Skip to main content

उपांत्य फेरीचे दावेदार....

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/06/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्‍या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्‍याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि... ..... आणि???? आणि काय घडणार पुढे?? जिथे एक गोल लाखो लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणू शकतो आणि लाखोंना निराशेच्या गर्तेत लोटतो.... तिथे फुटबॉल जगतातलं सर्वांत मोठं पारितोषिक "फुटबॉलचा विश्वचषक" मिळवण्यासाठी आता १० (आणि काही तासांतच शेवटचे ८) संघ झुंजतील. उरुग्वे वि. घाना, जर्मनी वि. आर्जेंटीना आणि नेदरलँड्स वि. ब्राझील अश्या लढती अगोदरच मुक्रर झाल्या आहेत. आज स्पेन, पॅराग्वे किंवा जपान पोर्तुगाल ह्यांपैकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोचतील. उपांत्य फेरी नंतर संघाच्या बळापेक्षा त्यांचा त्या दिवशीचा खेळच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि अश्या दमदार संघांमधून अंतिम फेरीसाठी "आकडा" लावताना ब्रह्मदेव सुद्धा आपल्या चारही डोक्यांनी विचार करेल. तेव्हा आपण सध्या तरी उपांत्य फेरीचा विचार करू. कोण पोहोचेल उपांत्य फेरीत? तुमचे उपांत्य चार फेरीतले संघ कोणते? उरुग्वे की घाना? ब्राझील की नेदरलँड्स? जर्मनी की आर्जेंटीना? पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / जपान? येऊद्या तुमचे अंदाज ! बघुया कोण "गोल" मारतंय !!! जे पी
विशेष

वाचने 24917
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by Nile

जाऊ द्या राव... बाई हाय ती! काय यवढं मनावर घ्येताय? ;)

In reply to by धमाल मुलगा

इथे एक वाईट कमेंट सुचली होती, पण नको! धम्या, तुला नाही ना काही कळत फुटबॉलमधलं.... तर मग गप्राऽऽऽव! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धम्याला फुटबॉलमधलं चांगलंच कळतं बायको चांगला फुटबॉल करत असते त्याचा :D कधी कधी अंदाज चुकतात त्याचे म्हणूनच त्याला हॉलंडच्या ऐवजी ब्राझील चे स्वप्न पडते चुकुन ;) बाकीच्या ३ टीमा बरोब्बर आहेत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॉलंड पोर्तुगाल जर्मनी .... अदिती == च्यामारी बिस्किट!! ही कोणती नवी टीम बे!!! -Nile

उरुग्वे ब्राझील जर्मनी स्पेन पहिले ३ नक्की. स्पेन हे खरं म्हणजे उगीचंच वाटतंय - कागदी वाघ लेकाचे... आत्ताही उडाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

फिजी ग्वाटेमाला तैवान श्रीलंका काय सारखीसारखी तीच्तीच नावं लिहायची राव..

In reply to by भडकमकर मास्तर

काय सारखीसारखी तीच्तीच नावं लिहायची राव.. सहमत आहे. भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ आंबोळी

In reply to by आंबोळी

जरा कब्बडी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यांसारखा वाटतय!!

माझे अंदाज उरुग्वे की घाना? - उरुग्वे ब्राझील की नेदरलँड्स? - नेदरलँड्स जर्मनी की आर्जेंटीना? - अर्जेंटीना पोर्तुगल / स्पेन की पॅराग्वे / - स्पेन फायनल नेदरलँड्स व अर्जेंटीनात झाली तर खूप धमाल येईल... लिहून ठेवा... अर्जेंटीना विश्वकप मारणार यावेळी :) मग मॅराडोनावर ताशेरे ओढण्यासाठी पेलेला पेल्यात बुडवुन घ्यावे लागेल हे मी स्वप्न समजू की तंतोतंत जुळणारा अंदाज???? मलाच कळत नाही जाऊ देत ;)

In reply to by Nile

काय बोलू?.. हसू येतंय ब्राझीलची पुंगी वाजवणार्‍यांचं =)) =)) =))

In reply to by सागर

तशीही नेदरलँड्सवाल्यांनी ब्राझीलची पुंगीच वाजवली की!! ;) ;) - रंगोजी

माझे प्रतिसाद डीलीट करा रे. *#&(@)@&(#)@*@)(&#)(@)@*@&#@(@@) -Nile

ब्रिटिं साहेब, ब्राझीलने शेण खाल्ल.. घोडा बुजला.. पण बाकी घोडे आले शर्यतीत.. जर्मनी सरळ सरळ समोरच्याला लोळवून विश्वचषकातला थरार कमी करतेय असं वाटतय.. (जसा ऑस्ट्रेलियाने २ वर्ल्ड कप केलं) उपास मार आणि उपासमार