मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवडक सुविचार संग्रह

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे. तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! * लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म! * एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. * एखाद्या कृतीमध्ये पाप नसते. त्यामागच्या हेतूमध्ये पाप असते. जग आपल्याला आपण केलेल्या कृत्यांवरून तोलते. देव आपल्याला आपल्या हेतूंद्वारे मापतो. मग आपला हेतू आणि कृत्ये शुद्धच असली पाहिजेत. नाही का? * समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात. त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या! * स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण होतात. नाहीतर, निसर्गाने आपल्याला ते पाहाण्याची शक्ती कशाला बरे दिली? * काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात. * कठीण काळ कायम टिकाऊ नसतो. पण कठीण लोक असतात. * मुर्खाचे हृदय जिभेवर असते. शहाण्याची जीभ हृदयात असते. * शब्द विविध पद्धतीने योजले असता वेगेवेगळा अर्थ निघतो. आणि अर्थ वेगेवेगळ्या पद्धतीने योजल्यास वेगळा परिणाम साधता येतो. * यशासारखे प्रेरणादायी दुसरे काहिही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी आपणांस दोन्ही आवश्यक आहेत. * अपयश कायम नसते. यश सुद्धा! * लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात. * चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. * "दिलेले वचन" एखाद्या "घेतलेल्या कर्जासारखेच" आहे. * प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका. * वाईट मनुष्य भीती दाखवली तरच आज्ञा पाळतो. चांगला मनुष्य प्रेमाद्वारे. * मनुष्य ज्याला घाबरतो त्यावर कधीही प्रेम करू शकत नाही. * भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते. * आपण एखादी गोष्ट करू शकतो की नाही, हे ती गोष्ट करून पाहील्याशीवाय समजत नाही. * ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!

वाचने 11420 वाचनखूण प्रतिक्रिया 7

पाषाणभेद Sat, 10/16/2010 - 21:59
कित्तेकदा सुविचार एकमेकांच्या उलट असतात. त्यामुळे नक्की काय समजायचे हा प्रश्न उभा राहतो. वरचेच उदाहरण बघा: तुम्ही म्हणता: एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. आता दुसरा विचार बघा: प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे दिलेले उदाहरण एकदम जुळत नसेलही पण मला आत्ता या घडीला इतर उदाहरणे आठवत नाही.

शिल्पा ब Sun, 10/17/2010 - 00:31
एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. हे काही पटत नाही..इतर सुविचार छान.