धन्यवाद मराठेसाहेब.
पूर्वी गोगोल यांनी हा दुवा दिला होता. जो माझ्या प्रीतीच्या दुव्यांमध्ये टाकला होता. मग त्या संस्थळावर काहीतरी बदल केले गेले आणि ते लोक लॉगिन मागू लागले होते. आता परत ते संस्थळ सुधारलेलं दिसतय.
लॉगिन गेलं ते बरं झालं. मी घरातुन हॉस्टेलला जाईपर्यंत सगळे चांदोबा ठेवले होते, मग घर बदलताना काय झालं माहित नाही, आणि तोपर्यंत माझी इंटरेस्ट्ची पुस्तके ही बदलली होती.
मित्रांनो, या वरून सहज आठवले. मी चेन्नईला पोस्टिंगला असताना मुद्दाम वडपलऩी भागातील चांदोबाच्या कार्यालयात भेट द्यायला गेलो होतो. ज्यांच्ये मुळे आमचे बालपण मजेत आणि वाचनाला वळण देणारे ठरले त्या मासिकाचे चित्रकार कोण म्हणून आवर्जून पोहोचलो. वपा, शंकर असे त्यावेळचे कलाकार कसे चित्र काढतात...पहायची उत्सुकता होती... दोघेही तोवर निवृत्त झाले होते. मराठीतून गोष्टींचे भाषांतर करायला तेलगू मजकूर पांडिचेरीला एकांकडे जातो व तो आला की टाईपसेटींग करून अंक सजतो असे त्यावेळी मला तमिळ लोकांकडून भाषांतरकाराच्या मदतीन कळले होते. मला वाटतं एक छोटेखानी लेख दै. पुुढारीत आला होता... असो...
पैसे घेऊन चांदोबाचे अंक देणारे वाल्यांना मी फोन केला होता, ते १० रु. प्रति अंक घेऊन पीडीएफ देतात. पुण्यात आहेत. कुणाला हवा असल्यास माझ्याकडे फोन नं.आहे.
इथे जी साईट आहे, त्यावर इंग्रजी अंक आहेत, त्यामुळे मराठीसाठी त्यांचेकडून घेता येतील.
यावरून आठवले की ६३-६४ च्या सुमारास शाळकरी वयात कोकणात एका उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो असताना तिथे एका भल्या मोठ्या पेटीत चांदोबाचे अगदी सुरवातीपासूनचे पाहून अलिबाबाच्या गुहेतील संपत्ती पाहून ४० चोरांना जसा हर्ष झाला असेल तसा माझा प्रकार झाला. गेलो होतो हापूस आंबे खायला मिळाला जुळ्या बहिणी अन अनेक गोष्टी, दीर्घ कथांचा मधुर सुरस... ती भलीमोठी पेटी जणू माझी वाट पहात होती!
क्या बात है! दुव्यासाठी मनःपुर्वक आभार.
थोडंसं अवांतर, साधारण 1997,98 च्या सुमारास 'किशोर' मधे 'चार्ली अॅण्ड चाॅकलेट फॅक्टरी' चा क्रमशः अनुवाद प्रकाशित होत असे. नंतर हे इंग्रजी पुस्तक व त्यावर बेतलेले दोन्ही चित्रपट पाहिले. पण या अनुवादाची मजा वेगळीच होती.
प्रतिक्रिया
धन्यवाद मराठेसाहेब. पूर्वी
पण आता एरर येतोय .
In reply to धन्यवाद मराठेसाहेब. पूर्वी by शुचि
हे बेस्ट झालं.
लिंकसाठी धन्यवाद.
वॉव ! सगळ्या गोष्टी परत वाचता
धन्यवाद.
आवाज आणि जत्रा कुठे ऑनलाईन
चान्दोबा
दुवा
चांदोबाचे चित्रकार
शंकर
धन्यवाद सर !
In reply to शंकर by चित्रगुप्त
चांदोबा पुन्हा सुरू व्हावे
ते मध्यंतरी एक पैसे घेऊन
पैसे घेऊन चांदोबाचे अंक देणारे
In reply to ते मध्यंतरी एक पैसे घेऊन by आदूबाळ
कुठे मिळेल का?
जुने अंक
सर
In reply to जुने अंक by शशिकांत ओक
पेटीचे रहस्य
In reply to सर by चांदणे संदीप
http://shashioak.weebly.com/3-peek-at-my-blogs---social-media--23502367234623662350234323702344-23462381235223252366235823672340-23542375232623441.htmlचंदामामा हिन्दी मासिक
मला द्या RAR format
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
चांदोबा
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
चान्दोबा मासीक रार फोर्मट मध्ये मिळणे
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
मला हवेत
In reply to चंदामामा हिन्दी मासिक by उमेश माधवराव मसलेकर
क्या बात है! दुव्यासाठी
मला सुद्धा RAR Format मध्ये
मला सुद्धा RAR Format मध्ये
खूप दिवसांपूर्वी पहिला होता
मला सुद्धा हवेत
मला पण
किशोर चे अंक सुद्धा आता
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बुम्मा अधिरिंदी... धिम्म्मे तिरिगिंदी... ;) :- Jawaan_____/\_____
In reply to किशोर चे अंक सुद्धा आता by मदनबाण