आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. अन्यथा महिन्याच्या २७ तारखेला नवा भाग काढला नसता पण यावेळी घडामोडी खूप वेगाने होत असल्याने या भागातही १५० प्रतिसाद झाले तर नवल वाटायला नको.
काल लोकसभेच्या ३ जागा आणि विविध राज्यातील विधानसभांच्या ७ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी झाली. लोकसभेच्या तीनही जागांचे निकाल धक्कादायक लागले आहेत.
२०१९ मध्ये पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे भगवंत मान निवडून गेले होते. ते पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार होते. मार्च महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ही पोटनिवडणुक आम आदमी पक्षासाठी प्रतिष्ठेची होती. तिथून माजी आय.पी.एस अधिकारी आणि अकाली दल (अमृतसर) या गटाचे नेते सिमरनजीतसिंग मान यांनी आम आदमी पक्षाचे गुरमेल सिंग यांचा ५८२२ मतांनी पराभव करून खळबळ माजवून दिली. या मतदारसंघातून शिरोमणी अकाली दलाने पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या हत्येसाठी तुरूंगात असलेल्या बलवंतसिंग राजोनाची बहिण कमलजीत कौर राजोनाला उमेदवारी दिली होती तर भाजपने २०१९ मध्ये भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या केवलसिंग धिल्लो यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसने माजी आमदार दलवीरसिंग खंगुरा (गोल्डी) यांना उमेदवारी दिली होती. इतर तीनही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. सिमरनजीतसिंग मान यांनी १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेध करण्यासाठी त्यांनी आय.पी.एसचा राजीनामा दिला होता. नंतरच्या काळात ते खलिस्तानचे समर्थक आहेत असे आरोपही झाले होते आणि त्यात तथ्यही होते. २०१८ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखपूर आणि फुलपूर या अनुक्रमे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर भाजप उमेदवारांचा पराभव झाला त्याच्या आदल्याच वर्षी भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक जवळपास चार-पंचमांश बहुमताने जिंकली होती. तशीच आम आदमी पक्षाने २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणुक जिंकली आहे. २०१८ मध्ये योगींना दणका, योगींची (आणि मोदींची) लाट ओसरली वगैरे बरेच चर्वितचर्वण झाले होते तसे आम आदमी पक्षाचा तीन महिन्यातच हा पराभव झाल्यानंतर होते का हे बघायचे.
उत्तर प्रदेशात आझमगड आणि रामपूर या दोन लोकसभा जागांचे निकालही असेच खळबळजनक आहेत. २०१९ मध्ये आझमगडमधून अखिलेश यादव अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. त्या जागेवर भाजपच्या दिनेशलाल यादव निरहुआ यांनी यादव कुटुंबातील धर्मेंद्र यादव यांचा जवळपास ८ हजार मतांनी पराभव केला. अखिलेशना २०१९ मध्ये मोठे मताधिक्य मिळाले होते त्यात बहुजन समाज पक्षाच्या मतांचा वाटा मोठा होता असे दिसते. या मतदारसंघात बसपाचा जोर आहे. पूर्वी ही जागा बसपाने जिंकली पण आहे. आता पक्षाची बरीच पडझड झाली असली तरी बसपाने आपली मते राखली आहेत. सपा-बसपा मधील मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला असे दिसते.
रामपूरमधील निकाल अजून धक्कादायक आहेत. हा लोकसभा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. इथून भाजपने पूर्वी विजय मिळवला आहे पण त्यावेळेस सपा/बसपा/काँग्रेस यांच्यातील मुस्लिम मतदारांमध्ये मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप उमेदवाराला मिळाला आहे. पण यावेळेस तसे झालेले नाही. बसपा आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला नव्हता. तसेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघितलेल्या कलाप्रमाणे समाजवादी पक्षामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होणे अपेक्षित होते. तसेच २०१९ मध्ये ही जागा समाजवादी पक्षाच्या आझमखानने जिंकली होती त्याचाही त्या भागात जोर आहे. असे असताना सपाचा उमेदवार आरामात जिंकेल असे वाटत होते. पण भाजपच्या घनश्याम लोधींनी जवळपास ५२% मते मिळवत ही जागा आरामात जिंकली.
विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये त्रिपुरात ४ पैकी ३ जागा सत्ताधारी भाजपने तर एक जागा काँग्रेसने जिंकली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री माणिक साहा यांचाही समावेश आहे. काँग्रेसने आगरतळ्याची जागा जिंकली. या जागेवरून २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जिंकलेल्या भाजप उमेदवाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याने ही पोटनिवडणुक जिंकली. उरलेल्या तीन विधानसभा जागा त्या त्या राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जिंकल्या. आंध्र प्रदेशातील आत्माकूरमधून वाय.एस.आर काँग्रेसने, दिल्लीतील राजिंदर नगरमधून आम आदमी पक्षाने तर झारखंडमधील मंदार या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.
वाचने
15820
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
बंड अयशस्वी झाले तर राऊत हे
In reply to आताची by माईसाहेब कुरसूंदीकर
मोहम्मद झुबेरला अटक केली.
थोडे सहमत
In reply to मोहम्मद झुबेरला अटक केली. by कॉमी
ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी*
In reply to थोडे सहमत by प्रदीप
मी काही स्क्रीनशॉट्स पहिले
In reply to ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी* by कॉमी
????
