Skip to main content

चालू घडामोडी -श्रीलंका अराजक

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 09/07/2022 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीलंकेत जनतेने उठाव केला आहे. राष्ट्रपती गोताभये हे राष्ट्रपतीभवनातून पळून गेले आहेत. जनतेने राष्ट्रपतीभवनात घुसून तेथला ध्वजही उखडून टाकला आहे. तिथे जनतेचा कब्जा झालेला आहे. जनतेने गॉल मधे चाललेले श्रीलंका ऑस्ट्रेलिया मॅचही स्टेडियम मधे घुसून बंद केली आहे. श्रीलंकेकडे परकीय चलन अजिबात शिल्लक नाही , ( चीनच्या कृपेने). त्याना कोणी कर्जही देण्यास तयार नाही. या गोष्टीचा भारतावर नक्कीच परिणाम होणार आहे. श्रीलम्केसारखा जवळचा देश अराजकतेचा सामना करतोय. जनता रस्त्यावर उतरलेली आहे. यात तरुणांचा जास्त सहभाग आहे. सनथ जयसूर्या या जनतेचे नेतृत्व करायला पुढे आलेला आहे. परिस्थिती दर तासातासाला अधीकच वाईट होत चालली आहे

वाचने 17724
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

लाओस हा देश चीन च्या फार आहारी गेलेला आहे आणि त्याची किंमत आता चुकवावी लागते आहे. त्यामानाने व्हिएतनाम मात्र साम्यवादी असूनही भारताच्या बाजूने झुकलेला राहिला आहे. व्हिएतनामी लोक चीन ला शत्रू मानतात.

In reply to by निनाद

एकंदरीत जे जे देश चीनच्या आहारी गेलेत त्यांची वाट लागणार असे दिसत आहे.... पाकिस्तानचा नंबर लवकर येऊदे...

In reply to by निनाद

एकंदरीत जे जे देश चीनच्या आहारी गेलेत त्यांची वाट लागणार असे दिसत आहे.... पाकिस्तानचा नंबर लवकर येऊदे...

पलेसमधल्या जीममध्ये जी उपकरणे ठेवली आहेत ती आंदोलक वापरत आहेत ते पाहून फार मजा वाटते. अगदी सायकलसुद्धा चालवत आहेत प्रामाणिकपणे.)) कुठल्याच प्रकारची तोडफोड, आगजनी किंवा सरकारी संपत्तीला नुकसान नाही. मीळालेली रोकड आंदोलकांनी पोलिसाना दिली. आंदोलक कुठल्याच प्रकारचे नुकसान करू नका आसे बाकीच्या लोकांना सांगत आहे. खरोखर कौतुकास्पद आणी शीकण्या सारखे पण. मला आशा वाटते हा देश नक्कीच या संकटातून बाहेर पडेल. शांतीसेना पाठवली चुक की बरोबर यात न पडता एवढेच म्हणेन की तत्कालीन श्रीलंका सरकारने शेजारच्या देशाने दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून घ्यायला पाहीजे होता. हितसंबंध दोघांचेही आडकले होते.

श्रीलंकेत लोक शिस्तीत रांगा लावून राष्ट्रपतींचा प्रासाद पहायला गर्दी करताहेत. इतक्या अराजकातही लोकांची शिस्त खरंच वाखाणण्याजोगी आहे

In reply to by विजुभाऊ

हो. श्रीलंकन लोक शिस्तप्रिय आहेत. 5 वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो. बऱ्याच शहरी आणि ग्रामीण भागात फिरलो. लोक झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडताना दिसले.

राघव, तुमचा इथला प्रतिसाद अत्यंत समर्पक आहे : https://www.misalpav.com/comment/1146550#comment-1146550 बरीच मेहेनत घेतलेली दिसते. धन्यवाद! :-) निनाद, वरील संदेशास दिलेला तुमचा प्रतिसादही वाखाणणीय आहे : https://www.misalpav.com/comment/1146561#comment-1146561 आ.न., -गा.पै.

