Skip to main content

चालू घडामोडी - भाद्रपद शके १९४३ (भाग २)

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 10/09/2021 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - भाद्रपद शके १९४३ (भाग २) सप्टेंबर २०२१

वाचने 19443
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी भारतीय विमान वाहतुकीसाठी UDAN योजने अंतर्गत ५० नवीन मार्गांसह ५ नवीन विमानतळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सहा नवीन हेलिपोर्टसुद्धा असणार आहेत. आगरतळा आणि देहरादून विमानतळांसाठी वाढीव प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेसह नवीन टर्मिनल्सची बनवले जाणार आहेत.

चिम्पी विमान तळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत. विमान सेवेचे जाळे जिल्हा स्तर पर्यंत असले पाहिजे.

In reply to by कंजूस

नूतनीकरण करुन अगोदर होता त्यापेक्षा जास्त भयानक केला आहे आता....

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीला फक्त १५ महिने शिल्लक असताना त्यांनी का राजीनामा दिला असावा हे अजूनतरी गूढ आहे.

आता भाजपचे काही खरे नाही. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव आता नक्की आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-to-contest-for-all-…

गुजरातच्या राजकीय परिस्थितीबद्दल आमचे पत्रकार नेहमी दबत्या आवाजात का बोलतात कळत नाही. ! चंद्रकांत पाटील,नितीन पटेल,झडाफिया वगैरे संभाव्य उमेदवार दिसत आहेत. मूळचे मराठी असणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे पारडे जड दिसते आहे. मात्र २००२ साली एका सहकारी बॅंकेचे ५४ कोटीचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. त्यामुळे कदाचित त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. https://en.wikipedia.org/wiki/C._R._Patil गुजरातमध्येही 'चंपा' आहेत हे माहीत नव्हते. हे चंपा बोलणे कमी आणि काम जास्त.. मोदींच्या विश्वासातलेही आहेत.

ह्या वर पण माध्यम जास्त बोलत नाहीत.चर्चा आयोजित करत नाहीत. उत्तराखंड,गुजरात ह्या राज्याचे मुख्यमंत्री का बदलले हा प्रश्न अनुत्तरित च आहे. योगी हे मोदी ना डोईजड होवू शकतात. त्यांना हटवण्याची तयारी तर चालू नाही ना.

In reply to by Rajesh188

योगी हे मोदी ना डोईजड होवू शकतात. त्यांना हटवण्याची तयारी तर चालू नाही ना.
तुमच्या व तुमच्या एका चीयरलीडरच्या अनेक प्रतिसादांना पाहिले की मला द. मा. मिरासदारांच्या एका कथेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. द. मा. मिरासदार हे मराठीतील एकेकाळचे नावाजलेले विनोदी लेखक होते. त्यांच्या एका कथेत, नायक पुण्यात स्टेशनवरून त्याच्या घराकडे जाण्यासाठी टांगा करतो (जुन्या काळची गोष्ट आहे). टांगा घरापाशी पोहोचल्यावर तो माणूस टांगेवाल्याशी भाड्यासाठी घासाघीस करू लागतो, हुज्जत घालू लागतो. तेव्हा त्याने देण्याची तयारी दर्शवलेले भाडे इतके कमी असते की टांगेवाला त्याला म्हणतो- 'साहेब, हळू बोला, घोड हंसल'.

In reply to by प्रदीप

हा उपहासगर्भ विनोद १८८ वेळा सांगितला तरी त्यातील उपरोध, विनोद, गर्भितार्थ या महाभागाच्या डोक्यावरून जाईल.

आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री सध्या उत्तर प्रदेश किती प्रगत झाला आहे ह्याच्या जाहिराती वर्तमान पत्र मधून देत आहेत . BJP च्या agenda नुसार विकास काहीच नाही आणि फक्त जाहिरात . पण विकास दाखवण्यासाठी योगी जी नी बंगाल मधील पुल आणि बिल्डिंग चा फोटो वापरला. काय करणार बिचारे जाहिरात वर होणाऱ्या खर्च मधून विकास करण्यास पैसे च राहत नाहीत. मग दुसऱ्या राज्यातील विकसित जागेचे फोटो यूपी सरकार साठी वापरले जातात.

In reply to by Rajesh188


In reply to by चंद्रसूर्यकुमार

या चुकीसाठी इंडिअन एक्सप्रेस माफी मागत आहे याचाच अर्थ त्यांनीच काहीतरी आगळीक केली आहे हे नक्की. जवळपास सगळे मिडीयावाले हिट अ‍ॅन्ड रन करण्यात वाकबगार आहेत- म्हणजे मोदी-योगी सरकारची प्रतिमा डागाळावी यासाठी काहीतरी खोडसाळपणे बातमी छापायची आणि मग सत्य परिस्थिती पुढे आल्यावर अशी बारीकशी माफी मागून (किंवा बर्‍याचदा ती पण न मागता) पळून जायचे. त्यामुळे ही चूक 'चुकून' झालीपेक्षा 'जाणूनबुजून केली' ही शक्यता अधिक असे वाटते. बादवे, याकूब मेमनच्या फाशीची बातमी याच इंडिअन एक्सप्रेसने पुढीलप्रमाणे दिली होती: indian express असल्या लोकांकडून काय अपेक्षा करायची? रामनाथ गोएंकासारख्या पत्रकाराने स्थापन केलेल्या या दैनिकाची ही अधोगती पाहून वाईट वाटते.

