मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंडळी, झाली का तयारी?

किलमाऊस्की · · विशेष
काय हे, अजून काहीच तयारी झाली नाहीये का? चला चला, आवरा पटापट...केव्हाचं सांगून ठेवलेलं आज निघायचं आहे म्हणून. चला चला बॅगा भरा... https://lh3.googleusercontent.com/-FxWNi9H9pYY/VrJZt3dhV3I/AAAAAAAAFPo/sBycS39rfUw/s512-Ic42/Orig_Bagpack.png कुठून घेतल्या बॅगा विचारताय...ती किनई मजाच्च झाली. अनाहिता गेलेल्या ना 'सरस' ला तिथूनच आणल्यात. काय बाई, नुस्ता धुडगूस घातला एकेकीने प्रदर्शनात. तुम्हाला म्हणून सांगते, बोलू नका कुणाला...कुठे न्यायची म्हणून सोय नाही हो या बायकांना. वात आणला नुसता. हिरवे, काळे, नि़ळे मिळतील त्या रंगाचे मसाले उचलत होत्या, पीठं काय नि चहा काय एक वस्तू सोडली नाही. एकीने तर सहा कानातली उचलली. आहात कुठे? आता काय भा़जी करणार का सहा कानातल्यांची. पण ऐकणार नाहीत...जाऊदेत, तुम्ही आटपा लवकर...आधीच उशीर झालाय. https://lh3.googleusercontent.com/-gLU0MZGJ8dU/VrJaqpIW5mI/AAAAAAAAFPw/kOKvLUcbdUU/s720-Ic42/Orig_shoppingbag.png https://lh3.googleusercontent.com/--x9qRkGPgxY/VrJaK2O59II/AAAAAAAAFPo/hMf3MdMvpNE/s800-Ic42/Orig_Handbag.png कपडे अजून वाळतायतचं का दोरीवर.... https://lh3.googleusercontent.com/-vgUvUp8XY7M/VrJaWUxyKXI/AAAAAAAAFPo/elh0E05VOWI/s800-Ic42/Orig_Frock.png हम्म, काय म्हणता, घालतच होतात का घड्या. बरं...बरं... https://lh3.googleusercontent.com/-f-ioSZ-860Y/VrJachBvtmI/AAAAAAAAFPo/m-1OU2vtHGs/s576-Ic42/Orig_Shirt.png छत्र्या घ्या हो आठवणीने, पाऊस असला तर उगाच तारांबळ नको. https://lh3.googleusercontent.com/-dF69GsfhXQg/VrJag_irTLI/AAAAAAAAFPo/Fl213BBgHEI/s512-Ic42/Orig_Umbrella.png टोपी पण घ्या, काय उन्हं वाढलीत आजकाल.. तुम्हाला सांगते मागच्या वर्षी आम्ही त्या तिकडे गेलेलो ना... ऊन काय मी म्हणत होतं. आमचे हे...काय म्हणता, आमच्या ह्यांच्या गोष्टी नंतर सांगूका?, बर्र... https://lh3.googleusercontent.com/-YU7Sk6U_T-8/VrJapyi1rvI/AAAAAAAAFPw/ws1r6QT0Y24/s640-Ic42/Orig_cap.png आणि ते गॉगल काय आणून ठेवलेत ना काल.. ह्म्म्म भरले का ते? https://lh3.googleusercontent.com/-20U0m-rKO8U/VrJoWS-NuwI/AAAAAAAAFP4/xVmRL3Ckmq4/s912-Ic42/Orig_gogle.png तिकिटं? https://lh3.googleusercontent.com/-Wv4Jl5ymAps/VrJaCpF5hsI/AAAAAAAAFPo/GfJFUhEwTSQ/s512-Ic42/Orig_Letter.png अय्या पिकनिक बास्केट राहिलंच की....काय बाई इतकं हौसेने घेतलेलं या दिवसासाठी.. https://lh3.googleusercontent.com/-r5ww5dRfc3M/VrJZp-NH6WI/AAAAAAAAFPo/_0gha1boDHE/s576-Ic42/Orig_Basket.png पाकिट कशाला घेताय... फुकट तर आहे सहल https://lh3.googleusercontent.com/-TpHM4Tue-Ao/VrJabv-4R_I/AAAAAAAAFPo/MgekHCmCQmk/s800-Ic42/Orig_Wallet.png चपला घाला आठवणीने. https://lh3.googleusercontent.com/--_Iw00eo_QI/VrJZXHVYS7I/AAAAAAAAFPE/jOnQigBaNok/s800-Ic42/Crochet_slippers.jpg कसं जायचं म्हणता...होडी आहे की तयार कधीपासून.. https://lh3.googleusercontent.com/-Om-ueLht2v0/VrJZzCsUlkI/AAAAAAAAFPo/8tTYGIsOpRg/s512-Ic42/Orig_Boat.png कुठे निघालोय विचारताय? अर्रर्र...मेन मुद्द्याचं राहिलंच..सॉरी, सॉरी बरं का, अहो अनाहिताचा भटकंती अंक आलाय ना! त्याच्याच सफरीवर निघालोय. चला, निघायचं का? https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

वाचन 13770 प्रतिक्रिया 42

सविता००१ Tue, 03/08/2016 - 10:03
कसली क्यूट तयारी आहे गं प्रवासाची..... बेष्टम बेष्ट :) खूपच अभिनव कल्पना

In reply to by इशा१२३

प्रश्नलंका Tue, 03/08/2016 - 16:16
अगदी हेच म्हणणार होते. माझी पन बॅग झाली भरून. जरा सरका जागा द्या मला पण. मला इथुन तरी विमान पाहिजे. ;) तिथे आल्यावर बोटीत बशीन म्हणते. ;)

आपली अनेक डिस्कशन्स आठवताहेत मला यावरची. वस्तू किती छान झाल्यात हे तर सांगितलेच आहे. पण त्या निव्वळ वस्तू न राहता, या सहलीच्या तयारीच्या लेखाच्या माध्यमातून अजूनच खुलल्या आहेत.

किलमाऊस्की Wed, 03/09/2016 - 22:29
कल्पना तसंच वस्तू आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार! :-)

स्वाती दिनेश Sun, 03/20/2016 - 14:53
सगळ्याच वस्तू तर क्यूट आहेतच पण ही कल्पना जेव्हा तू मांडलीस तेव्हा ती फारच आवडली होती. स्वाती