लॅपटॉप मध्ये बर्‍याच फाईल अजून वाचायच्या बाकी होत्या. कदाचीत त्यात सापडू शकेल काहीतरी..!! गुगलवर सर्च करून अ‍ॅनाने वॉटर डीमन्स बद्दल लोकांना डेव्हील्स स्क्वेअर मध्ये आलेले अनुभव वाचण्यास सुरूवात केली. कदाचीत त्यावरून काही दुवा मिळेल का? किंवा जलजीवांच्या तावडीतून वाचलेली माणसे काही मदत करू शकतील का? केट काही मदत करू शकेल का? चौघेजण बेटावर असतांना केट मात्र वाचली होती. कशामुळे? अ‍ॅनाने जेफची मदत घ्यायचे ठरवले. तीने जेफला विनंती केली की रॉबर्ट गॉडमन किंवा त्याचे सहकारी यांना भेटून काही माहिती मिळते का ते बघायला सांगितले. तसेच कॅनडातून केट चा काही ठावठीकाणा मिळाला तर बरे होईल असे अ‍ॅनाला वाटले. ...सिडी न आणता अमेय जेनिफरजवळ पोहोचला. आता सर्व जलजीवा आकाशात ढगांच्या रुपात जमले होते. त्या ढगात अमेय ढगरुपात आला. त्याने सिडी आणली नव्हती हे तीला तो वाफरुपात परत आल्यावर कळले होते.... त्यांचे पुढचे टार्गेट होते - "स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो! हे पुस्तक वैज्ञानिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरले होते. अमेयच्या पूर्वजाला जलजीवांनी मारले होतेच. त्यानंतर अनिस्टनला सुद्धा त्याच वेळेस त्यांना मारायचे होते. पण, तेव्हा त्यांना गरम बर्फात बंद करून अंटार्टीका खंडातल्या थंड बर्फा खाली खोदून गाडून टाकले गेले होते. आता कित्येक वर्षांनंतर जागृत झालयावर हे जलजीवा खुपच खतरनाक झाले होते. अनिस्टन ज्या विमानातून प्रवास करणर होते त्यावर हल्ला करण्याचे सर्व जलजीवांनी ठरवले होते. ते पूर्ण विमानच वितळवून संपवण्याचा मानस त्यांचा होता. वेडेवाकडे आकार करून ढग आकाशात हल्ल्याची योजना बनवत होते. अमेय सुद्धा त्यांच्या अधिपत्याखाली होता. इतर मानवांना आणि अमेयला जलजीवांच्या अधिपत्या खालून कसे वाचवायचे हा एक मोठा यक्षप्रश्न होता!!! ते सर्वजण आसंद येथे पोहोचले. अशोकरावांना तसेच तेथल्या पोलिसांना या सगळ्याची पूर्ण कल्पना देण्यात आली. त्यांनी सहकार्य करायची तयारी दर्शवली. जंगलात त्या बीया शोधण्यासाठी जायचे होते. त्याच बरोबर अमेयलाही शोधून काढायचे होते. अजूनपर्यंत जलजीवांनी आपले अस्तित्त्व गरजेपुरते जगासमोर आणले होते. त्यामुळे प्रसार मध्यमांना सांगून या बद्दलच्या बातम्या देण्यास बंदी केली गेली. त्यामुळे तो सिडी घेवून जाणारा माणूस आणि ती बातमी येणे बंद झाले. सगळेजण जंगलात जाण्यासाठी निघले. सोबत पोलीसही होते. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. सकाळचे अकरा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता. त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते. जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता. काही जण दोन जीप्स मध्ये आणि तिसरी जीप पोलीसांची. जीपस च्या मागे अनेक नामातुआ पक्षी ओरडत चालले होते. त्यांचा आवाज अतिशय भेसूर होता. पुढे येणार्‍या एखाद्या संकटाची ही चाहूल होती की आणखी काही? जेफचा कॉल लवकरात लवकर आला पाहीजे.... जेफला गॉडमन भेटेल का? जंगल आले. जितीन त्यांना त्या जार्वार पर्वताच्या पायथ्याशी तळ्याजवळ घेवून गेला.... (क्रमश:) (14) जेफ ट्रेलला अ‍ॅनाकडून सगळी माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी तो रॉबर्ट गॉडमन च्या शोधार्थ निघाला होता.... त्याला विविध ठिकाणी