Skip to main content

तुम्हाला सुशिचा कोणता मानसपुत्र सर्वात जास्त आवडतो?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 12/07/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2259
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हा ऑप्शन पन पाहिजे :)

सगळेच हा ऑप्शन पाहिजेच. तरी त्यातल्या त्यात सर्वाधिक आवडणारा म्हणजे बॅ. अमर विश्वास.

या निमित्ताने आमचे परम आदरणिय मित्र रा.रा. श्री श्री परीकथेतील राजकुमार रावजी साहेबजी महाराज यांचे चरणी जाहीरपणे नम्रतेची विणंती त्यांनी त्यांच्या भन्नाट चे पुढील भाग लवकरात लवकर प्रसिध्द करावे व आम्हा सर्व पामरांना उपकॄत करावे. या मालिकेतिल शेवटचा भाग त्यांनी दी. 27/01/2011 रोजी प्रसिध्द केला होता. मालिका पुर्ण झाली की त्यांचा लकडीपुलावर सुप्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल. (आता धावत सगळे भाग येतात की नाही ते बघाच) वरील सगळे मानसपुत्र आपल्याला या मालिकेत एकत्र भेटणार होते असे आम्हाला अधि़कॄत रीत्या कळले होते

In reply to by श्रावण मोडक

श्रा मो काका, प.रा. ने मालिका पुर्ण केली नाही तर तुम्ही लेखणी हातात घ्या. तुम्ही जर मालिका पुर्ण केलीत तर तुमचा पण सत्कार करु लकडी पुलावर. आम्हाला वाचायला मिळाले की आम्ही त्यातच खुश.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या मालिकेतिल शेवटचा भाग त्यांनी दी. 27/01/2011 रोजी प्रसिध्द केला होता. एवढी मजा येत होती. मस्त मालिका उगीच थांबवून धरली आहे परांनी.

In reply to by गवि

सहमत! परा ssss परा ssss वाचतो आहेस का रे हे? लेका मनावर घे आणि लिहून टाक रे पुढचे भाग. चियर्स :beer: - (सुशिप्रेमी) सोकजी

हे सुशि कोण ?

In reply to by मराठी_माणूस

हे सुशि कोण? देवा, हाच दिवस बघण्यासाठी ठेवले होतेस का रे मला ह्या भूतलावर? अरे मराठी माणसा, आयडी चेंज कर. 'मराठी माणूस' हा आयडी धारण करतोस आणि असला तद्दन हुकलेला प्रश्न विचारतोस? मला कोणीतरी एक लार्ज भरा रे. - (चिडलेला मराठी) सोकाजी

In reply to by सोत्रि

उत्तर अजुन गुलदस्त्यातच

In reply to by सोत्रि

त्या धाग्यातील कथा आवाडली , उत्सुकता वाढवणारी आहे

In reply to by सोत्रि

शिवाजी महाराज, संत चोखा मेळा, थोरले माधवराव पेशवे आणि राम गणेश गडकरी या प्रभृतींनाही 'सुशि' म्हणजे कोण, हे ठाऊक नसण्याची शक्यता दाट वाटते. (फार कशाला, मलाही ठाऊक नाही.) (माझे एक वेळ सोडा, पण निदान) ही मंडळी (तरी) (वानगीदाखल) 'मराठी माणूस' या नामाभिधानास पात्र नाहीत, असा आपला दावा आहे काय? (त्या परिस्थितीत, 'मराठी माणूस' नसूनही ही मंडळी महाराष्ट्रात राहत होती, आणि (अनुक्रमे) राज्यकारभार, संतगिरी आणि अभंगलेखन, (पुन्हा) राज्यकारभार आणि काही फुटकळ नाट्यलेखन आणि विनोदी लेखन या क्षेत्रांत त्यांनी (प्रत्येकी) किमान एका तरी होतकरू 'मराठी माणसा'ची रोजगाराची संधी हडपली, असे खेदाने म्हणावेसे वाटते. 'मराठी माणसा'चा कैवार घेण्याचा दावा करणार्‍या संघटना याकडे लक्ष देतील काय?)

In reply to by पंगा

शिवाजी महाराज, संत चोखा मेळा, थोरले माधवराव पेशवे आणि राम गणेश गडकरी ह्यांचा काळात जर कदाचित सुशि असता तर ह्या प्रभृतींनाही 'सुशि' म्हणजे कोण हे ठाऊक असते. असो, तरीही आपल्या भावनांना ठेच पोहोचली असल्यास (सुशि माहित नसल्यामुळे) सुशिचा आत्माही हळहळला असेल. (कदाचित, कारण फारच कनवाळू होता तो ;) ) चियर्स :beer: - (सुशिप्रेमी) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुशि नाव माहीत आहे. पण त्यांचं लेखन अजिबात आवडत नाही. त्यामुळे "माहीत नाही" हा पर्याय पण हवा होता. असो... अवांतरः ...भावनांना ठेच पोहोचली हे असलं हिंदाळलेलं मराठी वाचून आत्मा हळहळला... :(

सगळेच मानसपुत्र आवडतात पण त्यातल्या त्यात असामान्य बुध्दीमत्ता लाभलेला बॅ. अमर विश्वास जास्त आवडतो.

"चार तारखांत संपवतो मी हि केस. सगळे पुरावे हजर आहेत, ब्रम्हदेव जरी खाली आला तरी आरोपी सुटणे शक्यच नाहीत !" "मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे." कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले. (क्रमशः) श्री परीकथेतील राजकुमार याचे शेवटचे श्ब्ध...........आह्मी वाट पाह्तोय बॅरिस्टर अमर विश्वास कधि येतोय ?

In reply to by दाद

श्री परीकथेतील राजकुमार याचे शेवटचे श्ब्ध...........आह्मी वाट पाह्तोय बॅरिस्टर अमर विश्वास कधि येतोय ?
मालक पुढचा भाग टाकलाय की हो :)

सगळेच आवडतात की राव... दाराची धडक, मंदारची गँग, फिरोझचा बैदुल आणि अमरची अक्कल-शक्कल.. पण त्यातल्या त्यात आपल्याला फिरोझ आणि अमर फेव्हरेट हैत...