बाप्पाचा नैवेद्य - कालाजाम
बाप्पाचा नैवेद्यः कालाजाम
साहित्यः
२०० ग्राम खवा किसून घेणे
१ वाटी पनीर किसून घेणे
५ टेस्पून मैदा
दीड टेस्पून दूध
२ वाट्या साखर
दीड वाट्या पाणी
वेलचीपूड व वेलचीदाणे
१/४ टीस्पून लिंबाचा रस
पिस्ते
चांदीचा वर्ख
पाकृ:
एका बाऊलमध्ये पनीर चांगले मऊसूत मळून घ्या.
किसलेला खवा ही चांगला मळून घ्या.
आता मळलेले पनीर, खवा, मैदा, दूध व १/२ चमचा साखर एकत्र करून मळून घेणे.
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.
प्रत्येक गोळ्यात एक पिस्ता व वेलचीदाणे भरून गोल वळून घ्या.
गोळे हलक्या हाताने वळा, एकही भेग / चीर पडता कामा नये.
कढईत तूप गरम करायला ठेवावे.
एकीकडे पॅनमध्ये साखर + पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावा.
साखर पूर्णपणे विरघळली की त्यात १/४ चमचा लिंबाचा रस घालून घेणे.
तूप गरम झाले की तयार गोळे त्यात सोडा. गोळे हळू-हळू वर आले म्हणजे तूपाचे तापमान योग्य आहे असे समजावे.
झारा गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व्ह गोळे समान तळले जातील.
कालाजाम करायचे आहेत म्हणून थोडे जास्त तळावे लागतात.
एकतारी पाक तयार झाली की त्यात वेलचीपूड घालून एकत्र करावे.
तळलेले जाम आता कोमट पाकात घालून मुरू द्यावे.
कालाजाम मुरायला साधारण ५-६ तास लागतात.
तयार कालाजामावर चांदीचा वर्ख लावून सजवावे.
कालाजाम तयार आहेत, बाप्पाला प्रसाद दाखवून सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा :)

वाचने
24103
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
बर्याच दिवसांनी सानिका स्पेशल देखणी रेसिपी!
वाह खुपच मस्त दिसतायत
ज्जे बात!
चांगले झालेत.गिलाबजामपेक्षा कालाजाम बरा वाटतो.
वा, मस्तच!
वा! सानिका.
सुरेख,मनमोहक पाककृती.
खूप दिवसांनी पाकृ विभाग सजलाय,आम्ही पाकृ देऊन चालू ठेवलाय पण हे परफेक्शन नाही जमत!
In reply to सुंदर ! नेत्रसुखद पाकृ by अनन्न्या
काहीही गं, तुझ्या पाकृ अप्रतिम असतात, नाविन्यपूर्ण असतात :)
बाप्पा भी खायेगा, बाप्पा का भक्त भी खायेगा!
वा कालाजाम!साजेशी पाककृती नेहेमीप्रमाणे!
वा कालाजाम!साजेशी पाककृती नेहेमीप्रमाणे!
मस्त ..
सुरेखच!
सुंदर सादरीकरण आणि खूप चॅन पाककृती...
करून पाहू आम्ही पण पनीर च्या ऐवजी काही दुसरं वापरता येईल का? पनीरला निषेध आहे आमच्या घरी.
साक्षात बाप्पांच्या तोंडाला पाणी सुटले तिथे आमची काय कथा ?
एक नंबर..... तोंडाला पाणी सुटले
लाजवाब सानिका.
तुझे फोटो आणि प्रेझेंटेशन पाहून पदार्थ करून पहावासा वाटतो.
व्वा ! मस्तं !
अजून पर्यंत कधी करून पाहिला नाही. आता करून पाहेन. नक्कीच.
आहा!!!! अप्रतिम दिसताहेत कालाजाम. सूपर यमी!!!
लाजबाब !
ती मोत्याची बांगडी किती सुरेख आहे !!!!!
In reply to अय्या..... by इरसाल
इश्श.काहिही ह.
सानि अप्रतिम दिसतायत कालाजाम. खुप आवडले. नक्की करुन बघणार.
सुरेख दिसत आहेत कालाजाम! शेफिल्डचा राजा खुष! :)
(ए फ्रा तही करता येतील ग, गुलाबजाम प्रमाणे.)
स्वाती
भारीच!!
ग्रेट दिसतायत कालाजाम!
मस्तच !!!
सुंदर सादरीकरण..!!
सुंदर दिसताहेत कालाजाम...
सुरेख, आणि अप्रतीम
सानिकास्वप्निल ह्यांची पाककृती आहे म्हणजे दुसरा काही विचार करायचाच नाही. नेहमीप्रमाणे मस्त ...
वा! अतिशय सुंदर दिसत आहेत!
अतिशय सुंदर सादरीकरण
धन्यवाद मिपाकरांनो ___/\___
मिपावर जवळ जवळ वर्षाने पाकृ देतेय. बाप्पाच्या नैवेद्याने पुन्हा पाकृ विभागात आले, सध्या वेळेअभावी इथे येणे होत नाही, यायची इच्छा खूप असते पण आमच्या "टि्वन्सनी" फुल्ल बिझी ठेवले आहे :)
आता येत राहीन, जमेल तसे पाकृही देणार आहेच. पुन्हा एकदा सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.
मस्त
फोटो अप्रतिम !!!
स्वप्नील ने केले का कालाजाम सानिका ? छानच झालेत, फोटोज पण मस्तच !
खल्लास!
सुंदर सादरीकरण आणि करण्याची नजाकत पण भारी. साधे गोळे तयार केलेत ते पण किती सुबक, एकसारखे दिसत आहेत. ते तळण्याचे फोटो आले समोर वाचताना तेव्हा मला वाटल अचानक आकाशातले फटाक्यांचे फोटो कुठुन आले मधेच या पाक्रु मधे. मग थोड अजून खाली आले तेव्हा कळ्ळल की ते का.जा. तळायचे फोटो आहेत.:)
सानिका मस्त दिसतायेत कालाजाम. पण मी फक्त बघून छान म्हणणार कारण मी इतकी सुगरण नै.
फारच छान
मस्त..
मस्त रेसिपी ग सानू. देखणी एकदम
मस्त.