Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ३)

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 13/07/2022 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या प्रमुखपदावर अश्विनी भिडे या आय.ए.एस अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्याच पदावर कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकारने त्यांना पदावरून हटविले होते. त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रोच्या कामात अक्षम्य दिरंगाई केली होती. ते काम वेगाने पुढे सरकून मेट्रोच्या सगळ्या लाईन्स पुढील दोन अडीच वर्षात सुरू झाल्या तर मुंबईकर नक्कीच फडणवीसांना शतशः धन्यवाद देतील. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/ashwini-bhide-is-back…

वाचने 23763
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

मविआ सरकार ने काय काय चुका केल्या याचे एक मोठे पुस्तक होईल. कोणी काय चुका केल्या याचा जनता हिषेब करेलच. पण लोकांची कामे लवकर मार्गी लागावी हीच इच्छा. एकाच गोष्टीसाठी अनेक जागी एफ आय आर नोंदविणे या वर काहितरी करायला हवे. सरकारवर / राज्यकर्त्यांवर कोर्टानेच हा अंकुश घालायला हवा. हा मानसीक छळ आहे आहे.

In reply to by विजुभाऊ

मविआ सरकार ने काय काय चुका केल्या याचे एक मोठे पुस्तक होईल. मोदी सरकारने काय काय चुका केल्यात ह्यावर कादंबरींचे ७ खंड होतील

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदी सरकारने काय काय चुका केल्यात ह्यावर कादंबरींचे ७ खंड होतील तुम्ही पटापट लिहायला घ्या बरं रद्दीला बरा भाव मिळेल

सध्या आंतररष्ट्रीय स्तरावरदेखील बर्‍याच उलटसूलट घटना घदत आहेत. दुर्दैवाने एकही मराठी चॅनेल किंवा युट्यूब ब्लॉगर याबद्दल काहीच बोलत नाहीत. बहुतेक मराठी न्यूज चॅनेल्स तर गावपातळीवरच्या वर्तमानपत्राप्रमाणेच वागत असतात. आणि विनोदी देखील उदा: एकाने पवारांचे भाषण दाखवायला सुरवात केली तर प्रत्येक चॅनेलवर तेच दाखवत असतात. काय साध्य करतात कोण जाणे. अमेरीकेने न्यूयॉर्क मधे लोकांना अणू बाँब हल्ल्या वेळेस काय काळजी घ्यावी याचा व्होडीओ शेअर केलाय. फिलीपाईन्सला त्यांच्यावर चीन आक्रमण करेल अशी भिती वाटतेय. अमेरेकेला रशिया त्यांच्यावर हला करेल अशी भिती वाटतेय युक्रेन युद्द संपायचे नाव घेत नाहिय्ये. श्रीलंका अराजकतेच्या उंबरठ्यावर उभी आहे.. तरीही तिथले नागरीक शिस्त पाळताहेत. पाकिस्तान मधे सरकारकडे परकीय चलनाचा प्रचम्ड तुटवडा आलाय अमेरीका ऑस्ट्रीलिया मधे लश्करी तळ उभा करायच्या हालचालीत आहे. अटक केलेल्या पाकिस्तानी पत्रकार /आयएसाय च्या एजन्टाने माजी उपराष्ट्रपतींशी आपले संबन्ध आल्याची कबुली दिली आहे. ( यात हमिद अन्सारींचा गुन्हा आहे असे नाही)

In reply to by विजुभाऊ

युक्रेन मधील युद्ध म्हणजे रशियन सरकारची रोजगार हमी योजना असावी. सोमवार ते शुक्रवार युद्धकाम करा. शनि/रवी सुटी. दुपारी एक ते दोन लंच . कितीही अर्जंट बांब टाकायचे असतील तरी एक तासानंतर या. परत कुठला सण आला तरी सुटी. अश्या पद्धतीने युद्ध चालले आहे. रशियाने युक्रेन वर भीषण हल्ला चढवला नाहीये. अजुनही युक्रेन मधील वीज निर्मीती , दळण्वळण यंत्रणा सुव्यवस्थीत चालु आहेत. खरे तर युरेन मधले सैनिक काम करण्या पूर्वी आधी नीट सेल्फी काढतात. एक सैनिक तोफ चालवत असेल तेंव्हा दुसरा थोडा लांब उभा राहुन व्हिडीओ शुटींग करतो. एक ड्रोन जमीनीवरचा रणगाडा उध्वस्त करतो तेंव्हा दुसरा ड्रोन त्याचे शुटींग करतो. आणि ड्रोन वर नियंत्रण ठेवणारा हे सुद्धा अपलोड करतो. आणि हे सगळे युटयुब वर अपलोड करतो. असे ओन्लाईण पद्धतीने युद्ध चालले आहे. रशियन सैनीक ही युक्रेनच्या सैनिकांना मारण्ञापूर्वी सांगतो. ' गडया , तुझी माझी काय दुष्मनी नाही, पण केवळ मी माझे कर्तव्य म्हणून तुला मारतोय. जरा तिकडे दूर जाउन उभा रहातोस का ? म्हणजे माझा सवंगडी नीट शुटींग करु शकेल. अरे यार आमचा एक व्हॉट्साप गृप आहे प्लॅटुन बबुष्का युद्ध २२-२३ त्यावर टाकावे लागेल. शिवाय एका दिवसात अमुक अमुक लोक मारले की आम्हाला इन्सेण्टीव्ह मिळतो. तेंव्हा प्लीज तिकडे जाउन उभा रहा ’ ढुचक्यांव..............

पाकिस्तान मधे सरकारकडे परकीय चलनाचा प्रचम्ड तुटवडा आलाय आम्ही गावात खाऊन राहू पण अणुबॉम्ब बनवू असे श्री झुल्फिकार अली भुट्टो म्हणाले होते. अणू बॉम्ब बनवला आता गवत खाऊन राहण्याची स्थिती पण आली आहे. https://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/50-years-ago-pakista… किती द्रष्टा होता हा माणूस

In reply to by सुबोध खरे

भारतीय नेतृत्व किती द्रष्ट्ये होते याचा प्रत्यय अशा प्रसंगी येतो.. एकाच धर्माचे , एकाच भौगोलिक प्रदेशात राहणारे लोक अशा अवस्थेत गेले आहेत. त्याच वेळी सुरूवात करणारे आपण विविधता असूनही प्रगती पथावर आहोत

In reply to by कपिलमुनी

आजकालच्या फॅशननुसार नेहरुंना मीही शिव्या घालायला सुरुवात केली होती. अजूनही बुद्धी शाबुत असणार्‍या एका मैत्रिणिने वेळीच कुरुंदकर वाचायला देऊन नेहरुंवरचा लेख तोंडपाठच करून घेतला. काही का असो, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि गुजराल आणि देवेगौडासारखे अपघाती पंप्र वगळता ममोंपर्यंत उर्वरित पंतप्रधानांना काय टिकवायला हवे याची खोलवर जाणीव होती. सिस्टीमचा साकल्याने विचार करण्याची क्षमता होती. आपला एखादा निर्णय किती मोठा परिणाम घडवून आणू शकतात याचा बेसिक सेन्स होता. निश्चलनीकरणासारखा बिनडोक निर्णय घेण्याचा धडाका जर या लोकांनी लावला असता तर देशाचं भजंच झालं असतं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

याने मत बदलले आहे, असा माणूस शोधत होतो. तुंम्ही सापडलात! हळूहळू लोकांच्या खरे देशहित कशात आहे, हे लक्षात येऊ लागेल, हीच आशा. आता अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत असून रूपया आज डॉलरला ८० असा अभूतपूर्व निचांकी भाव झाला आहे. बेरोजगारी वाढतच चालली आहे. नुकताच वनिकरण कायद्यात बदल करून कंपन्यांना जमीन देण्यासाठी जी ग्रामसभेची मंजूरी लागत असे, तीच आता लागणार नाही. पर्यावरणाबाबत आपला देश खाली चाललाय. परंतु खर्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रतिके, घोषणा इ. आक्रमक करणार्यांच्या मागे लोक लागतात, हे अत्यंत निराश करणारे आहे.

In reply to by स्वधर्म

हळूहळू लोकांच्या खरे देशहित कशात आहे, हे लक्षात येऊ लागेल लोक हुशारच असतात हो, त्या त्या वेळी जो योग्य पर्याय उपलब्ध असतो तोच निवडतात. साध्याला भाजपा योग्य वाटतोय म्हणून भाजपला मत देतात. तुम्हला वाटतय म्हणून भाजपाला विरोध करणे म्हणजे देशहित होत नाही किंवा भाजपला मत देणें म्हणजेही देशप्रेम होत नाही. दिल्लीतल्या लोकांनी विधानसभेला केजरीवालला तर लोकसभेला मोदींना मत दिली. आपल्या मताशी सहमत असेल तरच देशप्रेम अस काहीही नसतं.