अहमदाबाद शहरातील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार भूपेन्द्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री असतील. bhupendra patel विधानसभा निवडणुकांना वर्ष-सव्वा वर्ष राहिले असताना मुख्यमंत्री बदलायचा हा प्रकार भाजपने उत्तराखंडमध्ये केला त्याप्रमाणे गुजरातमध्येही केला आहे. झारखंडच्या अनुभवातून पक्षाने धडा घेतलेला दिसतो. गेल्या काही महिन्यात उत्तराखंड, कर्नाटक आणि आता गुजरात या तीन राज्यांमध्ये भाजपने आपले मुख्यमंत्री बदलले आहेत. या तीनही राज्यांमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून जी नावे मिडियात येत होती ती सोडून वेगळेच नाव पुढे आणण्यात आले. मार्चमध्ये सुरवातीला उत्तराखंडमध्ये तीरथसिंग रावत आणि कोरोनामुळे सप्टेंबरपर्यंत पोटनिवडणुक होईलच याची खात्री न वाटल्याने त्यांच्या जागी पुष्करसिंग धामी, जुलै महिन्यात कर्नाटकात बसवराज बोम्मई आणि आता गुजरातमध्ये भूपेन्द्र पटेल हे नाव पक्षाने पुढे आणले आहे. २०१६ मध्येही आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर विजय रूपाणी हे नाव अनपेक्षितपणे पुढे आणले गेले होते. भूपेन्द्र पटेल २०१७ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यापूर्वी काही काळ त्यांनी अहमदाबाद महापालिकेचे प्रशासक (आयुक्त?) म्हणून कारभार बघितला होता. विजय रूपाणीही २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले होते आणि दोन वर्षात थेट मुख्यमंत्री झाले तरी त्यापूर्वी ते राज्यसभेचे सदस्य होते. भूपेन्द्र पटेल यांना पूर्वी तो पण राजकीय अनुभव नाही. पण त्यांचा प्रशासकीय अनुभव चांगला असल्याने त्यांना निवडले गेले असे म्हटले जात आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना परत एकदा उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागेल असे दिसते. मोदी-शहांच्या काळात नुसत्या ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून जबाबदारीची पदे दिली जात नाहीत असे दिसते. स्वतः मोदींपेक्षा पक्षाचे इतर नेते ज्येष्ठ असतानाही मोदी पंतप्रधान झाले होते आणि गुजरातमध्ये मोदींनी पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याप्रमाणेच नितीन पटेल १९९५ मध्ये केशुभाई पटेलांच्या नेतृत्वात बनलेल्या पहिल्या भाजप सरकारमध्ये मंत्री होते या कारणाने मुख्यमंत्री बनणार नाहीत असे काहीसे मोदींनी ठरविलेले दिसते. ज्याप्रमाणे उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पक्षाने निवडणुकीपूर्वी वर्ष-सव्वा वर्ष मुख्यमंत्री बदलले तो प्रकार गोवा आणि उत्तर प्रदेशात केलेला दिसत नाही. गोव्यात मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर दोन वर्षांनी प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे त्यांना सलग चार वर्षे मिळालेली नाहीत. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री बदलला नाही याची दोन कारणे असावीत- एक तर आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विजयाची खात्री आहे किंवा दुसरे म्हणजे या क्षणी मुख्यमंत्री बदलला तर त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान अधिक होईल असे वाटत असावे.

2001 ते 2014 पर्यंत मोदी जी हे गुजरात चे मुख्यमंत्री होते . ह्याचे काय कारण असावे? तेव्हा राज्यात नेतृत्व बदल करावा असे पक्ष श्रेष्ठींना का वाटले नाही? त्याचे एक कारण मला तर वाटत तेव्हा चे bjp चे केंद्रीय नेतृत्व हे लोकशाही वादी होते. पण मोदी च्या हातात आता पक्षाची धुरा आलेली आहे त्यांची वृत्ती लोकशाही वादी नाही. इंदिराजी जश्या वागत होत्या तसेच मोदी वागत आहेत. इंदिराजी नी त्यांच्या मोठे पक्षात कोणालाच होवून दिले नाही पक्षात त्यांच्या विरूद्ध कोणी बंद केले की ते बंड त्यांनी मोडून काढले आणि बाकी कोणाचीच किंमत पक्षात त्यांच्या पेक्षा जास्त वाढून दिली नाही गुजरात मध्ये सुद्धा अशा व्यक्ती ना मोदी ची मुख्यमंत्री बनवत आहेत ज्यांना समाजात स्थान नाही,लोकप्रियता नाही. आणि सारखे मुख्यमंत्री बदलून कोणालाच गुजरातमध्ये स्थिर होवू दिले जात नाही जेणे करून मोदी नाच गुजरात मधून आव्हान मिळेल. आता पण असा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून नेमला आहे त्याला गुजरात मध्ये लोकांचं.मोठा पाठिंबा नाही इंदिराजी पण अशाच वागत.

2001 ते 2014 पर्यंत मोदी जी हे गुजरात चे मुख्यमंत्री होते . ह्याचे काय कारण असावे? तेव्हा राज्यात नेतृत्व बदल करावा असे पक्ष श्रेष्ठींना का वाटले नाही? त्याचे एक कारण मला तर वाटत तेव्हा चे bjp चे केंद्रीय नेतृत्व हे लोकशाही वादी होते. पण मोदी च्या हातात आता पक्षाची धुरा आलेली आहे त्यांची वृत्ती लोकशाही वादी नाही. इंदिराजी जश्या वागत होत्या तसेच मोदी वागत आहेत. इंदिराजी नी त्यांच्या मोठे पक्षात कोणालाच होवून दिले नाही पक्षात त्यांच्या विरूद्ध कोणी बंद केले की ते बंड त्यांनी मोडून काढले आणि बाकी कोणाचीच किंमत पक्षात त्यांच्या पेक्षा जास्त वाढून दिली नाही गुजरात मध्ये सुद्धा अशा व्यक्ती ना मोदी ची मुख्यमंत्री बनवत आहेत ज्यांना समाजात स्थान नाही,लोकप्रियता नाही. आणि सारखे मुख्यमंत्री बदलून कोणालाच गुजरातमध्ये स्थिर होवू दिले जात नाही जेणे करून मोदी नाच गुजरात मधून आव्हान मिळेल. आता पण असा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून नेमला आहे त्याला गुजरात मध्ये लोकांचं.मोठा पाठिंबा नाही इंदिराजी पण अशाच वागत.

माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा नातू इंदरजितसिंग याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा नातू राजकीय दृष्ट्या फार प्रभावी आहे असे अजिबात नाही. तरीही शेतकरी आंदोलनामुळे पंंजाब-हरियाणामध्ये भाजपविरोधी वातावरण पसरले आहे (असे निदान मिडियामध्ये तरी दिसते) त्यात पक्षाला थोडाफार फायदा होत असला तर बघावा असा या नातवाला पक्षात घेताना विचार केला असावा. आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करायला मी भाजपत सामील होत आहे असे त्याने म्हटले. अशा प्रसंगी असे काहीतरी बोलणे गरजेचे असते म्हणून तो हे बोलला असावा अशी अपेक्षा. कारण आपल्या आजोबांचे स्वप्न खरोखरच पूर्ण करायला गेला तर मात्र मोठा प्रश्न उभा राहिल. १९७७ मध्ये सत्ता गेल्यानंतर संजय आणि इंदिरांनी ग्यानी झैलसिंगांना हाताशी धरून पंजाबातील अकाली दलाच्या धार्मिक राजकारणाला उत्तर द्यायला कोणी कट्टर शीख धार्मिक नेता अकाली दलाला आव्हान म्हणून उभा करायचा असा बेत केला. त्यातूनच जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा भस्मासूर उभा राहिला. १९७९ मध्ये काही निरंकारींना भिंद्रनवालेने ठार मारल्यानंतर अकाली दलाला उत्तर म्हणून आणखी कट्टर शीख नेता उभा राहिला म्हणून काँग्रेस नेत्यांना आनंद झालाही असेल कदाचित पण त्यांनी नक्की कोणत्या भस्मासूराला जन्म दिला होता हे त्यांना लगेच कळले नाही. ग्यानी झैलसिंगांनी भिंद्रनवालेला नुसती मदतच केली नाही तर शक्य तितका त्याचा बचावही केला होता. पंजाब केसरीचे संपादक लाला जगतनारायण यांच्या हत्येप्रकरणी भिंद्रनवालेला पंजाब पोलिसांनी अटक केली होती पण त्याला सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या ग्यानी झैलसिंग यांनी दबाव आणला होता. ही घटना ऑक्टोबर १९८१ मधील. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दरबारासिंग आणि झैलसिंग यांचे पटायचे नाही त्यामुळे भिंद्रनवालेला वाचविण्याबरोबरच दरबारासिंग यांच्यावर कुरघोडी करायचाही प्रयत्न त्या निमित्ताने झैलसिंगांनी केला. ऑक्टोबर १९८२ मध्ये आपल्या अमेरिका दौर्‍यादरम्यान झैलसिंग लॉस एन्जेलिसला एका शीख फुटिरतावाद्यांना सहानुभूती असलेल्याच्या आश्रमातही भेटीसाठी गेले होते. शीखांमध्ये भारत सरकारविषयी निर्माण झालेल्या असंतोषाला उतार पडावा म्हणून कोणा शीख व्यक्तीला राष्ट्रपती केले तर बरे होईल हा विचार करून इंदिरा गांधींनी झैलसिंगांना राष्ट्रपती केले खरे पण नंतर इंदिरा गांधींनाही झैलसिंगांना राष्ट्रपती केल्याचा पश्चात्ताप व्हायला लागला होता. त्यातून मग झैलसिंगांवर पाळत ठेवणे आणि त्यांना पंजाबविषयी इंटेलिजेन्स ब्युरोचे अहवाल न दाखविणे असे यापूर्वी कोणाही पंतप्रधानाने कोणाही राष्ट्रपतीबरोबर न केलेले प्रकार इंदिरा गांधींनी झैलसिंगांबरोबर केले होते. इतकेच नाही तर परदेशात राहून खलिस्तानी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या आणि भारताविरोधात गरळ ओकणार्‍या दिदारसिंग बेन्स आणि भजनसिंग जोगी हे दोघे राष्ट्रपतींचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती भवनात राहिले होते. (याच भजनसिंग जोगींच्या लॉस एन्जेलिसमधील आश्रमाला झैलसिंगांनी भेट दिली होती). बिहारमधील बक्सरचे काँग्रेस खासदार के.के.तिवारी यांनी लोकसभेत बोलताना राष्ट्रपतींचा खलिस्तानवाद्यांशी संबंध आहे असा आरोप केला होता तो अगदीच बिनबुडाचा नक्कीच नव्हता. पंजाब प्रकरणात घाण घालणार्‍या संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाला, इंदिरा गांधींचा खून झाला. त्यानंतर १९९४ मध्ये झैलसिंग हे एका अपघातात जखमी झाले होते आणि त्यानंतर त्यांचा जवळपास महिन्याभराने मृत्यू झाला. तेव्हा 'त्यांची गरीबांविषयीची तळमळ' वगैरे गोष्टी बोलल्या गेल्या होत्या पण त्यांची पंजाब प्रश्न चिघळविण्यात भूमिका होती त्यावर कोणीच काही बोलले नाही. असल्या आजोबाचे स्वप्न पूर्ण करायला म्हणून तो नातू कुठेही गेला असेल तर ते स्वप्न कधीच पूर्ण व्हायला नको.

अत्यंत स्वागतार्ह निर्णय! महाराष्ट्रात सुद्धा हाच निर्णय हवा जेणेकरून स्थानिक विद्यार्थ्यांना स्थानिक शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळेल व परप्रांतीय विद्यार्थी येथे येणार नाहीत. https://www.lokmat.com/national/admission-medical-without-giving-neet-e…

In reply to by श्रीगुरुजी

तामिळनाडू राज्याने जो नीट बद्द्ल निर्णय घेतला तसा निर्णय महाराष्ट्र कधीच घेणार नाही. त्या साठी स्थानिक पक्षाचे वर्चस्व असणारे सरकार असावे लागते ,राष्ट्रीय पक्षाचे सरकार नाही. राज्याच्या हिता ला प्रथम प्राधान्य देणारे लोक प्रतिनिधी असावे लागतात आपले विद्वान देश पहिला आणि नंतर राज्य असल्या विचाराने प्रभावित आहेत त्या मुळे राज्यातील मुलांचे नुकसान झाले तरी चालेल. राष्ट्रीय पक्षात असून सुद्धा राज्य हित हेच सर्वोच्च हित असा वागणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे श्री नरेंद्र मोदी जी हे होते. महाराष्ट्रात सर्व मुख्यमंत्री दिल्ली ची सेवा करण्यात च व्यस्त असतात. एमबीबीएस ची सर्वात जास्त कॉलेज ह्या राज्यात आहेत आणि त्याचा उपभोग इतर नाकर्त्या राज्यातील मुल उचलत आहेत. नेभळट महाराष्ट्र सरकार मुळे.

https://www.lokmat.com/photos/national/plasma-therapy-cause-adverse-eve… कसलेच संशोधन न करता आंधळे पणाने corona रुग्णांवर उपचार केल्या मुळेच अनेक लोकांचे जीव गेले .हे परत एकदा सिद्ध झाले. ह्याच्या अगोदर पण उपचार साठी वापरत असलेल्या अनेक औषधांचे दुष्परिणाम माहीत झाले आणि ती औषध बंद केली होती.

