बाप्पाचा नैवेद्य - स्टफ्फ्ड पिस्ता मोदक
बाप्पाचा नैवेद्यः स्टफ्ड पिस्ता मोदक
साहित्यः
२०० ग्राम खवा किसून
१/२ वाटी + थोडीच जास्तं पिठीसाखर
पिस्त्यांची पूड आवडीप्रमाणे प्रमाण घ्यावे
१ चमचा वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी
पाकृ:
नॉन-स्टिक कढईत खवा मंद आचेवर परतायला घ्या.
हळू-हळू खवा मऊ होऊ लागेल.
त्यात आता पिठीसाखर मिसळा. पिठीसाखरेमुळे मिश्रण आधी पातळ होईल. (तुम्हाला हवे असल्यास या पायरीला यात केशरमिश्रीत दूध घालावे)
सतत परतत राहावे, हळू-हळू खव्याचे मिश्रण गोळा होऊ लागेल तसा गॅस बंद करावा.
मिश्रण एका ताटात काढून जरा थंड होऊ द्यावे.
हाताला सोसवेल इतके थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड मिक्स करावी.
खव्याच्या मिश्रणातला १/४ भाग वेगळा काढून त्यात पिस्तापूड मिक्स करावी व त्याचे लहान-लहान गोळे करावे.
आता पेढे-मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यात साध्या खव्याचा छोटा गोळा घ्यावा व त्यात पिस्त्याचा गोळा ठेवून मोदकाचा आकार ध्यावा.
तयार मोदकावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :)

वाचने
11435
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मस्त आहेत मोदक.
बाकी रेसिपीच्या नावावरून ती तुमची आहे का सानिकास्वप्निल ह्यांची हे कळले नाही.
अप्रतिम देखणी रेसिपी.बाप्पा असेल तिथून धावत येईल हे मोदक खायला!
सानिका,तुझ्या पाककौशल्याला भुलून बाप्पा म्हणेल,मी जातच नाही यावर्षी.
साने कुणालाही हेवा वाटावा अशी तु सुगरण आहेस , इतके असुनही स्वत:च्या कौशल्याचा कुठेही गाजावाजा नाही. अशी सुगरण आमची मैत्रिण आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
अतिशय चविष्ट नैवेद्य , बाप्पालाही पाहातच राहावेसे वाटले असेल या नैवेद्याकडे.
In reply to साने कुणालाही हेवा वाटावा अशी by कविता१९७८
अशी सुगरण आमची मैत्रिण आहे याचा आम्हाला अभिमान आहे.>>>>खरच सानिका सलाम तुला.
सुरेख दिसत आहेत मोदक.
हा मोदकाचा साचा इकडेच घेतलास कागं? यात चिकटत नसेल ना?
अग काय कहर आहेस तु , लोवे यु झक्कास दिसताये मोदक :)
बादवे, वर्ख कुठून मिळवलास?
पुण्यात कुठे मिळेल वर्ख?
किती सुंदर ,सुबक आणि सोपी पाककृती..
क्लास!!!
मोदक फार म्हणजे फारच भारी झाले आहेत. बाप्पा घरी जाताना घेऊन जाणार हे तिकडे कैलासावर वाटायला, :)
स्वाती
खुप सुंदर मोदक सानि. फोटो भारी आले आहेत एकदम.
णॉक औट पञ्च आहे ही पाकृ!
"अखिल मिपारतीय मिपाकरीण लाळ गाळु " योजने अंतर्गत बनवलेल्या रेसीपी मुळे लाळग्रंथी सुकायला आल्यात.
सुरेख दिसतायत मोदक!
मस्त मोदक!छानच दिसताहेत.
सुंदर दिसत आहेत मोदक!
मस्तच गं , अगदी तोपसू आहेत
असा लडिवाळ नैवेद्य मिळाल्यावर बाप्पा प्रसन्न होणार यात वादच नाही !
ह्यात तिळमात्र शंका नाहिच. अतिशय तोंपासू. पण एखाद दोन मोदक मधोमध उभे कापून हलके उघडे (हे नक्कि कसं म्हणू समजत नाहिये) ठेवले असते तर फोटो अधिक आकर्षक झाला असता.....अर्थात हे आपलं माझं मत.
In reply to मोदक अप्रतिम आणि देखणे झालेत by दिपक.कुवेत
माझ्या मनात देखील असाच विचार आला
मस्त आहेत मोदक.