लोकहो, श्रीलंकेत इतकी टोकाची परिस्थिती आली तरी मोदी ढिम्म आहेत. खरंतर ते सहाय्यार्थ धावून जाणारे आहेत. पण श्रीलंकेत का गेले नाहीत, कोणास ठाऊक. काहीतरी खटकतंय खरं. की मोदींनीच हा बनाव घडवून आणलाय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पूर्वी तमिळ लोकांना ( म्हणजे भारतातून मजूर म्हणून गेलेले) फार त्रास दिलाय हे विसरून चालणार नाही. मला एका तमिळ सहकाऱ्यांनी सांगितले की त्यांना मतदानाचा हक्क नाही. त्यामुळे ते आंदोलनं, विरोध करतात. ( खरं खोटं काय माहिती.) तिकडे एक तमिळ पार्टीही आहे. मग त्यांना घेणार का सर्वपक्षीय सरकारात? भारताची अफगाणिस्तानातील गुंतवणूक ( ३लाख कोटी??) डुबीत जमा आहे. श्रीलंकेतही डुबेल. म्हणजे काहीतरी मदत देऊन कायमचे पाणी सोडावे लागेल.

In reply to by सुबोध खरे

माहितीबद्दल धन्यवाद, सुबोध खरे डॉक्टर! आ.न., -गा.पै.

धन्यवाद निनाद, डँबिस आणि गा.पै. :-) कंकाका आणि श्रीगुरुजींनी देखील काही उपाय मांडलेले आहेत. @निनाद,
प्रचंड गवगवा करून सरकार कडून रासायनिक खतांना कायदेशीर बंदीच घालून घेतली होती श्रीलंकेने. मग अन्नधन्य उत्पादन शक्यच झाले नाही. आणि सर्व आर्थिक भार अन्न आयातीवर गेला. रासायनिक खतांना कायदेशीर बंदी करा हा गवगवा एका एनजीओ ख्रिस्ती संघटनेकडून घडवून आणला होता असे म्हणतात. आणि त्याचे महत्त्वाचे लोक नंतर गायब झाले. (खखोदेजा!)
मला तरी ही कॉन्स्पिरसी वाटते. केवळ खतांचा वापर बंद करून पूर्ण धान्य उत्पादन डबघाईला येणे हे पटत नाही. याशिवायही काही गोष्टी पडद्यामागे घडलेल्या असाव्यात. भारतीय उपखंडातली शेती ही मुख्यतः ऋतूमानावर अवलंबून असते. जर वेळेवर शेतीची कामे झाली नाहीत तर देशाच्या नाजुक आर्थिक परिस्थितीवर अन्न तुटवड्याचा विलक्षण परिणाम होऊ शकतो. ह्याचा उपयोग विघातक शक्तींनी केला तरः जसं लोकांना सरकारच्या ह्या धोरणाविरुद्ध भडकवायचे आणि आंदोलनं करायची, जेणेकरून वेळेत मोठ्याप्रमाणावर शेतीच होणार नाही. किंवा सेंद्रीय खतांच्या किंमती अनैसर्गिकपणे वाढवायच्या, वेळेत पुरवठाच होऊ द्यायचा नाही. यानं बॅक डोर एन्ट्री घेऊन डायरेक्ट धोबीपछाड होऊ शकेल..! अर्थात् ही थिअरी आहे, असेच झाले असेल असे नक्की सांगता येत नाही.
भारताथी अनेक एनजीओज बेकायदेशीर परकीय पैसा बंद केल्यावर फार नाराज आहेत. हा पैसा त्यांना कउठे खर्च करायचा आहे ते मात्र त्यांना सांगायचे नसते, हे खास!
हे सिक्यूरिटी ब्रीच अगदी शक्य आहेत. भारतातही हेच चालत होतं की.
एक महत्त्वाचा मुद्दा यात राहून गेला आहे तो म्हणजे आणिबाणी जाहीर केल्यावर कोणत्याही मोठ्या सत्तेच्या हातातले खेळणे न बनण्यासाठी योग्य ती घटना दुरुस्ती करून घेणे. (भारतात इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर केल्यावर घट्नाच बदलून टाकली आणि भारत अचानक सेक्युलर देश झाला.)
+१ बाडीस. पण अशा परिस्थितीत हात दगडाखाली असल्यानं देखील बर्‍याच गोष्टी मान्य कराव्या लागतात. किंबहुना अशी परिस्थितीच त्यासाठी आणल्या जाते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. बाकी इंदिरा गांधींनी आणिबाणी स्वतःच्या फायद्या-तोट्याच्या गणितासाठी लादली होती. श्रीलंकेत आणिबाणी लागू करणे हा निरूपाय आहे. @डँबिसशेठ,
सस्टेनेबल गाव ही भारतासारख्या देशाची खासियत होती. वाढत्या शहरीकरणातुन व त्यानंतरच्या जागतिकीकरणातुन गावातल्या सेल्फ सस्टेनींग ईको सिस्टीम लयाला गेली. श्री लंकेतील लोकांना पुन्हा आपल्या मुळाकेडे परतावे लागेल. जितक्या लोकांकडे त्यांच्या मुळ गावात जमिनी आहेत त्या कसुन त्यावर जमेल तसे अन्न धान्य पिकवणे सुरु करावे लागेल. गावातील सर्व गावकर्यांना एकत्र आणुन एक सामाजीक बांधिलकी निर्माण करावी लागेल. शहरातुन लोक कमी झाल्याने शहरावरचा ताण कमी होईल. ईंधनाची मागणी कमी होईल. अन्न धान्य पिकवायला लागल्याने त्याची आयात करावी लागणार नाही. गावात रहायला गेल्याने तिथे विजेची पण बचत होईल. ईतर देशाकडुन मदत घेण्यासाठी देशांतर्गत तज्ञ लोकांची कमिटी बनवुन पैश्याव्यतिरीक्त ईतर सामानांची जसे युरीया, ईंधन, औषधे अशी मदत घ्यावी लागेल व त्या वस्तुचे योग्य वितरण जनतेत करावे लागेल.
हे जरी प्रथम टप्प्यात योग्य असलं तरी केवळ अन्नसुरक्षा झाल्यानं [ हेच खूप मोठं काम आहे हे मान्य! ] देशांतर्गत बाजारपेठेला चालना मिळणार नाही. पण सरकारला श्वास घ्यायला जरा स्पेस मिळेल हे खरे. कंकाका म्हणतात तसे, मूलभूत गरजांव्यतिरिक्तचे असे व्यापार ज्यातून निर्यात होऊ शकेल, पर्यटन [ कमी खर्चात बर्‍यापैकी शाश्वत उत्पन्न ] .. त्यांना उठाव देणे करावेच लागेल. पण ते कधी करायचे हे प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय ठरवता येत नाही. जसं पर्यटक यायला जरी तयार झाले तरी त्यांना बेसिक सोयी-सुविधा मिळणे गरजेचे राहील, जे सध्या अशक्य आहे. देशाबाहेरून शक्य तेवढा पैसा उभारल्यावर देखील तो टप्प्याटप्प्यानं बाजारपेठ सुरू करण्यासाठी वापरावा लागेल. प्राथमिक टप्प्यानंतर जेव्हा उद्योग सुरू होतील, त्यानंतर काही वर्षांनी गाडं रुळावर यायला लागेलसं वाटतं.

