तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? माझं नाव महत्त्वाचं आहे? ;-)
ह्या धाग्यात माझं नाव महत्त्वाचं आहे अन माझ्या नावाने लोक आंघोळ करतात ही 'अननुभुत' जाणिव नेणिवेच्या सीमा उंचावणारी आहे.
मला छान झोप लागते, शिवाय झोप न मोड्णारी स्वप्नही पडतात.
ती सगळी सकाळी लख्ख आठवतात.
..अनेक वेळेस पुढे घडणार्या महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. ( ज्याचे कारण वगरै मला अजून कळले नाही.)
मोठ्ठा (१४-१५ फूट) पिवळा साप एकदाच आइच्या घरात फिरताना दिसला होता. (ती आजोबांची तिथी होती. आजोबांना जाउन १५ वर्षे झाल्यानी सगळ्यांच्याच विस्मरणात गेली होती)
इतरही अनेक सूचक स्वप्न पडतात. सगळी इथे लिहायची तर एक दैनंदिन सदर काढावे लागेल.
मोठ्ठा (१४-१५ फूट) पिवळा साप एकदाच आइच्या घरात फिरताना दिसला होता.
तिला धामण म्हणतात, आणि ती स्त्रीलिंगी असते.
तुमच्या आजोबांची काही इच्छा वगैरे अपूर्ण होती का ?
मला विशेष कोणते प्राणी दिसत नाहीत पण कुत्रे आणि पाली दिसतात स्वप्नात.
कुत्रे मला चावून अक्षरशः माझ्या पायाचे लचके तोडतात त्यातून लोंबणारे माझ्या पायाचे मांस मला दिसते. पण स्वप्नातही असा विचार येतो ठीक आहे घाबरायचे नाही ७०% लोक अपघातापेक्षा भितीने मरतात. मग मी ते मास पट्टीने बांधतो आणि पुढे निघतो. एकतर घराच्या दिशेने किंवा ससूनच्या दिशेने.
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत आणि मी झाडू घेऊन त्याना मारायला निघालो आहे असे दिसते. एकदम ४-५ पाली घरात घुसल्या आहेत असे दिसते पण मारली एकही जात नाही एखादीला झाडूचा फटका बसतो पण तीही पळून जाते. सगळ्या कुठे ना कुठे खबदाडात जाऊन बसतात. एकही मरत नाही. याचाही अर्थ काय ते मला माहीत नाही. आणि अशी स्वप्ने मला बर्याच वेळेला पडतात.
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत आणि मी झाडू घेऊन त्याना मारायला निघालो आहे असे दिसते. एकदम ४-५ पाली घरात घुसल्या आहेत असे दिसते पण मारली एकही जात नाही एखादीला झाडूचा फटका बसतो पण तीही पळून जाते. सगळ्या कुठे ना कुठे खबदाडात जाऊन बसतात. एकही मरत नाही. याचाही अर्थ काय ते मला माहीत नाही. आणि अशी स्वप्ने मला बर्याच वेळेला पडतात.
सगळ्या दगडांवर हात ठेवणे क्रमप्राप्त असल्याने परा ह्यांना आळीपाळीने सगळ्यांच्याच भावनांची खिल्ली उडवणे भाग पडते, त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक दुष्ट हेतू नसतो. भरपूर सुपार्या घेतल्यावर त्या पेरायला नकोत का? :D नायतर कधीतरी त्यांचाच गेम व्हायचा! =))
सगळ्या दगडांवर हात ठेवणे क्रमप्राप्त असल्याने परा ह्यांना आळीपाळीने सगळ्यांच्याच भावनांची खिल्ली उडवणे भाग पडते, त्यात त्यांचा काहीही वैयक्तिक दुष्ट हेतू नसतो.
धन्यवाद, यशोताई. हे कॉम्प्लिमेंट असावे असे मी धरून चालतो.
पण तसे नसल्यासही काही हरकत नाही.
खरं तर हा लेख काल रात्री आल्या आल्या मी बघितला आणि वर वर वाचला. अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. पण रात्री उशिर झाला असल्याने, उद्या परत नीट वाचून प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. त्या प्रमाणे आज वेळ मिळताच तसे केले. जे काही व्यक्त केले आहे ते माझे प्रामाणिक मत आहे याबद्दल शंका नसावी.