In reply to by स्वधर्म

आता अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत असून रूपया आज डॉलरला ८० असा अभूतपूर्व निचांकी भाव झाला आहे चष्मा लावला कि असं होतंय खरं. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे पेट्रोलियम चे भाव कडाडल्यामुळे जगातील सर्व चलनांचे अवमूल्यन झालं आहे. युरो २० % कमी होऊन १. १९ डॉलर ला १ युरो पासून १ डॉलर ला १ युरो असा खाली आला आहे. The euro’s swift fall, from $1.19 this time last year to $1 on Wednesday. https://www.ft.com/content/f3043f9b-5fb8-4147-b34a-5595b9621746 जपानचा येन सुद्धा १०४ चा १३० पर्यंत घसरला आहे. After trading at 104 to the US dollar at the start of 2021, the yen began to weaken, a trend that accelerated in 2022. By June, the yen was well below 130 to the dollar, a low not seen in decades. China’s yuan slips to 17-month low against US dollar as economic pressures mount https://www.scmp.com/economy/china-economy/article/3175817/chinas-yuan-… चष्मा काढला कि जग कसा स्वच्छ दिसतं. पहा तरी

In reply to by स्वधर्म

हळूहळू लोकांच्या खरे देशहित कशात आहे, हे लक्षात येऊ लागेल हे बाकी बरोब्बर बोललात! २०१४ पेक्षा २०१९ मधे जागा वाढल्या. २०२४ मधे अजून जागा वाढल्या की मग हळूहळू लोकांच्या खरे देशहित कशात आहे, हे लक्षात आलंय असे म्हणता येईल :=)

In reply to by रंगीला रतन

मनमोहन सरकारच्या काळात क्रुड तेलाचे भाव शंभरीच्या पलिकडे असतानाही सरकारने पेट्रोल ७० रू दराने कसे दिले असेल? अग्नीवीर सारखी योजना न आणताही संरक्षण क्षेत्रात चांगले भरीव काम कसे करत असेल? सराऊ व अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर कसा चांगला ठेऊ शकले असेल? पंतप्रधान पत्रकारांना न घाबरता कसे सामोरे जाऊ शकत असतील? कोणतीही अस्मिता गोंजारणारी, आक्रमकत चिन्हे, स्मारके, घोषणा न करता काम कसे करत असतील? चांदणे, डॉक्टर, रतन, तुंम्हाला असे प्रश्न कधीच पडत नाहीत का? का दुसर्यांना चष्मा वगैरे म्हणून आपल्याला वाटतं तेच बरोबर असं वाटतं. मी तरी कुणावर असे शेरे मारल्याचे आठवत नाही. जसं वर म्हटलं तसं आपल्यासारख्या लोकांची मते कशी बदलतात याविषयी मला खूप उत्सुकता आहे. म्हणून हणमंत आण्णा यांना विचारले. त्यावर तुंम्ही अशी काही शेरेबाजी सुरू केलीत, की पुढे काही चर्चा करण्यात अर्थच नाही असे वाटते.

In reply to by स्वधर्म

मनमोहन सरकारच्या काळात क्रुड तेलाचे भाव शंभरीच्या पलिकडे असतानाही सरकारने पेट्रोल ७० रू दराने कसे दिले असेल?
In December 2021, speaking in Parliament, she had quoted from then Prime Minister Manmohan Singh’s 2008 address to the nation: “I would like the nation to remember that issuing bonds and loading deficits on oil companies is not the permanent solution to this problem (of high fuel prices). We are only passing our burden to our children who will have to repay this debt.” https://indianexpress.com/article/explained/the-economics-of-oil-bonds-…

In reply to by Trump

तुंम्ही काही संदर्भ दिला तर मी अजून उलटा आणखी एक संदर्भ देऊ शकतो. सतत येणार्या माहितीच्या महापुरात आपण सर्वच जण वाहून जात आहोत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आर्थिक, सामाजिक क्षेत्रात जे बदल घडतात ते जास्त महत्वाचे असतात असे वाटते. आता मनी कंट्रोल सारख्या कोणतीही बाजू न घेणार्या संस्थळावरील लेख काय म्हणतो तेही पहा: https://www.moneycontrol.com/news/business/markets/explained-what-are-o… Are oil bonds alone to be blamed for high fuel prices? The Modi-led NDA government has blamed these oil bonds that are hitting payback time now for the Centre’s inability to cut taxes and enable cheaper petrol and diesel. The government has to repay Rs 10,000 crore in the current fiscal year, another Rs 31,150 crore in 2023-24, Rs 52,860 crore in 2024-25, and Rs 36,913 crore in 2025-26. On an accumulated basis this is still far less than what the government collects from central excise duties on petroleum products alone. For instance, in 2020-21 it collected Rs 3.71 lakh crore as central excise revenues from petroleum products, nearly three times of what it has to pay—Rs 1.34 lakh crore—over the next five years to square up the oil bonds. In effect, repayment of oil bonds issued by the previous government alone is not the only reason why retail fuel prices are high. High crude prices and taxes are key reasons सितारामन त्यांना सोईच्या गोष्टीच उधृत करणार, आणि कॉंग्रेसवाले त्यांच्या सोईच्या. दुसरा भाग मी मान्य करू शकतो, पण पहिला भाग मान्य करणार भाजप समर्थक अजून मला भेटायचाय. न पेक्षा गुरुजीचे काही प्रतिसाद आहेत भाजपाला दोष देणारे, पण मोदी-शहा? ते कध्धी म्हणजे कध्धीच चुकत नाहीत. “आंम्ही करतो ते सगळं, सर्व काळात बरोबरच असंत आणि पूर्वीच्या सरकारने केलेलं सगळं सर्वकाळ वाईट” या रोगाला खरंच औषध नाही. अगदी निश्चलीकरणासारख्या घोडचुकीबाबतही साधा एक शब्द सरकारातील कोणी काढला अजूनपर्यंत काढला नाही. विरोधी पक्ष पूर्णपणे संपवायचाय. हे सगळं प्रचंड लोकशाहीविरोधी आहे. हे समजून घेऊन आपली मते काही प्रमाणात तरी दुरूस्त करणाची शक्तीच लोकांकडून नष्ट होत चालली आहे.

In reply to by स्वधर्म

विरोधी पक्ष पूर्णपणे संपवायचाय. हे सगळं प्रचंड लोकशाहीविरोधी आहे.
बाकी सगळं सोडा हो. विरोधकांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठविले जात आहे का? त्यांना निवडणुक लढवायला बंदी आहे का? नाही ना? मग विरोधी पक्ष निवडणुकीतून संपवला जात असेल म्हणजे सामान्य लोकांनाही विरोधी पक्ष संपवायचा आहे असे असल्यास तर ते का हा विचार कधी करणार आहेत की नाही हे लोक? सामान्य माणूस आपल्या देशाला भारतमाता म्हणतो आणि त्याच देशाचे तुकडेतुकडे करायची स्वप्ने बाळवणार्‍यांना विरोधी पक्ष 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' या नावाने डोक्यावर घेतो. अशा विरोधी पक्षाशी आपलेपणा वाटणे सामान्य लोकांना कमी झाल्यास तो दोष आपलाच आहे हे त्यांना समजणार आहे की नाही? मग कसलं डोंबलाचं लोकशाहीविरोधी आणि कसलं काय.