डावा विचारवंत मोड ऑन सन २००७- ह्युगो चॅवेजने वेनेझ्युएलामध्ये भूतलावरील नंदनवन फुलवले आहे. सन २०१३ नंतर- चिडीचूप शांतता सन २०१८- भारतापेक्षा श्रीलंका सगळ्याच दृष्टीने पुढे आहे. पोपट झाल्यावर दरवेळेस चिडीचूप शांतता ठेवणेही बरं दिसत नाही म्हणून-- सन २०२२- भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने होत आहे. डावा विचारवंत मोड ऑफ

In reply to by क्लिंटन

@क्लिंटन आपले आवडते, नोबेल विजेते, डाव्यांचे अध्वर्यू,अर्थ तज्ज्ञ श्री अमर्त्य सेन ( योगायोगाने यांच्या बायको चे आडनाव रॉथशिल्ड आहे) यांनी तीन वर्षांपूर्वीच श्रीलंकेची स्तुति करत भारताने त्यांचे अनुकरण करावे असे सुचवले होते. सध्या ते कुठे असतात? श्रीलंकेने त्यांना अर्थमंत्री नेमावे अशी नम्र सूचना करत मी खाली बसतो

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे डॉक्टर, तत्संबंधी एक लेख सापडला : https://www.patrika.com/economy-news/amartya-sen-said-india-second-wors… तर अमर्त्य सेनांनी २०१८ साली व्यक्त केलेल्या वक्तव्याच्या मते १९९८ साली श्रीलंका उपखंडात पहिल्या क्रमांकावर होता. आज २०२२ चालू आहे. तर सदर घसरण गेल्या केवळ ४ वर्षांतली नसून पूर्ण २ तपांतली असावी. मात्र ही चालू आहे याचा सुगावा नोबेलविजेत्यास लागला नाही हे महदाश्चर्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अमर्त्य सेन हे विकले गेलेले डावे अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या बायकोचे लग्न अगोदरचे नाव योगायोगाने रॉथशिल्ड आहे.

