"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122906
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकाला एक न्याय
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
हे कुठे सिद्ध झाले आहे?
In reply to एकाला एक न्याय by विकास
मला वाटले
In reply to हे कुठे सिद्ध झाले आहे? by संजय क्षीरसागर
सुशील कुमार शिंदे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते?
In reply to मला वाटले by विकास
हुरळून गेले नाही?
In reply to सुशील कुमार शिंदे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते? by संजय क्षीरसागर
दादा,
In reply to हुरळून गेले नाही? by हतोळकरांचा प्रसाद
दादा, प्रतिक्रया परत एकदा निट
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
आंदोलन संपवणं हि अपरिहार्यता होती ?
In reply to दादा, प्रतिक्रया परत एकदा निट by हतोळकरांचा प्रसाद
सांगणे न लागे!
In reply to आंदोलन संपवणं हि अपरिहार्यता होती ? by संजय क्षीरसागर
आय विश इट्स दॅट सिंपल.
In reply to हे कुठे सिद्ध झाले आहे? by संजय क्षीरसागर
करेक्ट!
In reply to आय विश इट्स दॅट सिंपल. by अर्धवटराव
असा राजकीय फायदा बघण्यात केजरीवालांना सुतराम इंटरेस्ट नाही
In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर
आता राजकारण प्रश्नाधिष्ठित होईल
In reply to असा राजकीय फायदा बघण्यात केजरीवालांना सुतराम इंटरेस्ट नाही by अर्धवटराव
आता राजकारण प्रश्नाधिष्ठित होईल
In reply to आता राजकारण प्रश्नाधिष्ठित होईल by संजय क्षीरसागर
सोमनाथ भारती
In reply to एकाला एक न्याय by विकास
"आप"आपला चष्मा..
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
व्यक्तिगत रोष कसला? माझी त्यांची ओळखपण नाहीये.
In reply to "आप"आपला चष्मा.. by चिगो
केजरीवालां बद्दल...
In reply to चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा : by संजय क्षीरसागर
हे घ्या
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
सत्यवदे वचनाला
In reply to हे घ्या by विकास
आणि आता हे किर्की एक्स्टेंशन भागातल्या लोकांच मत पाहा
In reply to सत्यवदे वचनाला by विकास
वांशिकता...
In reply to आणि आता हे किर्की एक्स्टेंशन भागातल्या लोकांच मत पाहा by संजय क्षीरसागर
असे दिसते आहे की ते (रेसिस्ट वागणे) तुम्हाला मान्य आहे?
In reply to वांशिकता... by विकास
आहे ना
In reply to असे दिसते आहे की ते (रेसिस्ट वागणे) तुम्हाला मान्य आहे? by संजय क्षीरसागर
बर्ड्स ऑफ सेम फिदर
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
मला जरास वेगळ वाटत..
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
.........ना घटना काय आहे ते शिकवायची गरज नाही.
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
हे वाचावेhttp://www.loksatta
प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का?
युएन चा संबंध नाही
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या
खुलासा
In reply to युएन चा संबंध नाही by विकास
....भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन...!!!!
In reply to खुलासा by हुप्प्या
असहमत आहे
In reply to ....भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन...!!!! by विनोद१८
+१,००,०००
In reply to ....भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन...!!!! by विनोद१८
त्यावरच्या झालेल्या खर्चाचे एव्हढे विशेष काय घेउन बसलात ??? आपले आन्थरुण व पान्घरुण दोन्ही चान्गली मोठी आहेत याची खात्री बाळगा. हा देश तेव्ह्ढा तथाकथित गरीब वा दरीद्री नक्कीच नाही.लाखाची गोष्ट ! १. अश्या सोहळ्यांचा आणि प्रदर्शनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा जागतिक स्तरावर तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे अणि इतर अनेक प्रकाराने देशाला होतो. या संस्थापित आणि सर्वमान्य प्रकाराने देशाच्या प्रतिमेला (इमेज) होणारा फायदा इतर कोठल्याही जाहिरातबाजीवर जरी त्यापेक्षा १०० पट खर्च केला तरी होणे शक्य नसते, शिवाय इतर जाहिरातबाजीला बटबटीतपणाचे रुप येऊन हसे होऊ शकते ते वेगळेच. ३. परदेशातल्या वरिष्ठ राजकिय अधिकार्यांना अश्या कार्यक्रमाची आमंत्रणेही हा वरचा १ मधला संदेश "योग्य जागी" पोहोचविण्यासाठीच असतात. शिवाय दरवर्षी मुख्य पाहुणे म्हणून एखाद्या राष्ट्रनेत्याला आंमंत्रित केले जाते, तीही एक राजकिय खेळी /संदेश असतो... आमत्रित देशाला मैत्रीचा आणि शत्रुपक्षाला जरबेचा. उदाहरणर्थ जपानी पंतप्रधानांना आमंत्रण हे जपानशी दोस्ती आहे हे दर्शविते तितकेच तो चीनला "आम्हीही तुझ्याभोवती 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' ह्या तुझ्याच नीतिचा फास आवळू शकतो" हा संदेश आहे. २. लष्करी तयारीच्या अश्या प्रदर्शनाने देशातिल जनतेचे मनोधैर्य आणि देशाभिमान वाढवायलाही मदत होते. अश्या सार्वजनिक प्रदर्शनाअभावी केवळ राजकिय बडबड म्हणजे ट्रकच्या मागे "मेरा भारत महान" असे लिहिण्याप्रमाणे हास्यास्पद ठरते... वचनाला दृश्य साधनांची सबळ जोड आहे हे दाखवणे जास्त परिमाणकारक असते. बर्याचदा आपल्या देशात सांपत्तिक दारिद्र्यापेक्षा वैचारीक आणि मानसिक दारिद्र्य फार मोठ्या प्रमाणात आहे हेच दिसते (दुर्दैवाने) :(मुख्य म्हणजे अश्या काही
In reply to +१,००,००० by डॉ सुहास म्हात्रे
ते शक्तीप्रदर्शन आता होणारे हो
In reply to मुख्य म्हणजे अश्या काही by डॉ सुहास म्हात्रे
अजिबात नाही...