मूळात मिपावर आलो तेच हिणकस लिखाणाचा शोध घेत . हे मी आधीही जाहिरपणे आणि खाजगीमधेही बोललो आहेच. त्यामुळे हिणकस लेखन, शैली वगैरेमुळे आवडते. एखाद्या माणसाने नेहमीच चांगले वागावे अथवा नेहमीच वाईट वागावे असे नाहीच ना. **
**सौजन्य :- बिका
पर्या LOL!! :D
>>अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. >> खरय, खरय! म्हंजे मग सगळ्यांचे प्रतिसाद तुझ्या प्रतिसादांशी जुळले नसते किंवा अधिक योग्य रीतीने म्हणायचे तर, तुझा प्रतिसाद इतरांची री ओढणारा नसता तर कित्ती पंचाईत झाली असती नै? :D
बरं, दोन म्हणी सांगू का रे? १. खा त्या ख. आणि २. चो म चां हवी ती घेणे! :P
बरं बरं मुलांनो भांडू नका.. ऐकला नाहीतना तर आमच्या स्वप्नामधील १ एक पाल तुमच्या स्वप्नात पाठवीन आणि तुमच्या स्वप्नातला झाडू पण पळवून नेईन, मग पकडा पाली हातानेच. :)
(स्वप्नसंपादक)पालोबा किलर
माझ्या स्वप्नात, (जागेपणी, झोपेत ) केवळ कसाब अन कसाबच येतो,
स्वप्नात तो इथल्या लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्याचा प्रतिकार करत आहे.
एकालाही भारत पूर्णपणे भ्रष्टाचारातून मुक्त झाला, महान झाला, महासत्ता झाला, असली स्वप्न पडत नाही हे मात्र विशेष आहे.
एकालाही भारत पूर्णपणे भ्रष्टाचारातून मुक्त झाला, महान झाला, महासत्ता झाला, असली स्वप्न पडत नाही हे मात्र विशेष आहे.
ज्यांन अशी स्वप्ने पूर्ण करायची असतात त्यांना झोपा काढून चालत नाही :)
मला स्वप्नात 'कुतरे', पाली, मधमाशा, झुरळे असे अनेक प्राणी मध्यंतरी दिसत असत. त्यावर उपाय म्हणून मिपावरील कवयित्री ३_१४ यांचे भुंक न कुतर्या याची ११ आवर्तने, तर यशोदामाईंची 'झुरळे पाली आम्हां सोयरी' ही कहाणी वाचून बराच फरक पडला. मधमाशा दिसू लागल्यानंतर मेवे यांच्या 'करु मी रांधप कुणीकडे' याच्या शेवटच्या कडव्याची २१ आवर्तने अतिशय लाभदायक ठरली.
अवांतर: उपाय न विचारताही आगाऊ दिले आहेत त्यामुळे दुर्लक्ष केले तरी चालेल. मुद्दा हा की प्राणी दिसत होते.
मला साप नाग कावळा किंवा मृत पूर्वज स्वप्नात नाही दिसले पण
मला नदीवर पाणी पिणारा वाघ बर्याचदा दिसतो ( सेव्ह द टायगर कँपेन सुरू व्हायच्या आधीपासून ).
कैलास पर्वत (म्हणजे जो पर्वत दिसतो तो कैलास पर्वत आहे असं मला स्वप्नात माहित असत).
जीव/आत्मा रहित शरीर , म्हणजे मृत शरीर नाही कारण मी इकडून तिकडून फिरून परत शरीर होते थोड्या वेळानं. पण स्वप्नात स्वतःला शरीर आणि 'मी' अशा दोन्ही रूपात अनुभवते...
परिक्षेची स्वप्नं बरीच पडतात, त्यात मी चुकीच वेळाप्त्रक उतरवून घेतल्यानं भूमितीचा अभ्यास केलेला असतो आणि हातात भूगोलाची प्रश्नपत्रिका पडते आणि मी खो खो हसतेय किंवा पेपर दुपारी आहे अशा अंदाजात असलेल्या मला मैत्रिण तरातरा ओढून चल आता निघूया, ९ ला पेपर आहे असं सकाळी ८.३० ला म्हणतेय...अशी बर्याचदा .
० वेळा
हे उत्तर दिले आहे. आणि ते माझ्या बाबतीत खरे आहे.
मला स्वप्न खुप कमी पडतात, पडली तरी १ % स्वप्ने पण मला उठल्यावर आठवत नाहीत.
