एक समिक्षा ( बी ए भाग दोन)
आमच्या एक आदरणीय सदस्या मृगनयनी देवीनी एक थोर काव्य खेचर टंकणीने स्क्रीनवर उतरवले.. त्या खेचरीच्या काव्यखेचराची विद्यापीठातील अभ्यासक्रमात वर्णी लागली आणि बी ए भाग दोन च्या पेपरात कवितेचे समिक्षण लिहिण्याच्या प्रश्नावर का विद्यार्थ्याने लिहिलेली ही समिक्षा
मूळ काव्य खेचरः
____/\____
फार झाला हा कवितेचा पसारा....
आता आवरा आवरा.....
आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा...
घाल घाल पिन्गा वारा....
सन्गे पावसाच्या धारा....
आय डोन्ट लव ब्रायन लारा......
यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा...
जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा......
शरारा... शरारा.......
तुझा मिर्चीचा तोरा.....
रन्ग कधी काळा.. कधी गोरा....
निळ्या निळ्या पिसांचा फुलव फुलोरा...
मै हुं आशिक ... अशिक आवारा...
मला जाउ द्या ना घरी... आता वजले की बारा.....
___
___
___
___
हे अति होत अस्सेल... तर अन्डी फेकून मारा....
.....मृगनयनी.
समिक्षा
प्रस्तूक कवितेत नायीकेच्या मनाची उलघाल दाखवताना कवयत्री लिहिते
फार झाला हा कवितेचा पसारा....
आता आवरा आवरा.....
कविता करून मनातल्या भावना व्यक्त होत नाहीत. कवितेतले शब्द मनाला आवर घालू शकत नाहीत . मनाचा पसारा कव्हर करायला कवितेचा कॅमेरा तोकडा पडतो. तो थोडासा आवरला तर न्यूज म्हणून कव्हर करता येईल. एकाच एपिसोड मध्ये बसु शकेल असे कवयत्रि ला वाटते.
आम्ब्याच्या वनात नाच रे मोरा...
घाल घाल पिन्गा वारा....
आंब्याच्या वनात वार्यासवे पिंगा घालावा...भावनांच्या कल्लोळात
अवघे आम्रवन पिग्याने घुसळून काढावे असे कवयित्रीला वाटते.
सन्गे पावसाच्या धारा....
आय डोन्ट लव ब्रायन लारा......
मनाचा हा कल्लोळ जणू पावसाच्या धारा आहेत आणि अवघी पृथ्वी न्हाऊन निघत असताना त्या कल्लोळाला ब्रायन लाराच्या एखाद्या झंझावती इनिंगची उपमा सुद्धा तोकडी पडेल असे कवयित्री म्हणते
काव्याच्या उपमेत क्रीकेटमधील ही उपमा हे अर्वाचिन काव्यातले एक झळालते रत्न आहे. मराठी कविता हळूहळू भाषीक भौगोलीक क्षितीजे ओलांडत आहे याचीच जाणीव ही उपमा करून देते
यातला कोण बरे पुरुष?= वीर की झारा...
जाऊ कशी मी मथुरेच्या बाजारा......
शरारा... शरारा.......
मथुरेच्या बाजारात शॉपिंगला जाताना आपण ज्याच्या सोबत जातो ती सखी असेल क्जी सख्याहारी असेल याच्या चिंतेत नायीका असताना तिच्या अधिर्या झपुर्झा अवस्थेत असणार्या मनाची थरथर कवयत्रीने शरारा शरारा या नव्या शब्दाने दाखवली आहे. मराठीच्या दालनात हा नवा शब्द बहाल केला आहे.
तुझा मिर्चीचा तोरा.....
रन्ग कधी काळा.. कधी गोरा....
निळ्या निळ्या पिसांचा फुलव फुलोरा...
मै हुं आशिक ... अशिक आवारा...
मला जाउ द्या ना घरी... आता वजले की बारा.....
काळा सो की गोर आसो एकदा प्रेमात पडले की सगळा तोरा संपतो.
निळ्या नभाच्या पार्श्वभुमीवर मोरपिसारखे फुलणारे प्रेम. हे स्थळकाळाची जाणीव हरपून ठेवते. बारा कधी वाजले तेच कळत नाही.
नायीका नायकाला आता हे सगले आवरा असे म्हणते.... बारा वाजले म्हणूनघरी जायचे असते. पण पाय निघत नाही.
___
___
___
___
हे अति होत अस्सेल... तर अन्डी फेकून मारा..
नुसत्या रेखीव चार ___ च्या ओळीत कवयित्रीने शब्देवीण संवादु म्हनजे काय हे दाखवून दिले आहे.
प्रेमात असली तरी नायीकेचे पाय जमिनीवरच आहेत. ती लोकाना सांगते माझ्या वेड्या प्रियकराला दगड फेकून नका मारू. अंडी फेकून मारा. निदान भूक तरी भागेल.
कवितेच्या शेवटच्या ओळीत प्रेम हे पोटाची भूक भागवू शकत नाहीत हे प्रखर वास्त्व अधोरेखीत केले आहे
प्रतिक्रिया
विजुभाऊ, इं
छान
मी
विजुभौ!!!!!!!
कसली खंगरी
तिच्या
"आणि मी