In reply to मी काही स्क्रीनशॉट्स पहिले by सुबोध खरे
तुम्ही पाहिलेल्या
In reply to ???? by कॉमी
इतर स्क्रीनशॉट असले तर दाखवा
In reply to तुम्ही पाहिलेल्या by सुबोध खरे
म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स
In reply to ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी* by कॉमी
"तिस्ता सिटलवाडला" अटक
In reply to म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स by डँबिस००७
डांबिस आणि बाहुबली, थोडा
In reply to म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स by डँबिस००७
याविषयी काही माहिती -
In reply to डांबिस आणि बाहुबली, थोडा by कॉमी
म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट्स
In reply to ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी* by कॉमी
मी काही स्क्रीनशॉट्स पहिले
In reply to ह्या झुबेरने (व इतर अनेकांनी* by कॉमी
मी काही स्क्रीनशॉट्स पहिले त्यात कसलीही गलिच्छ टिप्पणी झुबेरने केली नाहीये. त्याने पूना ओकीयन पोष्टींची थट्टा उडवली आहे.काॅमी ह्यांनी पाहीलेल्या ”काही” स्क्रिनशाॅट मध्ये त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही. हे लक्षात घेऊन भारत सरकारने त्वरित झुबेरला सोडावे. तसेच त्याला अटक करनार्या पोलीस अधीकार्यांना सज्जड दम भरावा. ह्यापुढे कुणालाही अटक करायची असल्यास काॅमी ह्यांच्या कडून स्क्रिनशाॅट तपासून घ्यावे. झूबेर ह्याने नुपूर शर्मा प्रकरण सुरू केले असा आरोप त्याच्यावर आहे पण काॅमी ह्यांना तो भंपकपणा वाटत असल्याने युपी सरकारने त्वरीत दंगल करनार्यांना सोडून द्यावे. ज्या कुणाचे घर बूलडोझर लावून योगींनी तोडलेय ते घर त्वरीत सरकारी खर्चाने (अतिक्रमीत जागेतच) बांधून द्यावे व घराच्या ऊद्घाटनाला काॅमी ह्यांना आमंत्रीत करावे. येण्याजाण्यासाठी चार्टर्ड प्लेन तसेच हजार रूपये दिवसाला भत्ता हा देखील सरकारी खर्चातूनच करन्यात यावा.बाहुबली, तुम्हाला ब्रेनडेड
In reply to मी काही स्क्रीनशॉट्स पहिले by अमरेंद्र बाहुबली
खूप उशीर
In reply to मोहम्मद झुबेरला अटक केली. by कॉमी
अविश्वासाची नोटीसीची तारिख आणी माध्यम
अधिकृत
In reply to अविश्वासाची नोटीसीची तारिख आणी माध्यम by नि३सोलपुरकर
माझ्या समजूतीप्रमाणे दोन
In reply to अधिकृत by कंजूस
११ जुलै च्या आत अविश्वासाचा
हे व्हावे ..
In reply to ११ जुलै च्या आत अविश्वासाचा by सुबोध खरे
सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये
सरकार पडले तर चांगले आणि वाचले तर अजून चांगले
In reply to सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये by रात्रीचे चांदणे
काहीही झालं तरी सेनच नुकसानच
In reply to सरकार पडले तर चांगले आणि वाचले तर अजून चांगले by क्लिंटन
सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये
In reply to सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये by रात्रीचे चांदणे
धन्यवाद डॉक्टर साहेब
In reply to सध्या ला ११जुलै च्या आतमध्ये by सुबोध खरे
To a specific query from the
गुप्त मतदान पध्दतीने
शेणा आणि काँग्रेस दोन्ही
मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे
आणखी एक
In reply to मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे by विजुभाऊ
तडजोड करण्यासाठी उठांनी अजून
In reply to मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे by विजुभाऊ
गुड कॉप बॅड कॉप स्ट्रॅटेजी !
In reply to मा.मु. उ.ठा. लोकाना काय येडे by विजुभाऊ
उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन!
हं.
In reply to उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आवाहन! by Doga
कोणाचा
In reply to हं. by वामन देशमुख
बोलबच्चनचा!
In reply to कोणाचा by श्रीगुरुजी
आजही मनाने शिवसेनेत आहात .
वरची बरीच मते वाचली..
@ गणेशा
In reply to वरची बरीच मते वाचली.. by गणेशा
शिंदे ह्यांनी देशातील सर्वात
In reply to @ गणेशा by सुबोध खरे
+१
In reply to शिंदे ह्यांनी देशातील सर्वात by गणेशा
नेमकं.
In reply to शिंदे ह्यांनी देशातील सर्वात by गणेशा
बैलाचा डोळा!
In reply to शिंदे ह्यांनी देशातील सर्वात by गणेशा
द्वेषांध झालं कि असं होतं.
In reply to शिंदे ह्यांनी देशातील सर्वात by गणेशा
रात्री याचिका दाखल तेही
In reply to शिंदे ह्यांनी देशातील सर्वात by गणेशा
निकाल मात्र भाजपा च्या
In reply to रात्री याचिका दाखल तेही by सुबोध खरे
निकाल मात्र भाजपा च्या
In reply to निकाल मात्र भाजपा च्या by गणेशा
निकाल मात्र भाजपा च्या म्हणण्यानेच असणार...जर सुप्रीम कोर्टावर पण संशय घेत असाल तर मग कठीण आहे. कावीळ झाली की सगळे पिवळे दिसते असे म्हणतात.गणेश भाऊंच्या वाक्या वाक्याशी
In reply to निकाल मात्र भाजपा च्या by गणेशा
गणेश भाऊ मुख्यमंत्रीपद
In reply to निकाल मात्र भाजपा च्या by गणेशा