मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोघे

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दोघे एक देशातला एक परदेशातला दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली. ............................................................................................................................ देश "हलो" बोल्,आता काय झाले? "अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"? आयला आता नेमके काय ते बोल की. "ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?" घरी आल्यावर टाकतो. "तुमचे हे नेहेमीचेच" असु दे. "असु दे काय? माझ्या मैत्रीणी येणार आहेत ना" मग घे स्टूल आणि तुच टाक. मी नाही टाकणार. "मग बोलव वॉचमनला आणि त्याच्याकडुन टाकुन घे" "मग तुमचा काय उपयोग"? तेजायला इथे ऑफिस मधे घोळ झालाय. तुझे टोमणे आल्यावर ऐकतो हां. ............................................................................................................................ "पहील्यांदा ती पिशवी वर टाका. नाहीतर उद्या पण ती तशीच राहील". अग घरात तर घुसु दे. चहा नाश्ता दे. नंतर टाकतो. "आधी वर टाका. नंतर बाकी सर्व" बाकी कुठे काय राहीले आहे. "तर तर. आता ३ तास क्रिकेट बघणार. जेवणार. लगेच घोरायला सुरु. आणि म्हणा बाकी काय"? ............................................................................................................................ परदेश हलो येस डार्लिंग. अरे हनी तु पिशवी माळ्यावर टाकायचे विसरलास. हाउ फरगेट्फुल ऑफ मी. सॉरी डार्लिंग. आता घरी आल्यावर पहीले काम तेच करतो. अरे तसे नाही रे माझ्या मैत्रीणी येणार आहेत. एक्स्ट्रीमली सॉरी. तुला स्टुल घेउन जमेल का? का वॉचमनला बोलवतेस? जरा ऑफिसमधे घोळ आहे. नाहीतर मीच आलो असतो. ठीक आहे. मी बघते काय करायचे ते. टेक केअर. राईट. लव यु डार्लिंग. ............................................................................................................................ हलो हनी मी आलो घरी. कुठे आहे ती पिशवी?(%$#@$%^) "असु दे रे. आज ऑफिसचा दिवस कसा गेला? घोळ संपला का"? काही ही प्रॉब्लेम नाही. "तु फ्रेश हो. मी नाश्ता करते." अग नको. आज आपण बाहेर जाउ जेवायला. "पण आज बेसबॉल च्या मॅच ची फायनल आहे ना टीवी वर"? मरु दे. तुझ्या बरोबर डिनरसमोर ती मॅच महत्वाची नाही.($#@^&%$%^&&) "हाउ नाईस ऑफ यु डार्लिंग. मला आज तु बाहेर नेणार ह्याची खात्रीच होती." (%$$#@$%%^^%^%$$#%^&& पिशीवीच्या) ................................................................................................................................... ........... ....... ........... ....... . ......... ........... ........... ........... ___________________________________________________

वाचने 4475 वाचनखूण प्रतिक्रिया 25

In reply to by धमाल मुलगा

कमी वाच रे, कमी वाच रे....ते मच्याकन कमी वाच रे.
लेखक सगळे लेखन वाचतोच असे नाही. तुझे मात्र आवर्जुन वाचतो ;) बाकी माझी प्रतिक्रीया म्हणजे गुर्जींची दाबली गेलेली सुप्त इच्छा आहे हे येथे नमुद करावेसे वाटते. काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा 10/09/2010 - 14:49
धन्यवाद. आपला आभारी आहे. -पोलाईट धम्या. ;) >>काल रातीच आम्ही गुर्जींना फोन केल्ता तेंव्हा काठी आपटल्याचा आवाज येत होता. =)) =)) =)) =)) =)) बास...आम्ही बास.......ह्यापुढचं खवमध्ये बोलु.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मी 'अस्सल देशी' कंप्लीटली,सबजेक्टीवली आणि ऑब्जेक्टीवली हेनपेक्ड.

पाषाणभेद 10/09/2010 - 19:01
मास्तरांचे लिखाण म्हणजे मेजवानी असते अगदी. एकदम जोरकस सुरूवात. मास्तर इतके दिवस कुठे होते? अन मास्तर माळ्यावरचा तो डबा काढला की नाही. तो दुसर्‍या दिवशी काढायचा मग. बाकी हे चित्र अन ते चित्र डोळ्यासमोर उभे राहीले.

हे वाचायचंच राहिलं होतं. हलकाफुलका लेख. जळजळीत देशी असो की स्मूथ विलायती असो, चढते ती चढतेच.
$#@^&%$%^&&
ही अकरा अक्षरी शिवी पुन्हा डोकं वर काढते आहे. तुम्ही, बिपिन वगैरे थोरामोठ्यांना असलेलं ज्ञान असं लपवू नका...
%$$#@$%%^^%^%$$#%^&&
इथे तर मी हातच टेकले. अक्षरं मोजण्याच्या भानगडीतही पडलो नाही.

विजुभाऊ 13/09/2010 - 14:14
@#@$%^&^%*&@#@$#$%%$ यापेक्षा जास्त बटणे कळफलकावर असती तर कित्ती बरे झाल्ये असते ना ! ;) ही ज्योत्यीने तेज्या(यला) ची आरती