संपादकीय

अजया's picture
अजया in विशेष
8 Mar 2015 - 1:31 am
महिला दिन

नमस्कार मिपाकरांनो!
अनाहिताची दोन वर्ष पूर्ण होत असताना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा अनाहिता विशेषांक तुमच्यासमोर आणताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. अनाहिता सुरू झाल्यापासूनच या बुरख्याआडच्या, सोवळ्यातल्या जगाची चेष्टा, तिथे सासू सुना, गॉसिप यापलीकडे काय होत असणार, अनाहितिक लेखन, मुख्य बोर्डावर वृत्तांत सोडून काही लिहीत नाहीत असं बरंच काही कानांआड करून आमचं अनाहिता चालू तर राहिलं आहे , वाढतं तर आहेच पण पूर्णपणे स्त्रियांनी तयार केलेला, आंतरजालावरील मराठी संस्थळावरचा पहिलावहिला महिला दिन विशेष अंकही सादर करत आहे ही गोष्ट निश्चित सुखावणारी आहे.
दिवाळी अंक प्रकाशित झाल्यानंतर इनि आणि माझ्या गप्पांमध्ये असा अंक काढावा, मग तो कसा असावा
याच्या चर्चा चालू झाल्या होत्या. त्याबद्दल इतर संपादिका आणि नीलकांत यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी सर्व
प्रकारच्या मदतीची तयारी दाखवून आमचा उत्साह वाढवला. मग सर्व अनाहितांशी धागा काढून चर्चा झाली की अंकात
काय वाचायला आवडेल, कसा हवा. आपल्या पहिल्यावहिल्या अंकासाठी काहीतरी लिहायचंच ठरवून सर्वजणी लिहित्या
झाल्या. त्याचं फलस्वरूप हा साहित्याने, चित्रांनी समृद्ध अंक!
काय आहे या अंकात? बऱ्याचशा लेखांत कवितांमध्ये चित्रांत तुम्हाला स्त्रीचे विविध भावनाविष्कार जाणवतील.
लेख स्वतंत्र तरीही कुठेतरी ओवणारा धागा समान असेल. या अंकात पुस्तक परीक्षणं आहेत, प्रवासवर्णनं
आहेत, ललित लेख,फँटसी, कविता तर आहेतच. पण कलाकौशल्य,,काही सुरेख रेखाटनं देखिल बघायला मिळतील.
स्त्रियांच्या संवेदनाशील दिवसांबद्दल माहिती ते खाद्यसंस्कृती, हलकेफुलके सरळ अनुभव ते बालमानसशास्त्र अशा
अनेकविध प्रकारांच्या मिसळीचा आस्वाद घेता येईल.
या अंकाची मध्यवर्ती कल्पना आहे, स्वयंसिध्दा. स्वकर्तृत्वावर घरादाराचा उद्धार करणाऱ्या
स्त्रियांबद्दल आपापले अनुभव सांगणारा हा अनाहितावरचा एक सुरेख धागा तुमच्यासमोर यानिमित्ताने खुला
करत आहोत. त्याचबरोबर इनिगोयने घेतलेली, स्वाती पांडे या स्वयंसिद्धेची मुलाखत या अंकाचं एक विशेष
आहे.
सर्व बंधनं ताण झुगारून मुक्त आनंदात भिजणार्या 'ती 'चं चित्र असणारं अंकाचं मुखपृष्ठ आनन्दिताने
स्वहस्ते तयार केलंय अाणि सर्वात शेवटी आहे अनाहिताच्या आत्तापर्यंत झालेल्या कट्ट्यांचा फोटोकोलाज!आता म्हणा
बघू कट्ट्यांना आभासी,मनाचे श्लोक वगैरे वगैरे!!
अंकाचं सर्व काम करताना इतक्या लोकांची मदत झाली आहे की आभार प्रदर्शन आपल्याच लोकांचं काय
करायचं हा नियम तोडून ऋणनिर्देश करणार आहे. सर्वप्रथम आभार असा अंक काढण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत
करण्याचे आश्वासन देऊन आमचा हुरूप वाढवणाऱ्या सर्व अनाहिता संपादिका, नीलकांत आणि कधीही हक्काने हाक
मारली की कामाला येणारे आपले कलाकार तंत्रज्ञ अभ्या आणि प्रशांत यांचे . धान्य निवडल्यासारखे
बारकाईने लेख वाचून शुद्धीकरण करणाऱ्या इनि,मितान आणि स्नेहांकिता, स्वयंसिध्दा धाग्याचे संपादन करणारी मधुरा
देशपांडे, या अंकाला अर्थपूर्ण मुखपृष्ठ देणारी आनन्दिता,फोटो कोलाजचे काम हक्काने मागुन करुन देणारी
सानिका,लेखा कवितांना अनुरूप रेखाटने देणारी पियुशा, तुमचे आभार मानले तर रागवाल माहिती आहे.आपल्या
अनाहिताचं काम म्हणून तुम्ही जे काय केलंय त्याची पोच समजा! आणि माझ्या डेडलाईनच्या
कटकटीला, तगाद्यांना न त्रासता , सर्वतोपरी मदतीला तत्पर असणाऱ्या, एका हाकेला ओ देऊन आपापली
कामं, मूलबाळ, संसार सांभाळून सुंदर लिखाण पाठवणाऱ्या माझ्या अनाहितांनो धन्यवाद शब्द अपुरा आहे.
गोड मानून घ्या!
मिपाकरहो, प्रत्येक लेख वाचा, प्रत्येकावर आवर्जून अभिप्राय द्याच! अंकात अजून काय असायला हवं याबद्दल
नक्की कळवा. तुमच्या सुचवण्यांचं स्वागत असेल.