In reply to by स्वधर्म

अग्नीवीर सारखी योजना न आणताही संरक्षण क्षेत्रात चांगले भरीव काम कसे करत असेल? २०९४-२०१४ या काळात संरक्षण क्षेत्रात कोणती भरीव कामे झाली? राफेल विमान खरेदीसाठी पैसे नाहीत असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीच संसदेत सांगितले होते. सैनिकांची धार्मिक आधारावर मोजणी करण्याचा अत्यंत वाईट निर्णय याच सरकारने घेतला होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहितांना याच सरकारने अडकविले होते. त्यांना अडकविताना सैन्यदलाच्या नावाने थापेबाजी याच सरकारने केली होती. २६/११ च्या हल्ल्यानंतरही सैन्याला गप्प बसायला लावले याच सरकारने. सराऊ व अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर कसा चांगला ठेऊ शकले असेल? २००५-१४ रा १० वर्षातील सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचे दर आहेत - ७.९२, ७.९२, ८.०६, ७.६६, ३.०९, ७.८६, ८.५०, ५.२४, ५.४६, ६.३९ २०१५-२१ या ८ वर्षातील सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचे दर आहेत - ७.४१, ८.०, ८.२६, ६.८०, ६.४५, ३.७४, -६.६०, ८.९५ या काळातील २ वर्षात कोरोना साथ, लॉकडाऊन, पर्यटनबंदी, उत्पादनबंदी अशा अनेक कारणांमुळे हा दर खूप कमी झाला होता. उर्मरीत ६ वर्षांचा सरासरी दर मनमोहन सिंग सरकारच्या काळातील सरासरी दरापेक्षा जास्तच आहे. नमोहन सिंग सरकारच्या काळात कोरोना ही समस्या तर अजिबात नव्हती. तरीही उत्पन्नदर फारसा वाढलेला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

संरक्षण क्षेत्रात मनमोहनसिंगांच्या सरकारने केलेले आणखी एक भरीव काम म्हणजे लडाखमधील दौलतबेग ओल्डी या ठिकाणची धावपट्टी. १९६२ च्या युध्दानंतर अनेक दशके ही धावपट्टी धूळ खात पडली होती. अक्साई चीनला जवळ असलेल्या या धावपट्टीचे महत्व मोठे होते. त्या धावपट्टीची दुरूस्ती करून ती परत वापरात आणण्यासारखी करावी म्हणून हवाईदलाचे त्या भागातील अधिकारी प्रणवकुमार बर्बोरा यांनी संरक्षण मंत्रालयाला अनेक पत्रे लिहिली होती. त्या पत्रांची दखलही घेतली गेली नाही. शेवटी मनमोहन सरकार हे काम करणे शक्य नाही हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ती दुरूस्ती करून घेतली. त्यासाठी पैसे त्यांनी कुठून मिळवले? तर इतर ठिकाणी वापरात असलेल्या हवाईदलाची installations च्या देखभाल/दुरूस्ती या नावावर जास्त पैसे मंजूर करून घेतले आणि ते जास्तीचे पैसे त्यांनी दौलतबेग ओल्डीला वापरून ते काम करून घेतले. हे करताना आपले कोर्ट मार्शल होईल ही भिती असूनही त्यांनी ते काम करून घेतले- कारण का तर काहीही झाले तरी मनमोहन सरकार ते करणे शक्य नाही हे समोर दिसत होते. ही घटना २००८ ची. प्रणवकुमार बर्बोरांनी दौलतबेग ओल्डीच्या जगातील सर्वात उंचीवरील विमानाच्या धावपट्टीवर हवाईदलाचे मोठे मालवाहतूक विमान उतरवले आणि असे असे झाले आहे हे दिल्लीला कळले. त्या कारणासाठी बर्बोरांविरूध्द कोर्ट मार्शल करायची हिंमत मनमोहन सरकारला झाली नाही. कसे करणार? शेवटी चीनबरोबर एल.ए.सी जवळच्या आपल्या संरक्षणसिध्दतेसाठी त्यांनी मोठे पाऊल उचलले होते आणि त्या कारणासाठी त्यांना काढले असते तर देशात त्याविरोधात काहूर उठले असते ते आपल्याला झेपणार नाही ही खात्री कदाचित असावी. त्यानंतर गलवान- दौलत बेग ओल्डी या भागात रस्ते बांधायचे काम मोदी सरकार आल्यावर झाले. म्हणजे प्रकल्पाची सुरवात मनमोहन सरकार असतानाच झाली होती पण इतर शेकडे प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्प पण रखडला आणि मनमोहन सरकार असताना तिथे फार प्रगती झाली नव्हती. जून २०२० मध्ये गलवान खोर्‍यात चीनी सैन्याविरोधात जो संघर्ष झाला त्यामागचे कारण ती भारताची संरक्षणसिध्दता हे होते.
२००५-१४ रा १० वर्षातील सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचे दर आहेत - ७.९२, ७.९२, ८.०६, ७.६६, ३.०९, ७.८६, ८.५०, ५.२४, ५.४६, ६.३९
नुसते आकडे दिशाभूल करणारे असतात. मनमोहन सरकारने सुरवातीला भरीव वाढीचा दर दाखवला त्यामागे त्यापूर्वी सत्तेत असलेल्या वाजपेयी सरकारने घेतलेले चांगले निर्णय होते. मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण, महामार्गांचा विकास, वीज आणि रस्ते क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप आणणे, वीज क्षेत्रातील २००३ च्या वीज कायद्यानुसार केलेले बदल आणि त्याबरोबरच महागाई आणि वित्तीय तूट नियंत्रणात ठेवल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणुक यायला लागली. या सगळ्याचा आपसूक फायदा मनमोहन सरकारला पहिली ३-४ वर्षे झाला. २००६ मधील एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे खाजगीकरण आणि २०१० मध्ये कोल इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन- रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन यांच्यातील निर्गुंतवणुक वगळता मनमोहन सरकारने त्या दिशेत फार कसलेच निर्णय घेतले नव्हते. त्याचा परिणाम नंतरच्या काळात मनमोहन सरकारने दाखविलेल्या विकासदरातही झाला.

In reply to by स्वधर्म

नुकताच वनिकरण कायद्यात बदल करून कंपन्यांना जमीन देण्यासाठी जी ग्रामसभेची मंजूरी लागत असे, तीच आता लागणार नाही. पर्यावरणाबाबत आपला देश खाली चाललाय. फक्त मिपाच नाही तर इतर सोशल मीडियावरही ह्यावर कोणी उत्तर द्यायला तयार नाही. कारण एकच, जोपर्यंत वरून काही युक्तिवाद आयटी सेलकडून येत नाही तोपर्यंत खालचे कळबडवे उत्तर देणार नाहीत. गैरसोयीच्या प्रश्नांना बगल दिली जाते, मग ते नोटाबंदी असो किंवा वस्तू सेवा कर असो. जमीन अधिग्रहणवर सरकारने माती खाल्ली, कृषी कायद्यांनी तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. वनसंवर्धन कायद्यातील बदल वर बोलायची सोयच ठेवली नाही. त्यात आता सेंद्रिय शेतीचे खुळ शिरले डोक्यात. सगळा आनंदी आनंद आहे.

In reply to by कपिलमुनी

भारतीय नेतृत्व किती द्रष्ट्ये होते याचा प्रत्यय अशा प्रसंगी येतो.. एकाच धर्माचे , एकाच भौगोलिक प्रदेशात राहणारे लोक अशा अवस्थेत गेले आहेत. त्याच वेळी सुरूवात करणारे आपण विविधता असूनही प्रगती पथावर आहोत अगदी खरय !! भारतीय नेतृत्व किती द्रष्ट्ये होते याचा प्रत्यय येण्यासाठी असा विचार करा , मुसलमानांनी १९४७ च्या पुर्वी आपला वेगळा देश मागीतला, त्यावेळच्या द्रष्ट्या नेत्यांनी त्यांची मागणी मान्य करत त्यांना असा देश देऊन टाकला. त्या वेळच्या भारतातले फक्त काही % मुसलमान तिथे गेले, म्हणजे पुर्ण मुसलमान लोकसंख्या तिथे गेली नाही. हिच मुस्लिम लोक आज म्हणतात की आमच्या कडे त्यावेळेला पाकिस्तानात जायच की नाही ह्याचा "चॉईस होता" आणि आम्ही भारताला निवडल. म्हणजे जर मुसलमानांना चॉईस होता मग हिंदुंच्या पुढे काय चॉईस होता ? त्यावेळेला मुसलमानांनी हिंदुच्या भारतात रहायच नाही म्हणून वेगळा देश मागीतला वर " त्यांना चॉईस होता" काय विडंबना आहे. हेच मागे राहीलेले मुस्लिम लोक आज ईंडिया व्हीजन २०४७ चा विचार करत आहेत. जो भारत हिंदुंसाठी मागे ठेवला होता तो सुद्धा आता ईस्लामिक राज्य बनवायचे स्वप्न उराशी बाळगुन भारताच्या वैविध्यपुर्ण समाजात रहात आहेत. फाळणीच्या वेळी तिथे असलेल्या हिंदुंना पाकिस्तान सोडुन परत येण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता पण भारतातल्या मुसलमानांना मात्र तेंव्हा ही पर्याय होता "चॉईस होता" सुनिल दत्त, प्राण, सारखे उच्च भ्रु लोक पाकिस्तान सोडुन भारतात परतले होते कारण शिकलेल्या त्या लोकांकडे ईत्यंभुत माहीती होती की पाकिस्तान बनतोय, व देशातले नेते त्याला परवानगी देताहेत, त्यामुळे पुढे काय वाढुन ठेवलय याची जाणीव त्यांना होती. ते आपली जमिन, घर सोडुन नेसत्या वस्रानिशी भारतात परतले. पाकिस्ताना मागे राहीलेल्या हिंदु, व मुस्लिमेतर लोकांची संख्या एकुण जन संख्येच्या २१% होती ती आजच्या घडीला फक्त २% राहीली आहे. पाकिस्तानात फाळणीच्या वेळेला मागे राहीलेल्यात, पेपर न वाचणारे, रेडियो नसणारे गोर गरीब, दलित, मागे राहीले. आयुष्य भर ह रीजनांचा कळवळा असलेल्या म गांधींना पाकिस्तानात मागे राहिलेल्या हरीजनांची किती काळजी होती हे त्यांच्या त्यावेळच्या वागण्यावरुन दिसलेच होते.