In reply to by सुबोध खरे

>>> अमर्त्य सेन हे विकले गेलेले डावे अर्थतज्ज्ञ आहेत. जर ते शेठच्या बाजूने लिहिणारे असते तर त्यांच्या इतका अभ्यासू तज्ज्ञ तिन्हीलोकात नसता. हो की नै....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांना अर्थच काय कुठल्याही तज्ज्ञ लोकांची ॲलर्जी आहे. ढग आले की शत्रूच्या रडारला विमाने दिसत नाहीत... हे तर आपल्या लष्कर तज्ज्ञांनासुद्धा माहित नव्हते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल. -व्यवस्थापन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:) भाऊ तोचतोचरेकर जो पर्यंत फडणवींसांच्या बाजूने लिहीताहेत तो पर्यंतच ते ऊत्स्फूर्त पत्रकार. ज्या दिवशी भाजपच्या विरूध्द एक शब्द लिहीली त्याच दिवशी ते विकले गेलेले ठरतील. :) जे विचारवंत भाजप विरोधात लिहीतात ते विकले गेलेल असतात. :)

In reply to by विजुभाऊ

वर जर वाचलं तर क्लिंटन ह्यांच्या कमेंट पासून सर्व सुरू झालंय. जो पर्यंत डावे, पुरोगामी ह्याना पाडूव बोललं जात होतं तो पर्यंत तुम्हाला आक्षेप नव्हता. पण भाजप, तोचतोचरेकर ह्यांच्यावर कमेंट पडल्या नी लगेच तुम्हाला धाग्याचा संबंध आठवला. व्वा विजूभौ, गूड.

In reply to by क्लिंटन

ते दर सहा महिण्याला जागतिक मंदी चे भाकीत करणारे जागतिक किर्ती चे अर्थतज्ञ कुठे आहेत कुणा ठाउक? प्रध्यापकी जोरात चालु आहे वाट्टे. त्यांनी श्रीलंकेला मदत करावी असे मला वाटते ...

In reply to by सुक्या

रघुरामन राजन यांनी स्वतःला इतके हास्यास्पद करून ठेवले आहे कि आता त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