कळावे, लोभ आहेच. तो वाढावा ही विनंती._

प्रतिक्रिया

पिशी अबोली's picture

8 Mar 2015 - 1:58 pm | पिशी अबोली

मुखपृष्ठ सुंदर आनंदिता!आणि अंक आणल्याबद्दल सगळ्या संपादिका,लेखिका, चित्रकर्त्या आणि तांत्रिक बाजू संभाळणाऱ्या सगळयांचे अभिनन्दन!
सगळ्या लेखांवरुन नुसतीच नजर टाकलिये. आता सगळा हळूहळू वाचून काढ़ते. खूप छान वाटतंय अंक बघून.:)

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 2:11 pm | सविता००१

आनंदिताने मुखपृष्ठ काय सुरेख केलंय..

आणि हो, या अंकासाठी काम केलेल्या आणि हा सुरेख अंक आणलेल्या सगळ्यांचेच त्रिवार अभिनंदन.

अनुप ढेरे's picture

8 Mar 2015 - 2:13 pm | अनुप ढेरे

सुंदर चित्र आहे! अंक वाचतो आहे...

आनंदिताने मुखपृष्ठ काय सुरेख केलंय..
+१११११११११११

आरोही's picture

8 Mar 2015 - 2:30 pm | आरोही

कसला सुंदर दिसतोय अंक !!आनंदिता ने केलेले मुखपृष्ठ कमालीचे सुंदर झाले आहे .सगळ्यांचे मनापासून आभिनंदन ...

सुचेता's picture

9 Mar 2015 - 7:20 pm | सुचेता

वाचायला घेतलाय

खटपट्या's picture

8 Mar 2015 - 2:50 pm | खटपट्या

वाचतोय !!

साती's picture

8 Mar 2015 - 2:59 pm | साती

मुखपृष्ठ सुंदर आहे.
संपादकीय मोजकंच पण समर्पक आहे.
अनाहितांचे आणि मिसळपावचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन.

एक एकटा एकटाच's picture

8 Mar 2015 - 3:11 pm | एक एकटा एकटाच

उत्तम जमलाय अंक
मुखपृष्ट जबरी.......

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 3:13 pm | मधुरा देशपांडे

मुखपृष्ठ अप्रतिम झाले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासुन ज्याची आतुरतेने वाट होती तो अंक बघताना होणारा आनंद अवर्णनीय आहे. संपादकीय देखील उत्तम.

धडपड्या's picture

8 Mar 2015 - 3:16 pm | धडपड्या

भारीच की!!!

मधुरा देशपांडे's picture

8 Mar 2015 - 3:21 pm | मधुरा देशपांडे

आणि हो, सर्व अनाहिता संपादिका, नीलकांत आणि तंत्रज्ञ मंडळी यांचे विशेष आभार.

अंतरा आनंद's picture

8 Mar 2015 - 3:22 pm | अंतरा आनंद

मुखपृष्ठ भारीय. एखादा लेख वाचला. नंतर शांतपणे वाचेन.

