अमेरिका-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांदरम्यान AUKUS (ऑस्ट्रेलिया-युके-युएस) हा संरक्षणकरार झाला. त्यानंतर अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी विकायची घोषणा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फ्रान्सबरोबर पारंपारीक (आण्विक नाही) पाणबुड्या विकसित करायच्या २०१६ पासून चालू असलेल्या प्रकल्पातून माघार घ्यायची घोषणा केली. त्यामागचे कारण कळले नाही पण कदाचित आण्विक पाणबुडी मिळत असेल तर मग पारंपारीक पाणबुड्यांची तितक्या प्रमाणावर गरज राहणार नाही हे कारण असावे का? कल्पना नाही. फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामधील हा करार अनेक बिलिअन डॉलर्सचा होता म्हणजे मोठ्या रकमेचा होता. हा करार गेल्यामुळे फ्रान्सचे बरेच व्यावसायिक नुकसान होणार आहे. आणि हे सगळे झाले अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी विकायच्या निर्णयामुळे. त्यामुळे फ्रान्स संतप्त झाला आहे आणि अमेरिकेने आपला विश्वासघात केला असे म्हटले आहे. तसेच फ्रान्सने अमेरिकेतील आणि ऑस्ट्रेलियातील आपला राजदूतही परत बोलावला आहे. दुसर्या देशातून राजदूत परत बोलावणे ही खूप टोकाची स्थिती निर्माण झाल्यावरच केले जाते. कारगील युध्द चालू असतानाही आपला राजदूत पाकिस्तानात होता. तो परत बोलावला नव्हता. २००१ मध्ये संसदभवनावर हल्ला झाल्यानंतर तो परत बोलावला गेला होता. सांगायचा उद्देश हा की इतक्या टोकाच्या परिस्थितीतच हे पाऊल उचलले जाते.
ट्रम्पतात्या अध्यक्ष असताना अमेरिकेचे मित्रदेशांशी संबंध बिघडतील म्हणून भिती व्यक्त केली गेली होती. जागतिक आरोग्य संघटना वगैरे चीनच्या गुलाम संघटनांना मदत थांबविणे, यु.एनचा मानवाधिकार आयोग वगैरे बेगडी लोकांची मदत थांबविणे हे चांगले निर्णय तात्यांनी घेतले होते. तसेच शीतयुध्द संपून इतकी वर्षे झाल्यानंतरही नाटोच्या माध्यमातून युरोपातील मित्रदेशांचे संरक्षण करायची जबाबदारी अमेरिकेने आपल्या अंगावर घ्यायची गरज नाही असे म्हटले होते. त्यातून हे संबंध बिघडतील अशी भिती व्यक्त केली जात होती. पण तसे काही झाले नाही. मात्र जगभरातील विचारवंतांच्या गळ्यातील ताईत जो बायडन अध्यक्ष झाल्यावर मात्र अमेरिकेचे मित्रदेशांशी संबंध बिघडताना दिसत आहेत.
पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण असेल या प्रश्नाचे उत्तर शोधताना काँग्रेस चाचपडताना दिसत आहे. सोनिया गांधींनी अंबिका सोनींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण आपल्याला त्यात स्वारस्य नसल्याचे अंबिका सोनींनी सांगितले आहे. नवज्योतसिंग सिध्दू बरोबरच काँग्रेस नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांचे चिरंजीव सुनील जाखड यांचीही नावे चर्चेत आहेत. त्याप्रमाणेच माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा, अमरिंदरसिंगांच्या मंत्रीमंडळातील मंत्री विजय इंदर सिंगला यांची नावेही चर्चेत आहेत.
१९६६ मध्ये पूर्वीच्या मोठ्या पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब आणि हरियाणा या राज्यांची स्थापना झाली. त्यापूर्वी गोपीचंद गुज्जर, भीमसेन सच्चर वगैरे हिंदू मुख्यमंत्री झाले होते. पण १९६६ नंतर पंजाबमध्ये एकही हिंदू मुख्यमंत्री झाला नाही. अशा परिस्थितीत जर अंबिका सोनी, सुनील जाखड ही नावे चर्चेत असली तरी ते बरेच मोठे स्थित्यंतर असेल.
