Skip to main content

भुतं- खेतं... अस्तित्वात आहेत की नाहीत व असल्यास कुठे?

लेखक स्पा यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2345
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

भुतं- खेतं... अस्तित्वात आहेत की नाहीत
आहेत..
असल्यास कुठे?
मिपावर..! :) मिपावरील भुतांचे प्रकार - १) वाचनमात्र भुतं.. २) वादविवाद एक्सपर्ट भुतं.. ३) बद्धकोष्ट झालेली जळकुटी भुतं.. ४) संपादकीय भुतं.. :) ५) मिपावर जेव्हा सामसूम असते तेव्हा 'मी मालक..', मी मालक..' असं म्हणणारं तात्याचं भूत.. :) ६) दुसर्‍याच्या आनंदावर विरजण घालणारं भूत.. :) ७) अवयवांचा अवास्तव वापर करणारं नानाचं भूत.. :) इत्यादी.. :) तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

In reply to by विसोबा खेचर

तात्या एकदम बरोबर.. बाकी चर्चा मुळ विषयापासून एखादे भुत भरकटते तशीच भरकटलेली आहे. यामुळे मि.पा.वर भुते आहेत हे पटले.

रोज मिपावरचे भन्नाट कौल्,चविष्ट चर्चा,काथ्याकूट वाचूनही आपण भुते आहेत की नाहीत हा प्रश्न विचारताय? (कौलात प्रतिसाद उलट्या क्रमाने येतात हे वेबसर्वरमध्ये भूत शिरल्याचे लक्षण आहे का?)

आम्ही असुरप्रजाती आणि भुते हे एकमेकांचे रा.को. असल्याने तुम्ही त्यांच्याबद्दल अशी चव्हाट्यावर चालवलेली चर्चा आम्ही खपवून घेणार नाही! :-) अधिक आमचे राजाधिराज महाराज दशाननसाहेब सुद्धा इथेच हजर असल्याने तुम्ही जरा जपून र्‍हावा असा एक मौलिक सल्ला देतो. याउपर जर काय चर्चाबिर्चा झाला ना, तर लंकेची सिंहलद्वार रेजिमेंट सोडीन तुमच्यावर, लै झंट्याक सैनिक आहेत, त्यांनी गेल्या वेळी इंद्रालासुद्धा शोधून काढला होता! त्यांच्यापासून सावध! नायतर आमच्याकडे एक उसाच्या शेतातलं खंग्री भूत आहे, जे तळपायाला गुदगुल्या करून २१ मिनिटात व्हिक्टीमला झोपवून टाकतंय, कायमचं! :D आणि अगदीच गेलाबाजार आंतरजालीय भुतं आहेतच! :D का उगा भुतांच्या नादी लागताय! र्‍हाऊंद्याना! --असुर (क्याप्टन, सिंहलद्वार रेजिमेंट) डिसक्लेमर: वरील मजकूर हलकेच घेणे! आणि हे सर्व वाचून डिप्रेस न होणे, ही विनंती!

In reply to by असुर

इंद्रालासुद्धा शोधून काढला होता! त्यांच्यापासून सावध!
खरंय! त्या भटिंडावाल्या इंद्रापासूनतर सावधच सावध. कधी जीगाबायटी खरड नाहीतर प्रतिसाद मानगुटीवर पडतील सांगता नाही येत.

In reply to by स्पा

जाउ द्या हो, ते २१ मिनिट गुदगुल्यांचं कळलं ना, तेव्हढं पुरेसं आहे. :-) बाकी तुमच्या शंकेचं उत्तर कुठेतरी दिलंच आहे मी, पुन्हा टंकत नाही! -असुर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आवो, तो इंद्र वायला वो. आमी येका रड्या इंद्राची बात केली! आम्ही (म्हन्जे दशाननसायेबांनी) स्वर्गावर स्वारी केली तर फाफलली ना त्याची! लढायचं सोडून पळून गेलं त्ये ब्येनं पाताळात! आमच्या रेजिमेंटने त्याला तिथूनपन शोधला आनि टाकला कैदेत. हाकानाका! तुम्ही म्हणताय तो इंद्र एक चांगला सज्जन मनुष्य आहे असं ऐकण्यात आलंय! --असुर