भिंगरी's picture

8 Mar 2015 - 3:30 pm | भिंगरी

मुखप्रुष्ठावरचे चित्र पाहूनच वाटले हा अंक 'आपला'आहे.
सर्वांचेच आभार आणि अभिनंदन.

स्वप्नांची राणी's picture

8 Mar 2015 - 3:37 pm | स्वप्नांची राणी

मुखपृष्ठापासूनच प्रेमात पडलेय..!! तिला चिकटवलेले सगळे रंग झुगारून देऊन मुक्त झालेली अनाहिता! 'हि' च्या वेलांटीत सगळी पृथ्वी लिलया तोलणारी अनाहिता पण अप्रतिम आहे.

आनंदिता...वेल डन ग, सखी!! अजया, अंकाचे सादरीकरण पण बोले तो झक्कास्स्स!!!

सुंदर मुखपृष्ठाला तितकंच अप्रतिम शीर्षक अभ्याने दिलंय.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2015 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा

दोन्हीला सलाम!
पण तरिही मुखपृष्ठ चित्र जास्त अवडल्या गेले आहे. :HAPPY:

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:48 pm | सविता००१

पिडिएफ अंक तर केवळ जबराट दिसतोय.
मस्तच.

आदूबाळ's picture

8 Mar 2015 - 4:05 pm | आदूबाळ

काय छान मुखपृष्ठ आहे!

विभावरी's picture

8 Mar 2015 - 4:36 pm | विभावरी

मुखपृष्ठ च इतके देखणे आहे . आणि अंक ही तसाच सुंदर आहे .

पलाश's picture

8 Mar 2015 - 4:37 pm | पलाश

सुरेख मुखपृष्ठ !!! अंक वाचते आहे.
अभिनंदन!!!!

इशा१२३'s picture

8 Mar 2015 - 5:10 pm | इशा१२३

अप्रतिम बोलके मुखपृष्ठ आनंदिता
संपादकिय अगदि अनाहितांच्या मनातल लिहिल्यासारख सुरेख.
अंकासाठी कष्ट घेणार्‍या व इतके छान सादरिकरणासाठी प्रत्येकाचे अभिनंदन!

बोका-ए-आझम's picture

8 Mar 2015 - 5:49 pm | बोका-ए-आझम

फारच छान!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2015 - 5:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

अंकाची कल्पना, मुखपृष्ठ, लेखांची निवड, रेखाटन या सर्वांसकट हा अंक सुरेख झालाय याची खात्री प्रथमदर्शनातच झाली आहे !

अभिनंदन !!

सवडीने एक एक लेख वाचला जाईलच. तेव्हा अधिक सांगण्यासारखे असेलच.

स्वाती२'s picture

8 Mar 2015 - 6:15 pm | स्वाती२

अतिशय देखणा अंक! अभिनंदन!

...तसेच 'अनाहिता महिला दिन विशेषांक २०१५' करिता अभिनंदन.

जुइ's picture

8 Mar 2015 - 6:46 pm | जुइ

अतिशय देखणा अंक!! अप्रतिम मुखपृष्ठ, मांडणी, चित्रे आणि त्याबरोबर ह्या अंकासाठी कष्ट घेणार्‍या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन!! आता वाचते निवांत.

मुखपृष्ठ मस्त झालेय. संपादकीय आवडले अजया!
महिला दिन विशेषांकासाठी मदत करणार्या सर्वांचे आभार.
सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलीये.

भाते's picture

8 Mar 2015 - 8:37 pm | भाते

पहिल्या 'अनाहिता महिला दिन विशेषांक २०१५' साठी समस्त अनाहितांचे अभिनंदन!
मुखपृष्ठ मस्तच आहे. सध्यातरी आपले संपादकीय आणि इनिगोय यांचे मनोगत वाचले. दोन्हीही अप्रतिम!
निवांत वाचनासाठी संपुर्ण पिडिएफ अंक घेतला आहे.
बाकी, सर्वां…चे आभार.

प्रियाजी's picture

8 Mar 2015 - 10:19 pm | प्रियाजी

मुखपृश्ठावरील अनाहिताइतके स्वातंत्र्य व आनंद सर्व अनाहितांना मिळो यासाठी मनापासून शुभेच्छा. आनंदिताचे चित्र मन अतिशय प्रसन्न कराणारे आहे. अन्क ही तितकाच आनंददायी असेल याची खात्री आहेच. कष्ट घेणार्‍या सर्वांचेच मनापासून अभिनंदन आणि आभार.