In reply to ते शक्तीप्रदर्शन आता होणारे हो by संजय क्षीरसागर
हे विधान भ्रष्ट सत्ताधार्यांना लागू होईल!अजिबात नाही... हे वाक्य सामान्य जनतेलाच उद्द्येशून लिहिलेले आहे. "राजकारणी = भ्रष्टाचारी" हे समिकरण कमीअधिक प्रमाणात खरे आहे हे आता राजकारणी लोक आणि पक्ष उघडपणे मान्य करताहेतच... कारण "निवडून येण्याची क्षमता = निवडणूकीचे तिकीट मिळण्याची पात्रता" हे सगळ्या पक्षांचे उघड धोरण आहे, हे तर वर्तमानपत्रातही छापून येत आहे. तेथे लोकोपयोगी कामे करण्याची क्षमता/लायकी नावाला पण विचारली जात नाही. मात्र मतदारांना अजून पाच वर्षांत १०+ कोटी कमावणार्यांना "भारी माणूस" च्या ऐवजी "जनतेच्या पैशाचा चोर" म्हणण्याइतकी अक्कल आहे आणि ती ते वापरतात याचा काही पुरावा (एक दोन 'नि-जर्क' उदाहरणे सोडता) अजून तरी नाही, असा त्या वाक्याचा किमान आणि साधा-सरळ अर्थ आहे. लैच इस्काटून सांगायला लावता राव... हुश्श्य !मात्र मतदारांना अजून पाच वर्षांत १०+ कोटी कमावणार्यांना...
In reply to अजिबात नाही... by डॉ सुहास म्हात्रे
मुळात लायक उमेदवार नाही ही
In reply to मात्र मतदारांना अजून पाच वर्षांत १०+ कोटी कमावणार्यांना... by संजय क्षीरसागर
आय अॅग्री!
In reply to मुळात लायक उमेदवार नाही ही by डॉ सुहास म्हात्रे
पण मुळात प्रश्न असा होता की
In reply to ते शक्तीप्रदर्शन आता होणारे हो by संजय क्षीरसागर
पण मुळात प्रश्न असा होता की आपल्याला शक्तीप्रदर्शनाची पडलीये का राज्याच्या सुव्यवस्थेची.दोन्हींची दोन्हींची सारखीच आणि सतत गरज आहे. दोन्हीं उत्तम असण्यासाठी सतत एकाच वेळेस प्रयत्न चालू असले पाहिजेत. दुसरीला वगळून कोणी एक (एक्सक्लूजिव) अथवा एकामागोमाग एक करणे हे दोन्हीही पर्याय व्यावहारीक नाहीत.दोन्ही व्यवस्था उत्तम हव्यात यात वाद कुठे आहे?
In reply to पण मुळात प्रश्न असा होता की by डॉ सुहास म्हात्रे
म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न
In reply to दोन्ही व्यवस्था उत्तम हव्यात यात वाद कुठे आहे? by संजय क्षीरसागर
>>>ब्राँकायटीस झाला
In reply to म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न by डॉ सुहास म्हात्रे
इक्का तुमच्याकडून ही अपेक्षा नाही :
In reply to म्हणजे तब्येत सांभाळताना नग्न by डॉ सुहास म्हात्रे
उत्तरे
In reply to +१,००,००० by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to उत्तरे by हुप्प्या
खरंतर या प्रतिसादाला
In reply to उत्तरे by हुप्प्या
आणि एक फार महत्वाचे...
In reply to खरंतर या प्रतिसादाला by डॉ सुहास म्हात्रे
माफ करा..
In reply to प्रजासत्ताक दिनाचे नको इतके स्तोम का? by हुप्प्या