आवाज की दुनीया के दोस्तों
केबल टिव्हीच्या जमान्याच्या आधी दिवसभर मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडीओ, म्हणजे विविध भारती. आणी अर्थात व्ही सी आर व व्ही एच एस टेप्स.
पावसाळा आला की पावसावर बेतलेल्या निसर्ग कवितांना एक वेगळाच भाव येतो. घाबरु नका मी काही कविता किंवा तिचे रसग्रहण करणार नाही. :-) पण पावसाळा ही थीम घेउन मला आवडणारी काही गाणी तुम्हाला ऐकवीन म्हणतो. लगेच सुरवात करुया. रेडीओवर ऐकून ऐकून बरीच गाणी मनात घर करुन जातात. माझ्या पटकन लक्षात येणारी ही गाणी तुलनेत नवीन आहेत, काही जुन्यापैकी आठवणारे म्हणजे हे एक गाणे. मधुबालाच्या फॅन्सना समर्पीत. पण धोक्याचा इशारा - भारतभूषण दिसणार.
आता मधुबाला व पाउस म्हणल्यावर हे गाणे तर यायला हवेच, नाही का?
सिनेमा आहे इजाजत. गायीका आशा भोसले. संगीतकार आर डी. गीतकार गुलझार. जेव्हा आमच्याकडे व्हिसीपी (व्हीसीआर नाही) आला तेव्हा मग आमच्या घरच्यांच्या सिनेमाप्रेमाला एक नवा आवेग आला. जमेल तेव्हा, परिक्षा असो किंवा नसो, पटकन एक टेप आणायची व सिनेमा दोन अडीच तासात बघायला घरात कोणाची ना नसायची. :-)
आर डी बर्मन यांचे अजुन एक गीत. सिनेमा १९४२ अ लव्ह स्टोरी.
चांदनी सिनेमातील सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गाणे विसरुन कसे चालेल?
रोटी कपडा मकान मधले हे पुढचे प्रसिद्ध गाणे मला तितकेसे आवडत नाही पण तेव्हाच्या फक्त प्रेयसी व आजची प्रेयसी व पत्नीसाठी एक दोन वेळा दांडी मारुन एकत्र काढलेले दिवस आठवून छान वाटते :-)
अलिकडच्या काळात पावसाचा इतका सुंदर वापर करुन चित्रीत केलेली ही पुढची दोन गाणी मला अतिशय आवडतात. सिनेमा ताल, संगीत रेहमान.
आणी हे एक
तुमची आवडती पावसाची गाणी देखील प्रतिसादात जरुर लिहा.
प्रतिक्रिया
वावा..
ऑफिसातुन व्हिडिओ दिसत
मस्त धागा!
+१ सहमत
सावन के कुछ गीत..
>>ऑफिसातुन व्हिडिओ दिसत
अजुन एक
पावसाळा
मस्तच हो सहजराव...भिजलो लेखात
आमचीही काही!
धागा वर आलाय तर आमच्या अजून
मस्त गाणी.
आहाहा! एकदम पावसात
मस्त
जबर्या!!
मस्त धागा ...
मस्त गाणी!! मला तक्षकमधील
देखो नां .. फना. अतिशय सुंदर गाणे!
पावसाची गाणी...
पावसावर एक लोक गीत!
मस्त धागा , मला गुरू मधलं
मलाही
सुंदर धागा... यग्झॅक्टली
आणखी दोन गाणी..
मीपण आताच प्रतिसाद लिहिला
मस्त धागा
अर्रे.... 'आज रपट जाएं' कसे