किलमाऊस्की's picture

8 Mar 2015 - 10:41 pm | किलमाऊस्की

छानच झालाय अंक. मेहनत दिसून येतेय. :-) सर्व अनाहितांचं अभिनंदन!

स्वाती राजेश's picture

8 Mar 2015 - 11:19 pm | स्वाती राजेश

अनाहीता चे मुखप्रुष्ठ खुपच बोलके आहे.... :)
सर्व अनाहीतांचे अभिनंदन...अन .. आभार...इतका माहीतीपुर्ण अंक वाचायला दिल्याबद्दल... :)
अजया...मस्त

अभिनंदन.
सर्वांनी खूप खूप मेहनत करून वेळ दिला आहे हे तर दिसतेच आहे.आपल्या मेहनतीचे खरोखर चीज झाले आहे.
आम्हाला घरात बसल्याबसल्या इतका सुंदर अंक वाचायला मिळणे हे एक भाग्याच आहे.

महिला दिनानिमित्त सर्व अनाहीतांना व सर्व भारतीय महिलांना शुभेच्छा.
`फोर्ब्स’च्या यादीत पाच भारतीय महिला

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 3:36 am | स्पंदना

मुखपृष्ठ अन त्यावरील चित्रामागचा विचार अतिशय सुंदर, सुदृढ!!अनेक रंगी नात्यांच्या पलिकडे जाऊन स्त्री म्हणुन मुक्त होणारी अनाहिता अतिशय आवडली. आनंदिता सुंदर!!
आणि आता अनाहिता हे नाव अतिशय समर्पकरित्या सादर करण्याबद्दल कलाकार "अभ्या..." चे हार्दिक अभिनंदन!!
संपादकिय अतिशय सुरेल!
सर्व अनाहितांचे अभिनंदन आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 5:06 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम सादरीकरण अन मनमोकळे संपादकीय.

मुखपृष्ठावरचे चित्र, शीर्षकाचे रेखाटन अन रंगसंगती हे सर्व खूप सुंदर दिसत आहेत. अजुन लेख वाचायला सुरुवात करायची आहे.

या अंकासाठी कष्ट घेणार्‍या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

या निमित्ताने काही सूचवावेसे वाटते.

  • हा अंक असो किंवा दिवाळी अंक असो यातील लेख होमपेजवरील अनुक्रमणिकेमध्ये येत नसल्याने बर्‍याच वाचकांचे त्यांच्याकडे लक्ष जात नाही. वाचनांच्या अन प्रतिसादांच्या संख्येवरून हे स्पष्टपणे जाणवते. हेही मिपावरीलच लेखन असल्याने अनुक्रमणिकेमध्ये उल्लेख आल्यास त्यापासून तोटा काहीच नाही.
  • तसेच प्रतिसादाविना लेखन हे बरे वाटत नाही. जुन्या काळी भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी फारशी पोचली नसल्याने पिडीएफ आवॄत्तीची गरज समजण्यासारखी होती. आता जर पिडीएफ ऐवजी हाच अंक वेगळ्या फुलस्क्रीन ब्राउझर विंडो मध्ये उघडला जावा अन तिथे पिडिएफ आवॄत्तीसारखी रचना व सादरीकरण असावे. तसेच प्रतिक्रिया देण्याची व वाचण्याची सुविधा उपलब्ध व्हावी .
नाखु's picture

9 Mar 2015 - 11:41 am | नाखु

पहीली सुचवणीला प्रचंड अनुमोदन
अंकाच्या सर्व मानकरींचे त्रिवार अभिनंदन !!

प्राची अश्विनी's picture

9 Mar 2015 - 7:30 am | प्राची अश्विनी

अतिशय देखणा आणि सुंदर अंक!

स्नेहल महेश's picture

9 Mar 2015 - 11:31 am | स्नेहल महेश

खूप छान वाटतंय अंक बघून..................मुखपृष्ठ अप्रतिम

अनन्न्या's picture

9 Mar 2015 - 11:31 am | अनन्न्या

सुंदर मुखपृष्ठ! सर्व सहभागी अनाहितांचे विशेष अभिनंदन!