In reply to by असुर

तुम्ही म्हणताय तो इंद्र एक चांगला सज्जन मनुष्य आहे असं ऐकण्यात आलंय!
लोकं काय, काहीही बोलतात!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकं काय, काहीही बोलतात!
+१ सहमत आहे. परवाच लोक म्हणत होते की गिगाबायटी इंद्रानी टंचकनीका ठेवली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>परवाच लोक म्हणत होते की गिगाबायटी इंद्रानी टंचकनीका ठेवली आहे. काय सांगता काय? एक तर्क लढवला तर आपण गेस करु शकतो बहुधा! ती तीच असेल, त्यांच्या बँकेतली! कुस्तितपणे (की कुत्सितपणे) हसणारी! :-) आणि गिगाबायटी लिखाणासाठी (ती) मदतनीस असणे गरजेचे आहे हो. तुम्ही एखादी मदतनीस क्याफेमध्ये ठेवून पहा उपयोग होतो का ते! ;-)

In reply to by असुर

तुम्ही एखादी मदतनीस क्याफेमध्ये ठेवून पहा उपयोग होतो का ते
जशी आज्ञा मालक. बँक अकाउंट नंबर व्यनी केला आहे ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>जशी आज्ञा मालक. ग्रह फिरले की काय आमचे? :-) >>>बँक अकाउंट नंबर व्यनी केला आहे पर्सनल स्कोअर सेटल करायचा अतिशय ही & ही प्रयत्न. म्हणूनच अत्याश्लील! संपादक मंडळ इकडे लक्ष देईल काय? ;-)

In reply to by असुर

"....त्यांच्या बँकेतली! कुस्तितपणे (की कुत्सितपणे) हसणारी!..." ~ नाही हो....ती बिचारी कशाला कुत्सितपणे हसेल?....फक्त करुणमय दृष्टीने एकदा माझ्याकडे आणि एकदा माझ्या बँक पासबुकातील आकड्याकडे तिने पाहिले. तिच्या काउंटरवर तीन आकडी रक्कम असलेले पासबुक प्रथमच आले होते, ते पाहून तिला 'माईल्ड अटॅक' आला होता. त्यात खातेदाराचे आडनाव 'पवार' पाहून शिलकेच्या आकड्यावर तिचा विश्वास बसतच नव्हता....(अजूनही बसलेला नाहीच.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

पवार आडनावाच्या माणसाकडे पांढरे पैसे आहेत हे पाहूनच तिचे डोळे पांढरे झाले असतील नै? ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं.....ज्याअर्थी ती बँकेत आपल्या लाल अ‍ॅक्टिव्हावरून प्रियांका चोप्रा स्टाईलने रेग्युलर येते त्याअर्थी तिने डोळे पांढरे केलेले नाहीत, इतपत मी सांगू शकतोच. जगू दे बिचारी...! कुणीतरी स्थानिक महिवाल मिळू दे.....सुखी राहू दे....(बघं, याला म्हणतात 'त्यागी वृत्ती') इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

>>(बघं, याला म्हणतात 'त्यागी वृत्ती') 'लंगडा त्यागी' होता ओंकारामध्ये त्याची वृत्ती का रे भाऊऽऽ? ;)

In reply to by धमाल मुलगा

नो...नो... ओंकारेश्वर 'लंगडा त्यागी' ही फिजिकल डेफिनिशन झाली....व्हेअरअ‍ॅज 'दॅट त्यागी वृत्ती' इज अ काईंड ऑफ डेडिकेशन फॉर समथिंग सोलेम. बघा....काहीतरी चांगलं शिकायला मिळालं ना तुम्हाला? नाहीतरी आतापर्यंन्त एका विविवि अ. कडून शिव्याच्या शेवयाशिवाय तुम्ही पुणेकरांनी दुसरी मॅगी खाल्ली आहे का ? इन्द्रा