काही वर्शांपुर्वी मात्र स्वप्न पडले की मी सकाळी नेहमी प्रमाणे ते विसरत असे, पण स्वप्न पडले होते हे मात्र आठवत असे काय ते कळत नसे.. पण काही महिन्यांनतर तेच स्वप्न कंटीनिव्ह व्हायचे आणि स्वप्नातच मला कळायचे या आधी हे घडलेले आहे.
पुन्हा सकाळी ब्लँक सगळे .. फक्त हे आठवत रहायचे की अश्या प्रकारचे स्वप्न पडले होते .. जे क्रमशः होते.
असा अनुभव आहे का कोणाचा? .. कारण मला असा अनुभव येणारे कोणीच भेटले नाहीत, बाकी स्वप्नातले सगळॅ कालप्निक असते माझ्या.
घर आणि काम ह्याशिवाय दुसरीकडे कुठेही हात मारता येत नाही तर कोणाच्या स्वप्नांत काय जाणार डोमला. आमच्या स्वप्नांवर देखील कुणाचीतरी पाळत असते आणि आम्ही आमच्या स्वप्नात देखील कुणाचेतरी कैदी असतो. हापिसात इंटरनेट मिळतो हेच आमचे नशीब.
**च्या नावाने आंघोळ करणे हा वेगळा प्रकार आहे हे कदाचित ठावं नसावं त्यांना. असो आम्हाला रोज कोण ना कोणतरी बुद्धीवादी भेटत असल्याने आमची रोजची आंघोळही कोणाच्याना कोणाच्या नावाने होत असते. :)
स्व्प्नांत नाग, साप, कावळा वगैरे दिसणे या सर्वांशी त्या फ्राईडने 'पाचकळ' संबंध जोडले आहेत हे खूपच लहानपणी (५ वीत असतानाच; नूमविय असल्यामुळे असेल कदाचित) समजले होते, त्यामुळे हे प्राणी स्वप्नांत आल्याचे निदान आठवत तरी नाही. कदचित हे लिखाण करत असल्यामुळे आज हे लोक स्वप्नांत आल्यास उद्याला कळवीनच.
माझी आजी (वडिलांची आई) मला लहानपणी दिवसभर सांभाळत असे, शाळेतून ने-आण पण करत असे, त्यामुळे माझे आणि तिचे आजी-नातू हे नाते जरा अधिकच गहिरे असावे. तिला जाऊनपण ८-१० वर्षे लोटली असतील. माझे वय ४१ वर्षे; पण आत्ता काही महिन्यांपूर्वी मला स्वप्न पडले कि मी खरोखरच लहान झालो आहे (अहाहा काय मजा आली नुसत्या त्या स्वप्नांतील लहान होण्यामुळे) आणि माझी आजी मला हाताला धरून कुठेतरी नेत आहे. पण रस्त्यांत मला काही मुले दिसली, आणि मी त्यांच्याबरोबर खेळायला जाऊ दे म्हणून आजीपुढे हट्ट धरला, पण आजी काही मला खेळायला जाऊ देत नव्हती. म्हणून मग मी लहानपणीसारखेच भोकाड पसरून रडायला लागलो आणि ..... जागा झालो (श्या जळ्ळ मेलं लक्षण). बायको, मुलगी उठून बघतच राहिले ... पण त्यांना हे स्वप्न सांगितल्यावर आणि दुसर्या दिवशी सकाळी घरातील इतरांना कळल्यावर माझ्यासकट सगळेच भरपूर हसलो.
आजीचा कर्मफल सिद्धांत सोडून इतर कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नव्हता, त्यामुळे आम्हीपण कोणताही दैवी , पैशाची, अद्भुत, अतर्क्य असा निष्कर्ष काढत बसलो नाही. माझ्याच मनांतील खूप पूर्वीची एखादी सुखद आठवण स्व्प्नाच्या रुपातून पुनर्प्रतीत झाली असे वाटते.
