मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुट्टी

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दिवसाची सुरवात तर मस्त झाली होती. खुप दिवसानी पुर्ण दिवस सुट्टीचा योग जुळुन आला होता. आंघोळ करुन परत ताणुन देण्याचा विचार होता. खमंग थालीपीठाचा वास खुणावत होता. "पाणी काढलय, ब्रेकफास्ट करुन घे" आतुन साद आली. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' हे आवडते गाणे गुणगुणत तो स्नान गृहाकडे निघाला. देवपुजेला तुळस आणि फुले काढताना अंथरुणावर ठेवलेला लेंगा झब्बा त्याला दिसला. कुणीतरी पाहूणे येतात की काय? कालच ठरल होते. विझीट टु पास्ट विदाउट एनी कॉम्प्रमाईज. " अरे अल्पी येतेय" ??? "माझी शाळेतली मैत्रीण. लग्नाला आली होती. तु तीला 'सुबक उंच' म्हणाला होतास आठवते. जेउन जाईल" दुपारचे का रात्रीचे? "फक्त चार तास असेल" ठीक आहे. तो पर्यंत मी एक मॉर्नीग शो बघुन येतो. उगाच माझी अडचण नको तुमच्या शॉप टॉक मधे. " तुझे आपले काहीतरीच. तीला लग्नाची मुलगी आहे" काय संबंध? नोट्स कंपॅरिझन होणारच. काय करते ही कल्पी? "अल्पी ही एक सायकॉलॉजिस्ट आणि काउंसेलर आहे ." डेंजरस कॉम्बिनेशन. "एच्.आय.व्ही. दिवसानिमित्त ती एका कॉन्फरन्स ला आली आहे दोन दिवसाकरता. भेटुन जा" अल्पीत फारसा फरक पडला नव्हता. वयाच्या खुणा अगदी पुसट. नमस्कार चमत्कार, थोडे फार संभाषण झाल्यावर तो बाहेर पडला. निंजा असॅसिन बघताना घरातल्या असॅसिन ची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. काय पुड्या सोडणार ही बया कुणास ठाउक? घरी आल्यावर बायकोचा चेहेरा वेगळाच दिसत होता. "एक विचारु का"? स्पष्ट विचार. जिलेबी न करता. "म्हणजे"? जिलेबी कुठुन सुरु होते कुठे संपते ते कळत नाही. "अल्पी म्हणत होती की तु जंटलमन आहे" (जिलेबी सुरु झाली होती) कशावरुन? "बाहेर जाताना तु तीला वळुन बघीतले नाहीस". वेडा आहे का मी? "तुझ्या नजरेत दु:शासन दिसला नाही तीला." आयला, कठीण आहे तुझ्या कल्पीचे. प्रश्न काय? लग्नानंतर तुझे काही अफेअर होते का रे? नाही. आतापर्यंत नाही. उद्याचे माहीत नाही. पण दोनदा योग जुळुन आला होता मी काही ही न करता. अगदी सिल्वर प्लॅटर वर. पण नको वाटले. अफेअर फुकटात होत नाहीत. त्याला पैसा खर्च करावा लागतो. शिक्षणासाठी राखुन ठेवलेला अफेअर वरती खर्च करावा हे पटले नाही. "माझा विश्वासघात वगैरे"? (काय उत्तर द्यावे) नाही. (चेहेर्‍यावर निराशा) "पण पुरुष अशी लफडी करतातच कशाला"? बरीच कारणे असतात. शारिरीक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक,इगो मॅनिफेस्टेशन व इतर. आणि ह्यात स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार असतात. आणि अल्पीला म्हणावे पुरुष एकटाच लफडे करत नाही. लफडे करायला एक स्त्री पण लागते. नाही का? "अय्या हे लक्षातच नाही आले". असे काही झाले तर ना पहील्यांदा तुला सांगीन, अंधारात ठेवणार नाही. "इतके दिवसात केले नाहीस आता काय करणार आहेस तु"? डोंट बी सो शुअर. आणि मी नाही म्हटले ते नाहीच हे कशावरुन. अल्पीने प्रमाणपत्र दिले म्हणुन. असे प्रामाणिक मुखवटे ओढणे अगदी सोप्पे असते. हम्म. तुला मिळाले का उत्तर. आता मी मोबाईल बंद करतो. तु दरवाजाची बेल बंद कर. जाता जाता: एक स्त्री प्रधान मान्यवर संस्थेचा सर्वे: लग्न झालेला पुरुष दर दोन महीन्याला स्वःताचे कपडे (बनियन वगैरे) स्व:त घ्यायला लागला की ओळखावे तो अफेअर मधे अडकलेला आहे. ये तो बडा टॉइंग है.

वाचन 6156 प्रतिक्रिया 0