In reply to by डँबिस००७

पाकिस्तानात फाळणीच्या वेळेला मागे राहीलेल्यात, पेपर न वाचणारे, रेडियो नसणारे गोर गरीब, दलित, मागे राहीले. आयुष्य भर ह रीजनांचा कळवळा असलेल्या म गांधींना पाकिस्तानात मागे राहिलेल्या हरीजनांची किती काळजी होती हे त्यांच्या त्यावेळच्या वागण्यावरुन दिसलेच होते. त्यावेळी पाकिस्तानातील ज्या हिंदूंना हि माहिती होती त्यांनी अशा लोकांना शोधून भारतात का आणले नाही? किंवा भारतातील हिंदूंनी तेथे जाऊन त्यांना का आणले नाही? लहानपणापासून ह्या शाखीय तक्रारी ऐकतोय. हे शाखेचे लोक तेव्हा काय करत होते? की महात्मा गांधीजींनी " उठा उठा आपल्या देशात जायची वेळ झाली " असे दारोदारी सांगायची वाट बघत होते?

In reply to by आग्या१९९०

भारतातील हिंदूंनी तेथे जाऊन त्यांना का आणले नाही? संवेदनाहीन सवाल !! फाळणीच्या वेळेला पाकिस्तानातुन भारतात येणार्या ट्रेन्स मध्ये जिवंत माणसे येत नव्हती, मृतदेह येत असत. लाखोच्या संख्येने हिंदु तिथे मारले गेले. जे भारतात होते त्यांनी देवाचे आभार मानले की त्यांच्या परिसराचा पाकिस्तानात समावेश केला गेला नाही. पाकिस्तानातले हिंदु आपला जिव वाचवुन फक्त नेसत्या वस्त्रानिशी तिथुन निघुन आले, त्यातल्या काही लोकांनी होतील तेव्हडी ईतरांची मदत केलेली असेलही. काँग्रेसचे जे नेता ह्या सर्व कृतीला जवाबदार होते त्यांनी पाकिस्तानातुन येणार्या हिंदु कडे पाठ फिरवली. आज दुबईत रहाणार्या श्रिमंत सिंधी लोकांना विचारा ! ते सांगतील निर्वासीत लोकांच दु:ख्ख. जें व्हा आपलीच मातृभुमी आपल्याला परकी होते व आपलेच बांधव आपल्याला निर्वासित म्हणतात त्यावेळेला काय वाटत असेल. त्या लोकांची काय चुक ? "ईंडिया व्हीजन २०४७" ला आपली मुले भोगतीलच , तुमच्या नेत्यांनी केलेल्या दुष्टपणाची फळे,

In reply to by डँबिस००७

ईंडिया व्हीजन २०४७" ला आपली मुले भोगतीलच , तुमच्या नेत्यांनी केलेल्या दुष्टपणाची फळे, आमचे कोणीच नेते नाहीत. तुमचे असतील तर ते तेव्हा झोपले होते का?

Pakistan stares at bankruptcy as economic crisis worsens Pakistani Rupee (PKR) is on a ‘free fall’ as it crossed 212 per USD on June 21. Pakistani Rupee has become Asia’s “worst-performing currency in 2022” Petrol prices in Pakistan have been raised by 56 per cent or PKR 84 (current price: PKR 233 per litre) and high-speed diesel prices have gone up by a massive 83 per cent (current price: PKR 263 per litre) Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/paki…

महाराष्ट्रातील नवीन सरकारचा शपथविधी होऊन १३ दिवस झाले तरी अजून मंत्रीमंडळ अस्तित्वात आले नाही. २०जूनला विधानपरीषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन कॉंग्रेसचा एक उमेदवार पडला व त्याच रात्री सेनेतील बंडखोर आमदार सुरतेत जाऊन बसले. तेव्हापासून २९ जूनला उद्धव ठाकरे राजीनामा देईपर्यंत सलकारी कामकाज ठप्प होते. त्यानंतर ३० जूनला नवीन सरकार येऊनही अजूनही सरकारी कामकाज ठप्पच आहे. म्हणजे मागील २३ दिवसात सरकार असून नसल्यासारखे आहे. ठाकरे सरकार असताना राज्य सरकारने इंधनकर कमी न केल्याने फडणवीसांसहीत सर्व भाजप नेते ठाकरे सरकारवर कठोर टीका करीत होते. इतर राज्यातील पेट्रोल/डिझेलचे दर व महाराष्ट्रातील सर्वोच्च दर याची यादी समाजभाध्यमातून फिरविली जात होती. आता नवीन सरकार येऊन १३ दिवस झाले तरी इंधनकरकपात केली नाही व इंधनदरांची तुलना करणारे समाजमाध्यमावर फिरणारे संदेश अंतर्धान पावले होते. महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा एकदा अकार्यक्षम सत्ताधारी आलेत.

In reply to by श्रीगुरुजी

+१ भाजपेयी किती ढोंगी आहेत हे यातून कळते.ठाकरे सरकारच्या काळात कमी असेलेल वीजबील ह्या सरकारने आल्या आल्या वाढवले. काहीतरी होऊन हे सरकार पडून पुन्हा मविआ यावी अशी अपेक्षा आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

१)नामांतर २)एनडिएच्या/ विरुद्ध उमेदवारास पाठिंबा देणे. आशावादापेक्षा परिस्थिती भयानक आहे.

In reply to by कंजूस

२०१२ मध्ये एन डी ए चे श्री पी ए संगमा हे राष्ट्रपतीपदाची उमेदवार होते हे सुद्धा गारो जमातीचे आदिवासी होते. तेंव्हा शिवसेनेने श्री प्रणब मुखर्जी याना पाठिंबा दिला होता. आता श्रीमती मुर्मू या आदिवासी आहेत म्हणून पाठिंबा दिला हा दावा खरा नाही तर खासदार फुटू नयेत म्हणून घेतलेली तोकडी भूमिका आहे. राजकीय अपरिहार्यता किंवा political complusion. चालायचंच सर्वनाशात अर्धं त्यजेत. सर्वनाश होण्यापेक्षा अर्धे सोडून द्यावे

आज गुरु पौर्णिमा. बऱ्याच वर्षांनी आज शिक्षकांची आठवण. आली. आज सकाळी अस्था पाहताना कळले, ४००० हून जास्त शिक्षाविदांनी भारतीय शिक्षा बोर्डाची पाठ्यक्रम निर्मिती जवळपास पूर्ण केली आहे. बहुतेक पुढच्या वर्षीपासून शिक्षण सुरू होईल.

In reply to by सुखी

आपल्याला गुरू म्हणून मोदींनी आपला उपहास केला हे पवारांनी ओळखले होते. परंतु मूर्ख पवारभक्तांना ते अजूनही खरं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

>>> परंतु मूर्ख पवारभक्तांना ते अजूनही खरं वाटतंय.
आशयाशी सहमत. तथापि एक विनंती, भक्त ह्या शब्दाला हिंदू तत्वज्ञानात एक विशिष्ट अर्थ, भावना, स्थान (~ ethos) आहे. तो शब्द अस्थानी वापरून त्या शब्दाची अवहेलना करू नये. --- In general मिपाकरांना एक विनंती - मोदी समर्थकांना चांगले / वाईट म्हणणे हे आपापल्या राजकीय भूमिकेनुसार ठीक आहे पण त्यांना भक्त म्हणू नये, कारण वरीलप्रमाणे. --- चूभूदेघे

India Vision 2047 PFI has circulated Letter for internal circulation, Not for Public view. पाकिस्तान व तूर्की च्या मदतीने 2047 पर्यंत भारतात ईस्लाम रुल आणणे. १०% भारतीय मूसलमान PFI च्या मागे उभे राहीले तर १०० कोटी नपुंसक, कमजोर हिंदुवर राज्य करता येईल. त्यासाठी देशभरात प्रशिक्षण चालू आहे. बिहार पोलिसांनी ह्याचा छडा लावलेला आहे.

In reply to by डँबिस००७

मोहम्मद जलालुद्दीन हे झारखंड पोलिसांचे निवृत्त अधिकारी आहेत.... -------- ही बाब नजरेआड करून चालणार नाही दाऊद इब्राहीमचे वडील देखील, पोलीसदलांत होते... ------- धर्माच्या नावावर, बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती झाली आहे आणि खालिस्तान चळवळ अजूनही बंद पडलेली नाही...

