मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्वोत्तम मराठी कादंबरी कोणती?

प्रचेतस · · कौल

वाचने 2364 वाचनखूण प्रतिक्रिया 33

प्रचेतस 03/09/2010 - 17:15
कौलाचा हेतू हाच की सर्वोत्तम मराठी कादंबरी वाचकांसमोर यावी. इतर कादंबर्‍यांच्या अनुल्लेखामागे त्यांना कमी लेखण्याचा हेतू नाही तर ती कौलाची मर्यादा समजावी. वाचकांनी त्यांना सर्वोत्तम वाटणारी कादंबरी त्यांनी खुशाल इथे द्यावी. संपादकांना सूचना - अजून 'इतर' असा एक पर्याय कौलात अ‍ॅड करावा. नजरचुकीने राहीला. स्वसंपादन सुविधा नसल्याने टाकता आला नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

तर्री 04/09/2010 - 23:10
माझ्या आवडीच्या काही शिरूभाऊंची रथचक्र हीच प्रथम चमकुन गेली. दळवी हा एक क्रमांकाचा कादंबरीकार . त्यांची "धर्मानंद" पर्यायांमधे हवी(च) होती. पण सरे प्रवासी घडीचे व महानंदा ही ऊत्तम. धाकट्या माडगुळकरांची " बनरग वाडी " ही एक सर्वोच्य कादंबरी. कविता महाजनची ची "ब्र" ही अलीकड्ची सशक्त चीज आहे. बाकी "कॅलीडोस्कोप" ही अच्युत बर्वे याची एक दरजेदार कादंबरी आहे. ( जरूर वाचावी अशी ) "इजाळ " ही ऊत्तम बंडू तुपे यांची एक दुर्लक्शित कादंबरी आहे . झक्क आहे. चानी / रात्र काळी घागर कळी इ. खानोलकरंची कादंबरी आवडीची आहे.

In reply to by तर्री

चिगो 09/09/2010 - 12:49
वरील यादीत सुशिंची "कल्पांत", "दास्तान", "क्षितिज" आणि ब-याच इतर कादंब-या अ‍ॅड करता येतील. माझ्यामते "सुशि" डिड नॉट गेट हिज ड्यू फॉर हिज वर्सटॅलिटी... बाकी वर दिलेल्या कादंब-या उत्तम आहेत. ("कोसला" ??? नेमकं काय होत हो ह्या कादंबरीत? मला नाही कळली बुवा)

In reply to by चिगो

सुहास.. 29/09/2010 - 18:36
सर्वोत्तम मराठी कादंबरी कोणती? >>> कु.कांदबरी अरुण मोरे ..आतापर्यंतची मी पाहिलेली सर्वोत्तम कांदबरी.. ? ऊप्प्स !! अरे ती वाचायची कांदबरी का ? सॉरी-सॉरी.. मग ही घ्या यादी. ययाती, मुर्त्युंजय ( परिकथेतील राजकुमारानी लिहीलेले महाभारत युध्दाचे वर्णन पण मस्त आहे , माझा दोस्त म्हणुन शिफारस करत नाहीये, खरोखरच वाचनीय आहे.) नुकतीच वाचलेली. तिढा -श्रावण मोडक (लवकरच परिक्षण लिहीणार आहे.) यादी खुप मोठी आहे...कुठल्याही एका कांदबरीस (अगदी सुरवातीला ऊल्लेखलेली सोडुन) 'सर्वोत्तम म्हणता येणार नाही , म्हणुन मत द्यायचे टाळत आहे

In reply to by विसोबा खेचर

प्रचेतस 03/09/2010 - 18:25
तुंबाडचे खोत माझीही अत्यंत आवडीची कादंबरी आहेच. जुळे, नरसू खोत, ओड्डल, आपा बेडेकर व त्यांच्या पत्नी, बापू वकील व इतरही अनेक सर्वच एकदम सही पात्रे.

चिंतामणी 03/09/2010 - 18:36
श्रीं. नां.च्या कुठल्याही कादंबरीला सर्वोच्च स्थान मिळू शकत. मग ती लव्हाळी असो, गारंबीचा बापू वा इतर कुठलिही. श्रीं. ना. पेंडसे या नावाला मत आधी आहे. खरेतर हा कौल श्रेष्ठ कादंबरीकार कोण या साठी हवा होता.

In reply to by चिंतामणी

विंजिनेर 03/09/2010 - 18:52
असंच काही नै काई... गारंबीची राधा काय खास नाहिये. म्हणजे 'बापू'ने अपेक्षा वाढवून ठेवल्या त्या पूर्ण करता आल्या नाहीत शिरूभाऊंच्या 'राधे'ला बहुदा...

In reply to by चिंतामणी

प्रदीप 04/09/2010 - 12:59
ह्यांच्या पूर्वीच्या लिखाणाविषयी अपार आदरच आहे. पण
[त्यांच्या] कुठल्याही कादंबरीला सर्वोच्च स्थान मिळू शकत
ह्या विधानाशी असहमत आहे. दोन-चार वर्षांपूर्वी आलेली त्यांची 'कामेरू' ही कादंबरी आपण वाचावी व हे मत तसेच राहते आहे का ते सांगावे.

अनाम 03/09/2010 - 18:55
बर्‍याच आहेत. वर कौलात म्हटल्या प्रमाणे मृत्युंजय त्या खेरीज, स्वामी, श्रिमानयोगी, शेहेनशाह, तुंबाडचे खोत, गारंबीचा बापु,पानिपत,ययाती,संभाजी...................