चौकशीअंती कळले की रॉबर्ट गॉडमन आता रिटायर्ड झाले असून ते लंडन मधील एका उपनगरात राहातात. प्रथम त्यांनी जेफच्या भेटीस नकार दिला. मग सर्व गोष्टी थोडक्यात फोनवर समजावून सांगितल्यानंतर ते अस्वस्थ झाले, त्यांची खात्री पटली आणि त्यांनी जेफला घरी बोलावले. जेफ आणि ते घरासमोरच्या बागेत खुर्चीवर बसले होते. जेफ विचारत होता: "आपली मदत हवी आहे. अ‍ॅना आणि सर्वजण मध्य प्रदेशातल्या त्या खेड्यातल्या जंगलात गेले आहेत." गॉडमन गहन विचारात होते. बराच वेळ ऐकून घेतल्यावर मौन तोडले आणि अचानक काहितरी आठवल्यासारखे करून ते म्हणाले, "जेफ, अ‍ॅनिस्टन च्या जीवाला धोका आहे हे नक्की. मी तूला सगळे काही सांगतो, पण त्या आधी मला अ‍ॅनिस्टन ला कॉल करून तो जेथे कुठे असेल तेथे त्याला सावध राहायला सांगायला हवे. आताच, ताबडतोब!" असे म्हणून ते उठून फोन करायला गेले पण फोन लागत नव्हता. अचानक त्यांना आठवले की अ‍ॅनिस्टन विमानाने एका देशात संशोधनासाठी जाणार आहेत. म्हणून फोन लागत नाही आहे. ते सोबत काही लाल, पिवळ्या आणि निळ्या मातीचे नमुने घेवून् ते एका कॉन्फरन्स साठी निघाले होते. काही दिवसांपूर्वीच याबाबत गॉडमनची अ‍ॅनिस्टनशी चर्चा झाली होती. गॉडमन ने त्यांना एक सावध करणारे इमेल आणि एस्.एम. एस. करून ठेवला. जेव्हाही ते वाचतील तेव्हा सावध होतील. आता हातात दुसरे काही नाही. तसा सुरूवातीला न्यूज बघून गॉडमन ला थोडा अंदाज आला होता की कदाचीत जलजीवा पुन्हा जागृत झालेत की काय? पण लागोलाग जेफ भेटल्यामुळे आणि त्याने सर्व वृत्तांत सांगितल्यामुळे ते आता त्यांना खात्री झाली. ते म्हणाले, "चल जेफ. तुला सांगतो सगळं काही. जर अ‍ॅनाला कॉल मध्ये घेता येत असेल तर घे, तेथे ते असतील त्यांना ऐकू दे हे सर्व." जेफ आणि गॉडमन मध्ये गेलेत. त्यांनी अ‍ॅनाला कॉल लावला. प्रथम जेफ बोलला, "अ‍ॅना, मला गॉडमन भेटले आहेत. आपन एक ऑडॉओ कॉन्फरन्स घेवू यात. त्यात ते आपल्याला सर्व सांगणार आहेत. तुम्ही सर्व काय करत आहात?" अ‍ॅना म्हणाली, "थॅन्क्स जेफ. तुझे खुप धन्यवाद. आम्ही जंगलातल्या त्या तळ्यातच आहोत. शोधाशोध सुरू आहे. रॉबर्ट गॉडमन च्या मदतीची आनी मार्गदर्शनाची आता गरज आहे. अमेयला परत बोलावण्यासाठी आनी जलजीवांचा नायनाट करण्यासाठी!" जास्त वेळ न दडवता गॉडमन नी सुरूवात केली, "जेफ नी मला काय घडले याबद्दल कल्पना दिली आहेच. अमेय हा त्यांचा या वेळचा प्रथम मानव्-जलजीवा असावा. त्याला जर पूर्वरूपात आणायचे असेल आणि जलजीवांच्या अधिपत्याखालून वाचवायचे असेल तर तो दिसताच लाल माती त्याच्यावर टाकायला हवी. पण, त्याला शोधायचे कसे हा प्रश्न आहे. कदाचीत ते सर्व अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठी आकाशात जमले असावेत. जसे दुसर्‍या महायुद्धात जलजीवांनी इतर मानवांना जलजीवा बनवण्यास सुरूवात केली होती तसेच आता सुद्धा केली आहे. यावेळेस हे काही प्रथम नाही आहे की त्यांनी मानवांना जलजीवा बनवले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जलजीवा बनवलेल्या मानवांकडून सागरी लुटालुटीचे काम त्यांनी करून घेतले होते. मानव जलजीवा लाल मातीने पुन्हा मानव रूपात येतात. आता यावेळेस ते पुन्हा बर्‍याच मानवांना जलजीवा बनतील. दुसर्‍या महायुद्धात अनिस्टनच्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्‍या बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून टाकले होते. जेनिफर ही एक हुशार जलजीवा. तीने त्याच वेळेस सर्व रहस्य जाणले होते. म्हणजे अ‍ॅनिस्टन बद्दल, तसेच कोणत्या प्रकारच्या झाडांमुळे जलजीवांना पाण्याच्या चौथ्या रुपात बंद करून टाकता येत होते, तसेच लाल आणि हिरव्या मातीचा पभाव, त्या झाडांचा शोध लावणारा अमेयचा पूर्वज. पण हे समजल्यानंतर तीने काही उत्पात घडवण्याच्या आतच त्यांना अंटार्टिका खंडावर बंद केले होते. तीचा एक प्रियकर होता. रेमो रॅमसन. त्यानेच तीला आणि इतरांना हिरव्या मातीच्या मदतीने जीव धोक्यात घालून अंटार्टिका खंडातून पुन्हा जिवंत केले असावे. त्यानेच स्वतःचा जीव धोक्यात घालून तीला ही सगळी माहिती सांगितली होती. पण, मला चांगले आठवते की नुकतेच त्याचा आणि इतर मित्रांचा मृतदेह अंटार्टिका खंडावर आढळला होता. जेनिफरनेच त्यालाही मारले असावे. या तिसर्‍या वेळेस ते पृथ्वीवर फक्त आणि फक्त विध्वंस करायलाच आले आहेत हे मी ठाम पणे सांगू शकतो. पण, आधी ते सगळी झाडे आणि त्या बीया आणि भुकटी जेथे जेथे असेत ते नष्ट करूनच मग जगासमोर स्वतःला आणतील. पण ती सगळी ठीकाणं त्यांना सहजा सहजी सापडणार नाहीत..." तिकडे अ‍ॅनिस्टन प्रवास करत असलेले विमान ढगरूपात असलेल्या जलजीवांनी घेरले. ते ठीकाण होते मध्य प्रदेशातल्या जंगलाच्या बरोबर वरच्या बाजूला पण, अमेय जेव्हा अ‍ॅनिस्टन ला मारायला धावला तेव्हा त्यांचा जवळची प्रयोगासाठीची लाल माती त्याचेवर उडाली आणि तो पुन्हा मानव बनून खाली पडला त्याच तळ्यात!! (क्रमशः) (15) अमेय तळ्यात पडला, मोठ्ठा आवाज झाला आणि अ‍ॅनाच्या तोंडावर पाणी उडाले..... ते पाणी खुप लालसर आणि काळपट होते. भयंकर भासत होते..... त्या पाण्यातल्या प्रत्येक थेंबातून असंख्य जलजीवा तयार झाले..... ते सगळेजण अ‍ॅनाकडे भेसूर हास्य हसत येवू लागले..... अ‍ॅना घाबरून ओरडणार इतक्यात तीची तंद्री (ट्रान्स) भंग पावली. तळ्यात तसे काहीही झालेले नव्हते. तळ्यात अमेय पडला नव्हता. खरेच अमेय या तळ्यात पडला असता तर? तो आज आपल्याला भेटला असता. पण तसे दुर्दैवाने नव्हते. मध्य प्रदेशातल्या त्या अंधार्‍या जंगलात सगळेजण स्तब्ध होवून रॉबर्ट गॉडमन चा आवाज फोनवरून ऐकत होते. गॉडमन पुढे म्हणाले, " मानवांना जलजीवा बनवून जेनिफर डेविल्स स्क्वेअर वरच्या भागात खुप दहशत पसरवत होती. त्याच भागात त्यांना छळ करून मारल्यामुळे तेथे त्यांच्या सैतानी विचारांची शक्ती जास्त प्रभावी होती. त्या भागात शिरणारी जहाजे, विमाने आजही नष्ट होतात. त्याला कारण हे मानव-जलजीवा. मूळ जलजीवांना गरम बर्फात गोठवून जरी नष्ट केले तरी जलजीवा बनलेले मानव हे त्या भागात त्रास देतात. आजही त्या भागात अद्भुत घटना घडतात. विमान चालले असेल तर ढग रुपात विमानाला वेढा घालून ते विमान नष्ट करतात. जहाजावर बर्फ रूपात हल्ला करून विध्वंस घडवून आणतात. सैतानी शक्ती शेवटी दुसरे काय करणार? विनाश, विध्वंस हेच! अ‍ॅना म्हणाली,"पण मग हे सगळॅ जलजीवा हे अत्याचारीत आहेत. त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. अत्याचारामुळे ही शक्ती जन्माला आली आहे. त्याचे काय?" गॉडमन म्हणाले, "बरोबर आहे. त्या जलजीवांनी अत्याचार करणार्‍या त्या सगळ्या सैनिकांचा बदला घेतला आहे. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना नष्ट केले आहे. पण आता ते सैतान झाले आहेत. सूडाने पेटले आहेत. ते पूर्ण मानवजातीवर सूड घेतील...." अ‍ॅना म्हणाली, "मग आता काय करायचे? कसे संपवायचे त्यांना? आणि अमेयला कसे शोधायचे? आणि कसे मानवरूपात आणायचे?" गॉडमन म्हणाले, "त्यांना पाण्याच्या चौथ्या रुपात फक्त गोठवून ठेवता येते पण नष्ट करता येत नाही. त्यामुळे आता जरी आपण त्यांना त्या चौथ्या रूपात गोठवले तरी ते पुन्हा येवू शकतात. कुणीतरी पुन्हा हिरवी माती घेवून त्यांना जीवंत करेल. आणि कुणी त्यांना जीवंत करू नये म्हणून ही सगळि माहिती कायमची नष्ट करावी असे जर ठरवले तर ते काम सोपे नाही. आजच्या इंटरनेट्च्या महाजालाच्या रूपात ती माहिती कुठेही डीजीटल रूपात अस्णारच आहे. त्यामुळे त्यांना कायमचे नष्ट करता येईल का असा मी विचार करत होतो.. रिटायर झाल्यानंतर मी त्यावर संशोधन केले होते. तो प्रयोग करण्याची वेळ एवढ्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते. " अ‍ॅना आणि सर्वजण स्तब्ध होवून ऐकत होते, "पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना आधी चौथ्या रूपात आणायचे..... मग त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे. पाण्याच्या इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी दुसरे केमीकल वापरल्यास ओझोनमध्ये. मला नक्की खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील. मी तपास करतो की अ‍ॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल... मग आपण तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला परत आणू... तुम्ही सर्व पटापट त्या गुहेतून ती रोपटी आणा. तोपर्यंत मी पुढचा प्लॅन सांगतो" फोन बंद झाला....... आता वेळ दडवून चालणार नव्हते. ते सर्वजण जार्वार पर्वताच्या पायथ्याशी होते. आणि अनेक कामगार कोल तेथे खणत होते. शेवटी ती गुहेवजा जागा सापडली. ती सापड्ल्यावर खुप खोल एका अंधार्‍या जागेत त्या बीया, रोपटे आहेत असे त्या फाईलमध्ये लिहिले होते. तसेच इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे असणार होता. ते सर्वजण गुहेतून आतमध्ये निघाले. बरेच पुढे गेल्यावर अंधारत दिसणारे ते दृश्य खूपच अद्भुत होते. अंधारात ज्वाळांसारखी पाने दिसणारी ती झाडे. रांगेने त्या गुहेत अनेक तशी रोपटी आणी झाडे होती. ते पुढे जावू लागले. त्यांचे जवळ सर्च लाईट होता. ते पुढे पुढे जावू लागले. पुढे धोका असू शकणार होता. पण सगलेजण आता एकाच ध्येयाने पछाडले होते. जलजीवांचा सर्वनाश!! अंधारात चालत असतांना पायांना अनेक बीया आणि भुगा लागत होत्या. त्याच त्या बीया असाव्यात. त्या भरण्यासाठी त्यांनी मोठाल्या पिशव्या आणल्या होत्या. सोबत मदतीला आणलेले कामगार आणि गडीमाणसं त्या बीया, भुगा आणि चुरा पिशवीत भरू लागलेत. पूर्वी इथे नक्की काहीतरी भयंकर घडले असावे. जे फक्त अमेयच्या पूर्वजालाच माहिती असावे. आणि येथे तळ्यात नक्की जलजीवांचे वास्तव्य असावे, असे अ‍ॅनाला वाटून गेले. थोडे दूरवर समोर काही चमकणारे डोळे त्या सर्वांचा माग घेत पुढे आले. अ‍ॅना अचानक कींचाळली कारण, तीच्या उजव्या बाजूलाच अग्नीने, ज्वालांनी बनलेला एक मानव डोळे मोठे करून बघत होता. जमतील तेवढी रोपटी जमा करून सर्वांनी त्या गुहेतून बाहेर निघण्याचे ठरवले. पण, ते ज्वाला-मानव त्यांचा रस्ता अडवून उभे होते. तेवढ्यात जितीनने हातातले ज्वाला-रोपटे त्या विचित्र अग्नी-मानवावर मारले, तसा तो ओरडून दूर