In reply to by Rajesh188

कसलेच संशोधन न करता आंधळे पणाने corona रुग्णांवर उपचार केल्या मुळेच अनेक लोकांचे जीव गेले हे आपले मत आहे कि व्हॉट्स ऍप्प वर डॉक्टरेट केलेल्या प्राध्यापकांचे?

In reply to by सुबोध खरे

हा प्रश्न व्हॉट्स ऍप्प वर डॉक्टरेट केलेल्यांसाठी आहे ? प्रतिसादकर्त्यास आहे ? की लोकमतसाठी ? की आणखी कुणाला ?

संजय राऊत म्हणतातः गुजरातमधील मुख्यमंत्रीबदलाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर शरसंधान केले आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. जेव्हा एखादे राज्य विकास किंवा प्रगतीचे मॉडेल असल्याचे आदळआपट करत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-criticiz… लोकांची स्मरणशक्ती तोकडी असेल असे त्यांना वाटत असावे. ३१ जानेवारी १९९९ रोजी पहिल्या युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडूनही असाच अचानक राजीनामा घेण्यात आला होता हे लोकांच्या लक्षात नसेल यावर त्यांचा पूर्ण विश्वास असावा. त्यावेळी मनोहर जोशी कोणत्यातरी कार्यक्रमावरून वर्षा बंगल्यावर परतले तेव्हा शिवसेनाप्रमुखांकडून ताबडतोब राजीनामा द्या असा आदेश आलेला होता त्यानंतर ते लगेचच राज्यपालांकडे धावले आणि त्यांनी राजीनामा दिला होता. पुढील मुख्यमंत्री नारायण राणे असतील हे पण त्यावेळेसच बातम्यांमधून सांगितले गेले होते. हे सगळे रात्री साठेआठ ते दहा या दरम्यान झाले. ना विधीमंडळ पक्षाची बैठक ना अन्य कोणते सोपस्कार. मातोश्रीवरून आदेश आल्यावर सगळे काही घडले आणि दुसर्‍या दिवशी राणेंनी शपथ घेतली सुध्दा. हाच न्याय लावायचा तर मनोहर जोशींचे युतीचे सरकार विकास आणि प्रगतीच्या मार्गावर जात नव्हते असे स्वतः संजय राऊतना म्हणायचे आहे का? आता गुजरात विधानसभा निवडणुकांना १५ महिने शिल्लक असताना मुख्यमंत्री बदलला गेला. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना १४ महिने शिल्लक असताना मुख्यमंत्री बदलला गेला होता. तो पण रातोरात. त्यावेळी लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या नव्हत्या का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"सद्यपरिस्थितीत तुम्ही राजीनामा द्या. यावर चर्चा होणार नाही." अशी दोन तोकड्या ओळींची चिठ्ठी बाळ ठाकरेंनी मनोहर जोशींना पाठविली होती. ती मिळताक्षणीच मनोहर जोशींनी राजभवनावर जाऊन राजीनामा दिला होता. अत्यंत अपमानास्पद पद्धतीने राजीनामा द्यावा लागल्याने राजीनामा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलै होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेने नी पण मुख्यमंत्र्यांन राजीनामा द्यायला लागला होता,काँग्रेस नी तसेच काम केले होते . म्हणून आम्ही पण तसेच वागलो तरी आमच्या चुका दाखवून द्यायच्या नाहीत. हे कोणते लॉजिक आहे Bjp इतर पक्षा वेगळी असेल म्हणून तर त्यांना लोकांनी सत्तेवर बसवले आहे. ज्यांना सत्तेतून जनतेनी बाहेर केले त्यांच्या वागण्यात आणि bjp च्या वागण्यात काहीच फरक नसेल तर bjp ल निवडून देवून तरी काय फायदा.

In reply to by Rajesh188

bjp ल निवडून देवून तरी काय फायदा.
बाकीच्यांना निवडून देतांना होऊ शकणार्‍या तोट्याचा विचार करावा लागतो म्हणून भाजपला निवडून द्यावे लागते! बाकीच्यांनी द्यावा की चांगला उपाय, लोक्स नक्की विचार करतील !! :-)

In reply to by राघव

बाकीचे सत्तेसाठी देश सुद्धा विकतात. १९४७ पासून हे अनेकदा पाहिलंय. भाजप इतक्या खालच्या थराला कधी गेला नाही व जात नाही.

पेट्रोल आणि डीझेल जीएसटी मधे घेण्याचा विचार चालू असण्याची बातमी आहे. मला वाटतं याला विरोध करण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे राहिल. :-)

In reply to by राघव

करण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे राहिल. :-) Gst council च्या मीटिंग मध्ये विरोध होईल पण अग्रलेखात मात्र केंद्र सरकारवर टीका होईल.

In reply to by राघव

२०१२ मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक राज्यांनी (ज्यात महाराष्ट्र सुद्धा होता) पेट्रोल, डिझेल, दारू आणि सिगारेट या गोष्टींंचा वसेक अंतर्गत समावेश करण्यास विरोध केला होता. यात सर्वपक्षीय राज्य सरकारे होती, पण अजूनपर्यंत फक्त मोदींना शिव्या दिल्या जातात. चिदंबरमनी राज्यांची मागणी न ऐकल्याने २०१४ पर्यंत वसेक अंमलबजावणी होऊ शकली नाही. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी राज्यांच्या या मागण्यांबाबत सर्वसंमतीने तोडगा काढला व त्यामुळे २०१७ मध्ये वसेकची अंमलबजावणी झाली.