अनिल २७ 04/09/2010 - 12:50
मृत्युंजय व ययाती मधून निवड होत नव्हती, शेवटी मृत्युंजयला मत दिले.. पण ययाती देखील अतिशय सुरेख आहे.. विशेषतः ययातीचा ऊत्तरार्ध तर सुपर्ब ! बाकी वरील पर्यायांमध्ये रणजित देसाईंची 'स्वामी' असायला हवी होती असे वाटले..

केशवपुत 04/09/2010 - 13:52
ह्या सगळ्या कादंबरी ची वेगवेगळी ओळख आहे. मृत्युंजय - शिवाजी सावंत दुनियादारी - सुहास शिरवळकर सर्वोत्तम!!!

विसुनाना 04/09/2010 - 16:30
वरील कादंबर्‍यांबरोबरच शोधयात्रा आणि मुंबई दिनांक ('सिंहासन') या अरूण साधू यांच्या कादंबर्‍याही उत्तम आहेत. श्रीनांच्या कादंबर्‍यांचाही उल्लेख हवाच! तुंबाडचे खोत, रथचक्र. शिवाय नेमाड्यांची 'हिंदू'. लक्ष्मण मान्यांची 'उपरा'.

In reply to by विसुनाना

प्रचेतस 04/09/2010 - 16:40
>>वरील कादंबर्‍यांबरोबरच शोधयात्रा आणि मुंबई दिनांक ('सिंहासन') या अरूण साधू यांच्या कादंबर्‍याही उत्तम आहेत. पण त्या सर्वोत्तम नाही म्हणता येणार. साधूबुवांचीच 'मुखवटा' म्हणून वर्‍हाडी पार्श्वभूमीवरील एक मोठी कादंबरी आहे. ती उपरोक्त दोन्ही कादंबर्‍यांपेक्षा सुरेख आहे. थोडीफार तुंबाडच्या खोतांच्या वळणानेच जाणारी आहे. >>श्रीनांच्या कादंबर्‍यांचाही उल्लेख हवाच! तुंबाडचे खोत, रथचक्र. तुंबाडचे खोत, रथचक्र सर्वोत्तम आहेतच. निर्विवादपणे. >>शिवाय नेमाड्यांची 'हिंदू' नवीनच असल्याने आणि बहुतेकांनी वाचलेली नसल्याने विचार केला नाही. >>लक्ष्मण मान्यांची 'उपरा'. आत्मचरित्र असल्याने कादंबरी म्हणून समावेश करता आला नाही. :)

गणेशा 06/09/2010 - 19:41
पार्टनर - व.पु काळे . तश्या तर वरती दिलेल्या सर्व कादंबरी मस्त आहेत. परंतु मला तरी पार्टनर ही कादंबरी जास्त आवडते. अतिशय सुरेख आनि वेगळी असलेली ही कादंबरी खरेच ग्रेट निर्मिती आहे. त्या खालोखाल १. पार्टनर - व्.पु. २. सेतु - अशा बगे. ३. महानायक - विश्वास पाटील. ४. ययाती - वि.स ..........

In reply to by गणेशा

मराठमोळा 09/09/2010 - 13:31
कौल थोडा चुकीचा वाटतो.. कादंबर्‍या बर्‍याच आहेत. माझ्या एका मैत्रिणिचे नाव कादंबरी आहे. मला ती पण आवडते. ;) बाकी पर्यायामधील ४ वाचलेल्या आहेत त्यामुळे मत देऊ शकत नाही. :)

अथांग 10/09/2010 - 04:11
कविता महाजन यांची 'ब्र' बरोबरच 'भिन्न' सुद्धा माझी आवडती कादंबरी आहे. व. पु. यांची 'पार्टनर' - कधीही, कुठलंही पान काढुन वाचायला घेतले, तरी मनाचा ठाव घेतेच. माझी प्रचंड लाडकी कादंबरी! बाकी यादीमधल्या सगळ्याच आपापलं वेगळेपण व महत्व राखून. 'कोसला' सध्या वाचतेय - पकड घेतेय कादंबरी, पण सर्वोत्कृष्ठ-सर्वोत्तम असावी असे अजून तरी वाटत नाहीये.

अडगळ 10/09/2010 - 09:00
कळ , खूप लोक आहेत , हे ईश्वरराव हे पुरुषोत्तम राव ,उत्सुकतेने मी झोपलो विलास सारंग : एन्कीच्या राज्यात राजन गवस :तणकट , कळप भाऊ पाध्ये : राडा , होमसिक ब्रिगेड , बॅरीस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर विश्राम बेडेकर : रणांगण नेमाडे : सगळ्या जी के ऐनापुरे : रिबोट रंगनाथ पठारे : टोकदार सावली चे वर्तमान सदानंद देशमुख : बारोमास खानोलकर : अजगर , रात्र काळी घागर काळी (आणि झाडे नग्न झाली) दिनानाथ मनोहर : रोबो मेघना पेठे : नातिचरामि प्रभाकर पेंढारकर : रारंगढांग आता या आणि अश्या कितीतरी अजून आहेत ..

स्वैर परी 29/09/2010 - 18:14
खरे तर, वर दिलेल्या कादम्बरिमधुन मी ३ वाचल्या आहेत. त्यान्तुन निवड करणे कठीण आहे. तरिहि श्रीमान योगी तुलनेत जास्त वजनाची ठरतेय!