यथोचित संपादकीय आणि त्याला साजेसे मुखपृष्ठ !
लेखांची आणि एकूण अंकाची गुणवत्ता उंच राखल्याबद्दल अजया आणि सर्व सहभागी लेखिकांचे अभिनंदन ! यानिमित्ताने अनेक अनाहिता सदस्यांना आम्ही लिहित्या करू शकलो हे या अंकाचे सर्वात मोठे यश.

पूर्वाविवेक's picture

9 Mar 2015 - 12:47 pm | पूर्वाविवेक

खूप मस्त, मुखपृष्ठ अप्रतिम ! संपादिका mam ना १०० पैकी १००. "अनाहिता" मध्ये उशिरा दाखल झाल्याची खंत वाटते.

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2015 - 1:21 pm | पिलीयन रायडर

अंक सुरेख झाला आहे.. शंकाच नाही!!

अंक पाहताना मलाही अनाहिताची सुरवात आठवली. गुद्दागुद्दी आठवली!!
अनाहिता हे एक वेगळंच जग आहे.. कुणाला वाटत असेल की "आत" फक्त कागाळ्या आणि भांडाभांडीच चालते की काय?!!
कट्ट्याचे धागे टाकले की लोकांना वाटतं की फारच गोगोड्ड बोलतात ह्या बायका..
पण आहेच आता मैत्र तसं तर काय करणार! मतभेद होतात, भांडणं कधी झालीच नाहीत अनाहिता वर!
अत्यंत गंभीर विषय्ही असतात आणि घरगुती गप्पाही होतात..
भारीच जागा आहे अनाहिता.. नो डाऊट!!!

आनंदिताचं विशेष कौतुक.. फारच छान झालं आहे चित्र!!
अभ्याचेही आभार.. मस्त वाटतेय "हि" च्या वेलांटी मधली अनाहिता!!

मुखपृष्ठ खुप सुंदर आहे.. आवडेश..
सगळ्यां अनाहितांचे अभिनंदन. :)

अंक सुंदर झालाय… सगळ्या सहभागी लेखिकांना एक शाबासकी :)

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 4:49 pm | सामान्य वाचक

अजया ने लिहिल्याप्रमाणे खूप वेग वेगळे विषय & त्यावरचे सुंदर लिखाण

बहारिन् चा खलिफा's picture

9 Mar 2015 - 6:33 pm | बहारिन् चा खलिफा

अतिशय देखण्या,विचारपूर्वक काढलेल्या,महिला दिनाचं औचित्य साधुन प्रकाशित केलेल्या या अनाहिता विशेषांकाबद्दल संपादक,मिपा मालक सर्वांचंच अभिनंदन.
संपादकीय आवडलं.प्रांजळ वाटलं.संपादिकाबाईंचं अनाहिता प्रेम अभिमान,विश्वास सगळं आलंय!!
अनाहितात इतक्या छान प्रकारे चर्चा होऊन अंकाची तयारी सुरु झाली याचे कौतुक वाटले.
अप्रतिम मुखपृष्ठ आणि शीर्षक.
अंकाच्या मांडणीकडे बघताच विचार करुन लेखांचा अनुक्रम लक्षात येतोय.रेखाटनंही लेखांचा आशय वाढवत आहेत.
व्यावसायिक दर्जाचा अंक झालाय हा.पिडिएफ आवृत्ती तर देखणी झालीये.
keep it up,Anahitas!!

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2015 - 8:51 pm | निवेदिता-ताई

देखणे मुखपृष्ठ व मुख्य अंक झकास.

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 9:43 pm | स्वाती दिनेश

अंक फारच देखणा झाला आहे.
स्वाती

अजो's picture

9 Mar 2015 - 11:53 pm | अजो

अंक सुरेख झाला आहे.

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2015 - 12:19 am | सानिकास्वप्निल

मुखपृष्ठ अतिशय सुरेख झालयं खूप आवडले, वेल डन आनंदिता :)
झकास झालाय अंक, अप्रतिम लेखांची गुंफण, सोबत छायाचित्रांची जोड सगळेच खूप सुंदर.
संपादकीय पण छान लिहिले आहे.
सगळ्या अनाहिता संपादिका, नीलकांत आणि तंत्रज्ञ मंडळी यांचे खास आभार.