पळाला. मग त्या रोपट्यांचा धाक दाखवत दाखवत ते मानव पळून गेले. मग अनेक प्रकारचे विचित्र आवाज करणारे प्राणी समोर येवू लागले. तेही रोपट्यांनी दूर पळाले. मग ते सर्वजण गुहेबाहेर पळाले. कसे बसे ते गुहेच्या बाहेर आले. कदाचीत ते रोपट्यांचे रक्षक असावेत? की आणखी दुसरेच काही? समोर गुहेबाहेर येताच एक विचित्र दृश्य होते. आणखी सैतानी शक्ती त्यांचे समोर उभ्या होत्या. म्हणजे तळ्याजवळ जलजीवांच्या रूपात रान मांजर, कोल्हे तेथे उभे होते. साप होते. पण पाणी रूपात. इकडे गुहेतले अग्नी मानव आणि अग्नी-प्राणी सुद्धा गुहेबाहेर आले. सगळेजण स्तब्ध होवून हे दृश्य बघत होते. म्हणजे जल-प्राणी सुद्धा उदयास आले होते. मागून गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी. कोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले. (क्रमशः) (part 16 final) जल-प्राणी उदयास आले होते. जार्वार पर्वतावरच्या त्या हिरव्या मातीने त्यांना जन्म दिला असावा. तळ्यात चुकून पडून मरण पावलेले ते प्राणी असावेत आणि नंतर जलजीवा बनले असावेत. किंवा त्यांची कुणी शिकार केली असेल आणि ते तडपून मरण पावले असावेत. पाण्यात पडले असावेत. जल प्राणी म्हणजे ते टणक बर्फाने बनलेले होते. ते जंगलातल्या अंधूक अंधारात पांढरे दिसत होते. जसा किसलेला बफ जमा करून त्याचा प्राणी बनवला तर तो जसा दिसेल तसेच हे दिसत होते. अतिशय भयानक. त्यांचे अणकुचीदार गोठलेले दात, पायाची नखे हे सर्व भकोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले. मागच्या बाजूने अंगभर ज्वाळांनी भरलेले अग्नी-दानव उभे होते. मागून गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी. अशा दोन दानवांच्या आत ते सर्वजण उभे होते. आता काय घडणार असे वाटत असतांनाच त्या अग्नी दानवांनी त्या जल प्राण्यांवर हल्ला चढवला...... अचानक झालेल्या त्या हल्ल्याने जल-दानव दचकले, बावरले आणि आणखी हिंस्त्र बनले. आणि मोठमोठ्याने आवाज करू लागले. त्यात भर म्हणून नामातुआ पक्षी आले. तेही तुआआ तुआआ असा आवाज करू लागले. सगळे जंगल भितीदायक आवाजांनी घुमू लागले. तोपर्यंत सगळेजण यातून सुटून जीपमध्ये बसण्याचा प्रयत्न करू लागले.... जीपमध्ये बसल्यानंतर दोन्ही जीप जंगलातून बाहेर नेण्यासाठी धडपड सुरू झाली. काही जल-दानव जीपच्या मागे मागे पळू लागलेत. त्यांच्यावर त्या पानांची भुकटी टाकावी लागली. तसे ते गरम बर्फामध्ये रुपांतरीत होवू लागले. पण ते तात्पुरते असणार होते. पुन्हा हिरवी माती त्यांच्यावर टाकल्यास ते कधीतरी जीवंत होणारच होते.... कारण इथे त्यांचे जवळ ते केमिकल्स नव्हते..... तिकडे गुहेसमोर अग्नी आणी जल यांचा संघर्ष सुरू होता. तो इतक्यात संपणारा नव्हता. अग्नी पाण्यामुळे विझतो. पण, येथे मात्र अग्नी दानव हे जल दानवांवर भारी पडत होते. त्या भयानक जल दानवांवर ते हल्ल करत ओते. त्यामुळे ते प्राणी तुकडे तुकडे होवून कोळसा जळतो त्याप्रमाणे अनेक तुकड्या तुकड्यात रूपांतरीत होवून जळत होते. म्हणजे हवेत असंख्य बर्फाचे जळणारे तुकडे दिसत होते. तरीही ते तुकडे हल्ला करतच होते.त्यांच्या तुंबळ जुंपली होती. जीपमध्ये अ‍ॅनाला गॉडमनचा कॉल आला. गॉडमनने या आधीच सांगितले होते की, "पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना आधी चौथ्या रूपात आणायचे.