हे स्वप्न मात्र थोड्या फार दिवसांनी (रात्रींनी?) परत परत असे तीनवेळा दिसले आणि कोणतीही पूर्वसूचना वगैरे न देता बंद झाले:
मी एक टिनपाट एस्.टी. बस चालवत आहे (कर्म माझं), बसमधे प्रवासी संख्या तशी मध्यमच. अगदी आड्बाजूच्या गावाजवळ बस आली आहे,वेग फारच मंदावला आहे आणि आता बस थांबवण्यासाठी ब्रेक दाबायला लागलो तर त्या ब्रेक लीव्हरवर असलेला (म्हणजे असायला पाहिजे असणारा) फूट-रेस्टर चा आडवा तुकडाच पडून गेलाय, त्यामुळे ब्रेक लीव्हर जोर करून दाबताच येत नाहिये (पावलात घुसेल म्हणून)... बस थांबली नाही तर बस्-स्टँड ओलांडून कडेच्या नाल्यात जाणार (नशीब फारसा खोल असा नव्हताच, जेमतेम ५-६ फूट). मग मी जिवाच्या आकांतानी पायाचा आंगठा आणि त्याजवळील बोट यांच्या पकडीत ती ब्रेक लीव्हर घट्ट पकडून दाबली, बस कशीबशी थांबली (नशीब त्या प्रवाश्यांचं, दुसरं काय म्हणणार...) आणि मला जाग आली ...
पण हे स्वप्न पडण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून, म्हणजे कार चालवायला शिकतानापासूनच, मी ड्रायव्हर सीटवर बसत असल्यास पादत्राणे काढून ठेवूनच गाडी चालवत असतो. त्यामुळे ह्या स्वप्नातून देखील काहीच संकेत वगैरे शोधायच्या भानगडीत पडलो नाही. कदाचित पूर्वी जागेपणी कधीतरी मनात विचार आला असावा, की ब्रेक लीव्हर वरचा फूट्-रेस्टर्चा आडवा तुकडा कोणत्याही कारणामुळे तुटून पडला तर काय करायचं ... हां एक मात्र नक्की, की मी आता कोणतीही गाडी चालवण्यापूर्वी ब्रेक लीव्हर मात्र नीट आहे ना हे तपासून घेतोय :)
ह्यापुढे काही तसा अनुभव आल्यास नक्कीच मिपावर कळवीन ...
बाकी परीक्षेसंबंधीची सर्व तर्हेची स्वप्न ही तर नित्याचीच गोष्ट झालीय.
साप, नाग ६-७ वेळा स्वप्नात आले आहेत.
आणि एकदम मोठ्या संख्येने असतात. प्रत्येक ४ फुटावर कमीत कमी एक. पण शांत पडुन असतात, त्रास देत नाहीत.
पुर्वजापैकी कोणाचाच मृत्यु फार जवळुन पाहिलेला नसल्याने कोणी येत नाही स्वप्नात.
मे महिन्यात सासरे गेले तेव्हापासुन मात्र चार पाच वेळा आले होते स्वप्नात.
काही वर्षांपूर्वी कॅनडात एक वर्षासाठी होतो. त्यावेळेला लग्न व्हायचं होतं. मी ज्या गावात राहायचो ते पण फार छोटं होतं.
तेव्हा वरचेवर होमसिक व्हायचो. त्यावेळेला मला स्वप्नात साप, मोठाले अॅनाकोंडा वगैरे दिसायचे. लागोपाट दोन-तीन वेळेला अशा प्रकारची स्वप्न दिसल्यानंतर गूगलून पाहिलं तर 'स्नेक ड्रीम्स' बरीच कॉमन आहेत हे समजलं. आणि विषेश म्हणजे जवळच्या व्यक्तींची जेव्हा फार आठवण होत असते तेव्हा अशा प्रकारची स्वप्न दिसतात असा जनरल निष्कर्श काढला होता.
नंतर भारतात परत आलो अशी स्वप्न पडणं बंद झालं.
प्रतिक्रिया
नाही मन निर्मळ.... असो.
In reply to शुद्धीसाठी आंघोळ करायची असेल by Nile
आपल्याला जमत नसेल तर
In reply to नाही मन निर्मळ.... असो. by परिकथेतील राजकुमार
आंघोळ रोजच करतो... तुमच्या
In reply to आंघोळ पण करुन घ्या हो, by Nile
नाम महत्त्वाचं नाही हो, कर्म
In reply to आंघोळ रोजच करतो... तुमच्या by बिपिन कार्यकर्ते
आम्ही नामपंथी असल्याने
In reply to नाम महत्त्वाचं नाही हो, कर्म by Nile
तुम्हाला नक्की काय म्हणायचं
In reply to आम्ही नामपंथी असल्याने by बिपिन कार्यकर्ते
अनेक..