In reply to by सूड

".....त्ये बारामतीकर हैत.!!" कोण ? ध.मु.? येस, ही ईज. पण त्यांना पुण्याने इतके पिरंगठून टाकले आहे की, आजकाल बारामतीची लालपिवळ्या रंगाची रा.प.म.ची बस स्वारगेट्ला, की स्टेशनला, की शिवाजीनगरला लागते, हे त्यांना बिलकुल माहित नाही. पुणे नावाचे मायावी तळे भोळ्याभाबड्या जीवांना गिळून टाकते असे म्हणतात (हे ऐकीव आहे, लेखी पुरावा द्या म्हटले तर मी तंबूत चूप बसेन....), त्यात नक्कीच तथ्य आहे. धमु एक केस, तर दुसरी ती अदिती (दीर्घ 'ती.'.. र्‍हस्व नव्हे) अशी काही रमली आहे पेशव्यांचा नगरीत की, ठाणे गावचे स्पेलिंग लिहून दाखव म्हटले तरी तिच्या पेनमधून प्रथम 'पी' लेटर येते. (अवांतर > आता या दोघांना भोळ्याभाबड्या कॅटेगरीचे रेशन कार्ड दिल्याने इथे काही ऑडिटर्स लगबगीने त्या एंट्रीवर लाल पेन्सिलने क्रॉस चिन्ह मारतील याची शक्यता आहे....पण तरीही... त्यांच्याबद्दलची तशी माझी सदभावना आहे असे समजा; सुधांशू) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

१. पुणेरी भामटा २. मुंबईचा मवाली ३. दिल्ली का ठग यातले कोण कुठल्या क्याटेगरीत बसतात बघा बुवा!

In reply to by पैसा

मुंबईचा मवाली की मुंबईची मवाली? कृपया क्याटेगरी स्पष्ट करा! -असुर

In reply to by असुर

१. मुंबईचा/ची मवाली २. पुणेरी भामटा/टी (ह. घ्या)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या पुणेकर मुंबईकर की दिल्लीकर असा प्रांतीय वाद चालू झाला आहे. ठाणे मुंबईमध्ये येते असा माझा कयास आहे. ज्ञानात भर घालावी ही विनंती! :-) --असुर

In reply to by इन्द्र्राज पवार

हिट्ट आहे इंद्रा! च्यायला, नुसत्या स्प्राईटवर इतका दंगा? त्या स्प्राईटमध्ये काही मिसळलं तर च्यायला, हा माणूस येडाच करेल दुनयेला. :)

In reply to by इन्द्र्राज पवार

आता या दोघांना भोळ्याभाबड्या कॅटेगरीचे रेशन कार्ड दिल्याने इथे काही ऑडिटर्स लगबगीने त्या एंट्रीवर लाल पेन्सिलने क्रॉस चिन्ह मारतील याची शक्यता आहे या दोघांना भोळ्याभाबड्या कॅटेगरीचे रेशन कार्ड दिले ते तरी कुठे तर भुतांच्या कौलात. बरोबरच आहे म्हणा. पळा पळा आत भुतं मागं लागत्यात.

In reply to by इन्द्र्राज पवार

धम्या, तुझं काय खरं नाय बघ! इंद्रालासुद्धा तुला पाहून ओंकारेश्वर का आठवावा? स्पाभौ, थोडा पेशन्स ठेवा, धमालराव 'भूत म्हणजे काय' हे उदाहरणासहीत स्पष्ट करतील! :-) --असुर

In reply to by असुर

>>>>>>>>>>>>>>>>>स्पाभौ, थोडा पेशन्स ठेवा, धमालराव 'भूत म्हणजे काय' हे उदाहरणासह>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> जरूर .,जरूर..... वाट बघतोय....... ;)

In reply to by स्पा

@ असुरः काही 'संदेह' ? फक्त माझ्या भेटीसाठी नंतर तासनतास स्मशानात वगैरे येऊन बसू नये ही विनंती. ;) @ स्पा : >>जरूर .,जरूर..... वाट बघतोय...... लव्करच. >>पहाटेच्या प्रतीक्षेत .................... नाही, नको. त्यापेक्षा मध्यरात्री आम्ही बाहेर पडतो झाडं सोडुन तेव्हा भेटु.