स्रुजा's picture

10 Mar 2015 - 1:06 am | स्रुजा

अप्रतिम मुखपृष्ठ ! अतिशय देखणा झालाय अंक. सगळ्यांचेच लेख आणि छान झालेत. आमच्या मागे लागून वेळेत लेख घेण्याचं आणखी एक काम अजया ताईच्या गळ्यात पडलं होतं, तिने ते केलं बिचारीने न कंटाळता. त्याचंच फळ दिसतंय आज.

मुखपृष्ठ खरोखरच सुंदर आहे. दोन लेख वाचले, तेही छान आहेत. बाकी लेखही लवकरात लवकर वाचणार.

या अंकासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना धन्यवाद!

संपादकीय छान लिहिलं आहे, पण शुद्धलेखन आणि विरामचिन्हांच्या बऱ्याच चुका आहेत.

सखी's picture

10 Mar 2015 - 7:56 am | सखी

दणदणीत झालाय हो अनाहितेचा अंक! संपादकीयही सुरेख लिहीलं आहे त्याला साजेसे मूखपृष्ठ. किती वाचु आणि काय काय वाचु असं झालयं आता चवीने वाचते :)
सगळ्या सहभागी कलाकरांचे (लिहत्या आणि पडद्यामागच्या) आणि नीलकांत आणि तंत्रज्ञ मंडळीचे अनेक आभार.

उमा @ मिपा's picture

10 Mar 2015 - 10:41 am | उमा @ मिपा

माझ्या सर्व अनाहितांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अजयाताई, अतिशय समर्पक लिहिलंयस.
पीडीएफ अंक खूप गोडुला आहे.
नीलकांत आणि तंत्रज्ञ टीम, great job done! hats off for you!

ते सवळ्याबद्दल पार संपादकीय मध्ये येईल असं वाटलं नव्हतं हो!!

मुखपृष्ठ आवडलं. आताच आंघोळ हा लेख वाचला, बाकी वाचेन तसतसे प्रतिसाद देईन. स्तुत्य उपक्रम. अंकासाठी लेख-कथा लिहीणार्‍या आणि निर्मितीत भाग घेणार्‍या सर्वांचे अभिनंदन आणि आभार!!

एस's picture

10 Mar 2015 - 8:26 pm | एस

अत्यंत देखणा अंक. पीडीएफपण मस्त सजवलाय. आनन्दिता, पियुशा यांची चित्रे विशेषकरून आवडली.

अनाहिता/उरलेले मिसळपाव असा भेद न मानता प्रत्येक लेख वाचला जाईल.

सर्व लेखक, संपादक, नीलकांत आणि तांत्रिक टीम इत्यादी सर्वांचेच अभिनंदन आणि भरभरून पाठिंबा.

Maharani's picture

11 Mar 2015 - 12:45 pm | Maharani

खुपच देखणा अंक..सर्व अनाहिताचे अभिनंदन...

सुप्रिया's picture

11 Mar 2015 - 1:26 pm | सुप्रिया

सुरेख अंक !! संपादिका, लेखिका, चित्रकार सगळ्यांचे अभिनंदन

michmadhura's picture

11 Mar 2015 - 4:16 pm | michmadhura

खूप छान, देखणा साजिरा अंक झालाय अगदी. सगळ्यां अनाहितांचे अभिनंदन.

सुंदर मुखपृष्ठ आहे. अंक वाचून त्या त्या लेखांवर प्रतिक्रीया देईनच.
सर्व संबंधितांचे अभिनंदन!

मोनू's picture

13 Mar 2015 - 2:55 pm | मोनू

आनंदिता ,

अतिशय सुरेख मुखपॄष्ठ...अंक अजून वाचायचाय, पण तो छानच असणार यात शंकाच नाही.आत्ताच आलेय इथे, त्यामूळे आधी संपादकीय वाचलेय...अजया अगदी यथार्थ लिहिले आहेस अनाहितांबद्दल. ते वाचूनच अंक वाचायची उत्सुकता अजूनच वाढलीये...आता एक एक करून वाचते वेळ मिळेल तसे.

पैसा's picture

13 Mar 2015 - 9:46 pm | पैसा

पोचले एकदाची इकडे! मस्त वाटलं! मी नुसती कल्पना केली होती ती प्रत्यक्षात आलेली बघून फार मस्त वाटतंय!

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:02 pm | भिंगरी

सगळ्या अनाहितांचे अभिनम्दन

भिंगरी's picture

13 Mar 2015 - 10:02 pm | भिंगरी

अभिनंदन असे वाचावे.

त्रिवेणी's picture

14 Mar 2015 - 4:11 pm | त्रिवेणी

अजया ताई,सर्व लेखिका,निलकांत आणि तांत्रिक टीम इत्यादी सर्वांचेच अभिनंदन.

कौशिकी०२५'s picture

15 Mar 2015 - 1:38 pm | कौशिकी०२५

अंक सुरेख झाला आहे. देखणा व वाचनीय. सहभागी अनहितांचे हार्दिक अभिनंदन.
संपुर्ण अंक वाचल्यावर देत असल्याने प्रतिक्रिया द्यायला उशिर झालाय...

प्रचेतस's picture

15 Mar 2015 - 8:18 pm | प्रचेतस

सुरेख संपादकीय.
आनंदिता आणि अभ्या ह्यांनी मिळून केलेले मुखपृष्ठ आवडले.

मनुराणी's picture

15 Mar 2015 - 10:51 pm | मनुराणी

सुरेख झाला आहे अंक.सगळ्या अनाहितांचे अभिनंदन.

विशाखा पाटील's picture

16 Mar 2015 - 2:10 pm | विशाखा पाटील

अंक पूर्ण वाचून झाल्यावर प्रतिसाद द्यायचे ठरवले होते. खरोखरंच अंक खूपच माहितीपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि कलात्मक झाला आहे. याचं श्रेय संपादकांनाच! वेळोवेळी अंकाची आठवण करून देणारी साक्षेपी संपादक अजयाचे मनापासून आभार! तसेच इतर सदस्य आणि तंत्रज्ञांचेही आभार! मिपाकर नसलेल्या अनेक जणांना what's app वरून या अंकाची लिंक पाठवली होती आणि उत्तम अभिप्राय आलेत/येतायत.

वर श्रीरंग जोशी यांनी एक उत्तम सूचना केली आहे. त्या अनुषंगाने प्रश्न पडलाय, एवढ्या स्तुत्य उपक्रमावर इतरांचे फार प्रतिसाद न येण्यामागे तेवढेच एक कारण असावे का? अंकामुळे मिपाची ओळख झालेल्या दोनतीन जणांनी हाच प्रश्न विचारला. व्हर्जिनिया वूल्फवर लेख लिहितांना तिचे लेखन कालबाह्य झाले असेल का, अशी सारखी शंका येत होती. पण ती शंका चुकीची ठरली, याचं वाईट वाटतंय. असो. काही जण वाचून, प्रतिसाद देऊन अनेक अनाहितांचा उत्साह वाढवतायत, हेही नसे थोडके!

स्नेहानिकेत's picture

16 Mar 2015 - 8:15 pm | स्नेहानिकेत

अतिशय छान झाला आहे अंक. सुरेख संपादकीय आणि त्याला शोभणारे मुखपृष्ठ. सर्व सहभागी अनहिता आणि तांत्रिक टीम चे अभिनंदन!!!!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Mar 2015 - 10:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उपक्रमाला अनेक शुभेच्छा!!!

मुखपृष्ठ मस्तं जमलयं.

जेपी's picture

17 Mar 2015 - 9:42 am | जेपी

छान अंक..
हे दोन शब्द बोलुन मी माझे भाषण संपवतो.

सस्नेह's picture

17 Mar 2015 - 10:40 am | सस्नेह

अभ्भी पूरा अंक बाकी है...!

असो उत्तर लवकरच दिले जाईल.

आनन्दिता's picture

18 Mar 2015 - 9:19 pm | आनन्दिता

चित्र आवडल्याचं आवर्जून सांगणाऱ्या प्रत्येकाचे अगदी मनापासून आभार. इट मिन्स अ लॉट. अजया ताई ने जेव्हा मुखपृष्ठा साठी चित्र काढणार का असं विचारलं, तेव्हा थोडं भारी वाटलं पण दुसऱ्याच क्षणाला खूप मोठ्ठं दडपण पण आलं. कारण मी चित्रकला सोडून आत्ता ५-६ वर्ष होऊन गेलीत. या वर्षात नाही म्हणायला थोडी परत सुरुवात केलीय पण त्यात सातत्य अजिबात नव्हत, आणि सफाईदारपणा तर त्याहून ही नाही. मी चांगलंस चित्र काढायचा प्रयत्न करायचं प्रॉमिस तर केलं पण ते मी करू शकेन की नाही याबाबत मीच साशंक होते.
काही चित्र अंकात टाकण्या इतपत ठीकाये पण डायरेक मुपृ वर ते चित्र जाणार म्हणजे जरा जास्तच ;) असं माझं मत. पण तीने हिंमत सोडली नाही, :) मी हे करू शकेनच हे तिने मला प्रत्येकवेळी पटवलं.