राज्यातील पेट्रोलवरील कर प्रतिलीटर ५ रूपयांनी आणि डिझेलवरील कर प्रतिलीटर ३ रूपयांनी कमी केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

“…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले जेब्बात! सौ सुनार की एक लोहार की :=) गप्प बसायला राणे कुटुंबीय त्यांना किरीट सोमय्या वाटले का काय :=) :=) केसरकर शिंदेगटाचे संजय राऊत बनायला निघालेत असे वाटतय.

In reply to by रंगीला रतन

शिंदे गटातील काही आमदार अजून द्विधा मनस्थितीत दिसतात. उद्धव ठाकरेंनी थोडी पडती भूमिका घेऊन संवाद साधला तर हे आमदार सेनेत परत जातील. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपला पोकळ अहंकार बाजूला ठेवला पाहिजे व राऊत आणि आपल्या चिरंजीवांना तोंड बंद ठेवण्यास सांगितले पाहिजे.

अमेरिकेत, भारतात किती साधी साधी माणसं कंपन्या काढून श्रीमंत आणि प्रभावशाली झाली आहेत. कुणी आइटीत,कुणी सिनेमात,कुणी स्पेस रॉकेटस,कुणी वाहनक्षेत्रात. लाखांचे पोशिंदेही आहेत.

कालच सिलेंडर घेतला, पुन्हा ५० rs ने वाढ झाली आहे lpg gas सिलेंडर ची. लाईट बिल वाढणार आहे अश्या हि news पाहिल्या.. त्यातून नविन सरकार ने ५ rs पेट्रोल कमी करून थोडा दिलासा दिला आहे, असो. गॅस दरवाढी बाबत, स्मृती सिंडरेला यांची स्मृती गेली आहे असे वाटते.. ४५० rs किंमती वर बस हुई महंगाई कि मार अब कि बार मोदी सरकार ह्या वर रान उठवणारे आता गप्प बसून आहेत, सामान्य लोकांचे कसे कंबरडे मोडले होते ४५० rs नंतर वाढ झाल्याने यावर चर्चा आता होत नाहित... स्मृती ताई आणि news वाले निदान स्वतःशी प्रमाणिक राहत असतील हि अपेक्षा...

In reply to by गणेशा

भाजप ने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले होते. तिथे काँग्रेस , आप किंवा इतर स्थानिक पक्ष कमी पडत आहेत.. महागाई, दरवाढ, पडलेला रुपया , 7 वर्षात तिप्पट झालेले कर्ज अशा कोणत्याही मुद्द्यावर सध्याचा विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीये ...

In reply to by कपिलमुनी

महागाई, दरवाढ, पडलेला रुपया , 7 वर्षात तिप्पट झालेले कर्ज अशा कोणत्याही मुद्द्यावर सध्याचा विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीये ... विरोधी पक्षा कडुन जबरदस्त अपेक्षा आहेत तुमच्या !! ज्यांना अश्या फालतु गोष्टी कडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे ? अशोक स्तंभावरील सिंव्हावर बोला यला ह्यांना वेळ आहे, पण जनतेला भेडसावणार्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत असताना त्यांच्या विरुद्ध भाजपाला आंदोलन करावे लागेल कारण त्यांच्या कडुन जनतेच्या प्रश्नाची दखल घेतली गेली नव्हती. अजुन ही सत्ताधारी पक्षच विरोधी पक्षाने त्यांच्या काळात केलेल्या चुकांबद्दल जाब विचारत आहे, त्यातुन विरोधी पक्षाला वेळ कुठे मिळणार ? पाकिस्तानी आ य एस आय एजंट (नुसरत मिर्झा) भारतात बोलवण्या प्रकरणी पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंसारी ने आता सफाई दिलेली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या रेकमेंडेशनवरच त्यांनी परवानगी दिलेली होती. म्हणजे काँग्रेस सरकार, पंत प्रधान व संबंधीत मंत्र्यांनावरच पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंसारीने सवाल उभे केलेले आहेत. काहीही झाल तरी पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंसारी ने आपल्या अख्त्यारीतले अधिकार वापरुन नेहमी पेक्षा जास्त सवलत ह्या एजंट ला दिलेली होती. असे कारनामे करुन आता सत्ताधारी पक्षवर बोलायचा पुर्ण अधिकारच विरोधी पक्षाने गमावलेला आहे.

In reply to by गणेशा

महागाई कोणालाच आवडत नाही ..पण जी वस्तू स्थानिक ठिकाणी बनत नाही त्यावर सरकार फार मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करू शकत नाही .. खोटा हस्तक्षेप करून स्वस्ताई आणू शकते ! तेवहा २ गोष्टी साहेब १) भारतात आणि ते सुद्धा नालायक भाजप सरकार मुलळे महागाई वाढली आहे आणि काँग्रेस असते तर वाढली नसती असे तुमचे म्हणणे आहे का ? जर हेच मविका किंवा केंद्रात काँग्रेस सत्तेत असते तर एवढ्याच पोटतिडकीने लिहिले असते का तुम्ही ? २) महागाई काय फक्त भारतात वाढली नाहोये .. उदाहरण देतो गृहकर्ज येथे २ महिन्यात आर बी ए ने दोन वेळेस ०.५ % ने वाढवले , पेट्रोल डोळा १,२०-३० पासून २., २,३० प्रति लिटर वर गेले पगार काही असे झटकन वाढत नाहीत .. शोवाय भारतासारखाच आय कर ३० - ४५% पर्यंत भरतो महागाई चे हेंच चित्र अमेरिकेत हि आहे ( इन्फ्लेशन ) मग झाली का जाळपोळ इकडे ? सरकार ला धारेवर जरूर धरा मग ते कोणत्याका पक्षाचे असेना .. आणि टीकेत सुद्धा समतोल असावा