In reply to by धमाल मुलगा

>>>@ असुरः काही 'संदेह' ? आवरा! >>>फक्त माझ्या भेटीसाठी नंतर तासनतास स्मशानात वगैरे येऊन बसू नये ही विनंती. खरंतर एखादा मनुष्य गांगारुन जाईल हे असलं काहीतरी वाचून. पण इथे सगळी भुतंच उच्छाद मांडून र्‍हायली ना भौ! :-)

In reply to by असुर

>>आवरा! का? तुम्हाला 'हुमा' बोलावतेय का? >>खरंतर एखादा मनुष्य गांगारुन जाईल हे असलं काहीतरी वाचून. पण इथे सगळी भुतंच उच्छाद मांडून र्‍हायली ना भौ! हा हा हा! चालायचंच. सर्वपित्रि आमुश्या ना ?

In reply to by धमाल मुलगा

हुमा! हम्म! अशर्फी महल ची ष्टोरी आहे ना रे ती? च्यायला, ती पुस्तकं इकडे आणून मेव्या आणि पुष्काला द्यायला हवी होती! 'लटकंती' मेव्याला आणि 'संदेह' पुष्काला! आणि 'झूम' तर दस्तुरखुद्द धमालबहाद्दरांना! 'झूम'चा दुसरा मालक परा आहे हे विसरु नये!! :-) चौथं पुस्तक कोणतं आहे रे? --असुर

In reply to by असुर

एस! अशर्फी महाल. >>'लटकंती' मेव्याला आणि 'संदेह' पुष्काला! हा हा हा! मेव्याचा 'जै जै गौरीशंकर स्टाईलीतला घाबरलेला फोटो पहायला आवडेल. पुष्की काय घाबरणार्‍यातली नाय. ती वर तुलाच फिलॉसॉफी झाडेल येड्या. >>आणि 'झूम' तर दस्तुरखुद्द धमालबहाद्दरांना! हॅ हॅ हॅ ;) (साल्या माझा काय केसकर मास्तर करतो का काय तू?) >>'झूम'चा दुसरा मालक परा आहे हे विसरु नये!! अरेरे :( म्हणजे झूमची कॉपी विभागुन बक्षिस आहे काय? :( >>चौथं पुस्तक कोणतं आहे रे? चुकभुल देणेघेणे! सुशिचं मोश्ट अ‍ॅबस्ट्रॅक्ट लेखन.

In reply to by धमाल मुलगा

फुल्लटु सर्क्युलेट कर ती पुस्तकं! पराला विचार वाचली हैत का, नसेल तर त्याचा लम्बर फैला!

In reply to by इन्द्र्राज पवार

आयला हे पवार अगदी त्या पवारांच्या लाईनीवरचेच दिसतात. जाता-जाता बारामतीकरांना धडा देतात आणि एक टपली त्याचवेळी ठाणेकरांवरही टाकतात.

In reply to by इन्द्र्राज पवार

माझ्याकडे करड्या रंगाची अ‍ॅक्टीव्हा आहे हे इथेच स्पष्ट करू इच्छिते. (फुलबडवी) अदिती

In reply to by इन्द्र्राज पवार

>>>आपल्या लाल अ‍ॅक्टिव्हावरून प्रियांका चोप्रा स्टाईलने पासबुक अपडेट करायला बँकेतले कर्मचारी यायच्या आधी कशाला जायचं असतं ब्वॉ????? >>> रेग्युलर येते पासबुक अंमळ जास्तच रेग्युलरली अपडेट होत असल्याशिवाय अशी ठाम विधानं येत नसतील असे माझे फुटकळ मत!!! बाकी चालू द्यात...

In reply to by मस्त कलंदर

मकीशी तद्दन समहत आहे मी! पासबुक अपडेट करण्याची गरजच काय हाताशी इंटरनेट असताना!! (भालाफेकर) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओये भालाफेकर..... मकीशी तद्दन सहमत आहेस, तर मग तुला आता वेगळा खुलासा देत नाही. तिला दिलेले उत्तर तुलादेखील अप्लाय कर. (छोले भटोरे खावून वाळलेला....इन्द्रा)

