Skip to main content

मी

लेखक अजिंक्य यांनी रविवार, 13/09/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
जाणुनी, झुंजीत नाही शूर मी, दौडलो ऐसा कसा चौखूर मी ||१| काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी ||२|| ओघ हे मोठे नद्यांचे वाहती, गावच्या छोट्या नळाचा पूर मी ||३|| या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५||
लेखनविषय:

वाचने 2251
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

या जगी जे मोठमोठे गायले, वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४|| झकास... मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75…

इतकी जबरदस्त गझल वाचल्यावर काव्यप्रांती काय माझी थोरवी, आग बाकीचे, फुकाचा धूर मी हे कुणाला पटेल? :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

इतकी अप्रतिम गझल लिहिली आहे..!! मस्तच!! का अजिंक्या, मोह काव्याचा पडे, त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५|| हे खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. गझल शिकण्यासाठी मला प्रोत्साहित करणारे माझे वडील, त्याचप्रमाणे मिपावरील राघव, बेसनलाडू इ. सदस्यांचे मनःपूर्वक आभार. अजिंक्य.