In reply to by चौकस२१२

अमेरिकेतही महागाई ४० वर्षातील सर्वाधिक आहे. अमेरिकेत परवा जाहीर झालेला महागाईचा आकडा यापूर्वी १९८१ मध्ये बघायला मिळाला होता. महागाई हा पूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न झाला आहे. मोदींमुळे महागाई वाढली या अपप्रचाराला फारसा अर्थ नाही. दुसरे कोणी लिहायच्या आत एक गोष्ट लिहितो. महागाई हा राज्यकर्त्यांविरोधात वातावरण बनविणारा एक घटक असतो पण तोच एक घटक असतो असे अजिबात नाही. भारतात कायमच महागाई राहिली आहे. महागाईमुळे सामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले वगैरे गोष्टी पूर्वीही बोलल्या जात होत्या आणि आजही बोलल्या जात आहेत. १९६०-१९७० च्या दशकात अमेरिकेत लिंडन जॉन्सन आणि रिचर्ड निक्सन यांच्या सरकारांनी अवलंबलेल्या धोरणांमुळे तिथे आणि त्यामुळे पूर्ण जगात महागाई होती. त्यात गोल्ड स्टँडर्ड गेले आणि १९७३ मध्ये अरब-इस्राएल युध्द झाले त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.परिस्थिती तेव्हाही इंदिरा गांधींच्या नियंत्रणाबाहेर होती आणि आजही मोदींच्या नियंत्रणाबाहेर आहे. रिचर्ड निक्सननी अमेरिकेत जे काही निर्णय घेतले त्याबद्दल आणि अरब इस्राएल युध्दामुळे तेलाचे भाव एका रात्रीत चौपट वाढले त्याबद्दल इंदिरा गांधींना जबाबदार धरणेही चुकीचे. विरोधी पक्ष तेव्हाही परिस्थितीचा फायदा उठवत होते आणि आताचे विरोधी पक्षही तेच करायचा प्रयत्न करत आहेत. तरीही त्यावेळेस लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले होते ते आता होताना दिसत नाही. गुजरातमध्ये नवनिर्माण आणि बिहारमध्ये संपूर्ण क्रांतीच्या नावावर अक्षरशः अराजक माजावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत आता फार कुठे सामान्य लोक रस्त्यावर उतरले आहेत असे दिसत नाही. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर आले असतील तर त्याविषयी मी लिहित नाहीये तर सामान्य लोकांविषयी लिहित आहे. १९७० च्या दशकात इंदिरा गांधींविरोधात वातावरण होते त्याच्या ५% वातावरणही मोदींविरोधात आहे असे वाटत नाही. अर्थात त्यावेळी परिस्थिती जास्त वाईट होती- महागाईचा दर ३५% होता म्हणजे आतापेक्षा कितीतरी पटींनी जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस स्वातंत्र्य मिळून थोडी वर्षेच झाली होती आणि सगळे काही सोडून आंदोलनात उडी घेणार्‍या लोकांना त्यावेळच्या तरूणांनी बघितले होते त्यांचे अनुकरण करावे ही प्रेरणा असेल कदाचित. त्यावेळेस अहमदाबादच्या एल.डी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडून आंदोलनात भाग घेतला होता. ही ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि पैशापासरी पन्नास इंजिनिअरींग कॉलेज त्यावेळेस नव्हती. तेव्हा इंजिनिअरींगला प्रवेश मिळणे हीच मोठी गोष्ट होती आणि एल.डी कॉलेज म्हणजे काही प्रमाणात मुंबईच्या व्ही.जे.टी.आय सारखे कॉलेज होते. अशा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपली इंजिनिअरींगची जागा सोडून आंदोलनात भाग घेतला होता. आता २०२२ च्या जगात असे काही होणे केवळ अशक्य आहे. पण तेव्हा ते शक्य झाले. म्हणजे आता असे करणारे विद्यार्थी नाहीत ही गोष्ट मोदींच्या बाजूला फायद्याची आहे. तरीही काहीही असले तरी त्यावेळी जे वातावरण होते त्याच्या ५% वातावरणही आता नाही याचे काय कारण असेल? मला वाटते की नुसती बाहेरची परिस्थिती वाईट असली तरी राज्यकर्ता स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करत नसून आपल्यासाठी काहीतरी करत आहे हे चित्र लोकांमध्ये उभे राहावे लागते. १९७० च्या दशकातील इंदिरा गांधींचे सरकार आणि काँग्रेस पक्ष म्हणजे सत्ताधारी माजणे याचे मूर्तीमंत उदाहरण होते. विविध ठिकाणचे सत्ताधारी म्हणजे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले हे चित्र लोकांपुढे होते. इंदिरा गांधींच्या सरकारनेही काही केले नाही असे अजिबात नाही. पण हे विरोधातील मुद्दे त्यांनी केलेल्या चांगल्या कामांना झाकोळून टाकायला पुरेसे होते. विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी तसे चित्र यावेळी नाही. त्याउलट देशात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे चालू आहेत हे लोकांना समोर दिसत आहे. अनेक गरीबांना घरे बांधायला सरकारकडून अर्थसहाय्य केले गेले आहे. शेतकर्‍यांनाही किसान योजनेच्या अंतर्गत थेट खात्यात पैसे मिळत आहेत. असल्या समाजवादी छाप योजना मला आवडत नाहीत हे आधीच स्पष्ट करतो. पण सांगायचा मुद्दा हा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी राज्यकर्ते लोकांसाठी काहीतरी करत आहेत, निदान प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करत आहे हे चित्र लोकांपुढे आता आहे ते तेव्हा नव्हते. त्यावेळी राज्यकर्ते आपले खिसे भरण्याकडे अधिक लक्ष देत आहेत असे लोकांपुढे चित्र होते. हा फरक मोठा आहे. तेव्हा परिस्थिती वाईट असली, महागाई कितीही वाढलेली असली तरी राज्यकर्त्यांविरोधात लगेच मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरत नाही. मोदींची लोकप्रियता पूर्वी होती तितकीच आजही आहे- कदाचित जास्तच असेल. आणि जोपर्यंत मोदी स्वतःसाठी काही न करता लोकांसाठी काहीतरी करत आहेत हे चित्र (सत्य परिस्थिती तशी आहेच का हे मला माहित नाही पण चित्र-- शेवटी राजकारणात तेच जास्त महत्वाचे असते) लोकांपुढे आहे तोपर्यंत विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हा प्रकार केवळ भारतातच बघायला मिळतो असे नाही. अमेरिकेतही तेच झाले होते. १९३६ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट आणि १९८० मध्ये जिमी कार्टर हे दोन अध्यक्ष निवडणुकांना सामोरे गेले तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे परिस्थिती वाईटच होती. १९२९ मध्ये चालू झालेली महामंदी १९३६ मध्ये कायमच होती (फ्रॅ़ंकलीन रूझवेल्ट यांनी स्वतःच्या धोरणांमुळे परिस्थिती आणखी बिघडवली ही गोष्ट वेगळी- सामान्य लोकांना हे सगळे कळत नाही) तर १९६० च्या दशकाच्या शेवटपासून सुरू झालेले अनियंत्रित महागाई आणि मंदीचे (स्टॅगफ्लेशन) चक्र १९८० पर्यंतही तसेच होते. पण १९३६ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट लॅन्डस्लाईडने जिंकले तर १९८० मध्ये जिमी कार्टर विक्रमी फरकाने हरले. ते का झाले? तर १९३६ मध्ये फ्रँकलीन रूझवेल्ट अमेरिकन लोकांसाठी काहीतरी करत आहेत हे चित्र होते तर १९८० मध्ये जिमी कार्टर हे अतिशय निष्क्रीय अध्यक्ष असे चित्र होते. ते कशावरही काहीही करणार नाहीत हे चित्र लोकांपुढे होते. अर्थात जिमी कार्टर भ्रष्ट होते असे कोणीच म्हणणार नाही- अगदी त्यांचे कट्टर विरोधकही हे म्हणणार नाहीत पण ते कमालीचे निष्क्रीय आणि कशाविषयी काहीच करणार नाहीत असे चित्र लोकांपुढे होते. तेव्हा दोन निवडणुकांमधला फरक समोरच आहे.

In reply to by क्लिंटन

+१ आशयाशी सहमत !
सल्या समाजवादी छाप योजना मला आवडत नाहीत हे आधीच स्पष्ट करतो. पण सांगायचा मुद्दा हा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी राज्यकर्ते लोकांसाठी काहीतरी करत आहेत, निदान प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करत आहे हे चित्र लोकांपुढे आता आहे ते तेव्हा नव्हते. त्यावेळी राज्यकर्ते आपले खिसे भरण्याकडे अधिक लक्ष देत आहेत असे लोकांपुढे चित्र होते. हा फरक मोठा आहे.
जरी हे एक मोठे कारण आहे तरी एवढे एकच कारण पुरेसे वाटत नाही. अत्रे, कॉ. डांगे इ. अनेक चांगले भाषापटू लोकांपुढे भाषणं करत तेव्हा लोकं खास वेळ करून त्यांचं ऐकायला जात. अशा लोकांच्या लेखांवर वाचकांच्या उड्या पडत. पण ते त्याप्रमाणात मतपेटीत परिवर्तित झालेले दिसत नाही. लोकांना एक भक्कम पर्याय लागतो. जोवर असा पर्याय निर्माण होणार नाही तोवर कितीही आकांडतांडव केला तरीही तो मतपेटीत पुरेसा परिवर्तित होणार नाही. अशा भक्कम पर्यायासोबत मग जनमतपरिवर्तनाचे काम व्हावे लागते. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यात की मग थेट सत्तांतराचा मार्ग निर्माण होईल. सद्यपरिस्थितीत भाजपला असा भक्कम पर्याय देश पातळीवर कुणीच नाही. त्यामुळे लोकसभेत सत्ताबदल होणे सध्यातरी मृगजळच आहे. आणि असा पर्याय निर्माण होऊ नये यासाठी सगळेच सत्ताधारी प्रयत्न करत असतात. हा एक कुशल राजकीय डावपेच आहे आणि राजकीय पक्षापुरतं म्हणायचं तर त्यात काही विशेष चूक आहे असं मी मानत नाही. मोदींची गुजरातमधली वर्ष घ्या किंवा देशपातळीवरची वर्ष घ्या, भाजपनं हे अगदी चोखपणे हाताळलंय.

