दोघे
दोघे
एक देशातला
एक परदेशातला
दोघांचीही लग्ने होउन साधारण १० वर्षे झालेली.
............................................................................................................................
देश
"हलो"
बोल्,आता काय झाले?
"अहो काय म्हणायचे तुमच्या ह्या विसराळुपणाला.? की मुद्दाम असते हे"?
आयला आता नेमके काय ते बोल की.
"ती पिशवी माळ्यावर टाकायला सांगितले होते ना?"
घरी आल्यावर टाकतो.
"तुमचे हे नेहेमीचेच"
असु दे.
"असु दे काय? माझ्या मैत्रीणी येणार आहेत ना"
मग घे स्टूल आणि तुच टाक.
मी नाही टाकणार.
"मग बोलव वॉचमनला आणि त्याच्याकडुन टाकुन घे"
"मग तुमचा काय उपयोग"?
तेजायला इथे ऑफिस मधे घोळ झालाय. तुझे टोमणे आल्यावर ऐकतो हां.
............................................................................................................................
"पहील्यांदा ती पिशवी वर टाका. नाहीतर उद्या पण ती तशीच राहील".
अग घरात तर घुसु दे. चहा नाश्ता दे. नंतर टाकतो.
"आधी वर टाका. नंतर बाकी सर्व"
बाकी कुठे काय राहीले आहे.
"तर तर. आता ३ तास क्रिकेट बघणार. जेवणार. लगेच घोरायला सुरु. आणि म्हणा बाकी काय"?
............................................................................................................................
परदेश
हलो
येस डार्लिंग.
अरे हनी तु पिशवी माळ्यावर टाकायचे विसरलास.
हाउ फरगेट्फुल ऑफ मी. सॉरी डार्लिंग. आता घरी आल्यावर पहीले काम तेच करतो.
अरे तसे नाही रे माझ्या मैत्रीणी येणार आहेत.
एक्स्ट्रीमली सॉरी. तुला स्टुल घेउन जमेल का? का वॉचमनला बोलवतेस? जरा ऑफिसमधे घोळ आहे. नाहीतर मीच आलो असतो.
ठीक आहे. मी बघते काय करायचे ते. टेक केअर.
राईट. लव यु डार्लिंग.
............................................................................................................................
हलो हनी मी आलो घरी. कुठे आहे ती पिशवी?(%$#@$%^)
"असु दे रे. आज ऑफिसचा दिवस कसा गेला? घोळ संपला का"?
काही ही प्रॉब्लेम नाही.
"तु फ्रेश हो. मी नाश्ता करते."
अग नको. आज आपण बाहेर जाउ जेवायला.
"पण आज बेसबॉल च्या मॅच ची फायनल आहे ना टीवी वर"?
मरु दे. तुझ्या बरोबर डिनरसमोर ती मॅच महत्वाची नाही.($#@^&%$%^&&)
"हाउ नाईस ऑफ यु डार्लिंग. मला आज तु बाहेर नेणार ह्याची खात्रीच होती."
(%$$#@$%%^^%^%$$#%^&& पिशीवीच्या)
................................................................................................................................... ...........
....... ...........
....... . .........
...........
...........
...........
___________________________________________________
प्रतिक्रिया
दोघे
:)
ते वॉचमन काय गुर्जी बरोबर ना
अरे जिंद्या...
कमी वाच रे, कमी वाच रे....ते
धन्यवाद. आपला आभारी
छे छे
अगाबाबो.... =)) हम कुच्च नै
ख प लो !! प्रभुच्या काठिला
शाबजी शाबजी
मी
हॅ हॅ हॅ
छान रे मास्तरा..
हा हा हा
काय मास्तर, मॅरेज काउंसेलिंग
हा हा हा मास्तर. आवडल.
आपण दोघे मिळून ती पिशवी वर ठेवू
मास्तरांचे लिखाण म्हणजे
हाहाहा......भारी हो मास्तर!!!
बरं मग?
१०० मार्क
हाहा
हा हा
@#@$%^&^%*&@#@$#$%%$ यापेक्षा
मस्त मस्त मस्त.