धामण
In reply to अनेक.. by कवितानागेश
मला विशेष कोणते प्राणी दिसत
अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत
In reply to मला विशेष कोणते प्राणी दिसत by llपुण्याचे पेशवेll
आमच्या भावणांची खिल्ली
In reply to अनेकवेळा पाली घरात आल्या आहेत by परिकथेतील राजकुमार
सगळ्या दगडांवर हात ठेवणे
In reply to आमच्या भावणांची खिल्ली by llपुण्याचे पेशवेll
सगळ्या दगडांवर हात ठेवणे
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by यशोधरा
पर्या LOL!! >>अर्थात तेव्हा
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by परिकथेतील राजकुमार
बरं बरं मुलांनो भांडू नका..
In reply to पर्या LOL!! >>अर्थात तेव्हा by यशोधरा
हाहाहा!!! पर्या लेका...
In reply to सगळ्या दगडांवर हात ठेवणे by परिकथेतील राजकुमार
माझ्या स्वप्नात, (जागेपणी,
ज्यांना...
In reply to माझ्या स्वप्नात, (जागेपणी, by गांधीवादी
मला स्वप्नात 'कुतरे', पाली,
हहपुवा
In reply to मला स्वप्नात 'कुतरे', पाली, by सूड
मला साप नाग कावळा किंवा मृत
एक मिपाकर म्हणून शरम वाटते
० वेळा हे उत्तर दिले आहे.
एखादा बुद्धिवादी भेटला की मला
अॅनाकोन्डा दिस्ला तर काय
In reply to एखादा बुद्धिवादी भेटला की मला by अवलिया
मग शिकेकाई किंवा शांपु वापरुन
In reply to अॅनाकोन्डा दिस्ला तर काय by गांधीवादी
बंर ते जाउद्या, स्वप्नांत
In reply to मग शिकेकाई किंवा शांपु वापरुन by अवलिया
वैष्णव जन तो तेणे.. गातो.
In reply to बंर ते जाउद्या, स्वप्नांत by गांधीवादी
थोडी वाट बघा, ३-४ दिवस. तुमची
In reply to वैष्णव जन तो तेणे.. गातो. by अवलिया
का तुम्ही त्यांच्या स्वप्नात
In reply to थोडी वाट बघा, ३-४ दिवस. तुमची by गांधीवादी
घर आणि काम ह्याशिवाय दुसरीकडे
In reply to का तुम्ही त्यांच्या स्वप्नात by llपुण्याचे पेशवेll
अरेवा, म्हणजे जोरदार पाणीबचत
In reply to एखादा बुद्धिवादी भेटला की मला by अवलिया
आमच्यात आंघोळ पाण्यानेच
In reply to अरेवा, म्हणजे जोरदार पाणीबचत by Nile
हो म्हणुनच तरं म्हणालो.
In reply to आमच्यात आंघोळ पाण्यानेच by अवलिया
{जांभई आल्याची स्मायली}
In reply to हो म्हणुनच तरं म्हणालो. by Nile
जा घ्या आंघोळ करुन, सचैल करुन
In reply to {जांभई आल्याची स्मायली} by अवलिया
अरेरे ! आमच्या आंघोळीची काळजी
In reply to जा घ्या आंघोळ करुन, सचैल करुन by Nile
अहो पण रोज नाही करत ना ? ते
In reply to आमच्यात आंघोळ पाण्यानेच by अवलिया
मालक... रोजची आंघोळ वायली आणि
In reply to अहो पण रोज नाही करत ना ? ते by गांधीवादी
अश्या किती वायल्या आन्घोळ्या
In reply to मालक... रोजची आंघोळ वायली आणि by अवलिया
**च्या नावाने आंघोळ करणे हा
In reply to अश्या किती वायल्या आन्घोळ्या by गांधीवादी
१ ते ५ वेळाला मत दिले आहे ...
आणखी एक ...
In reply to १ ते ५ वेळाला मत दिले आहे ... by sagarparadkar
चपला घालून गाडी चालवत जा असा
In reply to आणखी एक ... by sagarparadkar
नाही
तरीच
In reply to नाही by नितिन थत्ते
साप, नाग ६-७ वेळा स्वप्नात
प्रकाटाआ.
काही वर्षांपूर्वी कॅनडात एक
२६ ते ३० ला मत दिले आहे.