काँग्रेस नी राज्य सोडले तेव्हा 72 की 73, रुपये पेट्रोल होते ते आता 110 झाले गॅस 450 होता तो आता 1000 रुपये झाला 6.5 वर्षात गॅस चे भाव दुपटी पेक्षा जास्त वाढले देशाच्या इतिहासात इतकी भाव वाढ 6.5 वर्षात कधीच झाली नाही. पेट्रोल 38 रुपयांनी वाढले. पेट्रोल दर वाढ होण्यास फक्त राज्य सरकार चे कर जबाबदार नाहीत. राज्य सरकार च्या करा पेक्षा केंद्राचे कर किती तरी पटित जास्त वाढले आहेत. उगाचच सरकार चे समर्थन करण्यात काही अर्थ नाही. जनतेचे हित महत्वाचे राजकीय पक्षाचा स्वार्थ लोकांस का महत्वाचा वाटतो हा गहन प्रश्न आहे.

ntral government's tax collections on petrol and diesel have jumped over 300 per cent in the last six years as excise duty on the two fuels was hiked, the Lok Sabha was informed on Monday. The central government collected Rs 29,279 crore from excise duty on petrol and Rs 42,881 crore on diesel in 2014-15 -- the first year of office of the Modi government. The collections on petrol and diesel rose to Rs 2.94 lakh crore in the first 10 months of the current fiscal (2020-21), according to information furnished by Minister of State Anurag Singh Thakur in a written reply to a question in the Lok Sabha. सामान्य जनता पण नेत्यांवर किंवा जाहिराती वर हल्ली विश्वास ठेवत नाही शक्य माहिती खरी आहे खोटी हे Google वर शोधत असते. राजकीय नेत्यांवर,त्यांच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणारी आताची जनता नाही. ते दिवस गेले.

In reply to by Rajesh188

तुमचं हिशेबाचं संदर्भ पुस्तकच निराळं आहे, त्याला कोण काय करणार? अहो साधी सोपी गोष्ट आहे. केंद्राकडं सर्व राज्यांच्या माध्न्यमातून पेट्रोल/डीझेल वरील करांचं संकलन होतं. राज्यांकडं केवळ त्या-त्या राज्याचं संकलन होतं. त्यामुळं केंद्राचं संकलन हे नेहमीच जास्त राहणार. तुम्हाला जे सुचवायचं आहे त्यासाठी तुम्हाला, त्यांच्या - त्यांच्या एकूण वार्षिक करसंकलनाविरुद्ध पेट्रोल/डीझेल च्या करसंकलनाच्या गुणोत्तराचं प्रमाण दरवर्षी कसं बदलत गेलं ते पहावं लागेल. वाटल्यास २००९ पासूनचा विदा तपासून पहा.

In reply to by राघव

काही लोक स्वयंभू असतात किंवा बुद्ध असतात, त्यांना झाडाखाली बसलं कि ज्ञान मिळतं. असे संदर्भ/विदा वगैरे तपासण्याची अत्यंत आवश्यकता नसते.

एकीकडे तालिबानशी संबंध ठेवायचे आणि दुसरीकडे त्याच तालिबानशी लढायला अमेरिकेकडून मदत घ्यायची हा डबल गेम खेळल्याबद्दल पाकिस्तानबरोबरच्या संबंधांविषयी पुनर्विचार केला जाईल असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-says-it-will-review-tie… हा सगळा प्रकार दिवसेंदिवस अधिकाधिक हास्यास्पद व्हायला लागला आहे. पाकिस्तान हा डबल गेम खेळत होता हे कोणालाही सांगता आले असते. त्यासाठी परराष्ट्रधोरणातील तज्ञ असायची गरज नाही आणि सत्ताधारी असायची त्याहूनही गरज नाही. तरीही अमेरिकेला हे गेल्या २० वर्षात कळले नाही. आणि पाकिस्तानवर कारवाई करू, अमुक करू, तमुक करू असले खुळखुळे अमेरिकेने भारताच्या हातात आतापर्यंत कित्येकदा दिले आहेत. त्यामुळे आता, विशेषतः जो बायडनसारखा अध्यक्ष असताना या नव्याने दिलेल्या खुळखुळ्यांना कितपत गांभीर्याने घ्यावे?

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेन्द्र पटेल उद्या आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार करणार आहेत. नव्या मंत्रीमंडळात २७ सदस्य असतील आणि विजय रूपाणींच्या मंत्रीमंडळातील एकाही सदस्याचा नव्या मंत्रीमंडळात समावेश नसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे नितीन पटेल, सौरभ पटेल वगैरे ज्येष्ठ मंत्र्यांनाही वगळले जाईल असे दिसते. गुजरातमध्ये सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या १८ महिन्यांचा अपवाद वगळता भाजप मार्च १९९५ पासून सलग सत्तेत आहे. २५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर लोकांमध्ये 'भाजप फटीग' आला असेल तर त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांसकट सगळे मंत्रीमंडळ नव्या चेहर्‍यांनी भरलेले असेल तर जुन्यांविरोधातील प्रस्थापितविरोधी मतांचा तितका त्रास होणार नाही असे काहीसे गणित असावे असे वाटते.

गुजरात मध्ये मुख्यमंत्री सहित पूर्ण मंत्रिमंडळ पूर्णतः नवीन लोकांनी स्थापित करण्याचा अती धाडशी प्रयोग bjp नी केला आहे. ह्या त्यांच्या धाडसाला त्रिवार सलाम. मोदी ची गुजरात मध्ये प्रचंड लोकप्रियता असल्या मुळे बंड होण्याची शक्यता नगण्य आहे वर्षांवर्ष जागा आडवून बसलेल्यांना हकले च पाहिजे. हा प्रयोग आम्ही खूप वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायती मध्ये केला होता सर्व वरिष्ठ नेहमीचे सभासद बदलून फक्त तरुण लोकांना ग्रामपंचायती मध्ये निवडून दिले होते.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-terrorists-arrested-sho… दिल्ली मध्ये काही अतिरेक्यांना पोलिस नी पकडले आहे .त्यांची चौकशी चालू आहे .चोकशी मध्ये ते अतिरेकी जे माहिती देत आहेत ती मीडिया कडे पोचतेच कशी? १४ बांगला भाषा बोलणारे अतिरेकी बंगाल मध्ये आहेत अशी त्यांनी माहिती दिली आणि बालिश भारतीय मीडिया नी प्रसिद्ध केली. संबंधित लोक सावध झाली असतील. तपास पूर्ण होई पर्यंत कोणतीच गुप्त माहिती जाहीर करू नये ते देशाच्या हिताचे नाही.हे बालिश भारतीय मीडिया ला कधी समजणार. २६/११ पण लाईव्ह पोलिस कारवाई,कमांडो कारवाई भारतीय बालिश मीडिया नी दाखवली होती. त्या मुळे कमांडो आणि पोलिस ह्यांचे जीव धोक्यात आले . लपलेल्या अतिरेक्यांना पोलिस काय कारवाई करणार आहेत हे लाईव्ह दिसत होते.

शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाला, मनसे बरोबर चाचपणी सुरू आहे. पुढचा साथीदार संभाजी ब्रिगेड असू शकते. https://www.lokmat.com/maharashtra/chandrakant-patils-reaction-purushot…

In reply to by श्रीगुरुजी

ह्या प्रश्न ची कोणी तरी व्याख्या ध्या राजकीय पक्षाची व्याख्या. १)पाकिस्तान ,चीन,बांगलादेश ह्यांना देशातील प्रतेक वाईट गोष्टी साठी दोषी ठरवणे. ..२) देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे कोणतेच कार्य करायचे नाही फक्त मुस्लिम कसे दुश्मन आहेत,ब्राह्मण कसे दलितांचे दुश्मन आहेत,दलित कसे फुकटे आहेत ह्या वर च चर्चा करायची. ३)देशातील भ्रष्ट व्यवस्था,न्याय कधी मिळणार च नाही अशी स्थिती असलेली अतिशय स्लो न्याय व्यवस्था अनागोंदी कारभार,चोर,गुंड, लबाड,ह्यांचे लाड. ह्याला काहीच महत्व न देता मुस्लिम,दलित,पाकिस्तान,अफगाणिस्तान ,हिंदू ह्या वर च चर्चा करणे हा राष्ट्रवाद. अशी राजकीय पक्षांची राष्ट्र वादाची व्याख्या आहे .त्या मध्ये सेना तरी बसत नाही. पण देशाचे सत्ता धारी फिट बसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

संभाजी ब्रिगेडच्या दबामामुळे पुण्याच्या जिजामाता उद्यानातील लालमहालातील शिवरायांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा महापालिकेने तोडून कचऱ्याच्या गाडीत टाकून नेला. संभाजी ब्रिगेडनेच संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा तोडला. हा पुतळा तोडण्यास चिथावणी देणाऱ्या व नंतर पुतळा तोडणाऱ्यांना ५ लाखाचे बक्षीस देणाऱ्या नितेश राणेला भाजपने पक्षात आणून आमदार केले व त्याच्या तीर्थरूपांना खासदार करून केंद्रात मंत्रीपद दिले. ब्राह्मण महिलांविरूद्ध अत्यंत खालच्या दर्जाचे बीभत्स लिहिणारा पुरूषोत्तम खेडेकर हा तर संभाजी ब्रिगेडचा संंस्थापक. ही संघटना पराकोटीची ब्राह्मणद्वेषी आहे. या संघटनेने भाजपशी युती करण्याबद्दल बोलल्यानंतर तातडीने नाही म्हणण्याऐवजी, त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू असे चंपाने सांगून एक दार उघडे ठेवले आहे. प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून जनसंघ व भाजपला मतदान करणाऱ्या ब्राह्मण मतदारांना याने गृहीत धरले आहे. हा माणूस व त्याचा मालक यांच्याबद्दलची चीड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सत्तेसाठी हे दोघे प्रत्येक दिवशी एक नवीन खालची पातळी गाठत आहेत. ज्याप्रमाणे राहुल गांधी देशपातळीवर कॉंग्रेस संपवित आहे, तसेच सत्तेसाठी वखवखलेले हे दोघे महाराष्ट्रात भाजप संपवित आहेत.

उठसुट रा.स.सं. आणि ब्राम्हंणांना शिव्या देणार्या १७व्या धर्मातील शिवश्री खेडेकर यांचे व्यक्तव्य... https://www.youtube.com/watch?v=erpoyiSBjYs

In reply to by नावातकायआहे

भाजपला सध्या दाऊद इब्राहिम किंवा हफीज सईद सुद्धा साथीदार म्हणून चालेल.

In reply to by श्रीगुरुजी

खरंय. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मत देतांना दहादा विचार केला जाईल. संघानेही यावेळेस मदत न करण्याचे धोरण ठेवावे. एकदा चांगले भोवले की मग हे माजोरडे ताळ्यावर येतील

त्याचा अर्थ मला अजून पण समजला नाही.नुकतेच bjp सरकार सत्तेवर आले होत. २०१४ चा काळ. गावातील राजकारणात बदल दिसू लागला.एफबी,you tube सारख्या समाज माध्यमावर वेगळ्याच प्रकारचा प्रचार सुरू होता.. हिंदू वर टीका करणारे नेते तयार केले गेले.हे नेते हिंदू च, आणि हिंदू प्रेमी सुद्धा .पण टीका हिंदू वर.जाती वर.. नक्की हे काय चाललं आहे तेच समजत नव्हत. त्या राजकारणाचा अर्थ तेव्हा मला समजत नव्हतं. संभाजी ब्रिगेड ची स्थापना पण त्याच काळातील. आणि अशा अजुन काही संघटना त्या वेळी निर्माण झाल्या. ह्या संघटना निर्माण करण्यात कोणता तरी राजकीय पक्ष सहभागी आहे पण उघड ते सांगितले जात नाही. पण राष्ट्रवादी वर सर्वांचा संशय आहे. Bjp ल कमजोर करायचे असेल हिंदू मधील जाती जाती मध्ये द्वेष निर्माण करणे आणि bjp ची व्होट बँक तोडणे हा हेतू असावा असे आता वाटत आहे. मराठा मोर्चा,धनगर मोर्चा,ओबीसी मोर्चा ह्याच काळात निघाले..

गंदी नालीका किडा, नीच, हिटलर, भिकारी मोदी, सरकारचा, बीजेपी चा , संघोट्यांचा  त्वरित पाडाव होवो.  हे अभद्र सरकार लवकर पडो.  २०२४ मधे सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि त्यांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे /समांतर असतील ती सर्व पदे मिळोत आणि टकाशेर भाजी टकाशेर खाजा ह्या न्यायानी सर्व स्वस्त होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना!