मग त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे. पाण्याच्या इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी दुसरे केमीकल वापरल्यास हायड्रोजनला ओझोनमध्ये. मला नक्की खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील. मी तपास करतो की अ‍ॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल... मग आपण तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला परत आणू." आता अ‍ॅनाने कॉल उचलल्यावर ते म्हणाले, "अ‍ॅना, जगात इतरत्र ती झाडे असलेली ठीकाणे सापडली आहेत. काही ठरावीक महत्त्वाच्या व्यक्तींना आणि शास्त्रज्ञांना सांङून आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. लवकरच आम्ही अ‍ॅनिस्टन जात असलेले विमान शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ते विमान सध्या साऊथ जॉर्जिया या बेटाच्या वरूनच उडत आहे असे आम्हाला कळाले आहे. आम्ही आखलेल्या मोहीमेत आम्।इ काही हेलीकॉपटर्स घेवून ता विमानाचा पाठलाग करतो आहोत. आमचि शंका खरी ठरली आहे. आम्हाला त्या विमानाच्या मागे अनेक ढग पाठलाग करतांना दिसले आहेत. काही अघटीत होण्या आधी त्या विमानातल्या प्रवाशांना आणि अ‍ॅनिस्टनला वाचवायलाच हवे आहे. आम्ही ते जरूर करू. आनि त्या ढगांत कुठेतरी अमेय आनी जेनिफरही असावेत, त्यापैकी अमेयला लाल माती टाकून मूळ रुपात आणायचे काम आम्हाला करायचे आहे. मेल्यानंतर जेनिफर जेव्हा जलजीवा झाली तेव्हा तीने या आधीच तीच्या प्रियकराला म्हणजे रेमो रॅमसनला जलजीवा बनवून आपल्या सोबत यायला भाग पाडले होते. तो मात्र दुसर्‍या महायुद्धात जलजीवांना स्थानबद्ध करण्याच्या मोहीमेतून सूटला होता. त्याचे सोबत अनेक सुद्धा त्यातून सुटले होते. त्यांनीच समुद्रावर दहशत पसरवली होती. जलजीवा मरत नाहीत फक्त त्यांना पाण्ञाच्या चौथ्या रुपात गोठवून ठेवता येत होते..... जेनिफरला मात्र अंटार्टीकावर गाडण्यात त्या मोहिमेत यश आले होते. मग, अंटार्टीका मोहीमेत संशोधन करण्याच्या निमित्ताने अथक परिश्रमांनंतर त्याने जेनिफरला शोधून काढले आणि हिरवी माती टाकून पुन्हा जीवंत केले. इतर जलजीवांनाही त्याने जीवंत केले. पण, त्याचे भाग्य चांगले नव्हते कदाचीत! कारण तीने यालाच मारून टाकले. ती आता पूर्णपणे सैतानी शक्तींच्या अधिपत्या खाली आहे. तसेच तीचे इतर जलजीवा सुद्धा.... तुमचे तिकडे काय चालू आहे? तुम्ही जंगलातून त्या बीया घेवून पोहोचलात का? त्या सगळ्या बीया आता कुठेतरी गुप्त जागी तुम्ही सांभाळून हेवा. त्याबद्दलची माहिती योग्य व्यकींजवळ असू द्या. मी मोहीम फत्ते झाल्यावर संगतोच. आम्ही आधी सगळीकडे लाल मातीचा फवारा सोडणार म्हणजे त्यात जे मानव जलजीवा असतील म्हणजेच अमेय पुन्हा मानवात रुपांतरीत होतील. आम्ही सगळे मास्क घालून तेथे जाणार आहोत कारण आमच्या असे लक्षात आले की जलजीवाम्चे कोणतेही रूप श्वासाद्वारे आत गेले की त्या माणसाचे किंवा प्राण्याचे जलजीवात रूपांतर होते. त्या मोहीमेत पुढे आम्ही मग त्या झाडांच्या पानांची भुकटी फवारणार. त्यामु़ळे ते पाण्याच्या चौथ्या रुपात येतील. मग आम्ही ती केमीकल्स असलेले स्प्रे मारणार आहोत म्हणजे ते हायड्रोजन आणि ऑक्सि़जन मध्ये रूपांतरीत होतील आनी पुढे दुसरे केमिकल ज्याद्वारे ते ओझोनमध्ये रुपांतरीत होतील. आपल्या आवाक्यातले जलजीवाच फक्त असे कायमचे नष केले जातील. पण, त्यांना सगळीकडून जगभरातून शोधून नष्ट करणे अवघड काम आहे. आता एक होईल की जेनिफर आता नष्ट झाल्यास त्यांची टीम क्षीण (वीक) होईल. पण जेव्हा जेव्हा ते येतील, तेव्हा तेव्हा त्यांना आपण नष्ट करू शकतो. कायमचे! कारण आता आपल्या जवळ सगळे उपाय आहेत. त्यांना नष्ट करण्याचे! मोहीम फत्ते झाली की मी पुन्हा कॉल करतो!" असे म्हणून गॉडमन नी कॉल डिसकनेक्ट केला. अ‍ॅना मात्र आता अमेयची भेट होणार या आनंदात होती. जंगलातला तो संघर्ष सुरूच होता. ते सगळे त्या जीपस मधून निघून अखेर त्या जंगलाच्या बाहेर आले होते. पानांच्या भुकटी द्वारे अनेक जल दानवांना त्यांनी नष्ट केले होते. आता सर्वजण घरी फक्त गॉडमनचा कॉल येण्याचीच वाट बघत होते. तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाच्या मागावर निघाले. एकात स्वतः गॉडमन होते. प्रत्येकाने तोंडावर मास्क लावला होता. कारण, ते जलजीवा नाकाद्वारे शरीराच्या आत जायला नको होते. विमानाच्या पायलटला पुढे येणार्‍या धोक्याचा अगाऊ अंदाज दिला गेलेला होता. ब्रिटीश सरकारला या मोहीमेबाबत अंदाज होता. बरीच कोडी उलगडली होती.या मोहीमेद्वारे बरीच संकते टळणार होती. हीच मोहीम पुढे विमानाला वाचवल्यानंतर डेव्हील्स स्केअरवर राबवण्यात येणार होती. शक्य तेवढ्या जलजीवांना नष्ट करण्यात येणार होते. निदान जलजीवांचे निवासस्थान म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या त्या डेव्हिल्स स्क्वेअर वरचे जलजीवा जरी नष्ट झाले तरी बास होते. मग जगात इतरत्र जेही जलजीवा सापडतील त्यांना हळू हळू नष्ट करता येणार होते. .....ते तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाचा पाठलाग करत होते. आधी केलेल्या लाल मातीच्या फवार्‍यातून काहीही हाती लागले नाही. बराच वेळ विमान आणि आसपासच्या परिसरात त्यांनी लाल मातीचा फवारा केला. पण, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणजे अमेय तेथे नव्हता आणि जेनिफरही नक्कीच तेथून निघून गेली असेल. इतर जलजीवांना कामाला लावून. आता अमेयला शोधण्यात जास्त वेळ दडवून चालणार नव्हते. .......कारण आता त्या ढगांनी हेलीकॉप्टर्स वर सुद्धा हला केला होता. शेवटी विमानाभोवती गराडा घातलेल्या ढगांना म्हणजे जलजीवांना एका तुंबळ युद्धानंतर गॉडमन ने सांगीतल्याप्रमाणे कायमचे नष्ट करून ओझोन वायूत रूपांतरीत करण्यात यश आले.मग हेलीकॉप्टर्स डेव्हिल्स स्क्वेअर च्या भागार असणार्‍या बेटांवर उतरवण्यात आले. तेथे सुद्दा काही जलजीवांनी तर काही चाच्यांनी (मानव्-जलजीवांनी) हला केला. बर्‍याचश्या अथक प्रयत्नांनंतर अनेक मानव जलजीवांना मूळ मानव रुपात आणण्यात तसेच इतर जलजीवांना कायमचे नष्ट करण्यात यश आले. विमान आणि अ‍ॅनिस्टन सुख्रूप होते. विमान पुढे आपल्या ठरलेल्या ठिकाणि निघून गेले. विमानाला काही नुकसान झाले नाही. पण जेनिफर कुठे असेल? त्या अनेक जलजीवाम्च्या पाणी रुपात एकही स्त्री रूप नव्हते. म्हणजे ती यातूनही सुट्ली. आणि अमेयला ही घेवून गेली? कुठे गेली असेल ती? कुठे गेला असेल अमेय? हेलीकॉप्टर्स पाठलाग करत आहेत हे कळल्यावर जेनीफर ने अमेयला वेढा घातला आणि दोघांच्या ढगरूपाचे पाण्यात रूपांतर झाले आणि ते उंचावरून पृथ्वीवर एके ठीकाणी पडत होते. अमेयचे पाणी रूप एका लाल माती असलेल्या साऊथ जॉर्जीया बेटावरच्या एका पर्वतावर पड्ले आणि तो माणूस बनण्यास सुरूवात झाली. जेनीफरला हे अनपेक्षीत होते. त्या पर्वतावरून