In reply to by पैसा

"....तू जेवढं जास्त एक्सप्लेन करशील तेवढा लोकाना जास्त संशय येईल...." व्वा...व्वा....व्वा.... क्या बात बोली है !! खरंच या चौघीत वरचा 'सा' कुणाला द्यायचा तो 'पैसा' ला हे मी पल्लवी जोशीला सांगतोच आता. (तिचा ई-मेल आहे माझ्याकडे....शिवाय महाराष्ट्रातल्या तमाम 'जोशीणबाई' त पल्लवी एकमेव हुशार आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.). 'पैसा' तू इतकी हुशार आणि समंजस का आणि कशी झाली आहेस याचे शिक्रेट माहित आहे तुला ? काही महिन्यापूर्वी 'मिस्टर पैसा' यांनी तुला कोल्हापुरच्या "ओपल हॉटेल" मध्ये डिनरला नेले होते आणि तिथला तांबडा+पांढरा रस्सा वाटीने नाही तर तांब्याने तू प्याल्यामुळे तुझ्या मेंदुला एक वेगळी झळाळी आली आहे, तिचे प्रत्यंतर इथल्या प्रतिसादात उमटले. तुस्सी ग्रेट हो....चक दे फट्टे ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रा,
महाराष्ट्रातल्या तमाम 'जोशीणबाई' त पल्लवी एकमेव हुशार आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.).
तू पक्का "पवार" आहेस. वेगळ्या पुराव्याची गरज नाही आता. ;) पाहू आता इथल्या जोशिणी काय म्हणतात ते... ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इंद्राच्या "महाराष्ट्रातल्या तमाम 'जोशीणबाई' त पल्लवी एकमेव हुशार आहे असे माझे प्रामाणिक मत आहे." या वाक्यावर लगेच पुरावा देण्याची गरज होतीच का? ;)

In reply to by श्रावण मोडक

+ सहमत. पण श्रा.मो. >> जर तसे त्यांनी उत्तर दिले नाही तर मग त्या कसल्या जोशील्या जोशीणबाई ? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

ईण हा हीन प्रत्यय वापरणार्‍या इन्द्रा आणि श्रामोंचा निषेध! दुसर्‍या त्या धर्म आणि लिंगभेदी कौलावर 'हो' अशी प्रतिक्रिया देण्याचा मोह होतो आहे.

In reply to by मस्त कलंदर

"......पासबुक अपडेट करायला बँकेतले कर्मचारी यायच्या आधी कशाला जायचं असतं ब्वॉ?????.. ~~ हे भगवान ! अहो, आता भटिंडाच्या ज्या रोडवर आमच्या व्यवसायाची शो रुम आहे त्यासमोरच या 'सोनी'ची बँक आहे.... जणू पुण्याचा गजबजलेला लक्ष्मी रोडच म्हणा ना. सकाळी नऊला इथला आमचा मॅनेजरकडून (जो मित्रही आहेच...) शो रुमचे शटर्स उघडले जातात आणि प्रत्यक्ष कामकाज ९.३० च्या सुमारास चालू होते. तर समोर बँक दहाला सुरू. त्यामुळे 'कौन आया, कैसे आया, कब आया...." हा भुलभुलैय्या कॉमनच असतो. आता त्या मॉलवरील बरेचसे व्यवहार याच बँकेशी संलग्न असल्याने साहजिक बँकेचा स्टाफ तसा हसतखेळत असतोच. शिवाय पंजाबी हे वागण्याबोलण्यात फार सैल असतात, म्हणजे तुमची ओळख लाल अ‍ॅक्टिव्हावाली बरोबर दोन वाजता [टी ब्रेकदरम्यान] मी करून दिली तर २.१५ ला ती तुम्हाला मागे बसवून लस्सी प्यायला घेऊन जाईल... आणि बाय च्या वेळी सहज विचारेल, "तुअडे नाल मिल कर बहुत खुसी होयी, मके..., शाम तू विंच करे?" म्हणजे संध्याकाळीदेखील तुम्ही दोघी आउटिंगचा प्लॅन कराल...इतकी सहजता असते वागण्यात. "....पासबुक अंमळ जास्तच रेग्युलरली अपडेट होत असल्याशिवाय अशी ठाम विधानं येत नसतील असे माझे फुटकळ मत!!! ... अहो ताई, महिन्यातून एकदोनदा अपडेट हो.... मुळात मुळा नदीतच खडखडाट आहे, तर घागरीत पाणी येईल कुठले? अन् त्यातूनही 'ब्रेव्ह हार्ट' स्टाईलने काही अ‍ॅडव्हेन्चर करायला जर मी गेलोच तर ती लालछडी फटकन म्हणेल, 'ओये इन्दर....तुसी पल्ले ना ढेला, किथ्ते करे तू मेला मेला ?" (याचा अर्थ सांगू?) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नाही पण या गजबजलेल्या रस्त्यावर, सकाळी नऊ वाजता तुझं ऑफिस सुरू होतं तर लाल अ‍ॅक्टीव्हा का पिवळी हे बरं दिसतं हां तुला, 'भटिंडा के दामाद'!

