ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
In reply to वा! जगाला जे माहिती नाही ते by श्रीगुरुजी
In reply to :) by शाम भागवत
In reply to चर्च बेकायदा आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण ; by मुक्त विहारि
In reply to अमरावतीत भाजपच्या तिरंगा प्रचार रथाची तोडफोड, by मुक्त विहारि
In reply to न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दींवर by श्रीगुरुजी
In reply to सलमान रश्दी रश्दींवरील by वामन देशमुख
In reply to सलमान रश्दी रश्दींवरील by वामन देशमुख
सलमान रश्दी रश्दींवरील हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक त्यांचे सॅटॅनिक वर्सेस या पुस्तकाच्या प्रती खरेदी करीत आहेत.ज्या धर्माच्या लोकांचे शिक्षण व्हावे असे वाटते ते लोक खरेदी करतात काय ? वाचतात काय ? आपल्या चुका मान्य करतात काय ? आपल्यात बदल करतात काय ? दुसर्या धर्मियांनी ते वाचून पहिल्या धर्मियांच्या जीवनात काही बदल होणार आहे काय ? तसे नसेल तर ही कवायत करुन फारसे काही हाती लागेल अशी परिस्थिती नाही असेच म्हणावी लागेल.
In reply to कर्नाटक: शाळेने विद्यार्थ्यांच्या मनगटातील राख्या काढून टाकल्या by निनाद
ख्रिश्चन शाळांमधील हिंदू विद्यार्थ्यांना पद्धतशीरपणे अपमानित करण्याच्या आणि त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरांना लक्ष्य करून त्यांना अपमानास्पदपणे वागवण्याचा घटना घडत आहेत. हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू मुलांचा धर्मावरून छळ केला आहे. हिंदू विद्यार्थ्यांनी ख्रिश्चन शाळांमधे न जाता इतर शाळांमध्ये गेले पाहिजे.मी देखील हाच विचार करुन जिथे हिंदू धर्माचा आदर केला जातो अशा शाळेमधे मुलाला दाखल केले आहे. अर्थात त्याची जास्तिची आर्थिक किंमत मला मोजावी लागतेय हे ही खरेच. असो.
In reply to सहमत ! by धर्मराजमुटके
अर्थात त्याची जास्तिची आर्थिक किंमत मला मोजावी लागतेयत्याचे कारण शिक्षण हक्क कायदा आहे मोदींनी आठ वर्षांत तो कायदा रद्द करायला हवा होता.
In reply to कर्नाटक: शाळेने विद्यार्थ्यांच्या मनगटातील राख्या काढून टाकल्या by निनाद
कर्नाटकातील मंगळुरू येथील कटिपल्ला येथील इन्फंट मेरीज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.केंद्र -राज्य दोन्हीकडे, लोकांना हिंदुत्ववादी वाटणारी भाजपची सरकारे आहेत.
In reply to स्थानिक नगरसेवकाने ध्वजवाटप by श्रीगुरुजी
अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहेमला वाटते की तुमचा स्पष्टवक्ता स्वभाव पाहता ही गोष्ट तुम्ही नक्कीच नगरसेवकाच्या लक्षात आणून दिली असेल. अवांतर : मी घर घर तिरंगा मोहिमेत सहभागी झालो नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकणार्या गोष्टींची यादी वाचली. एवढे सगळे सोपस्कार माझ्याकडून होतील की नाही याची शंका वाटते. तसा मी देव देश आणि धर्माबाबत आस्थेवाईक असलो तरी कर्मकांडांमधे मागे पडतो. त्यापेक्षा १५ ऑगस्ट ला मुलाच्या शाळेत जाऊन तिथल्या मुलांच्या निरागस सान्निध्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरविले आहे.
In reply to अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहे by धर्मराजमुटके
In reply to राजहंसाचे चालणे by आनन्दा
In reply to स्थानिक नगरसेवकाने ध्वजवाटप by श्रीगुरुजी
In reply to हा प्रकार by जेम्स वांड
In reply to झेंड्याच्या नावाने बालिशपणा by आग्या१९९०
In reply to हेतू by जेम्स वांड
In reply to "हर घर तिरंगाने" झेंड्याचा by डँबिस००७
In reply to "हर घर तिरंगाने" झेंड्याचा by डँबिस००७
In reply to ज्या प्रमाणात "लाल सिंग by डँबिस००७
सखोल आराखडा तयार केलेला आहे अशी बातमी आहे. (बातमीचा दूवा देता येणार नाही)अंतस्थ गोटातली बातमी असल्यास अन् ती पक्की असल्यास तुम्ही ती पोलीस, आयबी/ रॉ वगैरे लोकांना देऊन आपल्या नागरिक जबाबदारीचे पालन करणे जास्त श्रेयस्कर. पब्लिक फोरम वर असे काही बोलताना आपणांस किमान विदा देता येत नसतील तर त्या वक्तव्याची जबाबदारी तरी वैयक्तिक रित्या घेण्याची तसदी उचलली पाहिजे, उद्या तुम्ही विदा लिंक काहीही उपलब्ध नाही/ देता येणार नाही/ देणार नाही म्हणून काहीही दामटून लिहाल तर त्याला काय अर्थ असेल !
In reply to काहीही by जेम्स वांड
In reply to जनतेला by कपिलमुनी
In reply to एखाद्या व्यक्तीने by आग्या१९९०
:)