पंजाबमध्ये काँग्रेससाठी इतके अनुकूल वातावरण काही महिन्यांपूर्वीच होते- जर कोणते राज्य काँग्रेस नक्कीच जिंकेल अशी खात्री देता येईल असे एक राज्य असेल तर ते पंजाब अशी परिस्थिती होती. असे असताना काँग्रेसने स्वत:च्या हाताने आपल्याच गळ्याला नख लावले आहे असे दिसते. गेल्या काही महिन्यात भाजपनेही उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलले. पण ती प्रक्रीया कोणताही त्रास न होता एकदम सरळ मार्गाने पार पडली. काँग्रेसच्या बाबतीत पंजाबात तसे होताना दिसत नाहीये.
पंजाबात हिंदू मुख्यमंत्री केला तर खलिस्तानवादी, अकाली दल इ. ना एक शीख अस्मितेचा जोरदार मुद्दा हातात मिळेल. त्यामुळे कॉंग्रेस हिंदू मुख्यमंत्री निवडेल असे वाटत नाही.
शेवटीकॉंग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी रामदासिया या दलित शीख जातीच्या चरणजीत सिंह चन्नी यांची निवड केली आहे. कॉंग्रेस शीख नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे धाडस करणार नाही असा अंदाज होताच. असे धाडस कॉंग्रेसमध्ये पूर्वी फक्त इंदिरा गांधी करीत होत्या.
अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महिला कल्याण मंत्रालय बंद करण्यात आले आहे आणि त्या इमारतीत सद्गुणांचा प्रसार करायला आणि दुर्गुणांना रोखायला स्थापन केलेल्या नव्या मंत्रालयाला जागा दिली आहे. आता सद्गुण आणि दुर्गुण म्हणजे काय हे कोण ठरवणार? तर अर्थातच शरीया कायद्यामध्ये जे अपेक्षित आहे तसे वर्तन म्हणजे सद्गुण आणि त्याविरोधातील वर्तन म्हणजे दुर्गुण. सौदी अरेबियातही रियाधमध्ये धार्मिक पोलिस असतात आणि धर्माविरोधात वर्तन झाल्यास ते जागच्या जागी फटके मारतात असे ऐकले आहे. खखोदेजा. तशाप्रकारे सद्गुणांचा प्रसार करायला हे नवे मंत्रालय असणार असे दिसते. आणि अफगाणिस्तानात महिला कल्याणमंत्रालय हवे कशाला? त्याची गरजच काय? नाहीतरी स्त्रियांना घरी कोंडूनच राहायचे असणार आहे आणि बाहेर पडताना नवरा, वडिल, भाऊ किंवा मुलगा यांच्याबरोबरच बाहेर पडायचे असेल तर मग वेगळ्या महिला कल्याणमंत्रालयाची काहीच गरज नाही!!
आता हे नवे तालिबान आहे- हे तालिबान २.० आहे असा घोषा लावणारे जगभरातले विद्वान लोक यावर काय म्हणणार हेच बघायचे.
ह्यांची अशीच अधोगती होत राहवी,नवीन शोध,यंत्र,तंत्र ह्यांच्या इथे कधीच लागू नयेत .ह्यांना अर्वाचीन काळात च जगू ध्या.
जे काही नवीन शोध लागतील,नवीन यंत्र ,तंत्र,हत्यार निर्माण होतील ह्याची कोणतीच माहिती ह्यांच्या शी शेअर जगाने करू नसे.. नवं उपचार,औषध,लसी,ही माहिती पण ह्यांच्या शी शेअर करू नये..
अल्ला च्या भरवश्यावर ह्यांना राहू ध्या..
पण पाश्चिमात्य राष्ट्र नालायक आहेत.पैसे मिळावे म्हणून ह्यांना आधुनिक हत्यार,औषध पुरवत असतात...
दारूडा दुश्मन असेल तर त्याची दारू सोडवू नका स्वतःच्या पदरची पाजा ..
धोका पूर्ण टळेल.
मुस्लिम राष्ट्र अजुन धर्मांध आणि अर्वाचीन काळात जातील तेवढे जगाच्या फायद्याचे आहे.