In reply to by इन्द्र्राज पवार

>> शिवाय पंजाबी हे वागण्याबोलण्यात ...... म्हणजे संध्याकाळीदेखील तुम्ही दोघी आउटिंगचा प्लॅन कराल...इतकी सहजता असते वागण्यात. हे त्या मुली फक्त इतर मुलींशीच वागतील की मुलांशीपण? दुसरा पर्याय असेल तर थोडे दिवस भटिंडा येथे वास्तव्य करेन म्हणतो. २:१५ वाजता लस्सी आणि संध्याकाळी फिरायला जाणे हे वेळापत्रक अगदीच वाईट नाही. (पंजाबी क्लासेस ची चौकशी केली पाहिजे. किंवा काही हिंदी चित्रपट बघेन, ५०% पंजाबी कळू लागेलच) (सहजताप्रेमी) वि. मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

"....हे त्या मुली फक्त इतर मुलींशीच वागतील की मुलांशीपण?" वेल....मोस्टली इट डीपेन्ड्स अपॉन द फेलो वुईथ व्हूम यू आर गोईंग टु हॅव अ हॅण्डशेक आयदर वुईथ अ पंजाबी काका ऑर अ कुडी.... (पंजाबीत 'काका' म्हणजे लाडला लडका......राजेश खन्नाला प्रेमाने यासाठीच 'काका' म्हणत.) उदा. माझी ज्या ग्रुपशी ओळख आहे (झटक्यात अरे-तुरे वर येतात येथील सर्वच...) तिथे मी 'विश्वनाथ मेहेंदळे' या विनयशील सदगृहस्थाला (चू.भू.द्या.घ्या. ~ विशेषण लागू नसेल तर दुर्लक्षित करावे) आणले तर पाच मिनिटाच्या आत 'मेल' समवेत 'विशू' त रुपांतर झालेच समजा. 'फीमेल' सुरुवातीस काही काळ रीझर्व्ह राहतील (नैसर्गिकच म्हणावे लागेल...) पण तुम्ही फक्त एकदोन दिवसाचे व्हिजिटर नसून बराच काळ सतलजचे पाणी पिणार असाल तर तुमची गट्टी जमलीच. राहता राहिला 'पंजाबी' शिकण्याचा प्रश्न.....सो फर्गेट इट. तुम्हास बर्‍यापैकी हिंदी वा उर्दु येत असेल तर अमृतसर, पतियाळा, गुरुदासपूर, लुधियाना, जालंदर सारखी प्रमुख शहरेच काय पण अगदी संगरूर, बरनाला, मुक्त्सर, फिरोझपुर आदी छोट्या छोट्या शहरातदेखील वावरताना कसलीच अडचण येत नाही. आणि शिवाय सरावाने इथल्या शेतातला मुंगूसदेखील भांग्रा नृत्य करू शकतो. (व्होल पंजाब इज युवर्स.... पण मेहरबानी करून यादीतून भटिंडा काढून टाका....च्यामारी इथे काही लोक 'इन्दर बिड्डा अच्चा है...' म्हणतात.....उगाच कुणी मिपा सदस्य येऊन आमच्या अब्रुचे खोबरे करायला नको.) (काहीसा धास्तावलेला इन्द्रा)

In reply to by इन्द्र्राज पवार

म्हंजे उद्या "शावा शावा"च्या ऐवजी "इंद्रा इंद्रा" असा भांगडा बघायला, ऐकायला मिळणार तर!!

