नातं तुझं माझं
लेखनविषय:
काव्यरस
नातं तुझं माझं
आठवणींच्या पलिकडलं
मनात वसलेलं
डॊळ्यात साठलेलं
हृदयात साठवलेलं
नातं तुझं माझं
पाण्यासारखं नितळ
गहिरं जस कातळं
खोल जस तळं
हिरव गार जस मळं
नुसत्या नावात न अडकणारं
नुसत्या रेषांमधे न सामावणारं
नुसत्या आभाळात न मावणारं
नुसत्या देहात न राहणारं
नातं तुझं माझं
प्रसन्ना जीके.
वाचने
1335
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
वाह वाह छान कविता. ( आम्हाला कवितेतले येव्हडेच कळते)
मिसळपावावरती स्वागत आहे :)
जेष्ठ कवी
©º°¨¨°º© प .रा. कवी ©º°¨¨°º©
आमचे राज्य
वाह वाह