पोलिसांनी किरीट सोमय्यांना कराड स्थानकातून ताब्यात घेतले. काल मुंबईत ही त्याना स्थानबद्ध केले होते. सोमय्यानी केलेले आरोप खरेच असण्याची शक्यता आहे नाहींतर सोमय्यांना एव्हढा त्रास दिला नसता.
पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. नवज्योत सिध्दू कधीपासून मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेऊन होता. कॅप्टननंतर आपणच मुख्यमंत्री होणार असे सिध्दूंना वाटत होते. आता सिध्दू हे कसे काय मान्य करणार हे बघायचे.
पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदरसिंग (तसेच अजून पूर्वी बियंतसिंग) असे हायप्रोफाईल नेते होते. त्या तुलनेत चरणजितसिंग चन्नी हे तितके वरीष्ठ नाहीत.
केंद्रात bjp सत्तेवर आहे विरोधही काँग्रेस सह बाकी पक्ष आहेत.
ह्या विरोधी पक्षांनी सामान्य लोकांना रोज च्या जीवनात येणाऱ्या अडचणी विषयी किती आंदोलन केली.
उत्तर
एक पण नाही.
ह्यांची आंदोलन कोणती CAA ला विरोध .
ह्या मध्ये सामान्य लोकांचे कोणते हित आहे .
राजकीय पक्षांची राजकीय आंदोलन सामान्य लोकांच्या प्रश्न पासून खूप लांब जात आहेत.
पण मूर्ख जनता राजकीय पक्षांच्या डावपेचात उगाचच सहभागी होत असते.
महाराष्ट्र मध्ये bjp विरोधी पक्षात आहे .
Bjp ची आंदोलन,विरोध
अर्णव साठी
सुशांत साठी.
कंगना साठी.
हे संपले की
.
राणे साहेबांचे माकड चाळे,फडणवीस,चंपा,किरीट ह्यांचे तमाशे.
सर्व च्या सर्व राजकीय पक्ष सामान्य लोकांच्या हिता साठी विरोध आंदोलन करणार नाहीत आणि करत ही नाहीत.
कारण सामान्य लोकांस राजकीय पक्षाचं राजकीय तमाशा चाच आवडत आहे.
त्यांना स्वतः लाच स्वहित समजत नाहीत.
शिक्षित देशातील अशिक्षित जनता इथे च एकवटली आहे.
आठ वर्षांच्या एका हिंदू मुलावर ईशनिंदा केल्याचा आरोप झाल्यानंतर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका मशिदीतून पाणी आणण्यासाठी एका हिंदू कुटुंबाला मारहाण करून ओलीस ठेवण्यात आले.
गेल्या आठवड्यातील एका घटनेनुसार, आलम राम त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह कच्चा कापूस काढत होता. जेव्हा हे कुटुंब जवळच्या मशिदीत नळाचे पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले तेव्हा त्यांना स्थानिक जमीनदार आणि त्यांच्या माणसांनी मारहाण केली. हिंदू कुटुंब कापूस उतरवून घरी परतत असताना त्यांना जमीनदारांनी उचलले आणि एका आऊट हाऊसमध्ये ओलिस ठेवले. मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल रामच्या कुटुंबावर पुन्हा अत्याचार करण्यात आले.
नंतर काही स्थानिक रहिवाशांनी कशीबशी या कुटुंबाची सुटका केली.
पीडीत हिंदु असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
पाकिस्तानात हिंदु ३८% होते आता फक्त ०.२% उरले आहेत.
हे सर्व लोक कुठे गेले याचा काहीही तलास लागत नाही म्हणजे त्यांना वरील प्रमाणे त्रास देऊन धर्मांतरीत केले गेले आहे. किंवा मारून टाकले आहे.
पीडीत १४ वर्षीय सरकारी शाळेत विद्यार्थिनी आहे. इशाक अलीने आपली ओळख लपवून मुलीशी मैत्री करण्यासाठी स्वतःला राज म्हणून ओळख दिली होती. नंतर, जेव्हा तिला त्याची खरी ओळख कळली तेव्हा तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. मात्र, तो मागे हटला नाही आणि मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिला. त्याने तिला तिचे आयुष्य उध्वस्त करण्याची आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.