अमेय घरंगळत खाली पडू लागला. त्यामागे जेनिफर पाणी रूपात त्याचे मागे लागली होती. आता तीने पुन्हा त्याला वेढा घातला तर पुन्हा तो मानव बनणार होता...... इतक्या दिवसांच्या तिच्या अधिपत्याखालून सुटून आनंद झालेला अमेय आता पुन्हा ती आपल्याला वेढा घालाणार या कल्पनेने हादरला होता. तो उठून अतिशय वेगाने खाल पडू लागला. ते एव्हाना त्या पर्वता खाली आले होते. तीही त्याचा पाणी रूपात पाठलाग करत करत त्याचे समोर उभी ठाकली. ती पाणी सदृश्य मानव रुपात त्याचे समर उभी होती. तीचे ते मादक रूप बघून तो क्षणभर हबकला. आनी पुन्हा पुढे येणार्‍या भीतीची जाणीव झाल्याने पळायला लागला. त्या तीनही हेलीकॉप्टर्स पैकी एक साऊथ जॉर्जीयाच्या बेटावर घिरट्या घालू लागले. ते अगदी जमीनीच्या जवळ उडत होते. तेव्हा त्यात आलेल्या गॉडमनला अमेय पळतांना दिसला. त्यांनी ओळखले की आता अमेय पुन्हा मानव रुपात आला आहे. आणि बर्फ रुप्पात जेनिफर त्याचा आठलाग करत आहे. ते हेलीकॉप्टर खाली घेण्यास गॉडमन नी पायलटला विनंती केली. आजूबाजूला जंगल होते. विविध प्रकारची झाडे होती. हेलीकॉप्टर येतांना बघून अमेयने मदतीची याचना करत आरोळी ठोकली. तोच जेनिफर पानी होवून वाफ बनली आणि वेगाने अमेयच्या दिशेने जावू लागली. जेनिफरच्या वाफेचा फक्त थोडा अंश जरी अमेयच्या श्वासावाटे आत गेला तरी तो पुन्हा जलजीवा बनणार होता. अर्थात हेलीकॉप्टर मध्ये त्यांचे जवळ लाल माती होतीच. त्यामुळे तशी चिंता नव्हती. वाफ अमेयला वेढा घालणार तेवढ्यातच जेनिफरलाही शेवटी केमीकल्स च्या मदतीने कायमचे नष्ट काण्यात यश आले. सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. जलजीवांचा धोका आतापुरता तरी संपला होता. अमेय सुखरुप असल्याचे अ‍ॅनाला कळवण्यात आले. अ‍ॅनाने आईची आठवण येवून आकाशाकडे बघितले. अमेय मिळाल्याचा आनंद आणि आईल गेल्याचे दु:ख याचे मिश्रण तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपात बाहेर पडत होते. डाव्या डोळ्यातल्या त्या अश्रूमध्ये बारीक नजरेने बघितले तर लक्षात येत होते की त्यात जेनिफर ची प्रतीमा करुणपणे रडत होती. उजव्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये अमेय ची हसरी प्रतीमा अ‍ॅनाच्या भेटीने व्याकूळ झालेली दिसत होती. .....जेनिफर ची प्रतिमा दिसत असलेला तो अश्रू गालावरून घरंगळत अ‍ॅनाच्या हनुवटीवर आला आणी जमीनीवर पडला. जमिनीवर तो अश्रू पुढे पुढे सरकत जावू लागला. त्याला ठरावीक असा आकार नव्हता. तो अमीबा या प्राण्यासारखे वेडे वाकडे आकार करत करत भिंतीवर चढला. बरेच वर भंतीवर जावून तो चढला. अश्रूमध्ये बंदिस्त असलेल्या जेनिफरचे रडणे चालूच होते. .....ते रडणे साधे नव्हते. ते भेसूर होते. बेसूर सुद्धा होते. कुठल्यातरी सूडाचे होते. त्या अश्रूतल्या जेनिफरच्या गालावरून सुद्धा रडण्यामुळे एक अश्रू ओघळत होता. त्या अश्रूत अमेय होता. तो अश्रू त्या मुख्य अश्रू मधून वेगळा झाला आणि आता भिंतीवर दोन अश्रू होते. एकात अमेय आणि दुसर्‍यात जेनिफर. अ‍ॅना मात्र त्या भिंतीवरच्या त्या दोन्ही अश्रू-जीवां पासून अनभिज्ञ होती..... The END लेखक : निमिष नवनीत सोनार, पुणे हीच कथा माझ्या ब्लॉगवर सुद्धा आहे- http://aksharnimitt.blogspot.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1834
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया