गोणेस्पोती राया - साष्टीमधील एका आरतीची चाल
काही महिन्यांपूर्वी मला गोव्यातील ख्रिस्ती समाजातील लोकगीतांच्या चालींचा खजिना आंतरजालावर सापडला. त्यातील एक चाल ओळखीची असणार म्हणून मागे दिलीच आहे - (आगे नारी - एक कोंकणी लोकगीत)
गोव्यातल्या-कोकणातल्या लोकांना एकमेकांची ओळख आणखी एका बाबतीत पटते. बाकी कुठल्याही सणापेक्षा गणपतीचा उत्सव सर्वात लोकप्रिय आहे. दिवाळीला एखाद दिवस सुटी घेणारे लोक गणपतीसाठी आठवडाभर घरी जातात!
पाद्री लुर्दिन्य बार्रेतो यांच्या पुस्तकात मला गणपतीच्या आरतीची एक चाल सापडली. (त्यांच्या लोकगीतांच्या पुस्तकात भक्तिगीते फक्त हिंदू देवदेवतांची आहेत. पाद्री बार्रेतो यांच्यावर गोव्यातील चर्चच्या संगीत-शिक्षणाची जबाबदारी होती. या शिक्षकपदामुळे चर्चमध्ये गायच्या ख्रिस्ती भक्तिगीतांचे त्यांनी बहुधा वेगळे संकलन केले असावे.)
सुरावट अशी आहे :
चाल अशी आहे :
किंवा जर गितार/पियानोची साथ हवी असेल, तर त्याचे "कॉर्ड" असे आहेत :
गीतप्रकार "देखणी" म्हणून दिला आहे, तरी "आरती" म्हणायलासुद्धा हरकत नसावी.
- - -
गोणेसपोती राया ताका नोमान आमी कोरया
गणेशपती राया त्याला नमन आपण करूया
पोत्रावोळी मांडून ताका जेवोण बोरे दिंउया
पत्रावळी मांडून त्याला जेवण बरे* देऊया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
म्होइनो भोरि गोरांत दोवरून पोणत्यो ताका लाउंया
महिनाभर घरात ठेवून पणत्या त्याला लावूया
पूजा ताची कोरून कोरून बांयतु ताका सोडया
पूजा त्याची करून करून विहिरीत त्याला सोडूया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
पानसुपारी चिबडां मोगीं हाडून भेटेंक दिउंया
पानसुपारी चिबुडे** मोगरी आणून भेटीस देऊया
लोक्शिमोणांक सांगून बोरेंच वाजोंतोरूं कोरया
लक्ष्मणाला सांगून बरी वाजंत्री करूया
आरे देवा रामा राया आमी कोरतां पुजा तुला (तुका) (दोनदा)
अरे देवा रामा राया आम्ही करतो पूजा तुला
- - -
*कोकणातल्या लोकांना ठाऊक असेल की "बरे" म्हणजे "खूप चांगले" :-)
**चिबूड - हे टरबूजवजा फळ गोव्यात मिळते, आणि गोवेकरांना खास प्रेमाचे आहे. बहुधा कोकणातही मिळत असावे.
शेवटच्या कडव्यात लक्ष्मणाचा उल्लेख आहे, आणि ध्रुवपदात रामाचा उल्लेख आहे. रामाच्या घरी गणपतीची पूजा चालली आहे, असा काही प्रसंग लोककवीने कल्पलेला असावा.
गंमत म्हणजे गोव्यात "सुखकर्ता दु:खहर्ता" या आपल्या ओळखीच्या आरतीची चालही वेगळी आहे. मुंबई-पुणे-नागपूरमधल्या माझ्या नातेवाइकांमध्ये सर्व आरत्यांची एकच चाल आहे - पण हे नातेवाईक सर्व मूळ कोकण-पुणे भागातले असल्यामुळे त्यांनी तीच चाल सगळीकडे नेली असेल. महाराष्ट्रातसुद्धा आरत्यांसाठी अनेक प्रादेशिक चाली आहेत का?
चाल अशी आहे :
|
|
याद्या
10621
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
चांगला उपक्रम
दीड दिवसांचा \ लयीच्या बाबतीत कच्चा
In reply to चांगला उपक्रम by अक्षय पुर्णपात्रे
बार्स
In reply to दीड दिवसांचा \ लयीच्या बाबतीत कच्चा by धनंजय
काकदृष्टी
In reply to बार्स by प्रदीप
सुंदर!
धन्यवाद
In reply to सुंदर! by निमीत्त मात्र
सुंदर
खरडही छानच
In reply to सुंदर by प्रदीप
ही गोव्याची आरती आहे का?
In reply to खरडही छानच by धनंजय
अगदी हीच!
In reply to ही गोव्याची आरती आहे का? by चित्रा
छान
In reply to ही गोव्याची आरती आहे का? by चित्रा
छान
प्रदीप यांची खरड
In reply to छान by चित्रा
छान अनुभव
In reply to प्रदीप यांची खरड by चित्रा
पाद्री
नवीन माहीती
ये ई हो विठ्ठ्ले
In reply to नवीन माहीती by विकास
छान
रोचक धागा
गंमतीदार धागा!
छान