२ सेकन्दात स्वर्गानुभुति
नमस्कार मंडळी,
पहिलेच लेखन.
जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले :)
तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत).
टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी?
असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे.
या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य!
मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही. पण, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा हिच होती.
माझ्या मते, किशोरी बाईनी या दोन सेकंदात केवळ आणि केवळ स्वर्ग उभा केला आहे. उर्वरित गाणे देखील अवश्य ऐका, पण या २ सेकंदात असणाऱ्या स्वर्गानुभूती ला मुकू नका.
आजतागायत, इतक्या कमी वेळात असा अनुभव देणारं मी या जगात काहीही ऐकलेलं नाही.
तुनळि वरिल धागा http://www.youtube.com/watch?v=_nm9TkY_H3k
धन्यवाद
वर्गीकरण
छा !
ठ्ठोठ्ठो....
In reply to ठ्ठोठ्ठो.... by टारझन
>> षिर्षक
In reply to ठ्ठोठ्ठो.... by टारझन
भ्रमानिरासा बद्दल क्षमस्व :)
In reply to भ्रमानिरासा बद्दल क्षमस्व :) by तुका म्हणे
तसं नाही हो तुका
माझा आयडी हॅक
In reply to माझा आयडी हॅक by तुकाम्हणे
तुमचा आयडी
In reply to तुमचा आयडी by तुका म्हणे
तात्याला
छान आहे रे