शुक्रवारी तो पीडितेचा पाठलाग करून जबरदस्तीने तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ती ओरडू लागली. पीडित मुलीचे कुटुंबीय आणि शेजारी तिच्या मदतीला धावले आणि इशाकला ताब्यात घेतले. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.
लव्ह जिहाद हे प्रथमतः केरळातील चर्च उघडकीस आणले होते. त्या नंतर शिक्षा म्हणून त्या फादरचे हात छाटले गेले होते असे म्हणतात. हे लव्ह जिहाद चे प्रकार देशभर पसरलेले आढळून येतात. यात एका पद्धतीने मुस्लिम नसलेल्या मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
कॅनडामध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला ३३८ पैकी १५८ तर विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ११९ जागा मिळाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकांमध्ये ट्रुडोंच्या पक्षाला १५५ जागा होत्या तर विरोधी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ११९ जागाच होत्या. लवकर निवडणुका घेण्यामागे बहुमत मिळवायचा ट्रुडोंचा हेतू साध्य झालेला दिसत नाही. ट्रुडो हरायलाच हवा होता. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीये.
आज खा. रामदास आठवले म्हणाले " सोनिया मॅडम यांनी मनमोहन सिंह यांच्या ऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला हवे होते"
शरद पवार पंतप्रधान झाले असते तर काय असले असते आजचे चित्र ?
२००४ मध्ये कॉंग्रेसचे १४५ खासदार होते. कॉंग्रेसबरोबर युती केलेल्या लालूच्या राजदचे २४ खासदार होते, द्रमुकचे १६ खासदार होते तर राष्ट्रवादीचे ९ खासदार होते.
कोणत्या आधारावर कॉंग्रेसने आपल्या पक्षाचा पंतप्रधान न करता, मोठ्या सहकारी पक्षांचा पंतप्रधान न करता, सोनिया गांधींच्या परकीय मुळाला आक्षेप घेणाऱ्या पवारांना पंतप्रधान करायला हवे होते?
दीड टक्का खासदार असलेल्या माणसाला कोणत्या आधारावर पंतप्रधान करायचे?
बाकी श्री रामदास आठवले याना तर संसदेत सुद्धा कुणी गंभीरतेने घेत नाही हे त्यांच्या असंख्य व्हिडिओमधून स्पष्ट होतं .
महाराष्ट्रातील फक्त काही जिल्ह्यांंच्या बाहेर प्रभाव नसलेल्या पवारांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कोणीही गांभीर्याने घेत नाही. मोदी पवारांना बरोबर मॅनेज करतात. त्यामुळे ३७० कलम रद्द करणे, तोंडी घटस्फोटावर बंदी घालणे, कृषी विधेयके, नागरिकत्व सुधारणा कायदा अशा महत्त्वाच्या विधेयकांना संसदेच्या बाहेर पवार विरोध करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदेतील खासदार विधेयकांवर मत न देता अनुपस्थित राहतात व मोदींना मदत करतात.
सिधूच्या चिथावणीला बळी पडून कॉंग्रेस श्रेष्ठींंनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून अमरिंदरसिंगांना हटविले. परंतु आपल्याला मुख्यमंत्री न केल्याने नाराज झालेल्या सिधूने राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ नवीन मुख्यमंत्री चन्नींच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री रझिया सुलताना व अजून दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. आता काही वेळापूर्वी अमरिंदर सिंगांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. ते भाजपत येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री कालच आआपमध्ये सामील झाले. सुश्मिता देव तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या. तर दुसरीकडे भारताचे तुकडे करण्यासाठी अल्लाची दुवा मागणारा कन्हैया कुमार कॉंग्रेसमध्ये सामील झाला. गाळातून अजून गाळात अशी कॉंग्रेसची अवस्था होत आहे.
श्री मोदी याना जे हस्तांदोलन करतात त्यांचा सुपडा साफ होतो अशी वदंता आहे.
ट्रम्प झाले. आताच मर्केल बाई झाल्या
आपले काँग्रेसचे महायुवा नेते तर भर संसदेत स्वतः त्यांच्या गळ्यात पडले होते.
मग काँग्रेसचे अजून काय होणार?
Bjp ची उचलबांगडी दिल्ली आणि बाकी राज्या मधून होणे गरजेचे आहे.