पाहिले काँग्रेस नी काय केले ते बघा आणि शिका.. Bjp नी जातीत अडकलेल्या हिंदू ना एकत्र केले ह्या विषयी आम्ही विरोधी मत व्यक्त करत असलो तरी त्याची जाणीव आहे. यूपी ,बिहार मधील यादव,मुस्लिम हे समीकरण तोडून यादव जाती ल हिंदू असल्याची जाणीव करून दिली. समीकरण तुटले आणि लालू,मुलायम खरी बसले. खूप मोठे अवघड काम होते bjp te पूर्ण केले.. दरवाढ हा सामान्य लोकांचा जिव्हाळा चा विषय असतो. दोन वेळ पोट भरेल इतका रोजगार आणि जीवन आवशक्य वस्तू स्वस्त असाव्यात ही अपेक्षा . बस हेच सामान्य लोकांना हवं असते आणि तेच मतदार आहेत. Bjp नी तिकडे लस द्यावे बाकी हिंदू म्हणून bjp ला कोणताच हिंदू विरोध करत नाही. जातीय राजकारण करणाऱ्या लोकांचे नांगे ठेचून काढा. एवढे केले तरी खूप झालं

काल एका समारंभात एका वक्त्याने चंपाचा उल्लेख माजी मंत्री असा केल्यानंतर, माजी म्हणू नका असे चंपाने सांगितले. त्यावर प्रश्न विचारल्यावर, २-३ दिवसात कळेल अशी चंपाने पुडी सोडल्याने गॉसिप सुरू झाले. आज एका समारंभात काही भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उठांनी, माझे आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, अशी सुरूवात केल्याने गॉसिप अजूनच वाढले. भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार अशी अनेक वाहिन्यांवर जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेना एकत्र येणार, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार असे अंदाज काही पत्रकार जूनपासून वर्तवित आहेत. उठा-मोदी भेट, पवार-मोदी भेट, पवार-शहा भेट, चंपा व उठाची वक्तव्ये यातून पत्रकारांना जोरदार खाद्य मिळाले आहे. परंतु अजून तरी पुढे काही झालेले दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत उठा मुख्यमंत्रीपद सोडणार नाहीत असे मला वाटते. गरज असेल तर भाजपने सेनेला पाठिंबा द्यावा पण मुख्यमंत्रीपद सेनेकडेच राहील यावर उठा ठाम राहणार. भाजपला मुख्यमंत्रीपद हवे असेल तर ते फक्त राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानेच मिळू शकेल. सेना किंवा राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणाच्याही नादी लागले तर वर्तमानात व भविष्यात भाजपला खूप मोठी किंमत द्यावी लागेल व महाराष्ट्रात भाजप संपेल हे नक्की.

क्रूर आक्रमक हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारा बख्तियार खिलजी च्या नावावर असलेले बख्तियारपुर हे नाव बदलण्यास नितीश कुमारांनी नकार दिला आहे. यामुळे बहुदा त्यांच्या मुस्लिम मत पेटीला धक्का लागण्याची शक्यता असावी असे दिसते. आमदार हरिभूषण ठाकूर यांनी बख्तियारपूरचे नितीश नगर असे नामकरण करण्याचे सुचवले होते . बिस्फी विधानसभेचे आमदार ठाकूर म्हणाले “जर अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज होऊ शकते तर बख्तियारपूर चे नितीश नगर का नाही? त्याचे नाव बदलून नितीश नगर करावे.

अंमलबजावणी संचालनालय, प्रमुख आर्थिक गुन्हे अन्वेषण संस्था, पूर्वीच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे (एनएसी) माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या घरावर छापा टाकला आहे. हर्ष मंदेर हे जॉर्ज सोरोस, ओपन सोसायटी फाउंडेशन्स यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय अनुदान निर्माण नेटवर्कचे सल्लागार मंडळ सदस्य आहेत. मँडर यांनी संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरूला फाशीतून वाचवण्यासाठी दया याचिकाही दाखल केली होती. सध्या जॉर्ज सोरोस हे जगात देशभक्तीशी लढण्यासाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च करत आहेत. त्यांना राष्ट्रवाद पसंत नाही आणि जगात साम्यवादी सत्ता आणायची आहे. मात्र त्यासाठी लागणारे पैसे मात्र ते लोकशाही देशा असलेल्या व्यवसायातून मिळवतात.