दिल्ली असो वा मुंबई सर्वच डॉक्टर एकच गोळी लिहीत होते. डोलो 650. ते हीच गोळी का लिहीत होते. फक्त पैसे हाच उद्देश्य असलेल्यांना डॉक्टर म्हंटले पाहिजे का? The evidence indicates that the group has adopted unethical practice to promote its products/ brands. The quantum of such freebies detected is estimated to be around Rs 1,000 crore, the IT department said. https://www.moneycontrol.com/news/trends/tax-raids-on-dolo-650-maker-of…

दिल्ली असो वा मुंबई सर्वच डॉक्टर एकच गोळी लिहीत होते. डोलो 650. ते हीच गोळी का लिहीत होते. फक्त पैसे हाच उद्देश्य असलेल्यांना डॉक्टर म्हंटले पाहिजे का? The evidence indicates that the group has adopted unethical practice to promote its products/ brands. The quantum of such freebies detected is estimated to be around Rs 1,000 crore, the IT department said. https://www.moneycontrol.com/news/trends/tax-raids-on-dolo-650-maker-of…

एन.डी.एच्या (खरं तर भाजपच्या) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू काल मुंबईत येऊन गेल्या. उध्दव ठाकरे गटानेही त्यांना पाठिंबा दिला आहे तेव्हा परंपरेप्रमाणे त्यांनी मातोश्रीवर येऊन उध्दव ठाकरेंची भेट घ्यावी अशी अपेक्षा त्यांची बहुदा असावी. पण त्याला द्रौपदी मुर्मूंनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणे सोडूनच द्या, त्यांना अन्य कुठेही भेटीलाही बोलावले नाही. इतकी वर्षे युती असल्याने शिवसेनेचे हे फाजील लाड सहन करावे लागत होते. आता तसले काही चालवून घ्यायची काहीही गरज नाही. त्यातही ठाकरे गटात उरलेल्या खासदारांच्या दबावामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला होता त्यामुळे ठाकरेंनी यशवंत सिन्हांना मत द्यायचा निर्णय घेतला असता तरी लोकसभेतील बर्‍याच्यशा शिवसेना खासदारांनी द्रौपदी मुर्मूंनाच मत दिले असते. तसे असेल तर ठाकरेंना विनाकारण महत्व द्यायची काहीही गरज नव्हती. २०१४ पासून ठाकरेंनी जे एकेक प्रकार केले आहेत ते पाहता त्यांना कोणत्याही प्रकारची सौजन्यपूर्ण वागणूक दिलीच जाऊ नये असे वाटते.

सरकार ला धारेवर जरूर धरा मग ते कोणत्याका पक्षाचे असेना .. आणि टीकेत सुद्धा समतोल असावा
नक्कीच,. माझे हि हेच म्हणणे आहे, सरकार आणि त्यांच्या निर्णया विरुद्ध आपली मते आपण मांडली पाहिजेत, एकाच पक्षाची बाजू घेऊन रेटून बोलण्यासाठी आपण नक्कीच अघोषित दलाल नाहीच..
१) भारतात आणि ते सुद्धा नालायक भाजप सरकार मुलळे महागाई वाढली आहे आणि काँग्रेस असते तर वाढली नसती असे तुमचे म्हणणे आहे का ? जर हेच मविका किंवा केंद्रात काँग्रेस सत्तेत असते तर एवढ्याच पोटतिडकीने लिहिले असते का तुम्ही ?
नक्कीच, काँग्रेस सरकार असताना त्यांच्या प्रती हि राग होताच, भ्रष्टाचाराच्या आरोपा मुळे, विविध कारणा मुळे त्यांना हि बोल लावलेलेच आहेत.. येथे एक सांगू इच्छितो, सरकारच्या काही गोष्टींना विरोध करणारा हा दुसऱ्याच पक्ष्याच्या समर्थनात बोलतोय हि मानसिकताच आपण बदलली पाहिजे.. आणि एक, काँग्रेस जाऊन भाजप आले, ह्याला कारण आधी काँग्रेस ला मत देणारे काही लोक बदलले म्हणूनच.. आणि ह्या बदललेल्या लोकांमुळेच सरकार बदलते, ना कि कायम त्या पक्षाची नाकात वेसण घालून बसलेल्या लोकांमुळे.. असो.
२) महागाई काय फक्त भारतात वाढली नाहोये ..
Ok, पण माझे म्हणणे इतकेच आहे, कि ४५० rs वरून गॅस १००० रुपया पलीकडे गेला तर आधी ज्यांनी रान उठवले त्यांना तरी प्रामाणिक पणे आता बोलता येते आहे का नाही? का त्यावेळेस जगात स्वस्ताई होती आणि भारतात महागाई होती? बस हुई महंगाई कि मार असे कोण म्हणाले त्यांनाच जनता प्रश्न विचारणार ना? या मुळे ज्यांनी मते दिले त्यांनी प्रश्न विचारले तर ते काँग्रेसी होतात का? असो खुप घाईत रिप्लाय लिहिलाय, आणि जगाचा अभ्यास माझा नक्कीच नाही, त्यामुळे तिकडे आणि हिकडे असले मला करायचे नाही.. तुम्ही पेट्रोल ३५-५० rs ला देऊ असे आश्वासन कसे देऊ शकता असे प्रश्न विचारलेच पाहिजे, नाही मी रामदेव बाबा चे बोलत नाही, bjp कडून मंत्री जावडेकर पत्रकार परिषदेत बोलले होते.. जाहिराती, मग ती गॅस असो, खड्डे असो का काही याबाबतीत आश्वासन पाळले नाही तर नक्कीच बोलले पाहिजे... का काँग्रेस ने शेण खाल्ले म्हणुन bjp च्या गु खाण्याला चूक म्हणायचे नाही का? असो.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सगळ्या विरोधी पक्षांनी उमेदवारी दिलेले यशवंत सिन्हा म्हणजे नक्की काय चीज आहे हे पुढील एका फोटोवरून समजेल. हा फोटो आहे २०१८ मधील. आय.बी आणि रॉचे माजी प्रमुख अमरजितसिंग दुलात* यांनी पाकिस्तानच्या आय.एस.आयचा प्रमुख असाद दुरानी याच्याबरोबर संयुक्तपणे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाचे नाव होते- The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace. त्या पुस्तकाचा दिल्लीत प्रकाशन समारंभ झाला होता. त्या समारंभासाठी असाद दुरानीला दिल्लीला यायचे होते पण मोदी सरकारने त्याला व्हिसा नाकारला होता. तेव्हा तो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्या समारंभाला पाकिस्तानातून हजर होता. त्या समारंभाला लेखक दुलात यांच्याबरोबरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, फारूख अब्दुल्ला यांच्याबरोबरच हे यशवंत सिन्हाही हजर होते. भारताचे माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी अर्थ-परराष्ट्रमंत्री हजारो भारतीय नागरीकांना ठार मारण्यात हात असलेल्या बरोबर एकाच व्यासपीठावर हजर होते हे किती विलोभनीय दृश्य असेल नाही.. 1 या प्रकारानंतर मनमोहन सिंग आणि यशवंत सिन्हा यांच्याविषयी असलेला उरलासुरला आदरही पूर्ण संपला. मोठ्या पदावरून गेल्यानंतर हे लोक भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍याबरोबर एका व्यासपीठावर असतील तर ते त्या पदावर असताना आपल्याच लोकांना ठार मारायला मदत करत होते का हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. यशवंत सिन्हा हे भारताचे अगदी सर्वोत्तम अर्थमंत्री होते असे म्हटले तरी चालेल. पण या प्रकारानंतर ते मुळात चांगले भारतीय आहेत की नाही हा प्रश्न मला तरी नक्कीच पडतो. जन्माने भारतीय असला तरी कर्माने एक चांगला भारतीय नसलेला माणूस कितीही प्रकांडपंडित असला, अगदी बृहस्पतीचा जावई नव्हे बृहस्पतीचा सासरा असला आणि त्याने इतर कितीही चांगल्या गोष्टी केल्या असल्या तरी असा माणूस आदरास पात्र नाही/नसावा. असला माणूस राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभा असला तरी जिंकायची शक्यता फारच थोडी ही चांगली गोष्ट आहे. *: याच अमरजितसिंग दुलात यांची रॉमधून निवृत्त झाल्यावर वाजपेयींनी काश्मीरमधील खास दूत म्हणून नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात केली होती. २००३-०४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शेवटच्या वर्षात वाजपेयींनी काश्मीरमध्ये तथाकथित शांततेसाठी प्रयत्न केले होते (आणि जानेवारी २००४ मध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे लोक अडवाणींना भेटले पण होते. वाजपेयी २००४ ची निवडणुक जिंकून परत पंतप्रधान झाले असते तर ते लोक वाजपेयींनाही भेटले असते) त्यामागे हे दुलात होते. वाजपेयींविषयी आदर असला तरी त्यांचे काश्मीर आणि पाकिस्तानविषयक धोरण गंडलेले होते असे अनेक भाजप समर्थकांना वाटते (मी पण त्यातलाच एक) त्यामागे हे एक मोठे कारण आहे.

In reply to by क्लिंटन

राष्ट्रपती झालो तर सीएए कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणार- यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाचे उमेद्वार आणि हे यांचे विचार ! तुम्हाला वेगळ्या शत्रुची गरज का म्हणुन भासावी ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Kabhi Nahi Video Song Adnan Sami | Tera Chehra | Feat. Amitabh Bachchan

In reply to by मदनबाण

२००७ मध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या आग्रहामुळे हामिद अन्सारीची उपराष्ट्रपदाचा उमेदवार म्हणून युपीएने निवड केली होती. त्यावेळी कम्युनिस्टांचा युपीए सरकारला बाहेरून पाठिंबा होता. कम्युनिस्टांच्या आग्रहामुळे पुढे आलेला माणूस.... नक्की कसा असेल हे वेगळे सांगायची गरज आहे का?