आघाडी सरकार विरोधी पक्ष स्थापन करतील .असंख्य लोक आताच्या पंतप्रधान पेक्षा कर्तुत्व वान आहेत कोणी ही ते पद सांभाळेल.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलीय. म्हणजे भाजपने अजून एका आयारामाला उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपने समाधान औताडेला पक्षात आणून उमेदवारी दिली होती.
पुढील विधानसभा निवडणुकीत फडणवीस, चंपा, मुनगंटीवार, शेलार अशा ८-१० जागा सोडल्या तर उर्वरीत सर्व जागांवर भाजपकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा पक्षातून भाजपत आणलेले आयाराम उभे असतील.
गुजरातमधील गांधीनगर महापालिका निवडणुकीत भाजपने ४४ पैकी ४१, कॉंग्रेसने ३ व आआपने १ जागा जिंकली.
ओखा नगरपालिका निवडणुकीत भाजपने ३६ पैकी ३४ जागा जिंकल्या.
भानवड नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने २४ पैकी १६ जागा जिंकून नगरपालिका भाजपकडून हिसकावून घेतली. भाजपला फक्त ८ जागा मिळाल्या.
प्रतिक्रिया
अमेरिका-फ्रान्स मतभेद
चांगला उहापोह
In reply to अमेरिका-फ्रान्स मतभेद by चंद्रसूर्यकुमार
ट्रुंप वाट लावतील ही फक्त हवा होती
In reply to अमेरिका-फ्रान्स मतभेद by चंद्रसूर्यकुमार
फ्लोरिडामध्ये पुढील ऑक्टोबर महिना 'हिंदू वारसा महिना'
बाबुल सुप्रियोने तृणमूल
पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण?
पंजाबात हिंदू मुख्यमंत्री
In reply to पंजाबचा नवा मुख्यमंत्री कोण? by चंद्रसूर्यकुमार
शेवटीकॉंग्रेसने पंजाबच्या
In reply to पंजाबात हिंदू मुख्यमंत्री by श्रीगुरुजी
अफगाणिस्तानात महिलाकल्याण मंत्रालय बंद
हे तर उत्तम च आहे ना
In reply to अफगाणिस्तानात महिलाकल्याण मंत्रालय बंद by चंद्रसूर्यकुमार
पोलिसांनी किरीट सोमय्यांना
चरणजितसिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
राजकिय महानाट्य शी सामान्य लोकांचा काय संबंध
बरं मग ?
In reply to राजकिय महानाट्य शी सामान्य लोकांचा काय संबंध by Rajesh188
शेतकर्यांसाठी आपला गळा चिरून ठेवेन
पाकिस्तानात हिंदू कुटुंबाला मारहाण करून ओलीस ठेवले
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करण्यासाठी इशाक अली राज बनला
कॅनडातील निवडणुका
आज भारत बंद आहे म्हणे.
फक्त दिल्ली
In reply to आज भारत बंद आहे म्हणे. by श्रीगुरुजी
आज खा. रामदास आठवले म्हणाले "
२००४ मध्ये कॉंग्रेसचे १४५
In reply to आज खा. रामदास आठवले म्हणाले " by चौथा कोनाडा
ममोऐवजी पवार पंतप्रधान असते
In reply to आज खा. रामदास आठवले म्हणाले " by चौथा कोनाडा
दीड टक्का खासदार असलेल्या
In reply to ममोऐवजी पवार पंतप्रधान असते by श्रीगुरुजी
महाराष्ट्रातील फक्त काही
In reply to दीड टक्का खासदार असलेल्या by सुबोध खरे
सिधूच्या चिथावणीला बळी पडून
श्री मोदी याना जे हस्तांदोलन
In reply to सिधूच्या चिथावणीला बळी पडून by श्रीगुरुजी
बळजबरीने मोदींच्या गळ्यात
In reply to श्री मोदी याना जे हस्तांदोलन by सुबोध खरे
पंतप्रधान कोणी ही झाले तरी लोक खुश होतील
तुम्ही व्हा पंतप्रधान
In reply to पंतप्रधान कोणी ही झाले तरी लोक खुश होतील by Rajesh188
नांदेडमधील देगलूर विधानसभा
गुजरातमधील गांधीनगर महापालिका