विजुभौ. तुमचा धागा. यावेच लागले. मैत्री असते की नाही काही. श्रीलंकेचा भारतावर काय परिणाम होईल पण, भारतात अजून चांगली स्थिती आहे, लोक अजूनही महागाई, पारदर्शक भ्रष्टाचार या विरुद्ध रस्त्यावर उतरलेले नाही. संसदेत मात्र मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला चांगले घेरले आहे. त्याच विषयावरुन ''श्रीलंका अत्यंत गंभीर पेचाला सामोरा जात असून तेथील स्थितीची तुलना भारताशी करणे गैरलागू असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले'' ( संदर्भ मटा) 'देशातील काही घटक भारताची तुलना श्रीलंकेशी करत असल्याने ही सर्वपक्षीय बोलावली होती असे सरकारने म्हटले आहे' असे जे काही घटक असतील त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे सरकारने दुर्लक्ष करुन आपला सरकारचा गाडा हाकत राहावे. सध्या देशात महागाई दररोजच वाढते आहे, त्यात वाढत्या जीएसटीने भर घातली. लोकांचा सरकारवर रोष आहे. मात्र श्रीलंकेसारखे भारतीय जनता उठाव वगैरे करतील असे काही वाटत नाही, त्यामुळे सरकारने निश्चिंत राहावे असे वाटते. आपल्याकडे लोक फक्त वाट्सॅपवर रोष व्यक्त करतात. सरकारने अशा कोणत्याही घटकाला फार गांभीर्याने घेऊ नये. आर्थिक शिस्त, जबाबदार कारभार आणि फूकटची संस्कृती हे महत्वाचे तीन धडे श्रीलंकेतील स्थितीवरुन घ्यायला हवे असेही एस. जयशंकर म्हणाले. या सरकारची या विधानावर मात्र गम्मत वाटते. आर्थित शिस्त या सरकारला नाही. अर्थव्यवस्थता ढासळत चालली आहे, असे अभ्यासकांचे म्हणने आहे. रुपयाची अवस्था वाईट आहे. तर, तिसरीकडे सरकार मतदारांना लुभावण्यासाठी हे देऊ ते देऊ असे म्हणून जनतेची फसवणूक करीत असते. गप्पा मारणारे सरकार असले तरी जनतेला हे सगळं समजायला अजून वेळ लागेल. जनतेने सरकारला धडा शिकवायची वेळ जेव्हा यायची तेव्हा येतच असते. त्यामुळे सरकारने अशा कोणत्याही घटकाकडे लक्ष न देता. आपल्या 'मन क्या बाता आणि जनतेला थापा' मारण्याचा जो कार्यक्रम आहे, त्यावरच भर द्यावा असे माझे व्यक्तीगत मत आहे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर महागाई झाली महागाई झाली याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा आणि केवळ तुमच्या लाडक्या अभ्यासकांचे मत पाहून मत प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष अर्थशास्त्र अर्थव्यवस्था वाचून घ्या. केवळ द्वेषासाठी द्वेष करण्यापेक्षा भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा कितीतरी वेगळी का आहे हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. रशियाच्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे जगभर महागाई झाली आहे (अमेरिका रशिया जर्मनी कॅनडा ब्राझील ब्रिटन येथे झाली) त्या मानाने भारतात तेवढी का झाली नाही हेही जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत युरो, येन. युआन,ब्रिटिश पौंड जितके घसरले तितका रुपया का घसरला नाही हे जाणून घ्या. एवढा अभ्यास झाला कि चर्चा करू नाहीतर तुमचा चालू द्या सुरुवातीला काही दुवे देतो आहे तेवढे पाहून घ्या https://tradingeconomics.com/country-list/inflation-rate

In reply to by सुबोध खरे

>>>> महागाई झाली महागाई झाली याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा. तोच तर सामान्य माणसाचा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून फळ, भाज्या आणि दुधासह खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. समोर येत असलेली आकडेवारी ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तसंच सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. एप्रिल महिन्याचा घाऊक महागाईचा निर्देशांक (WPI) 15.08 % राहिला. गेल्या 9 वर्षांतील हा उच्चांक आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

डॉलराचे काय घेउन बसलाय खरे सायेब. काल आमच्या गावात एक फिरंगी बायदेन ला शिव्या घालत होता. मोदी च्या नादाला लागुन बायदेन ने पेट्रोल गॅलनाला साडे सहा डॉलर केले नी म्हागाई वाढवली म्हणुन तो मोदी ला पण शिव्या घालत होता. बरं झालं श्रीलंका मोदी च्या नादाला लागली नाही ... नाहीतर २ वर्षापुर्वीच दिवाळं निघालं असतं. पार जगात पचका करुन ठेवलाय मोदी ने. घंटा / दिवे / नोटबंदी करुन पार वाट लावली जगाची ..

भारताचा कधीच श्रीलम्का होणार नाही. भारतात प्रत्यक्ष उत्पादन होते, अन्न धान्य तसेच , वाहने व इतर इंजिनीयरिम्ग उत्पादने निर्यात होतात. त्यामुळे डॉलर तसेच इतर चलने मिळतात. भारतात रीफायनरीज आहेत, पेट्रोलीयम पदार्थ थेट डॉलर न खर्च करता वस्तु विनीमय करून मिळू शकतात. श्रीलंका या प्रत्येक बाबतीत शून्यच आहे.

In reply to by विजुभाऊ

काय घेऊन बसलाय, इथे लोक डोळ्यात तेल घालून वाट बघत बसलेत भारतात पण असा व्हावं म्हणून, kazakisthan च्या धाग्यावर बघा काय मुक्ताफळ उधळलेत ती.