चित्र काढायला घेतलं खरं पण नक्की काढु काय हे काही केल्या सुचेना. स्त्री-विषयक काही म्हटलं की हात उंचावून उडी मारणारी एक मुलगी असा काहीस स्टेरीओटाइपिकच असतं. त्यामुळे तसं काही मी काढणार नव्हते. मग विचार करता करता या चित्राची रूपरेषा मनात हळूहळू तयार झाली. बंधनं, ताणतणाव च नाही तर आयुष्यातल्या सगळ्याच उजळ, गडद रंगांची छत्री काही क्षण दूर करून एक 'व्यक्ती' म्हणुन उभी राहणारी, चेहऱ्यावरून आनंद ओसंडणारी, आणि स्वत:च्या कंपनी मध्ये खुष असणारी स्त्री !

चित्र पुर्ण केलं खरं पण ते नुसतं कागदावर असून उपयोगाचं नव्हतं. मी या आधी चित्रं डिजिटली स्टोअर केली नव्हती. नुसता फोटो काढुन किंवा scan करून भागणार नव्हतं, त्याचं processing ही करावं लागणार होतं. आळसामुळे मला ते शिकायला जमलं नव्हतं. मग स्पा ला साकडे घातले. त्याने सांगायची तयारी दाखवली, पण माझी त्यातली एकंदरीतच प्रगती पाहून त्याने स्वत:च या चित्राचे processing करून दिले. :) कशाबशा तयार झालेल्या चित्राला मुखपृष्ठावर सुंदररित्या विराजमान करायचे काम अभ्याने केले.
माझ्या चित्राला जे कौतुक मिळतंय ते अजयाताई, स्पा, आणि अभ्या.. यांच्या हाताभाराशिवाय झालं नसतं. त्यामुळे यांचे मनापासून आभार !!

चित्र पूर्ण व्हायच्या आधीच खरंतर हे सरप्राईझ ठेवायचं हे अजयाताई ने कबुल करून घेतलं त्यामुळे अनाहिता अंक निघणार हे सर्व अनाहितांना माहित असलं तरी मुप्रु बद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. तर सर्व अनाहीतानो ' हे चित्र तुम्हाला प्रत्येकीला समर्पित ' !!! :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Mar 2015 - 9:22 pm | श्रीरंग_जोशी

आवडलेल्या चित्राची जन्मकहाणीही तेवढीच आवडली.

आपण काढलेल्या चित्रांचा धागा कलादालनात प्रकाशित करावा ही विनंती.

जुइ's picture

18 Mar 2015 - 9:28 pm | जुइ

:-)

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:41 pm | कविता१९७८

masta anka, mukhya prushtha hi sunderach

अनिता ठाकूर's picture

20 Mar 2015 - 12:39 pm | अनिता ठाकूर

संपूर्ण अंक चांगला जमला आहे. सर्व संबंधितांचे मनापासून कौतुक!!

प्रश्नलंका's picture

26 Mar 2015 - 12:39 pm | प्रश्नलंका

मुखपृष्ठ च इतके देखणे आहे . आणि अंक ही तसाच सुंदर आहे. सगळ्या अनाहिता संपादिका, नीलकांत आणि तंत्रज्ञ मंडळी यांचे खास आभार. :)

खुप दिवसानी माझा फोन नीट वागायला लागला, आणी सगळ्यात आधी मिपा चालु केलं. किती दिवस वाट बघत होते. पण आता आधी सगळा अंक पुर्‍ण वाचुन काढनार.

अंकाचे मुखपृष्ठ आता दिसत नाहीये, तसेच पीडीएफ आवृत्तीचा दुवाही नाहीये. कृपया दोन्ही उपलब्ध करून द्यावे ही विनंती.