मुलगी लहान असताना, आमचा आवडीचा खेळ म्हणजे - एकत्र बडबडगीतं गाणं. पैकी मला आठवणारी बहुतेक बडबडगीतं मराठी होती. कारण इंग्रजी ५ वी पासून चालू झालेलं. त्यामुळे मुलगी देखील मराठी गाणी सर्वात आधी शिकली. "ससा रे ससा नी कापूस जसा" असो की "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या" किंवा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" असो तिला गाणी ऐकायला आणि मला गायला अतिशय आवडत. आमचं मराठी आवडतं बडबडगीत होतं -
"आभाळ वाजलं धडाड्धूम
वारा सुटला सूं सूं सूंम
वीज चमकली चकचकचक
जिकडेतिकडे लखलखलख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहीलं सों सों सों
पाण्यांत बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला
डरांवडूक डरांवडूक!"
त्या मानानी "जॅक अँड जिल", "ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म", 'ईट्सी बिट्सी स्पायडर्"वगैरेंची गोडी तितकीशी कधीच लागली नाही.
पण एके दिवशी मात्र माझ्या कानी एक आफ्रीकन्-अमेरीकन स्पिरीच्युअल गाणं पडलं. इतकं, मधुर, इतकं अर्थपूर्ण! मी ते गोड चाल लाऊन गाऊ लागले आणि हां हां म्हणता आमच्या आवडत्या बडबडगीतांपैकी ते बनून गेलं.
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज क्राइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज प्रेइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज लाफींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज सिंगींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
इतकं सोपं, साधं लोकगीत पण अर्थगर्भ. सगळ्या सुंदर गोष्टी साध्याच असतात का? का साध्या गोष्टी सुंदर भासतात? मी अनेकदा अजूनही तुनळीवर हे गाणं ऐकते. मन हलकं होतं.
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह
वाह सुचीताई कसली मस्त आठवण काढलीत हो.
"आभाळ वाजलं धडाड्धूम"
बालवाडीत असताना ही कविता होती पुस्तकात. अगदी चित्रा सकट.
मस्त एकदम लहान झाल्या सारख वाटलं.
>>त्या मानानी "जॅक अँड जिल", "ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म", 'ईट्सी बिट्सी स्पायडर्"वगैरेंची गोडी तितकीशी कधीच लागली नाही.
सहमत.
नवी पिढी "जॅक अँड जिल", "ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म", 'ईट्सी बिट्सी स्पायडर्" म्हणते पण आपल्याला त्यात तो ओलावा जाणवत नाही.
लेकीला आपल्या वेळची बडबड गीतं पण ऐकवतो. तिला ही ती इंग्रजी गाण्यां इतकीच आवडतात.
गणपा
In reply to वाह by गणपा
"आभाळ वाजलं धडाड्धूम" ही कविता बहुदा पहिली मधे बालभारतीच्या पुस्तकात होती. परीक्षेत ह्या आणि अशा कवितांवर असंख्य प्रश्न विचारत आणि मग त्या फक्त मार्क मिळवण्याचे साधन बनत.. तरीही कविता वाचून छानच वाटले एकदम.
कसे सुचते
कसे सुचते हो तुम्हाला येवढे छान छान अणि गोग्गोड लिहायला ? ;;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
हं.....बड्बडगित....
...खरच्....छान्न आहे...
मलाही माझं आवडतं बडबड गीत आठवलं...
कैरी कोथिंबीर मिरची आलं
या सगळ्यांचं भांडण झालं..
कश्शावरुन?
एवढ्याश्या खोबर्याच्या तुकड्यावरुन..
काकुबाई आल्या पदर खोचुन..
एकेकाला काढ्लं ठेचुन..
पाट्यावर केली वाटणी..सुरेख झाली चटणी..
चटणी भरली बशीत..
जाई जेवायला बसली खुशीत..
=D> (नंतर टाळ्या वाजवाय्च्या हं सगळ्यानी)
आणि आपलं नाव आपणच गाण्यात घातलं कि काय आनंद व्हायचा!..आहाहा
(मोठी झाल्यावर कैरिच्या चटणीची रेसीपी म्हणुन सुद्धा उपयोग होतो या बड्बडगिताचा....)
मोठी
In reply to हं.....बड्बडगित.... by जाई अस्सल कोल्हापुरी
हे मस्तच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
जाई, सह्ही
In reply to हं.....बड्बडगित.... by जाई अस्सल कोल्हापुरी
जाई, सह्ही आहे हे तू सांगितलेलं बडबडगीत.... आधी नव्हतं ऐकलं... :)
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
कुम्बायाह
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह...
माझ आवडतं बडबडगीत.
फारच छान
संजा
वक्का
वक्का वक्का माझ आवडतीच बडबड गीत आहे. :)
---------------
धनंजय बोरगांवकर
वा!
छान!!!
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
छान! येथे
छान!
येथे दिलेली ही एक चाल आहे आणि ती पण सुन्दर आहे.
लेख वाचुन २५/३० वर्षे मागे गेलो.
शाळेत शिकवत असताना काही सकाळ्च्या assembly मध्ये हे गाणे १५०/२०० मुले/मुली पीयानोच्या धुनीवर ऐका सुरात गात असत. ह्यात सर्व धर्माची/सर्व रन्गाची मुले असत.
मस्त मजा येत असे!
आठ्वण करून दिलीत-- धन्यवाद
वाक्का वाक्का !!
आपलं तर बुआ "वाक्का वाक्का" आवडतं बडबडगीत हाये.
https://www.youtube.com/watch?v=pRpeEdMmmQ0
....बबलु
अहो त्या
In reply to वाक्का वाक्का !! by बबलु
अहो त्या लहानांच्या बडबडगीतांबद्दल बोलताय...मोठ्यांच्या नाही काय... :D
दिपाली :)
दिपाली , ते
In reply to अहो त्या by दिपाली पाटिल
दिपाली , ते बाळगोपाळांच्या "शकीरा मावशी" चं गानं हाय. :)
आता शकीरा मावशी मोठ्यांस् नी पन आवडू रायली त्याला आपन काय करनार ? :) =))
(शकीरा मावशी चा पंखा) ....बबलु
आय लाइक टू मूव्ह इट !!
अजून येक हाये.
आय लाइक टू मूव्ह इट !!
हे लै बेष्ट हाये.....
....बबलु
वा वा वा.
वा वा वा. सुंदर. अप्रतिम. लाजवाब!
-Nile
मस्त आहे
मस्त आहे गाणं! :-)
अरुंधती
https://iravatik.blogspot.com/
डरांवडूक डरांवडूक
बाकी काहीही म्हणा....
"डरांवडूक डरांवडूक" आठवून काळजात अंमळ गलबललं !
शुचीतै... मस्त लेख.
....बबलु