पुणेरी शब्दार्थ !!!!
माझ्या एका मित्राकडे हा एक संग्रह होता. त्यातूनच मी देत आहे ...
१. केशव:- साधा सरळ माणूस, नका समोर बघून चालणारा.
२.सामान:- त्याची प्रेयसी.
३.काटा काकू:- चांगली दिसणारी, पण वयाने जास्त.
४.खडकी:- एकदम टुकार.
५.झक्कास:- एकदम चांगले.
६. काशी होणे:- गोची होणे.
७. लई वेळा:- नक्की, खात्रीने.
८. चाल हवा येऊ दे:- निघून जा.
९. मस्त रे कांबळे:- छान, शाब्बास.
१०.पडीक:- बेकार.
११. मंदार:- मंद बिद्धीचा.
१२. चालू:- शहाणा.
१३. पोपट होणे :- फजिती होणे.
१४.दत्तू :- एखाद्याचा हुजाऱ्या.
१५.ब्याटरी :- चष्मेवाला/ चश्मेवाली.
१६.पुडी - माणिकचंद/ दुसरा गुटखा.
१७ राष्ट्रगीत वाजणे:- संपणे/ बंद होणे.
१८. पुडी सोडणे:- थाप मारणे.
१९.खंबा :- दारू/ बीयरची बाटली.
२०. पावट्या:- एकदम मूर्ख.
२१.खडकी- दापोडी :- हलक्या प्रतीचे.
२२.टीनपाट:-काहीच कामाचा नसलेला.
२३.पेताड/ बेवडा:- दारू पिणारा.
२४.डोलकर :- दारू पिऊन झिंगणारा.
२५.सावरकर:- दारू पिऊन झीन्गानार्याला सावरणारा.
२६.वखार युनुस:- दारू पियुन ओकारी करणारा.
२७.सोपान:- गावनढल माणूस
२८.श्यामची आई :- १८ + सिनेमा.
२९.सांडणे:- पडणे.
३०.जीवात जीव येणे :- गरोदर राहणे.
३१.भागवत :- दुसर्याच्या जीवावर जगणारा.
३२.पत्ता कट होणे :- शर्यतीतून बाहेर येणे.
३३.फणस लावणे :- नाही त्या शंका काढणे.
३४.फिरंगी:- कोकाटे इंग्रजी फाडणारा.
३५.पेटला:- रागावला.
३६.चड्डी:- खूप जवळचा माणूस.
३७.हुकलेला:- वाया गेलेला
३८.डोळस:- चष्मेवाला/ ली.
३९.यंत्रणा:- जाड मुलगी.
४०.दांडी यात्रा:- ऑफिस ला सुट्टी मारणे.
४१.चैतन्य कानडी :- सिगरेट/बिडी.
४२.चेपणे :- पोटभरून खाणे.
४३.कल्ला :- मज्जा.
४४.सदाशिव पेठी :- कंजूस.
४५.टांगा पलटी :- दारूच्या नशेत out झालेला.
४६.थुंका लावणे :- गंडवणे.
४७.LLTT :- तिरळा, लुकिंग लंडन टोकिंग टोकियो
४८.घ्या श्रीफळ :- जा आता घरी .
४९.कर्नल थापा :-थापाड्या
५०.सत्संग :- ओली पार्टी.
वाचने
6415
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
प्रतिक्रिया
हाहाहा.... मस्तच. कॉलेजात असताना पर्यंत हे शब्द वापरायचो.. :)
अजुनही बरेच आहेत, पण इथे लिहिण्यासारखे नाहीत. ;)
कन्नी कापणे : न सांगता निघून जाणे
अच्युत ढेर होणे : आयताच तावडीत सापडणे
बांगो होणे : पळून जाणे ( सहसा हा शब्द पोलीस येताहेत कळाल्यावर पळून जाणे ह्या साठी वापरतात )
गांव झिनत : उठवळ बाई / मुलगी
हेडक्वार्टर मधिल काही शब्द
भगोडा- कायम अबसेंट पडणार मेंबर
सुंकुंड्री- 'टाकून' यकदम सुमपणे वावरणारा
झेल्या- साहेबाच्या पुढे पुढे करणारा
शिरोमणी परेड- सेरिमोनियल परेड
शिलिंडर रजा- सरेंडर्ड लिव्ह ( ज्या रजेचे रोखीकरण होते अशी रजा)
एलबीडीएन- लुकिंग बिझी डुईंग नथिंग
**चोळ्या- (** हे वापरकर्त्याच्या विद्रोह/ संताप/ असहाय्यता यानुसार भरले जाणारे शरीराचे काही विवक्षित अवयव) झेल्या अर्थाला पर्यायी शब्द
चादर- काम न करता नुस्ताच अळंटळं करणारा( ६०*९० हे अतिरिक्त मोजमाप चादरीला लावले जाते)
कंबल परेड- धुलाई . सरकारी किट मधे कांबळ मिळते ती एखाद्याच्या अंगावर टाकून त्याची सामुहिक धुलाई करणे. म्हणजे कोण कोण सहभागी आहे हे समजणारच नाही
In reply to काही अन्य by प्रकाश घाटपांडे
तोडगा, बर्तन गँग, झीरो नंबर इ. राहिलेत का?
