राम राम मंडळी!
काय मग? कसं काय चाललंय? काय म्हणतंय औंदाचं पीक-पाणी? :)
आज धनत्रयोदशी! वर्षभर आपण ज्या सणाची आवडीनं आणि आतूरतेनं वाट पहात असतो तो दिवाळसण (हं.हं...नवविवाहित मित्रांनो, तोच तो..तोच तो, आणि जूनविवाहित मित्रांनो, 'तो' नव्हे पण आपला साधाच दिवाळीचा सण ;) ) आजपासून सुरु होतोय. मी विचार केला, रोज आपण सतराशे साठ खरडी मित्रमैत्रिणींना धाडत असतोच, पण असेही कित्येक मायबाप मिपाकर आहेत, ज्यांच्याशी नेहमीच संवाद होतो असे नाही. तर मग आपण ह्या धाग्याद्वारेच दिपावलीचं अभिष्टचिंतन करुया. :)
आज संध्याकाळी घरोघरीचे बापयलोक घरच्या धनाची पूजा करतील, घरच्या लक्ष्मी गाय-वासरांना ओवाळून, त्यांना गोडाचा घास खाऊ घालून वसुबारस साजरा करतील.. घरोघरीचे आकाशकंदील आज चमचमायला सुरु करतील, मिणमिणत्या पणत्या लखलखून येतील, पोरंसोरं फटाक्यांच्या खोक्यात लुडबुडून दंगा करतील...स्वयंपाकघरांतून तळणीचे, बेसनाचे खमंग वास जीव खुळावतील.. कामकाजासाठी दूर असलेले एकेक चाकरमानी आजपासून जमेल तसं आपापल्या घराकडं ओढीनं धावत निघतील..३-४ पिढ्या सोबत बसुन आनंदाच्या चार गुजगोष्टी करतील...
चला, आजपासून आपणही ह्या आनंदात आकंठ बुडून जाऊया. दिवाळीचा हा आनंद चढत्या भाजणीत वाटूया.
'दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा' म्हणतात ते काय उग्गाच? :)
मायबाप मिपाकरहो,
ही दिवाळी तुम्हा सर्वांना, तुमच्या आप्तस्वकियांना सुखाची, समृध्दीची, भरभराटीची जावो हीच श्रीशंभोचरणि प्रार्थना!
दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!
वाचने
7007
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
+१
In reply to सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! by असुर
+१
In reply to सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! by असुर
+१
In reply to सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! by असुर
:)
शुभ दिपावली!!! छान लिहिलं
+१
In reply to शुभ दिपावली!!! छान लिहिलं by बिपिन कार्यकर्ते
शुभेच्छा !!!
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आरे वा ! धमालपंतांबरोबर
In reply to शुभेच्छा !!! by विनायक पाचलग
हेच
In reply to शुभ दिपावली!!! छान लिहिलं by बिपिन कार्यकर्ते
चला, आजपासून आपणही ह्या
च्यायला !!
दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
च्यायला... कंपुतल्या माणसाचा
In reply to दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा by छोटा डॉन
बघा, कोण बोलतंय !!
In reply to च्यायला... कंपुतल्या माणसाचा by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to बघा, कोण बोलतंय !! by सूड
हॅप्पी दिवाली ...
In reply to च्यायला... कंपुतल्या माणसाचा by परिकथेतील राजकुमार
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक
+१
In reply to सर्वांना दिपावलीच्या हार्दिक by अवलिया
शुभ दिपावली
दीपावली
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या
संपुर्ण जालिय परिवाराला
हेच म्हणतो... संपुर्ण जालिय
In reply to संपुर्ण जालिय परिवाराला by गणपा
असेच
In reply to संपुर्ण जालिय परिवाराला by गणपा
डु
In reply to असेच by मेघवेडा
हेच म्हणतो
In reply to संपुर्ण जालिय परिवाराला by गणपा
शुभेच्छा
सर्व मिपाकर व कुटुंबियांना
शुभेच्छा!
शुभ दिपावली
धन्यवाद धमु! सर्व मिपाकरांना
असेच
In reply to धन्यवाद धमु! सर्व मिपाकरांना by रेवती
शुभ दीपावली
ही दिवाळी तुम्हा सर्वांना,
व्वा धमुभौ...
शुभ दिपावली!
दीपावली शुभचिंतन
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा
!! सर्व मिपाकरांना
शुभेच्छा..! (अंधारलेल्या
काय काय बघते काय मी ? धमु?
शुभ दिपावली
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक
सर्व मिसळपावकरांना आणि
छोटेखानी अभिष्टचिंतन छान! आवडले.
सर्व मिपाकरांना दिपावलीच्या
मी विचार केला, रोज आपण सतराशे
दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!
दिवाळीच्या शुभेच्छा
शुभ दीपावली
हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.
दिवाळीच्या शुभेच्छा
धमालरावांचा लेख पाहुन फार