ईतका गदारोळ होऊनही पुर्व उपराष्ट्रपती हामिद अन्सारीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार हालचाल करत नाहीय.

In reply to by डँबिस००७

वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी अनेक गोष्टींमध्ये कचखाऊ धोरण अवलंबले होते. त्यांच्या कारकिर्दीत दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या आणि थेट संसदेपर्यंत दहशतवादी पोचले होते. वेळेप्रसंगी चार पावले मागे यावे लागते म्हणून कंदाहार विमान अपहरण प्रकरणी दहशतवाद्यांना सोडले हे आम्हालाही समजते. पण त्यानंतर काय केले? दहशतवाद्यांवर कडकडून कारवाई केली का? वाजपेयी कडक भूमिका का घेत नाहीत हा प्रश्न नेहमी पडायचा. तरीही वाजपेयींचे समर्थन करत होतो कारण उजव्या बाजूला त्यांच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. मोदी आल्यावर मात्र तितका भोंगळ प्रकार राहिलेला नाही. २०१६ मध्ये जानेवारीत पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर गेल्या साडेसहा वर्षात काश्मीरबाहेर एकही मोठा हल्ला दहशतवादी करू शकलेले नाहीत. काश्मीरमध्येही स्थिती पूर्वीपेक्षा बरीच जास्त नियंत्रणात आहे हे नक्की. जी-२० ची शिखर परीषदच काश्मीरमध्ये घेण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे म्हणजे बायडन नाना आणि युरोपमधील देशांचे प्रमुख तसेच जपानचे पंतप्रधान वगैरेंना झक मारत काश्मीरला आणायचा मोदी सरकारचा इरादा आहे- म्हणजे काश्मीर भारताचा भाग आहे याची कबुली त्यांच्याकडून घ्यायचा इरादा आहे. हे प्रत्यक्षात होईल असे मला अजूनही वाटत नाही पण केले तर खूपच उत्तम. तेव्हा सांगायचा उद्देश हा की वाजपेयी काही गोष्टींमध्ये बोटचेपे होते त्या बाबतीत मोदी कडक आहेत. तरीही काही गोष्टींमध्ये मोदी आपल्याला पाहिजे तितके कडक नाहीत. उदाहरणार्थ हा अन्सारी, तुकडे तुकडे गँग, जे.एन.यु, विविध एन.जी.ओ आणि विचारवंत वगैरे. तरीही उजव्या बाजूला मोदींपेक्षा अधिक चांगला पर्याय नसल्याने त्यावेळेस काही गोष्टी मान्य नसूनही जसे वाजपेयींचे समर्थन करत होतो त्याप्रमाणेच आता मोदींच्या काही गोष्टी मान्य नसूनही मोदींचेच समर्थक आहोत. भविष्यात मोदींपेक्षा कडक उजवा नेता आल्यास त्याचे समर्थन करू. हाकानाका.

मोदी आपल्याला पाहिजे तितके कडक नाहीत. उदाहरणार्थ हा अन्सारी, तुकडे तुकडे गँग, जे.एन.यु, विविध एन.जी.ओ आणि विचारवंत वगैरे. उमर खालिद अजून तुरुंगातच आहे. त्याच्यावर UAPA कायद्याखाली खटला भरला असल्यामुळे त्याला जामीन मिळालेला नाही. तिस्ता सेटलवाड आणि कंपनी सध्या परत तुरुंगात आहेत आणि त्यांना जामीन मिळालेला नाही. शेहला रशीद कन्हैया कुमार यांच्या बद्दल सध्या फारसं काही ऐकू येत नाही. कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षात गेला आणि लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधि पक्षांनी पाठिंबा देऊनही सव्वा चार लाख मतांनी हरला आहे. जिग्नेश मेवानी पण सध्या पाट्या टाकतो आहे. या सर्व लोकांना डाव्या आणि काँग्रेसी प्रणालीने अथय प्रमाणावर पाठिंबा दिला त्यांच्या वर भरपूर खर्च केला परंतु यातील कोणालाही टेकू देऊन काहीही फायदा झाला नाही. दुर्दैवाने भारतात न्यायालयात न्याय मिळायला अक्षम्य विलम्ब लागतो. १९९६ -९७ च्या लालू प्रसाद यांच्या केसेस कोर्टात २०१८ नंतर उभ्या राहिल्या आणि त्यांना शिक्षा झाली. तसेच या सर्वांच्या विरुद्ध केसेस उभ्या राहायला १० वर्षे लागतील. शिवाय कृतिकरण्याइतका सबळ ACTIONABLE EVIDENCE पुरावा जमा करणे हे सोपे नाही. विशेषतः आर्थिक गुन्ह्यात. त्यामुळे श्री मोदी काही करत नाहीत असा भास निर्माण होतो. याशिवाय या बोकडांविरुद्ध कार्यवाही करण्यात नको तेवढा वेळ घालवण्यापेक्षा श्री मोदी इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टीवर काम करणे जास्त योग्य समजतात.

In reply to by सुबोध खरे

टुकडे, टुकडे गँग, ल्युटियन्स मिडीया, सुप्रिम कोर्टाचे वकिल ज्यात ईंदिरा जयसींग, प्र भुषण, क पिल सिब्बल वैगेरे येतात त्यांच्या वर एक्शन घ्यायला मोदी कश्याला हवेत ? मोदीच्या मंत्र्याच काम आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात पहली पाच वर्ष मोदीजींनी बरीच मेहनत करुन भारताची प्रतिमा खुपच उजळवळी. आंतरराष्ट्रिय पटलावर जी-७ सारख्या जगातल्या फक्त ७ देशाच्या मंडळात भारताला पाहुणा म्हणुन बोलवुन भारताच्या मतांचा विचार करण हेच दाखवत. या पुढे अश्या कार्यक्रमात मोदीजींनी अगत्याने बोलवल जाईल. जी-७ सारख्या देशाचे मुख्य नेते मोदीजींनी भेटण्यासाठी आतुर होते. अक्षरश: गळाभेट करत होते हे पाहुन ईथले बुद्धी जीवी, कम्युनिस्ट लोक विव्हळत होते. श्री जयशंकरच्या रुपाने एक चांगला परराष्ट्र मंत्री मिळालेला आहे व त्यांनी श्री मोदीजींवरचा बराच भार हलका केलेला आहे. जगाच्या इतर देशाच्या मानाने भारताला आपली जागा बनवायला मोदीजीं सारखा नेता भारताला भेटला हेच भारताचे भाग्य आहे. कालच्याच तमीत युएई देशाने भारतात अत्याधुनिक फुड पार्क साठी २ बिलियन डॉ निवेश करायचा प्रस्ताव दिलेला आहे. भारता सारख्या देशात ३६० डिग्री फुड पार्क ही युएई सारख्या देशाच्या फुड सेक्युरीटीची गरज आहे. युएई, साउदी अरेबिया, बहरीन, ओमान, कुवेट सारखे देश आपल्या फुड सल्पायसाठी पाकिस्तान, भारत, तुर्की, फार ईस्ट देशांवर अवलंबुन आहेत. ह्यातल्या साउदी अरेबियाने पाकिस्तानात निवेश करत बरीच मोठी जमिन संपादन करुन तिथे आपल्या साठी पिकाची सोय केलेली आहे. पण पाकिस्तानच्या घसरत्या इकॉनॉमिमुळे पाकिस्तान कडुन फुड सेक्युरीटीची अपेक्षा करता येणार नाही ह्याची कल्पना ह्या देशांना आहे. रशीया - युक्रेन च्या युद्धा मुळे बेरेच संपन्न देश आताच्या परिस्थितीवरुन भविष्यात निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे आताच शोधायला लागलेली आहे. अत्याधुनिक फुड पार्क हे अश्याच प्रयत्नाच द्योतक आहे. युएईला फॉलो करत गल्फ मधले ईतर देशही भारताकडे आपल्या फुड सेक्युरीटीच्या गरजेसाठी वळण्याची शक्यता आहे. ह्या मुळे भारतातील शेतकर्याला मोठी हक्काची बाजारपेठ निर्माण होईल. कृशी कायद्याची महत्ता ज्यामुळे आपल्याला आता पटेल अशी असंख्य उदाहरणे ह्या काही महिन्यात आपल्या समोर आलेली आहेत. भारतातल्या शेतकर्याच्या दुर्दैवाने त्यांना एकही चांगला नेता मिळाला नाही, अन्यथा ज्या परिस्थितीत सरकारने कृशी कायद्ये मागे घेतले त्यावेळेला ज्या शेतकर्यांना हे कायदे हवे होते त्यांनी सुद्धा सरकारवर आपल्या नेत्यांकरवी दबाव आ णायला पाहिजे होता.