In reply to by स्पा

अहो, स्पा.....आमच्या 'वेताळा' च्या कॉम्प्लिमेंट्सवर जाऊ नका. तो 'वारणेचा वाघ' आहे, आणि मी त्याच्याच गावच्या 'पंचगंगेचे पाणी पिणारा प्रवासी...' असल्याने तो मला 'कव्हर' करतोय....इतपतच. राहता राहिला 'कमिशन' चा प्रश्न... तर कॅलक्युलेशन कराच....'पहाटेच्या प्रतिक्षेत' तुम्ही असतानाच वेताळासह केव्हातरी खारे शेंगदाणे घेऊन येतो, एकत्र बसून हिशोब करू..... भुताखेतांचा ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

>>>>पहाटेच्या प्रतिक्षेत' तुम्ही असतानाच वेताळासह केव्हातरी खारे शेंगदाणे घेऊन येतो, एकत्र बसून हिशोब करू..... भुताखेतांचा !>>>>> नक्की...... :) फक्त खारे शेंगदाणे........? फारच कंजूस आहात ब्वा तुम्ही...... मलाच काहीतरी आणावे लागेल...... घसा ओला करायला ;)

In reply to by स्पा

".....फारच कंजूस आहात ब्वा तुम्ही......" ~ कंजूस ? अहो, स्पा भाऊ.... पासबुकात फक्त रुपये ७२३/- शिल्लक आहेत....इतक्या दीनवाण्या आकड्यावर 'नंगा क्या धोयेगा और क्या निछोडेगा?" कसेबसे शेंगदाण्याची बेजमी करतो....अगदीच तुम्ही तक्रार करायला लागला तर एक लिज्जत पापड पाकीट आणतो....तुम्ही बसा वेताळाला घेऊन, तोपर्यंत मी वारणा नदीत मासेमारी करतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

थोडेसे शेंगदाणे आमालाबी ठेवा. आमी वशाट खात नाय, दारू पीत नाय, इतर काहीही वाईट सवय नाय. आमच्याकडे पास बुक पण नाय, (एक ATM कार्ड आहे फक्त, ICICI चे) त्यात पण असेच ३ किंवा कधीतरी ४ आकडी संख्या दिसते. (हलके घ्याल अशी अपेक्षा आहे.)

In reply to by इन्द्र्राज पवार

तिच्या काउंटरवर तीन आकडी रक्कम असलेले पासबुक प्रथमच आले होते, ते पाहून तिला 'माईल्ड अटॅक' आला होता.
मग तिला निट समजावुन सांगा, "बाई ग उद्या आपले सुर जुळले की मग पगाराचे आकडे देखील जुळतील. मग आपोआप हि तीन आकडी रक्कम पाच आकडी दिसायला लागेल." ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

".....उद्या आपले सुर जुळले की मग पगाराचे आकडे देखील जुळतील. ...." ~ तिची जितपत ओळख झाली आहे तीवरून एक गोष्ट नक्की समजली आहे की, तिला जोडखात्यासाठी 'राज' चालेल पण त्या नावात इन्द्र नको आहे.....थेट 'राजकुमार'च हवा आहे. आता माझ्या माहितीतील एक 'जानी' राजकुमार तर बिचारा अल्लाला प्यारा झाला आहे. दुसरा एक आहे परिकथेतील....तर त्याचे नाव सुचवू का? आणखीन होईल एक देशी चांगलं 'ट्वालाईट सागा...' सोच लो, बाबू !! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

तर त्याचे नाव सुचवू का? आणखीन होईल एक देशी चांगलं 'ट्वालाईट सागा...'
सुचवा की . पण नाव काय म्हणुन सुचवणार, एडवर्ड म्हणुन का जेकब म्हणुन ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

जर परा एडवर्ड असेल तर धम्या जेकब आहे. अणि जर धम्या एडवर्ड असेल तर डान्राव जेकब आहे. आणि जर डान्राव एडवर्ड असेल तर नाना जेकब आहे. आणि जर नाना एडवर्ड असेल तर बिका जेकब आहे. आणि जर बिका एडवर्ड असेल तर मेव्या जेकब आहे. आणि जर मेव्या एडवर्ड असेल तर प्रभ्या जेकब आहे. आणि जर प्रभ्या एडवर्ड असेल तर निदे जेकब आहे. आणि जर निदे एडवर्ड असेल तर अदिती जेकबीण आहे. आता सांगा, संधीप्रकाशातला मूळ एड्या आणि जेक्या कोण? :-)

In reply to by असुर

आपण चनावाला का ? ('नावाला' असेच वाचावे, नावाला असे नाही.) मुळ प्रश्नांत आपण काही माहिती विसरत आहात काय ? जसे कोणती विधाने सत्य, कोणती असत्य ? कोण गंधर्वधर्मी, कोण यक्षधर्मी. कोणाचे, कोणावर, कधी, प्रेम होते/आहे का नव्हते/नाही. हे असले काही असेल तरच भेजा नावाचा अवयव चालतो, नाहीतर त्याच्या फ्राय होतो.

