अधोरेखीत
"तुमच्या कार्यक्रमातुन स्फुर्ती,प्रेरणा घेउन आम्ही एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम चालु केला आहे. पण त्यात काही इंग्लिश माध्यमाच्या शिक्षकांचा अभिव्यक्तीचा अहं अधोरेखीत झाल्यामुळे सुसुत्र संचालनाला बाधा येत आहे".
अहो, लेले जरा मराठीत बोला.चुपके चुपके मराठीतुन काढला तर स्क्रीप्ट रायटींग तुम्हीच करा.
"इगो मॅनेफेस्टेशन."
थोडक्यात थेम्स नदीच्या काठी जन्माला आलेले तुमच्या कार्यक्रमात राडे घालतायत. मी उद्या येतो. सगळ्यांना एकत्र बसवा. दहा मिनिटात प्रश्न सुटेल.
...........................................................................................
लेल्याने ओळख करुन दिली.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेश पासुन करियर ची सुरुवात वगैरे वगैरे...
इंग्रजी वाले कपड्यावरुन ओळखता येत होते. मराठी वाले गुर्जी आणि बै त्या मानाने साध्या कपड्यात.
पाहुण्यांनी पहीलाच सवाल टाकला.
The quality of English teaching is on decline. What is your opinion?
"I do not know about other mediums. But I in my 10 years of teaching have never allowed it to happen. I believe it is same with all convent high schools." एक कोट आणि टाय जरा रागातच बोलला.
पाहुण्यांनी काहीही न बोलता फळ्यावर चार शब्द लिहीले.
पहीला शब्द सोपा होता. पण तोच इतर शब्दां च्या उच्चारणाचे वांदे करणार होता.
CHARITY, CHARISMA,CHARADE, FACADE
एक मराठी माध्यमाच्या बै नी ह्याचे उच्चार बरोब्बर केले.
बाकी सर्व चॅरेड्,फॅकेड, करीश्मा मधे अडकले.
पाहुणे मराठी माध्यमात शिकलेले होते.
पुढील ३ दिवस कार्यक्रम कुणाच्याही अभिव्यक्तिचा अहं अधोरेखीत न होता निर्धोक पार पडला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
मास्तर
गुर्जी ओ
हॅहॅहॅ!!!
+१
शरेऽड
:-)
मस्तच!
च्यायला
हाण्ण
hymn असाच
हम्म्म्म!
मराठी
Rendezvous
उच्चार
झकास!
लै