लेखिका डॉ. मीना प्रभू. हे वाचनालयात सापडले. आताची परिस्थिती पाहता श्रीलंका वाचणे अगत्याचे झाले. यांची अगोदरची पर्यटनावरची पुस्तकं मला एवढी आवडली नव्हती. पण प्रकाशन २०१९, करोनाअगोदरचे पर्यटन म्हटल्यावर पाने उलटून पाहिली. (पाने २२०) भरपूर रंगीत सुस्पष्ट चित्रे बघितल्यावर लगेच घेतले. लेखिकेने गाईड घेतला होता संपूर्ण पर्यटनाला त्यामुळेच खूप छान माहिती आहे. अगदी बौद्ध काळाअगोदर बिहारमधून गेलेले आणि आता मूळ सिंहली समजले जाणारे महावंशाचे लोक ते अशोकाच्या काळातले संघमित्रा, मग चोला राजे, पोर्तुगीज, डच,ब्रिटिश, स्वातंत्र्यानंतरची सिंहली तमिळ लढाया असा सर्व इतिहास दिला आहे. अत्यंत वाचनीय पुस्तक आहेच आणि कोरोनाबंदीने डुबीत गेलेल्या पर्यटनामुळे झालेली परिस्थिती पाहता आपण या देशाला का गेलो नाही अगोदर ही रुखरुख लागली. फोटो खूप चांगले उत्तम आहेत.

श्रीलंकेप्रमाणे आपल्या शेजार्‍याची पण स्थिती अजूनच बिघडली आहे. त्यांच्याकडे रेल्वे चालवण्यासाठी इंधन शिल्लक नाही. सामान्य लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही. परकीय चलनाबाबत तर काही बोलायलाच नको अशी गत आहे.

पाकिस्तान अस्थिर राहणे भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे कारण मग भारतात येणारे निर्वासित वाढतील.

पाकिस्तान अस्थिर राहणेच भारताच्या दृष्टीने योग्य आहे. पाकिस्तानात स्थिरता आली की थोडा फार पैसाही येईल. तोच पैसा ते भारताविरुद्ध वापरतील. सध्या केंद्रात कणखर सरकार असणे आणि पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थिती मुळेच सीमेवर शांतता टिकूण आहे.

पाकिस्थानात श्रीलंकेसारखीच परिस्थिती केंव्हाही उद्भवेल असे वाटते आजच समजले की इम्रान खानला एका केस मधे पूर्ण दोषी ठरवले आहे. नवाझ शरीफ सौदीमधून परत यावेत यासाठी कायदे बदलले आहेत. पण त्यांचेही काही खरे वाटत नाही. पाकव्याप्त काश्मीर मधे भारत सध्या तरी अधिकृत पणे काही करेल असे वाटत नाही. चीनला तेथून जाणार्‍या सीपेक हायवे ची चिंता आहे. त्यामुळे तेथे उठाव झाला तर चीनच्या मदतीने तो दडपून टाकतील असे वाटतेय.

स्मशानात वाढदिवस साजरा केला https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/celebrating-birthdays-… स्मशानात लोक अंत्य विधीसाठी येतात.तिथे वाढदिवस साजरे करणे कितपत योग्य. दुसरा तिथे येणारे अधिकांश व्याधीग्रस्त असतात. अंधविश्वास दूर करायला लहान मुलांना ही तिथे नेणे याचा एकच अर्थ निघतो अनिस मानसिक विकृतीने ग्रस्त संस्था आहे.

In reply to by विवेकपटाईत

मटातील बातमी:
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू स्मशानभूमीत मध्यरात्री वाढदिवस साजरा केला. अमावस्या असेल तर अनेक नागरिक स्मशानभूमीत जात नाहीत किंवा त्यांच्या मनात नकारात्मक माहिती दडली आहे. ही नकारात्मक बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मशानभूमीत विविध उपक्रम केले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत केक आणून खाल्ला.
छान. आता रमजानच्या पवित्र महिन्यात कब्रिस्तानात आणि क्रिस्मसच्या रात्री सेमेटरीमधे मुस्लिम आणि इसाई मुलांचे औक्षण करून पुरणपोळी चा नैवेद्य दाखवून वाढदिवस साजरा करावा ही अंनिसच्या कार्यकर्त्यांना विनंती. म्हणजे जास्त लोकांच्या मनातील नकारत्मकता बाहेर काढली जाऊन बघता बघता सगळ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल.