डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..?? त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...." आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय... . . . . . पटतंय ना वरचे लेखन. पटणारच.. मद्रासच्या सफरीचा मस्त वृत्तांत http://misalpav.com/node/7993 इथे अधिक वाचायला मिळेल. तिथेच या लेखमालेच्या आधीच्या भागांची लिंक मिळेल. ***
"ठीक आहे.. राजे नक्की.."---------------चला सुरूवात तर चांगली झाली----------- काऊंट = १ पुढे? "तात्या..?" "हो.. पण ते भांडी घासायला तयार होतील?? स्वयंपाक करायचं एकवेळ मनावर घेतील पण भांडी....??? जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील.... नि जाऊन स्वतःचा 'खाद्य व लग्न संस्कृती' नावाचा प्रोग्राम काढतील. आपल्याकडे काळं कुत्रं फिरकायचं नाही मग... आपल्याला काँपिटीशन नाय पायजे...!!" "खरंच की... तात्या कटाप!!!" "मग अवलियाला खोपच्यात घेऊया"??? "अरे तो माणूस काळा की गोरा हे माहित नाही... .. अजून त्याला कुणी पाहिलं नाही.. तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू" "ठीक आहे.. अवलिया पण कट!!!" ------------------------------- काउंट तसाच. . . खुसखुशीत संवाद आणि मस्त कथाबीज. काय म्हणालात वाचायचे आहे? वाचा तर मॅरेज लाईफ http://misalpav.com/node/8893 http://misalpav.com/node/8906 http://misalpav.com/node/8917 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखिकेची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी ती केवळ एवढेच लिहु शकते असे नाही. तिचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/3586 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, ही लेखिका आहे मस्त कलन्दर.. :) रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते. मात्र मस्त कलन्दर आमची या आठवड्याची "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे तिच्या कडे असलेल्या मोगर्यांच्या कळ्या सुकल्या आहेत. त्यामुळे हल्ली ती लेख लिहित नाही. हरकत नाही. आम्ही तिला मोगर्यांच्या कळ्या भेट देत आहोत. त्याच बरोबर पुष्पगुच्छ आणि पैठणी देत आहोत. त्याचा तिने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! मोगरा फुलला !" बाकी ती ठरवेल ते मान्य. कसे? पुष्पगुच्छ
पैठणी
मोगर्यांच्या कळ्या
दुकानांचे पत्ते
पुष्पगुच्छ - http://www.sendflowerindia.com/Images/bouquet_07.jpg
पैठणी - http://agjbusiness.com/images/paithani.jpg
मोगर्यांच्या कळ्या - http://farm2.static.flickr.com/1426/1170785933_17e9c4bf75.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
प्रतिक्रिया
माझं नाव कट कर रे ! नसेल तर
नाना
मस्त रे नान्या ! पण संयत
नान्स धन्स रे....
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला
मस्कामारु साला तु छाण लिहीतेस
तेच म्हटले ..उश्त्या हाताने
_/\_
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन
साऽऽडीऽऽ....
तुला साडी हा प्रकार आवडत
सॉलीड...
प्रेझेंट आणि फॅशन कोशंट
कॉन्टॅक्ट मोडक
अवांतर अमर रहे
कृपया ह्या धाग्यावर हा वधु-वर
जळजळ पोहोचली
काय ते
जुन्या मालकांपासूनच रूढ आहे
छे
मकीला समस लिहिलाय =)) आता
मकीला समस लिहिलाय या चुचुचे
आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी
तुमचा नाना अगदी सर्वगुणी
जरतारी पदर पहाण्यापेक्षा
पैठणी?
मके
मस्त कल्पना आहे.
चान चान ....
मस्तताईंना लेखणी उचललीच
नान्या
ह्या उपक्रमाच्या निम्मिताने
मकीला थोडी सूट!
वा! वा!! वा!!! खर्या पंख्या
हाहा!
याला म्हणतात पाशवी
+१
नाना, याचा भाग-१ आहे का २
http://misalpav.com/node/1662
छान ... आणि मद्रास ची सफर
छान !