२ सेकन्दात स्वर्गानुभुति
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
पहिलेच लेखन.
जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले :)
तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत).
टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी?
असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे.
या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य!
मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही. पण, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा हिच होती.
माझ्या मते, किशोरी बाईनी या दोन सेकंदात केवळ आणि केवळ स्वर्ग उभा केला आहे. उर्वरित गाणे देखील अवश्य ऐका, पण या २ सेकंदात असणाऱ्या स्वर्गानुभूती ला मुकू नका.
आजतागायत, इतक्या कमी वेळात असा अनुभव देणारं मी या जगात काहीही ऐकलेलं नाही.
तुनळि वरिल धागा http://www.youtube.com/watch?v=_nm9TkY_H3k
धन्यवाद
वाचने
2441
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
कव्हरवर एक मस्त चित्र, आणि आत पहावे तर दत्तमहिमा !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
ठ्ठोठ्ठो.... षिर्षक वाचुन अंमळ वेगळीच कल्पना मनात होती .. =))
बाकी स्वर्गानुभुती व्यक्तिसापेक्ष आहे हेच खरे :)
-(स्वर्गानुभुतीच्या शोधात) स्वामी टारानंद
स्वर्गानुभुती कडुन ... अनुभुती कडे
In reply to ठ्ठोठ्ठो.... by टारझन
>> षिर्षक वाचुन अंमळ वेगळीच कल्पना मनात होती
झोपायच्या आधी तु धागा वाचला तेंव्हाच लक्षात आले की तुझी कल्पना अंमळ वेगळी होती ते .....
In reply to ठ्ठोठ्ठो.... by टारझन
हा धागा टाकल्यावर मला वाटलेच होते, कि लोकांच्या अपेक्षा उगाच उंचावू शकतात. पण प्रामाणिकपणे : माझा तसा हेतू नव्हता :)
In reply to भ्रमानिरासा बद्दल क्षमस्व :) by तुका म्हणे
तसं नाही हो तुका ..... संगीत ही प्रचंड वैयक्तीक बाब आहे. व्हॉट स्टिम्युलेटस यु मे नॉट नेसेसरीली इव्हन अपील मी.
मला ही काही गाणी जबरी आवडतात मग मी ती माझ्या खात्यात वैयक्तीक माहीतीत घालते. जो तिकडे जायचे कष्ट घेतो त्याला/तिला च ती सापडतील अशी. : )
मी तुमचा दुवा ऐकण्याचा प्रयत्न केला. छान आहे.
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
तात्या, माझा आयडी हॅक झालेला दिसतो. काही करू शकता का?
तुषार
विश्व जालावरील मराठी जग
In reply to माझा आयडी हॅक by तुकाम्हणे
तुमचा आयडी ह्याक झालेला नसून, तुमच्या आयडी सारखा माझा आयडी आहे. तुमचा "तुकाम्हणे" माझा "तुका म्हणे"
अर्थात, मला हे आधी माहिती नव्हते.
मी बघतो, नवे खाते न काढता आयडी बदलण्याची काही सोय आहे का ते.
In reply to तुमचा आयडी by तुका म्हणे
तात्याला खरडा. ते करू शकतील.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
छान आहे रे बागेश्री...:)
तात्या.
छा !