In reply to by श्रीगुरुजी

काही महिन्यांपूर्वीपर्यंत पंजाबात अमरिंदर आरामात जिंकतील असे वातावरण होते. पण काँग्रेस हायकमांडने अमरिंदर आपल्यापेक्षा मोठे होतील असे वाटून त्यांच्या गळ्यात नवज्योत सिध्दू हे लोढणे अडकवले. त्यातून आज ही वेळ आली आहे. तथाकथित शेतकरी आंदोलनाचे अमरिंदरसिंग जन्मदाते आहेत. नंतर तो प्रकार आपल्या नियंत्रणाबाहेर गेला हे त्यांच्या लक्षात आले असले तरी असल्या प्रकाराला राजाश्रय द्यायचे पाप कायमचे त्यांच्या माथी लागणारच. त्यामुळे त्यांच्याविषयी फार सहानुभूती नाही. तसेच सी.ए.ए प्रकरणावरूनही कॉंग्रेसचे अट्टल पुरोगामी धर्मनिरपेक्ष नेते असतात तसेच अमरिंदरही वागले होते. फक्त ३७० व्या कलमावरून कॉंग्रेसच्या इतरांपेक्षा थोडी वेगळी भूमिका त्यांनी घेतली हे पुण्य त्यांच्याकडे आहे. तेव्हा अमरिंदरविषयी फार सहानुभूती आहे असे अजिबात नाही. पण या प्रकारातून पंजाबात पोकळी निर्माण होत आहे. अकाली दल हा पक्ष पूर्वीपेक्षा बराच कमजोर झाला आहे. अकाली दलाचे ग्रामीण भागातील शीख मतदार आणि भाजपचे शहरी भागातील हिंदू मतदार एकत्र येऊन ती बर्‍यापैकी व्होटबँक बनत असे. आता अकालींनी भाजपची साथ सोडली आहे आणि पूर्वीइतका जोर त्यांच्यात राहिलेला नाही हे चित्र दिसते. २०१४ मध्ये आम आदमी पक्षाने पंजाबातील १३ पैकी ४ लोकसभेच्या जागा जिंकून मोठी मुसंडी मारली होती पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचे विमान जमिनीवर आले. तसेच पतियाळाचे डॉ. धर्मवीर गांधी हा चांगला नेता पक्ष सोडून गेला. हरविंदरसिंग फुलका हा दुसरा चांगला नेताही आता तितका सक्रीय दिसत नाही. सध्या भगवंत मान सारखे विदूषकच आघाडीवर दिसतात. पण या निर्माण झालेल्या पोकळीचा आम आदमी पक्षाला फायदा झाला तर ती वाईट गोष्ट असेल. पंजाबमधील आपला कॅनडातील शिखांचे मोठे समर्थन आहे असे मागे वाचले होते. कॅनडात मोठ्या प्रमाणावर खलिस्तान समर्थक आहेत. तसेच २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचार करायला पंजाबात आलेले केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी उतरले होते (त्यामुळेच काँग्रेसमागे हिंदू मते एकवटली आणि काँग्रेसला ११७ पैकी चांगल्या ८० जागा मिळाल्या). त्यामुळे आपची सहानुभूती खलिस्तानवाद्यांना (किंवा उलटे) असेल आणि या पोकळीचा फायदा आपला झाला तर ते देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाईट असेल. अमरिंदरसिंग आता पुढे काय करतात हे बघायचे. त्यांचे वय ७९ असल्याने आपला नवा प्रादेशिक पक्ष काढणे वगैरे प्रकार ते करायला जातील ही शक्यता त्यामानाने कमी दिसते. तसेही मागच्या निवडणुकांच्या वेळेसच 'ही माझी शेवटची निवडणुक' असे ते म्हणत होते. पण समजा अमरिंदरसिंगांनी आपला पक्ष स्थापन केला तर भाजपने त्यांच्याशी उघड/छुपी युती करावी असे वाटते. पंजाबच्या शहरी भागात हिंदूंमध्ये भाजपला बर्‍याच प्रमाणात पाठिंबा आहे. नुसत्या तेवढ्या मतांच्या जोरावर भाजप फार जागा जिंकू शकत नाही पण बरोबर अमरिंदरसिंगांची मते आली आणि त्यातून पंजाब विधानसभा त्रिशंकू झाली तर निदान खलिस्तानवाद्यांचे समर्थन असलेले सरकार पंजाबमध्ये सत्तेत येण्यापासून रोखता येऊ शकेल. अमरिंदरसिंगांविषयी अजिबात सहानुभूती नाही. वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसी संस्कृतीचे अर्क ते आहेत. पण खलिस्तानवाद्यांना सहानुभूती असायची शक्यता असलेले सरकार सत्तेत येण्यापासून रोखणे हे अधिक महत्वाचे असेल म्हणून भाजपने तसे नक्कीच करावे असे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पंजाबात यावेळी आआपला २०१७ पेक्षा जास्त मते व जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. जर कॉंग्रेसने सिधूसारख्या आचरट विदूषकाच्या नादी लागून अमरिंदरसिंगांना राजीनामा द्यायला लावून उर्वरीत ४-५ महिन्यांसाठी वेगळा मुख्यमंत्री निवडला तर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव नक्की आहे व त्या परिस्थितीत पंजाबात आआपचे सरकार येईल.

In reply to by श्रीगुरुजी

दुसर्‍या बाजूला आपकडून भगवंत मान असेल तर तो पण विदूषकपणात कमी आहे असे अजिबात नाही. त्या परिस्थितीत भगवंत मान आणि सिध्दू यांच्यात माकडचाळ्यांची स्पर्धा चालेल. तसे झाल्यास पंजाबमधील निवडणुक कोणत्याही राज्यपातळीवरील मुद्द्यावरून न होता स्थानिक पातळीवर जे उमेदवार लोकप्रिय असतील ते निवडून येतील आणि कोणा एका पक्षाच्या बाजूने लाट वगैरे काही नसेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्री मोदींनी नव्हे तर श्री राहुल गांधी यांनीच काँग्रेस मुक्त भारत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. कॉंगफ्रेस मध्ये जी काही चांगलीमंडळी होती त्यांना एका मागोमाग मुखभंग करून एक तर पक्ष सोडण्यास भाग पडले जात आहे किंवा अडगळीत टाकले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे नंतर सचिन पायलट आणि आता श्री अमरिंदर सिंह हे त्यातल्या त्यात चांगले असलेले नेते असून त्यांना राहुल गांधीपेक्षा डोईजड होऊ नयेत म्हणून बाजूला टाकले आहेत. बाकी बहुसंख्य नेते उदा कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी, रणदीप सुरजेवाला- हे अजिबात जनाधार नसलेले आहेत. उद्या काँग्रेसच्या जागा २५-३० इतक्या कमी झाल्या तर या भंपक माणसांना राज्यसभेवर निवडून जाणे सुद्धा कठीण होईल. पंजाब राज्य हरियाणा आणि हिमाचल प्रदेश वेगळा झाल्यावर तेथे शीख पंथ सोडून दुसरा मुख्य मंत्री होऊ दिला जात नाही असा इतिहास आहे. सद्य स्थितीत कोणत्याच पक्षाकडे मुख्यमंत्री बनण्या साठी चांगला शीख नेता मला तरी दिसत नाही. श्री नवज्योत सिद्धू याना मुख्यमंत्री केले तर काय स्थिती होईल हे सांगणे कठीण आहे परंतु त्यांची वैचारिक बैठक पाहता ते निदान खलिस्तानवाद्यांकडे जाणार नाहीत असे वाटते. अन्यथा श्री भगवंत मान आणि त्यांच्यात कोण जास्त वाईट हे ठरवणे कठीण आहे. श्री भगवंत मान हे कधी कधी शुद्धीत असतात असा त्यांच्या बद्दल प्रवाद आहे. बाकी पुढची पाच वर्षे पंजाब मध्ये अधांतरी विधानसभा येईल असे वाटते. याचा भाजप ने पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे.