Skip to main content

पेपर फ्लॉवर..डच गुलाब

लेखक इशा१२३ यांनी रविवार, 08/03/2015 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो. अशाच एका वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी बनवला कागदी गुलाबांचा पुष्पगुच्छ. . कागदी फुलांसाठी लागणारे साहित्यः डुप्लेक्स पेपर(रंग-मी लाल आणि पिवळा घेतलाय) तयार हिरवी कागदी पाने (गुलाबाची मिळतात) २२ नं.जाड तार(घेताना हाताने सहज वळवता येतीये ना हे पहाणे) हिरवी टेप पांढरा दोरा फेव्हिकॉल कॄती: प्रथम एखाद्या जाड कागदावर फुलाच्या पाकळीचा व पुष्पाधाराचा आकार कापुन घ्यावा.कापलेला आकार डुप्लेक्स कागदावर उभ्या रेषेत ठेवून कापा. डूप्लेक्स कागदाची योग्य मापाची घडी घातल्यास एकावेळेस जास्त पाकळ्या कापता येतील.एका फुलासाठी साधारण १२ पाकळ्या आणि एक पुष्पाधार लागतो. F वर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाकळ्या(साधारण ५सें.मी.उंच,खालचा बेस१.३ सेंमी आणि वर गोलाच्या इथे ४.३ आहे) घेतल्या.त्यातील एक पाकळी गोलाकार फिरवा.परत दूसरी पाकळी पहिल्या पाकळीवर फिरवून दोर्‍याने बांधा. नंतर २२ नं.ची लवचिक तार घेउन पाकळीच्या खालील भागास गुंडाळणे. F फूलाचा देठ जाड होण्यासाठी त्या तारभोवती अजून एक तार गुंडाळा. या पाकळ्यांवर २ पाकळ्या घेउन समान अंतरावर बांधा. . यापुढे तीन पाकळ्या बांधा.नंतर उरलेल्या ५ पाकळ्या बांधा. हिरवा डूप्लेक्स पेपर घेउन जो पुष्पाधार पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे(साधारण४,५ सेमी.रुंद आणि ३.५सेमी.उंच) कापला आहे त्याला फेव्हिकॉल लावून फुलाच्या खालील भागास चिकटवून घेणे. Ff पुष्पाधाराच्या खालून ते देठाच्याशेवटपर्यंत हिरवी टेप लावा.तयार पान फूलाला गुंडाळा गुलाब तयार. R या तयार फूलांची हवी तशी रचना करून सजावट वा गुच्छ तयार करता येइल. . लहान मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी चॉकलेट आणि फुलांचा गुच्छ! .
विशेष

वाचने 15461
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

खूप सुरेख/ मस्तच आहेत फुलं. रंगसंगतीही छान आणि ते मोराचं तबक तर खूपच मस्त. अप्रतिम कलाकृती.

मस्तं! छान सोप्पं आणि सुबक काम आहे.

तुझ्या लिहिण्याने सोपे वाटले तरी अशा गोष्टी सुबक सुन्दर करायला कल्पकता आणि कलात्मकता लागते.सुरेख सादरीकरण! मस्त.

In reply to by अजया

+१ मागे एकदा मी ड्च गुलाब करायला घेतले होते पण प्रत्यक्षात फुलुन फुलुन पाकळ्या पडायला आलेला गुलाब तयार झाला!! तेव्हा पासुन मी फक्त कागदाच्या होड्याच बनवते. सादरीकरणाला १०/१०. मोराच्या तबकाला, ११/१० :)

सुंदर !

मस्तच!! या साठी बोट अशी झरझर चालली पाहिजेत.

खुप छान आहेत ही फुले!! आईला ही फुले करताना पाहिले आहे.

सही … शेवटचा फोटो एकदम सुरेख.. बघताना खूप सोप्पं वाटतं पण मला जमतच नाही ....

किती सुंदर आहेत डच गुलाब खूप्प्प्प्प्प आवडले. तु करतेस पण छानच , सुंदर सादरीकरण :)

मला कधी जमणार :( हे ही पुढच्या जन्मासाठी राखीव !!!!!

देखणॅ झाले आहेत खरंच

आईग्ग! किती मस्त वाटतय बघायला! अशी भेट देण्याची कल्पना आवडली. मला वाटते हस्तकलेची आवड शाळेत असताना लागते, मग हे सुट्टीत करायचे छंद होऊन जातात. नंतर ही अशी आठवण येत राहते. मी ऑर्गंडीच्या कापडाचे गुलाब करायला शिकले होते. अगदी क्लासला जावून वगैरे. त्यावेळी अमूक दुकानात हे साहित्य मिळते ते आणा म्हणून सांगितले जाई. २२ नंबरची तार, क्रेप कागद वगैरे साहित्य बघून दिल गुलाब गुलाब हो गया! ती मोराच्या पिसार्‍यात ठेवलेली फुले आवडली.

गुलाब फार सुंदर आहेत! स्वाती

सुंदर! तू स्वतः कलाकार आहेसच शिवाय इतरांना कला शिकवण्याचही कसब तुझ्याकडे आहे, त्याबद्दल अभिनंदन!

केवळ फोटो पाहिले असते तर पहिल्या दोन फोटोजमधले गुलाब खरोखरचेच वाटले असते.

खूपच सुंदर! फोटोतली फुले खरीच वाटतायत!