केसरिया बालमा
केसरिया बालमा
हळूच खुणवे
लिहिता लिहिता
कोपर्यातला
हिरवा ठिपका
दोन दिशांना
दोघे आपण
नव्हती ओळख
नव्हते नाते
ऑर्कुटवरुनी
संवादाचे
इथेच रुजले
हिरवे पाते
व्हर्च्युअल जरी
भांडण अपुले
किती अबोले
लटके रुसवे
पण
केसरिया तो
हिरवा होता
अंतर सारे
क्षणात मिटवे
रंग बदलला
जगण्याचा मग,
फूलपाखरू
झालो आपण,
नवीन क्षितिजे
नवीन नाती
नवरंगातच
न्हालो आपण
.....
.....
.....
अजूनही सय
दाटून येता
लॅपटॉप मी
उघडून बसतो
केशर हिरवे
होण्याची मी
पुन्हा नव्याने
वाट पहातो
वाचने
9789
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
काळानुसार बदलेला केसरिया
वा!
वा! सुरेख आहे कविता न चित्रही
नाही कळली बुवा.
In reply to नाही कळली बुवा. by प्राची अश्विनी
काय ग!
In reply to काय ग! by पैसा
ओह, कळलं.:)
क्या बात है! एकदम नव्या
वा! सुंदर कविता.
मस्त आहे नव्या युगाची नवी
आवडली
वाह