In reply to by असुर

नाव सुचविणार होतो....पण तुम्हा तिघांचा हा खंडोबाच्या जत्रेतील बेलभंडारा पाहिल्यावर थोडा वेळ थांबतो....तुम्हीच एकमत तयार करा प्रथम.....[ती थांबेल, तो पर्यंत...] इन्द्रा

In reply to by नितिन थत्ते

नो चान्स सर.... कारण माझे बँक अकौन्ट डिटेल्स तिच्या कॉम्प्युटरवर एका टिचकीत येतात ना....! अन् तिथे ओरिजिनल अकाऊंट 'इन्द्रराज पवार' याच नावाने आहे. आता या पंजाब्यांना आणि हरियाणवीना एक 'इन्द्रकुमार गुजराल' नकोसा झालाच होता....त्यात नव्या 'इन्द्रराजकुमार' चे स्वागत ते कसे आणि का करतील, हादेखील एक गहन प्रश्न होईल. त्यामुळे सर्टनली मि.प.रा. ईज द मोस्ट इलिजिबल फेलो टु क्लेम द सोनी फ्रॉम भटिंडा. इन्द्रा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू कशाला मरायची बात करतेस बाई !! अजून १०० वर्षे जग....काय ठाण्याला आणि पुण्याला त्रास व्हायचा तो होवू दे. येईल दुसरा टी.चंद्रशेखर तेथील त्रास कमी करायला. इन्द्रा

In reply to by असुर

".....तुम्ही म्हणताय तो इंद्र एक चांगला सज्जन मनुष्य आहे असं ऐकण्यात आलंय!> ~~ व्वा, व्वा...... क्या बात है ! असुर जी.....तुमच्या नावाचा शब्दकोशात तो अर्थ असेल तो असेल त्याच्याशी या 'इन्द्रा' ला काही कर्तव्य नाही, पण तुम्ही इथल्या एका ज्येष्ठ भद्र महिला सदस्येचे मत इतक्या रोखठोक शब्दात खोडून काढले ते पाहून मन भरून आले. भटिंडामध्ये आज उन्हाचा तडाखा जाणवत होता, पण तुमचे मत वाचून अचानक नदीकाठच्या शेतातून पोपट नाचत गेल्याचा भास झाला. इन्द्रा (जमिनीवरचा)

In reply to by इन्द्र्राज पवार

पण तुम्ही इथल्या एका ज्येष्ठ भद्र महिला सदस्येचे मत
लिहायचा राहिलाय का त्या शब्दाआधी ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

"अ लिहायचा राहिलाय का त्या शब्दाआधी ?".... ~~ इल्ला इल्ला..... तसे मी बापडा कशाला आणि का लिहू ? मला 'धर्मराजा'चे बरेच धर्म पसंद पडले नसले तरी एक धर्म त्याचा चांगला होता, तो म्हणजे समोरच्याबद्दल कायम चांगलेच बोलायचे. दुर्योधनाला त्याने सातत्याने 'सुयोधन' या नावानेच हाक मारली आहे.....मग अदितीला भद्र म्हणताना 'अ' ची अंकलिपी माझ्यासमोर येईलच कशी? इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

'अ' ची अंकलिपी माझ्यासमोर येईलच कशी?
'अ'ची अंकलिपी, बॉर्र! मग काय आता मला दिती म्हणणार का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुला माहित नाही वाट्टं! अदिती ही देवांची आई आणि दिती हे दैत्यांची! (खुद के साथ बातां: माझं नाव ठेवताना बहुतेक आई थोडी 'अं .. अं' अडखळली असेल लोकांना चुकून वाटलं असेल माझं नाव अ-दिती!) ;-)