In reply to ठ्ठो मेजर.... by प्रसन्न केसकर
शिवाय 'कान फाडणे '
ऊत्तरपुजा,
झँग-पँग,
महाआरती,
माजगावचा पाटील,
मंडळ आभारी आहे ....
हा राहिलाच की ...
हा हा हा !!!! सही रे मनि२७.
जबरा !!!
M.I.T. कॉलेजचे दिवस आठवले.
विशेषतः हे फार्फार आवडले. लोळायचा बाकी होतो. :) :) :) :)
>>श्यामची आई :- १८ + सिनेमा.
>>चड्डी:- खूप जवळचा माणूस.
>>चैतन्य कानडी :- सिगरेट/बिडी.
>>सत्संग :- ओली पार्टी.
In reply to हा हा हा !!!! सही रे मनि२७ by बबलु
कानडी चैतन्य मराठी मिपावर काय करतो आहे?
In reply to कानडी चैतन्य मराठी मिपावर काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या मते ते "चैतन्य कांडी" असे हवे.
(एके काळचा "चार चौरस" प्रेमी)
जुने दिवस आठवले.
आणखी काही शब्दार्थ-
>४.खडकी:- एकदम टुकार.
दापोडी: खडकीहूनही टुकार.
टिंग्या लावणे- थापा मारणे
झाकडूमाकडू / झॅंक : चकमकीत, बटबटीत हीन अभिरुचीचे
सट्टाक/ अल् सटॅक्स् -आकर्षक
अल् फटॅक्स्- फाटणे
ही ही ही... छान!
सर्व्हर गंडला = सर्व्हर क्रॅश झाला
थांबा चहा घेऊन येते हं = थांबा मी आत जाऊन चहा पिऊन येते
मज्जा आली........खुप सही आहे!
विशेष आवडले.
(मुंबईकर)बेसनलाडू
कल्टी मारणे - कल्टीबाबा डॉट कॉम - मधूनच निघून जाणे
विशेष - काहीतरी खास चांगली / किंवा काहीतरी खूप बंडल गोष्ट
बाजार उठला - नष्ट होणे / नुकसान होणे
खंग्री - चविष्ट / काही तरी लई भारी
कंडम माल - दर्जाहीन गोष्ट
भुक्कड - फालतू
पाट्या टाकणे : अर्धवट काम करणे/काम उरकणे
घमेले वाहणे :आपले काम नसताना उगीच दुसर्यासाठी काम करणे.
फोन टाकणे :फोन करणे या अर्थी
बाजार उठ्वणे : गो॑गाट करणे
बे॑ग॑डे असणे :एखाद्याला तिरसट म्हणने.बावळट या अर्थिपण.
प॑ढरीची वारी करणे : सारखे नापास होणे.एखादे काम सतत करावे लागणे
उगाचच खेचणे :एखाद्याला अति चिडवणे.
भोकाड पसरणे : विनाकारण जोरात रड्णे.
माकडाचे घर उन्हात :एखादे काम कधीच पुर्ण न होणे.
सोमडीतः गुपचुप पणे.
ई॑गा दखवणे :आपला जोर दाखवणे(मग तो नसला तरी..)
रपेट मारणे :जवळच फिरुण येणे.
हरिश्च॑द्राचा अवतार असणे :सत्यवादी अथवा दानशुर असणे.
सध्या एवढेच....
Out of 50 atleast 10 are new addition / learning for me
Keep practising Thanks
he superb knowledge madhe bhar padali
हाहाहा.... मस्तच. कॉलेजात